वायू प्रदूषण मराठी माहिती Air Pollution Information in Marathi

Air pollution information in Marathi – Vayu Pradushan Information in Marathi हवा (वायू) प्रदूषण माहिती नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना! कारण आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे आपल्या निरोगी आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. ‘हवा प्रदूषण’, हो आपण याला वायू प्रदुषण (Vayu Pradushan) किंवा इंग्रजीमध्ये Air pollution ही म्हणतो. तर हे हवा प्रदुषण काय असते? याची कारणे काय आहेत? याचे कोणते दुष्परिणाम होतात? तसेच याला रोकण्याचे उपाय कोणते? हे सर्व आपण या सदरात पाहणार आहोत.

air-pollution-information-in-marathi
Air Pollution Information in Marathi

हवा (वायू) प्रदूषण माहिती – Air Pollution Information in Marathi

हवा प्रदुषण म्हणजे काय? 

शुद्ध वा आवश्यक घटकामध्ये जेव्हा दूषित, अशुद्ध आणि अनावश्यक घटक नैसर्गिक रित्या मिसळले जातात तेव्हा अशा वेळी याला प्रदुषण म्हणतात. आणि असे प्रदुषण जेव्हा हवे शी निगडित असते तेव्हा त्याला ‘हवा प्रदुषण’ असे म्हणतात. हवामान बदलामुळे झालेल्या प्रदूषणाला ही हवा प्रदुषण किंवा वायू प्रदुषण म्हणतात.

हवा प्रदुषण होण्यासाठी बरीच नैसर्गिक व मानवनिर्मित घटक कारणीभूत आहेत. आपल्या पृथ्वीवर प्राणी, वनस्पती व असंख्य सूक्ष्मजीव यासारखे सजीव राहतात. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन ची गरज असते, हे आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत.

पण सजीवांना ऑक्सिजन बरोबरच कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजन ची ही आवश्यकता असते. पण विविध कारणामुळे व हवामान बदलांमुळे या आवश्यक वायूंच्या प्रमाणात घट होते असते.

हवा प्रदुषण होण्याची कारणे! 

  • जेव्हा वाहनांमधून इंधन जळते तेंव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन चे उत्सर्जन होत असते. आपण खाजगी वाहने वापरतो. त्याबरोबरच विमाने, रेल्वे, जहाज यासारख्या सार्वजनिक वाहनांमधून मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साइड व कार्बन चे उत्सर्जन होते.
  • कारखान्यांमधून सल्फर डायॉक्साईड सारखे वायू उत्सर्जित होत असतात. जेव्हा कोळसा आणि रॉकेल गंधक म्हणजेच सल्फर जळते तेव्हा त्याचे ऑक्सिजन सोबत रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फर डायॉक्साईड तयार होते.
  • भोपाळ मध्ये झालेली विषारी वायू गळती सर्वांना ठाऊक असेलच अशा वायू गळतीमुळे वायू प्रदुषण होते.
  • वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हवेत कार्बन चा स्तर वाढतो आणि त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूचे प्रमाण देखील वाढते.
  • अस्वच्छता, उघडी गटारे, नाले, व्यवस्थित रित्या निचरा न केलेले सांडपाणी यामुळे मिथेन सारख्या विषारी वायूचा फैलाव होतो.
  • युद्ध, महायुद्ध यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले, दारूगोळा वापरला जातो. यामधून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी याबरोबरच वायू प्रदुषण होत असते.

हवा प्रदूषणाचे परिणाम !

तर अशाप्रकारे आपण वायू प्रदूषणाची विविध कारणे आपण पहिली. आता आपण याचे दुष्परिणाम लक्षात घेऊ.

  • वायू प्रदूषणामुळे जीवित व त्याबरोबरच वित्त हानी ही होत असते. आपण पाहिले आहे वाहनं, रेल्वे, विमान यासारख्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन जळत असते. त्यामधून कार्बन मोनॉक्साइड, नायट्रस ऑक्साइड यासारखे विषारी वायू बाहेर पडतात.
  • हे वायू फार हानिकारक असतात, त्यामुळे श्वसन संस्था बिघडू शकते. फुफुसाचे आजार उद्भवतात. नायट्रस ऑक्साइड डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे तसेच त्वचेचे आजार होतात.
  • रेल्वे , कारखान्यात जेव्हा कोळसा आणि रॉकेल जळून गंधक मुक्त होते. तेव्हा गंधक ऑक्सिजन बरोबर संयोग पाऊन सल्फर डायॉक्साईड बनते. सल्फर डायॉक्साईड पावसाच्या पाण्यात मिसळून सल्फुरिक आम्ल तयार होते.
  • याला आम्ल पर्जन्य सुद्धा म्हणतात. यामुळे शेतजमीन नापीक होतात तसेच इमारतीचे मटेरियल असतं त्याची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे इमारतींचे आयुष्य कमी होते.
  • अस्वच्छता, सांडपाणी, तसेच हरितगृह यामुळे मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन , नायट्रस ऑक्साईड यासारख्या वायूंचे उत्सर्जन होते. मिथेन हा कार्बन डायऑक्साइड पेक्षाही २१ पटीने अधिक हानिकारक आहे. हा वायू अगदी जास्त प्रमाणात श्वसन नलिकेत गेला तर मृत्यू ही ओढवतो.
  • क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजेच CFC  यामुळे ओझोन वायूच्या थरात घट होते. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सृष्टीचे रक्षण ओझोन वायू करत असतो. त्यामुळे जर ओझोन च्या थराला हानी झाली तर पृथ्वीवरील सृष्टीचे भविष्य हे अगदी धोक्यात येऊ शकते.
  • मानवा प्रमाणेच इतर सजीवांच्या आरोग्यावर देखील अगदी खोलवर विपरीत परिणाम होतात. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या २०१४ सालच्या अहवालानुसार २०१२ साली ७ दशलक्ष जीवित हानी झाली. त्याच्याही अगोदर ४.५ दशलक्ष मनुष्य हानी झाली होती.

हवा प्रदुषण रोखण्याचे उपाय! 

वायुप्रदूषण रोखण्यासाठी जागतिक स्तरापासून ग्रामीण स्तरावर बरेच प्रयत्न केले जात आहेत. सरकार जी पावले उचलतात त्याबरोबरच प्रत्येक नागरिकाचीही ही वैयक्तिक जबाबदारी आहे.

  • सर्वात प्रथम वृक्षतोड पूर्णपणे थांबवणे व वृक्षारोपण करणे हे अगदी महत्वाचे आहे. कारण झाडांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन ही निर्माण होतो व त्याबरोबरच कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण कमी होते. जमिनीमध्ये मिसळलेला नायट्रस ऑक्साईड ही झाडे शोषून घेतात. झाडांमुळे हवा शुद्ध राहते.
  • बरीच यांत्रिक उपकरणे चालवण्यासाठी, वाहने चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते. हेच इंधन जर आपण पर्यावरण प्रेमी वापरले तर दूषित वायूंचे उत्सर्जन होणार नाही. म्हणजेच सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जा यासारख्या नविकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे काळाची गरज आहे. तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करणे, सायकलचा किंवा विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांचा , आणि लांबच्या ठिकाणी जाताना सार्वजनिक वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे.
  • मिथेन सारख्या विषारी वायूंचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी स्वच्छता राखणे, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करणे महत्वाचे असते. त्याबरोबर मिथेन चा आपण बायोगॅस म्हणून इंधनाच्या रुपात सकारात्मक उपयोग करू शकतो.
  • सभोवतालच्या वातावरणा बरोबर आपल्याला वैयक्तिक वातावरणाचा विचार करणे महत्वाचे असते. स्वयंपाक घरात निरनिराळे पदार्थ बनवत असताना जो धूर आणि रसायने हवेत मिसळली जातात ती जर मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यास त्रास होतो त्यासाठी स्वयंपाक खोलीत खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. कारखान्यात वेल्डिंग सारख्या कामांमुळे जो दूषित वायू पसरतो त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण घटू शकते. अशावेळी तोंडाला मास्क लावून त्या धुराचा निचरा करणे महत्वाचे असते.
  • शेतात काम करणारी, रस्त्यांची कामे करणारी मजूर , दगडांवर कलाकृती करणारे मजूर, सिमेंट कारखान्यात काम करणारे कामगार, रंग काम करणारे कामगार यांनी वैयक्तिक काळजी घेऊन राहिले पाहिजे. कारण यांना आरोग्य बिघाडण्यासाठी जागतिक हवा प्रदूषणाची गरज नाही तर त्यांच्या अगदी जवळचे घटकच कारणीभूत ठरत असतात.
  • हवा प्रदूषणा बरोबर, पाणी प्रदुषण, भूमी प्रदुषण देखील पर्यावरणाला धोक्यात आणतात. ग्रेटा थनबर्ग सारखी १८ वर्षांची मुलगी जर जागतिक स्तरावर पर्यावरणासाठी आवाज उठवत असेल तर आपण आपल्या सभोवतालचे पर्यावरण नीटनेटके ठेवण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करू शकतो.

air pollution information in Marathi वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हवा प्रदूषण कशामुळे व का होते ?व त्याचे दुष्परिणाम  काय आहेत त्याच बरोबर ते रोखण्याचे उपाय देखील आपण या लेखात पाहिले आहेत. air pollution information in Marathi LANGUAGE हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही हवा प्रदूषण विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!