गुलाबी ओठ बनवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती टिप्स Pink Lips Tips in Marathi

pink lips tips in marathi गुलाबी ओठ बनवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती टिप्स, आज आपण या लेखामध्ये आयुर्वेदिक घरगुती उपचार वापरून आपण ओठांची काळजी कशी घ्यायची आणि ओठांना गुलाबीसर रंग येण्यासाठी काय करावे ते आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. सध्या अनेक प्रकारे आपल्या सौंदर्याकडे प्रत्येक व्यक्ती बारकाईने पाहत असतात आणि ओठ देखील आपल्या सौंदर्याचा भाग आहे आणि सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये देखील आपल्याला अनेक प्रकारचे बदल हे घडवून आणणे खूप गरजेचे असते आणि आपल्याला देखील लोक जसे वागतात तसेच आपल्यामध्ये देखील बदल घडवून आणावे लागतात.

ओठ देखील आपला एक महत्वाचा अवयव आहे आणि सध्या स्त्रिया ओठांना गडद लिपस्टिक लावून आपले ओठ लाल किंवा गुलाबी रंगाचे बनवतात. हे दिसताना खूप छान दिसते परंतु त्याचे नंतर नंतर दुष्परिणाम दिसतात म्हणजेच त्याच्या केमिकल युक्त प्रोडक्टचे आपल्या ओठांच्यावर दुष्परिणाम दिसतात आणि त्यामुळे आपले ओठ कोरडे होणे काळे पडणे या सारख्या अनेक समस्या उद्भवतात.

परंतु अनेक लोकांना माहित नाही कि आपल्या ओठांचा रंग घरगुती उपाय वापरून गुलाबी बनवता येतो आणि त्याचे काही दुष्परिणाम देखील नसतात आणि त्याचे निकाल देखील आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतात आणि आपण जे उपाय वापरू ते नैसर्गिक असल्यामुळे ते खूप फायदेशीर देखील ठरू शकतात. चला तर आता आपण नैसर्गिकरित्या आणि आयुर्वेदिक घरगुती उपाय वापरून आपले ओठ गुलाबी कसे बनवू शकतो ते पाहूया.

pink lips tips in marathi
pink lips tips in marathi

गुलाबी ओठ बनवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती टिप्स – Pink Lips Tips in Marathi

ओठ गुलाबी रंगाचे बनवण्यासाठी उपाय – tips for pink lips in marathi

सध्या लोक आपल्या सौंदर्याकडे खूप लक्ष देतात आणि ओठ हा देखील आपल्या सौंदर्याचा भाग आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या ओठांची देखील काळजी घेतली पाहिजे. वर सांगितल्या प्रमाणे स्त्रिया आपल्या ओठांना वेगवेगळ्या रंगाचे लिपस्टिक लावतात आणि ओठांचे सौंदर्य वाढवतात पण त्याचे थोड्या दिवसांनी अनेक दुष्परिणाम दिसून येतात म्हणून आज आपण खाली काही नैसर्गिक रित्या म्हणजेच घरगुती आयुर्वेदिक उपचार वरून ओठांना गुलाबी रंग कसा अनु शकतो ते पाहणार आहोत.

  • ओठांना गुलाबी रंग आणण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे घरगुती प्रयत्न करत असतो आणि त्यामधील एक म्हणजे आपण व्हॅसलीन मध्ये आपण जर बीट चा रस घालून ते आपण रोज लावले तर आपल्या ओठांना थोड्याच दिवसामध्ये गुलाबी रंग येवू शकतो. तुम्ही दोन चमचे व्हॅसलीनमध्ये १ ते दीड चमचा बीटचा रस घाला आणि मग त्यामध्ये २ थेंब खोबरेल तेला घाला आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून रिकाम्या झालेल्या लीप बाम च्या दाबीमध्ये भरून ठेवा आणि ते तुम्ही न चुकता रोजच्या रोज ते तुमच्या ओठांना लावा.
  • ओठांची जर स्वच्छता नाही केली तर आपले ओठ हे काळपट दिसू शकतात आणि म्हणून तुम्ही रोजच्या रोज ओठांची स्वच्छता आणि काळजी घेतली पाहिजे. तुमचे ओठ जर काळपट झाले असतील तर तुम्ही एक वाटीमध्ये अर्धा चमचा साखर घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध घाला आणि ते मिक्स करून ओठांना लावा आणि ते स्क्रब करा. यामुळे तुमचे ओठ स्वच्छ देखील दिसतील आणि ओठांना गुलाबी रंग देखील येण्यास मदत होईल.
  • डाळिंबाचा वापर हा अनेक आरोग्य फायद्यासाठी ओळखले जाते आणि आपण रोज डाळिंब खाल्ल्यामुळे आपले रक्त वाढते त्यामुळे अपोआप आपले ओठ गुलाबी दिसण्यास मदत होते. तसेच आपण जर डाळिंब्याचा रस काढून त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज आपल्या ओठांना लावले तर आपल्या ओठांच्या रंग बदलण्यास मदत होते.
  • हळदी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि हळदीचा वापर हा अनेक आरोग्य समस्यांच्यासाठी केला जातो. तसेच जर आपले ओठ काळपट दिसत असतील तर आपण ओठांचा काळपट पणा घालवण्यासाठी हळदीचा वापर करू शकतो. अर्धा चमचा हळदीमध्ये थोडेसे दुध (अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा जास्त) घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या आणि मग ती तुमच्या ओठांना लावा आणि ते तसेच १५ ते २० मिनिटे ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा. असे रोज न चुकता केल्याने आपल्या ओठांचा काळपट पणा कमी होण्यास मदत होते आणि ओठांना गुलाबी रंग देखील येतो.
  • बीट हे ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी एक महत्व पूर्ण कामगिरी बजावते आणि म्हणून मी तुम्हाला अस सिजेस्ट करतो कि तुम्ही बीटचा एक छोटासा काप घ्या आणि तो दोन्हि ओठांना ५ ते ६ मिनिटे लावत रहा आणि मग तुमचे ओठ १० मिनिटे तसेच ठेवा आणि १० मिनिटानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे ओठ स्वच्छ आणि गुलाबी रंगाचे दिसतील.
  • दालचिन मुळे देखील आपल्या ओठांना रंग येतो असे म्हंटले जाते तसेच ओठांचा काळपट पणा देखील कमी होणाय्स मदत होप्ते असे म्हटले जाते आणि म्हणून तुम्ही दालाचीनची पावडर बनवा आणि त्यामध्ये थोडे खोबऱ्याचे तेल घाला आणि त्याची पेस्ट बनवा आणि ते ओठांना १० मिनिटासाठी लावा मग ते गार पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग जर तुम्ही महिनाभर न चुकता केला तर तुमचे ओठ गुलाबी होतील आणि ओठांचा काळपट पणा देखील दूर होण्यास मदत होईल.
  • आपण जर ओठांना स्ट्रॉबेरीचा रस जरी लावला आणि मग ते १५ ते २० मिनिटाने स्वच्छ पाण्याने धुतले तर यामुळे देखील आपल्या ओठांच्या रंगामध्ये फरक पडलेला दिसून येतो.
  • बदामाचे तेल देखील ओठांना गुलाबी रंग आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बदामाचे तेल हे आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते आणि हे तेल जर आपण रोज रात्री झोपताना ओठांना लावले तर आपल्या ओठांचा रंग बदलण्यास मदत होते.
  • तुम्हाला जर ओठांना गुलाबी रंग आणि मऊ पणा यावा असे वाटत असेल तर तुम्ही ओठांना रोज तुम्हाला सूट होणारे मॉईश्चरायझर लावले तर ते देखील फायद्याचे ठरू शकते.
  • ऑलीव्ह ऑईल जर ओठांना लावले तर तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी रंगाचे होऊ शकतात.
  • लिंबू हा अनेक आरोग्य समस्यांच्यासाठी वापरला जातो आणि लिंबू रस हा तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांच्यासाठी वापरला जातो आणि हा ओठांचा काळपट पणा कमी करण्यासाठी देखील वापरू शकता. लिंबू रस ओठांना लावून ५ ते ७ मिनिटे मसाज करा आणि फरक पहा तुमच्या ओठांचा काळपट पणा हा कमी झालेला असेल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या pink lips tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुलाबी ओठ बनवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती टिप्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tips for pink lips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!