आजचा आदर्श विद्यार्थी निबंध Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi आदर्श विद्यार्थी निबंध मराठी ‘आदर्श विद्यार्थी’ यातील ‘विद्यार्थी’ vidyarthi in marathi या शब्दाचा अर्थ आपल्या लगेच लक्षात येतो, विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती जी दररोज विद्या ग्रहण करते. पण, आदर्श म्हणजे काय? समाजात आदर्श नाहीत असे प्रत्येक पिढीच्या काळात बोलले जाते. प्रत्येक पिढीला असे वाटते की आदर्शांची वानवा आहे. मात्र आपले प्राचीन काळातील राम-कृष्ण यांसारखे आदर्श आपण विसरतोच, तसेच आपल्या अवतीभोवतीही वर्तमानकाळात अनेक आदर्श असतात; त्याकडे मात्र आपण कानाडोळा करतो. आजच्या या लेखात आपण आदर्श विद्यार्थी या विषयावर निबंध लिहिणार आहोत.

डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे हे जोडपे आदर्श म्हणजे काय ? हे दर्शवतात. डॉ. कोल्हे यांनी लग्न केले तेंव्हा एक अट आपल्या भावी वधूला म्हणजे डॉ. स्मिता यांना घातली होती की, महिना फक्त चारशे रुपयात संसार करायचा, दररोज किमान २०-३० किमी चालायचे, लग्नासाठी फक्त दोन हार असतील वगैरे.

आजही हे जोडपे याच साध्या पद्धतीने जगत आहे आणि आपली सगळी कमवत दान करताना दिसत आहे. आदर्श ही काळाची गरज असली तरी ती प्रत्येक काळात उपलब्ध असतेच हेच खरे, फक्त त्या आदर्शाला ओळखण्याची आपल्याला दृष्टि पाहिजे. आदर्श म्हणजे दुसऱ्यांसाठी उत्तम, परिपूर्ण काही करण्याची उमेद, प्रेरणा असणे होय. नैतिक मूल्ये मानणाऱ्या सत्प्रवृत्त व्यक्तींना समाज आदर्श मानतो.

adarsh vidyarthi nibandh in marathi
adarsh vidyarthi nibandh in marathi

आजचा आदर्श विद्यार्थी निबंध मराठी – Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध 

माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात. काही चांगले तर काही वाईट ! अशा प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता ही मर्यादीत असते. आपल्याला वाटते की यावर उपाय शोधण्यासाठी आपण कोणतीही चुक करू नये. अरे पण माणूस आहे, चुका या होणारच. चुका केल्याशिवाय त्यातून नवीन शिकायला कस मिळणार ?

फक्त पुस्तकी अभ्यास करतो, वर्गात पहिला नंबर येतो, म्हणून तो आदर्श विद्यार्थी झाला का? तर नाही. अशा लहान – मोठ्या चुकांमधून नवीन काहीस शिकणारा आणि परत त्या चुका होऊ नये याकडे लक्ष देणारा, पुस्तकी अभ्यासाबरोबर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा ही अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणजे आदर्श विद्यार्थी अस म्हणता येईल.

कोणताही आदर्श विद्यार्थी जन्मापासून आदर्श होत नाही. तो चांगले ज्ञान मिळवून व चांगल्या लोकांच्या संगतीत राहून आदर्श बनतो. प्रत्येक गुरूचे स्वप्न असते की त्याचा संपुर्ण वर्ग आदर्श विद्यार्थ्यांनी भरलेला असावा. असे म्हणतात की जर एखादे कार्य आपण पुन्हा – पुन्हा करत असू तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते. आदर्श विद्यार्थ्याचे काही गुण पुढीलप्रमाणे आहेत . त्यांना आचरणात आणून सामान्य विद्यार्थी ही आदर्श होऊ शकतात.

एका आदर्श विद्यार्थ्यामधील सगळ्यात महत्वाचा पहिला गुण म्हणजे तो ‘ मेहनती’ असतो.  त्याच्या अभ्यासात सातत्यपणा असतो. तो आपल्या आयुष्यातील स्वप्न, ध्येय निर्धारित करून ठेवतो आणि त्या मार्गाने आपली वाटचाल सुरु ठेवतो. तो अभ्यास असो ,खेळ असो वा त्याच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट असो ती उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करताना तो कधीही संकोच करीत नाही.

आदर्श विद्यार्थ्यातील दुसरा महत्वाचा गुण म्हणजे त्याच्यातील’ ऊर्जावारपणा’ . एक आदर्श विद्यार्थी नेहमी ऊर्जेने भरलेला असतो, तो कधीही आळस करीत नाही . तो दररोज सकाळी लवकर उठतो आणि पहाटे अभ्यास करतो, त्याची दिनचर्याही ठरलेली असते. फास्टफुड जास्त न खाता, तो नेहमी आरोग्यदायी भाजीपाला खातो. त्यामुळे, त्याच्या शरीरात ऊर्जा राहते आणि अभ्यास करताना त्याला मदत होते.

‘जिज्ञासा’ हे देखील आदर्श विद्यार्थ्याचे महत्वाचे लक्षण आहे. नवनवीन गोष्टींमध्ये त्याला आवड असते आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तो स्वतःमध्ये जिज्ञासा निर्माण करतो.

‘सकारात्मकता’ ही त्याच्यामध्ये ठासून भरलेली असते. आदर्श विद्यार्थी हा आपल्या आयुष्याकडे आणि आयुष्यात येणाऱ्या समस्यांकडे सकारात्मकतेने पाहतो, त्यामुळे या समस्यांमधून बाहेर पडणे त्याला सोपे जाते. सकारात्मक दृष्टीकोनच सर्व समस्या सोडवण्यास साहाय्यक आहे.

आदर्श विद्यार्थ्यामधील सगळ्यात उल्लेखनीय ठरणारा गुण म्हणजे  तो ‘नेहमी खरे बोलतो’, व मोठ्यांच्या ‘आज्ञेचे पालन करतो’.

त्याच्या मनात इतरांविषयी आदर असतो. आईवडील तसेच, गुरुंच्या प्रत्येक आज्ञेचे तो पालन करतो.

खरंतर, असा आदर्श विद्यार्थी घडवण्यात शिक्षक, आई – वडील आणि  समाजाचे योगदान महत्त्वाचे ठरते. लहानपणापासूनच मुलांना योग्य ते संस्कार देऊन त्यांना योग्य वळण आई – वडिलांना लावता येत. मुलं मोठी झाली आणि शाळेला जाऊ लागली की त्यांची जबाबदारी शिक्षकांवर असते, ते त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्याकडून तयारी करून घेतात आणि यशाचा मार्ग दाखवतात .

समाजातील लोकांकडून मुलांना प्रगती करण्यासाठी प्रेरणा तसेच, उत्स्फूर्तता मिळते . थोडक्यात काय, तर एका आदर्श विद्यार्थ्यामागे त्याचे आई – वडील, गुरु आणि समाज असतो. त्यासाठी, आवश्यकता आहे की शाळा तसेच पालक मंडळींनीही आपल्या मुलांकडे योग्य लक्ष देऊन त्यांना आदर्श गुणांनी शिक्षित केले पाहिजेत तरच, त्यातून एक आदर्श विद्यार्थी घडायला मदत होईल.

आजकाल आपण पाहिलं तर लक्षात येईल की, विद्यार्थ्यांना योग्य असे शिक्षण मिळत नाही. शाळेच्या, महाविद्यालयांच्या फिज इतक्या वाढतायेत की आदर्श गुण असूनही विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेले शिक्षण फक्त पैसे नसल्या कारणाने घेता येत नाहीय. असे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.

ज्ञानाचे मंदिर आज कुठंतरी बँकेचे रुप धारण करताना दिसतं आहे. शिवाय, आजचा विद्यार्थी हा परिक्षार्थी ही बनताना आपल्याला दिसतोय. फक्त परिक्षेत चांगले गुण, टक्के आणि डिग्री संपादन करण्यासाठी शिक्षण घेणे ही त्यांची शिक्षण घेण्याची पद्धत बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मुल्यमापन करण्याची आजची ही परिक्षा पद्धत कुठंतरी बदलली पाहिजे .

आजचा विद्यार्थी हा अधिक प्रगल्भ, विचारवंत, कर्तबगार, तसेच महत्वाकांक्षी आहे. आपल्या हक्कांविषयी तो जागरूक आहे. गरज आहे ती या विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीकडे स्वातंत्र्य संपादनाचे ध्येय होते. देशभक्तांसाठी एकाहुन एक असे ध्येयनिष्ठ आदर्श होते.

म्हणूनच, तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा अमूल्य असा वाटा आहे. असे उदात्त कार्य जरी आजच्या विद्यार्थ्यांपुढे ठेवले गेले तरी ही युवापिढी अफाट असे कर्तृत्व गाजू शकेल. अनेक संकटप्रसंगी त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण अशा प्रसंगी विद्यार्थी आघाडीवर असतात.

श्रमदान, रक्तदान यामध्ये आजची तरुण पिढी पुढाकार घेताना आपल्याला दिसते. जीवाची बाजी लावून अडचणींचा डोंगर पार करतात. मात्र, दुसरीकडे आपल्या गुणांचे, कष्टांचे चीज होत नाही असे पाहिल्यावर हे विद्यार्थी प्रक्षुब्ध होतात. त्यामुळे, आजच्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता धिटाने प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले पाहिजेत .

कोणत्याही देशाचा विद्यार्थी हा त्या देशाचं भविष्य असतो. देशाचा विकास हा आदर्श अशा विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे, आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये आदर्श आणायला हवेत आणि हे करन काही कठीण काम नाहीय. आदर्श विद्यार्थ्यांचे गुण समजुन ते आत्मसात केले की सामान्य विद्यार्थीही आदर्श व्यक्तिमत्त्व बनतो.

अंगातील रोमारोमांत आणि कणाकणात देशप्रेम ओसंडून वाहणारे सावरकर, गरिबांच्या आणि अस्पृश्यांचा उद्धारकर्ता, ज्ञानदाता असणारे महात्मा फुले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडूच्या माध्यमातून गावाची घाण साफ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करणारे संत गाडगेबाबा, तलवार टाकून हातामध्ये झाडू घेऊन सरहद्द प्रांतावरील स्वतःच्या हाताने विस्कळीत केलेले.

संसार पुन्हा एकत्रित करून ‘सरहद्द गांधी’ या उपाधीस पात्र ठरणारे, हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारणारे, नेहमी सत्याचा मार्ग पत्करनारे महात्मा गांधी. गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु, पटेल,  नेताजी, अशी कितीतरी ईश्र्वररूपी माणसे समाजापुढे, आजच्या तरुण पिढीपुढे आदर्श उभा करतात.

त्यांच्या जीवनातून आजच्या विद्यार्थ्यांनी आदर्श घेतले पाहिजेत. आजचा विद्यार्थी झटपट मोठे होण्याच्या स्पर्धेत उतरला आहे, त्याला सगळ काही अगदी झटपट हव अस वाटत; त्यामुळे, त्याला यश लवकर मिळाले नाही, तर तो निराश होतो .

‘कर्मण्येवाधीकारस्ते मा फलेषु कदाचन’ अर्थात अरे, माणसा कर्म करत रहा; पण, फळाची अपेक्षा करू नकोस. असे येथे म्हटले आहे. अशाप्रकारचे उदात्त तत्वज्ञान या देशामधल्या हिंदूनी आधारभूत मानलेली गीता देते. त्यामुळे, याही गोष्टी आपण आत्मसात केले पाहिजेत. शेवटी, प्रत्येक चांगल्या गोष्टीत आदर्श हा असतोच तो ओळखुन आजच्या विद्यार्थ्यांनी फक्त कृती केली पाहिजेत; त्यानंतर मग आपल्या संपुर्ण देशातील विद्यार्थी हे ‘आदर्श विद्यार्थी’ बनतील.

चुकलेला वाटसरू मी

वाट चुकलो होतो …..

परिचित दिशा चारी जरी

नवदिशा शोधत होतो …..

फसव्या जगामध्ये मी

स्वतःला शोधत होतो …..

जीवनाच्या या आडवटेवर

आदर्श विद्यार्थी बनत होतो ….

– तेजल तानाजी पाटील

                बागीलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या adarsh vidyarthi nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “आजचा आदर्श विद्यार्थी निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aajcha adarsh vidyarthi nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि adarsh vidyarthi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण adarsh vidyarthi nibandh या लेखाचा वापर ideal student essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!