आकाश ठोसर मराठी माहिती Akash Thosar Biography in Marathi

Akash Thosar Biography in Marathi – Akash Thosar Information in Marathi आकाश ठोसर मराठी माहिती मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक जेष्ठ मान्यवरांनी कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जनतेला हसवण्याचा, प्रेम देण्याचा प्रयत्न केला. असेच काही ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते ज्यांनी सुपर-डुपर हिट सिनेमे दिग्दर्शित केले, निर्मित केले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी निर्मित केलेला फॅन्ड्री हा चित्रपट अतिशय सुपरहिट ठरला होता. त्यानंतर २०१६ मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराट नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला ज्याने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये इतिहास घडवला.

सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अप्रतिम प्रेम मिळालं आणि या चित्रपटामध्ये ज्याने मुख्य भूमिका साकारली होती जो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे तो म्हणजे अभिनेता आकाश ठोसर. यांच्या बद्दल आपण आजच्या ब्लॉग मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

akash thosar biography in marathi
akash thosar biography in marathi

आकाश ठोसर मराठी माहिती – Akash Thosar Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)आकाश ठोसर
जन्म (Birthday)२४ फेब्रुवारी १९९३
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील पुणे
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)अभिनेता

जन्म

आकाश ठोसर यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९९३ रोजी झाला. आकाशचा म्हणजेच आपल्या लाडक्या परशाचा जन्म महाराष्ट्रातील पुणे इथला आहे. आकाशच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत तर आकाशचे वडील एक गवंडी आहेत आणि आई गृहिणी आहे. आकाशच चित्रपट सृष्टी मध्ये पाऊल ठेवणा-या आधीच त्याच आयुष्य काही वेगळं होतं.

आता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण या आधी आकाशला कुस्तीचे वेड होतं. आकाश ठोसर हा एक माझी कुस्तीपटू म्हणून ओळखला जातो. परंतु आकाशला एक्टिंगची देखील आवड आहे. चित्रपट सृष्टीमध्ये आकाशने अतिशय तरुण वयामध्ये इतकं मोठं यश प्राप्त केलं आहे. आकाश ठोसर याने त्याचं शालेय शिक्षण श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथून पुर्ण केलं.

आकाशने त्याच पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले या पुणे विद्यापीठामधून पूर्ण केल आहे. याच विद्यापीठांमधून आकाश ठोसर त्याचं पदवीचे शिक्षण घेत आहे.

चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल

आकाश ठोसर आता चित्रपट सृष्टी मधंल एक मोठं नाव बनला आहे. आकाशला चित्रपट सृष्टी मध्ये यायच्या आधी कुस्तीचे वेड होतं परंतु त्याने त्याच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक नाटकं केली आहेत. नागराज मंजुळे हे सिनेमा सृष्टीतील एक मोठे दिग्दर्शक आहेत त्यांनी आतापर्यंत केलेली सर्व चित्रपट सुपरहिट राहिली आहेत.

नागराज मंजुळे हे जेव्हा सैराट चित्रपटासाठी अभिनेता शोधत होते तेव्हा त्यांच्या भावाने आकाश खेळामध्ये गुंतलेला असताना त्याचं छायाचित्र काढलं आणि ते चित्र नागराज मंजुळे यांना पाठवून दिलं नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा फारच आवडला आणि आकाशला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. आकाशने सैराट चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून ऑडिशन दिलं आणि त्याचं सिलेक्शन देखील झालं.

२०१६ मध्ये नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आणि बघताक्षणी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या तोंडावर फक्त आणि फक्त सैराट चित्रपटाचं नाव होतं. चित्रपटात आकाश ठोसर याने प्रशांत काळे म्हणजेच परश्या ही भूमिका साकारली होती.

आकाशने केलेली परशाची भूमिका ही सुपरहिट ठरली प्रेक्षकांना आर्ची आणि परशाची जोडी फारच आवडली होती. याच चित्रपटामुळे आकाश ठोसर याला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेम मिळायला सुरुवात झाली. आकाश ठोसर याचा सैराट हा मराठी चित्रपट सृष्टी मधील पहिला सिनेमा होता आणि या त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं अत्यंत यशस्वी असा हा चित्रपट आहे. सैराट हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टी मधील सर्वात हिट सिनेमा म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

फक्त महाराष्ट्रात सैराट चित्रपटाने ८२.९५ करोड रुपये कमवले नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं बजेट चार करोड ठेवलं होतं फक्त चार करोड मध्ये हा अतिशय अप्रतिम सुपरहिट चित्रपट निर्मित केला गेला. परंतु या चित्रपटात एकशे दहा करोड रुपये इतकी कमाई केली आहे आणि ही मराठी चित्रपट सृष्टीमधील आत्तापर्यंतची सर्वाधिक कमाई मानली जाते.

आकाश ठोसर याच्यासोबत या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरु यांनी नायिकेची भूमिका बजावली होती. या चित्रपटामुळे आकाशने त्याच्या घरच्यांच, कुटुंबीयांचं, त्याच्या शाळेच स्वतःच्या महाविद्यालयाचं त्याच्या जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाव रोशन केले आहे. या चित्रपटानंतर सोशल मीडियावर तर आकाश ठोसर फारच प्रसिद्ध झाला.

या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली की पुढे जाऊन हा चित्रपट हिंदी, पंजाबी, ओडिया, बंगाली, आणि कन्नड या भाषांमध्ये पुन्हा रिमेक केला गेला. फक्त भारतातच नाही तर या चित्रपटाने भारताबाहेर देखील झेप घेतली दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपला मराठी चित्रपट झळकला.

आकाश ठोसर याने याच चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टी मध्ये प्रवेश केला आणि आपण ज्या चित्रपटात काम केले त्या चित्रपटाने इतके यश मिळाले हे पाहून त्याला त्याने केलेल्या श्रमाची पोचपावती मिळाली. सैराट हा सिनेमा मराठी सिनेसृष्टी साठी ऐतिहासिक ठरला. सैराट चित्रपटासाठी आकाश ठोसर याने तब्बल १३ किलो वजन कमी केले होते.

या चित्रपटानंतर आकाश ठोसर यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली त्यांनी या चित्रपटात मुख्य नायक म्हणून एक चांगली भूमिका बजावली आहे. या चित्रपटामुळे आकाश ठोसर यांनी आणि युट्युब वर शंभर च्या पुढे मुलाखती दिल्या आहेत. तसेच चला हवा येऊ द्या, कपिल शर्मा शो यांसारखे अनेक लोकप्रिय शो मध्ये त्यांनी पदार्पण केलं.

या चित्रपटानंतर आकाशला एफ यु फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१८ मध्ये आकाश ठोसर यांचा तिसरा चित्रपट वासन कथा प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये आकाश ठोसर यांचा हा चौथा चित्रपट झुंड प्रकाशित झाला. झुंड हा एक बॉलीवूड चित्रपट आहे. आकाश ठोसर याने २०२१ मध्ये एक वेब मालिका देखील केली आहे.

त्या वेळी मालिकेचे नाव आहे १९६२ वाॅर इंन हिल्स. सध्या आकाशने नेटफ्लिक्स वर पदार्पण केलेल आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिच्यासोबत लस्ट स्टोरीज चित्रपटांमध्ये आकाशने तेजस नावाच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेत पहायला मिळाला. आकाश ठोसर यांच नेटवर्थ अंदाजे दहा कोटीच्या आसपास आहे. आकाश ठोसर हा एक तरुण अभिनेता आहे.

इतक्या छोट्या वयामध्ये त्याने इतके मोठे यश प्राप्त केल आहे. आकाश ठोसर यांच्यासारखे तरुण युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहेत सोशल मीडियावर देखील आकाश चे भरपूर चाहते आहेत आकाश आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना प्रेरणा देत असतो.

बरेच पालक त्यांच्या मुलांना चित्रपट सृष्टी मध्ये जाण्यापासून आडवतात किवा ज्या मुलांच अभिनेता-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आहे ती मुलं त्यांच्या पालकांन मुळे आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. परंतु आकाश ठोसर यांच्यासारखे तरुण या मुलांना प्रेरणा देण्याचं काम करत आहे आकाश ठोसर यांनी त्यांच्या लहान वयामध्ये खूप मोठे यश प्राप्त करून दाखवल आहे.

त्यामुळे ते बऱ्याच तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. आकाश ठोसर यांच्या सारख्या उत्कृष्ट अभिनेत्याची चित्रपटसृष्टीला गरज आहे. आकाशने त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सैराट चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला होता.

तो म्हणजे आकाशची सैराट चित्रपटाची ऑडिशन होण्याआधी सहा महिने पूर्वी आकाशाला अशी बातमी मिळाली होती की सैराट चित्रपटाची शूटिंग सुरू आहे आणि तो खूप उत्सुक होता त्याला स्वतःला सैराट चित्रपटाची शूटिंग बघायची होती आणि सहा महिन्यानंतर त्याला स्वतःलाच सैराट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि या गोष्टी वरून त्याला आता ही हसू येतं.

पुरस्कार

आकाश ठोसर यांना आधीही अभिनयामध्ये रस होता. जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ज्या वेळी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि त्यांचा पहिलाच चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. सैराट हा मराठी चित्रपट भारताबाहेर पोहोचला याचे सर्व श्रेय आकाश ठोसर याच्या उत्कृष्ट अभिनयाला व त्यासोबतच त्याच्या संपूर्ण टीमला जात.

सैराट चित्रपटासाठी आकाश ठोसर याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर झी मराठी पुरस्कार व झी सिने पुरस्कार मध्ये आकाश ठोसर यांना सर्वोत्कृष्ट पुरूष पदार्पण पुरस्काराने गौरविण्यात आलं. फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्ये आकाश ठोसरला सर्वोत्कृष्ट पुरूष पदार्पण पुरस्कार देण्यात आला.

सैराट चित्रपटानंतर आकाशला अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. आकाश एक यशस्वी अभिनेता बनला आहे. त्याचा पहिला चित्रपट भारताबाहेर प्रदर्शित झाला. हेच त्याच्यासाठी खूप मोठ पुरस्कार आहे. आपल्या मराठी मातीत दिग्दर्शित निर्मित झालेला मराठ्या भाषेचा चित्रपट आकाश ठोसर यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे भारताबाहेर देखील पोहोचला याचं कौतुक आणि अभिमान आपल्या सर्वांनाच आहे.

आम्ही दिलेल्या akash thosar biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आकाश ठोसर मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या akash thosar information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of akash thosar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये akash thosar in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!