अमिताभ बच्चन विषयी माहिती Amitabh Bachchan Information in Marathi

Amitabh Bachchan information in Marathi – Amitabh Bachchan Biography in Marathi अमिताभ बच्चन विषयी माहिती अमिताभ बच्चन भारतीय सिनेसृष्टीतील एक मोठं नाव. सन १९७० ते १९८० हा भारतीय सिनेसृष्टीतील सुवर्ण काळ ठरला. या काळामध्ये अभिताभ बच्चन यांनी भरपूर लोकप्रियता प्राप्त केली. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेमा सृष्टीच्या इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व बनले. त्यांच्या अभिनयाने त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं आणि पुढे अमिताभ बच्चन यांना अनेक पुरस्कार जाहीर झाले.

या पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, तीन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि तसेच सोळा फिल्मफेयर पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आले होते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण महान, सर्वश्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

amitabh bachchan information in marathi
amitabh bachchan information in marathi

अमिताभ बच्चन विषयी माहिती – Amitabh Bachchan Information in Marathi

पूर्ण नाव (Name)अमिताभ बच्चन
जन्म (Birthday)११ ऑक्टोबर १९४२
जन्म गाव (Birth Place)इलाहाबाद, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)अभिनेता

Amitabh Bachchan biography in Marathi

जन्म, शिक्षण व वैयक्तिक आयुष्य

इलाहाबाद, उत्तर प्रदेश (११ ऑक्टोबर १९४२). प्रसिद्ध हिंदी कवी डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्या जन्माच्यावेळी त्यांचे नाव इंकलाब श्रीवास्तव ठेवण्यात आलं होतं. आई तेजी बच्चन यांना थेटरमध्ये अधिक रुची होती त्यांना सिनेसृष्टीमध्ये काम करण्याची संधी मिळत असताना देखील त्यांनी गृहिणी बनण्याचा निर्णय घेतला.

परंतु बच्चन यांच्या आईची आवड त्यांच्या मध्ये उतरली आणि त्याचा परिणाम अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीवर दिसून आला. अमिताभ बच्चन त्यांच्या घरातील मोठे पुत्र होते त्यांच्या छोट्या भावाच नाव अजिताभ बच्चन होय. अमिताभ बच्चन यांनी इलाहाबाद येथील ज्ञान प्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल व त्यानंतर नैनिताल येथील शेरवुड कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण केलं.

अमिताभ बच्चन यांनी दोन वेळा एम.ए ची पदवी प्राप्त केली आहे. अमिताभ बच्चन यांच पुढील शिक्षण दिल्ली विश्वविद्यालय येथील किरोडीमल कॉलेजमधून पूर्ण पडलं इथे त्यांनी बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतली. ३ जून १९७३ रोजी अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी रीतसर विवाह केला आणि पुढे या दाम्पत्यांना पुत्र व कन्या प्राप्ती देखील झाली. मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक अशी यांच्या मुलांची नावे आहेत.

करियर

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या विसाव्या वर्षी अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांच सिनेसृष्टीमध्ये पहिलं पाऊल पडलं ते म्हणजे सात हिंदुस्तानी या चित्रपटाच्या माध्यमातून. हा चित्रपट इतका गाजला नाही परंतु या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांना पहिला चित्रपट म्हणून राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मध्ये सर्वश्रेष्ठ नवागत म्हणून पुरस्कार मिळाला. अमिताभ बच्चन यांचा पुढील चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झाला. आनंद या चित्रपटातून राजेश खन्ना यांच्या जोडीला अमिताभ बच्चन यांनी उत्तम भूमिका बजावली.

एक सहाय्यक कलाकार म्हणून अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि म्हणूनच त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक कलाकार हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेला परवाना या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली प्रेमी तरुणाची भूमिका बऱ्याच लोकांना आवडली. अमिताभ बच्चन यांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ थोडासा अवघड ठरला‌. बरेच चित्रपट करून देखील त्यांच्या नशिबी यश प्राप्त होत नव्हतं.

पुढील सात वर्ष अभिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटं केली परंतु ती फारशी यशस्वी ठरली नाही. चित्रपट सृष्टी मध्ये बराच संघर्ष करत असताना १९७३ ते १९८३ हा काळ अमिताभ बच्चन व संपूर्ण भारतासाठी बॉलीवुड मधील सर्वोत्कृष्ट काळ ठरला. १९७३ साली प्रदर्शित झालेला जंजीर या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याला कलाटणी मिळवून दिली. या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन स्टार बनले आणि त्यांची उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली लोकप्रियता वाढली.

१९७० च्या सुरुवातीस अमिताभ बच्चन यांनी जंजीर, दिवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवत हिंदी चित्रपटांमधील ओंस्क्रीन भूमिकांसाठी त्यांना भारताचा अँग्री यंग मॅन म्हणून संबोधले जाऊ लागले. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी बरेच ऍक्शन चित्रपट केले. ज्यामध्ये त्रिशूल, कालापत्थर आणि शक्ती यांसारखे चित्रपट समाविष्ट आहेत. पुढे १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा शहंशाह हा चित्रपट देखील फार गाजला आणि त्यामुळे त्यांना बॉलिवूडचा शहेनशहा अशी नवीन ओळख प्राप्त झाली.

पुढे शतकाचा महान अभिनेता, स्टार ऑफ द मिलेनियम, बिग बी अशा वेगवेगळ्या नावांनी अमिताभ बच्चन यांची ओळख प्राप्त झाली. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये घर केलं आणि भरपूर लोकप्रियता मिळवली. पुढे अमिताभ बच्चन यांनी पाच दशकांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीमध्ये जवळपास २०० हून अधिक भारतीय चित्रपट केले इतकेच नव्हे तर या त्यांच्या भव्यदिव्य कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले.

ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. शिवाय जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला. सोळा फिल्मफेयर पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहेत‌. तसेच ४२ नामांकनांसह फिल्मफेअर मधील प्रमुख अभिनय श्रेणीमध्ये सर्वाधिक नामांकित कलाकारांमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांचं नाव पुढे येतं. अमिताभ बच्चन यांनी अभिनयातच नव्हे तर पार्श्वगायक, चित्रपट निर्माता आणि टेलिव्हिजन प्रस्तुत करता म्हणून देखील काम केले आहे. अमिताभ बच्चन यांनी हू वॉन्टस टू बी अ मिलेनियर? या गेम शो फ्रॅंचाईजी भारतातील आवृत्तीचे अनेक सीजन होस्ट केले आहेत.

१९८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. अभिनय कलेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारत सरकारकडून अमिताभ बच्चन यांचा गौरव करण्यात आला. १९८४ मध्ये पद्मश्री. २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण असे मोठे पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने अमिताभ बच्चन यांचा चित्रपटसृष्टीतील आणि त्यापुढील जगामध्ये केलेल्या अपवादात्मक कारकिर्दीबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ द लिजंड ऑफ ओनर ने त्यांना गौरविण्यात आलं.

अमिताभ बच्चन यांनी बाज लुहरमनच्या द ग्रेट गॅट्सबी या हॉलिवूड चित्रपटा मध्ये देखील काम केलं आहे. भारतासह भारताबाहेर देखील अमिताभ बच्चन यांची ख्याती पसरली. अमिताभ बच्चन यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडते अजूनही ते तितक्याच उत्साहाने आनंदाने काम करतात. आज अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट सृष्टीतील स्टार व सुपरस्टार म्हणून नावाजले जातात.

बॉलीवूड म्हंटल तर प्रत्येकाच्या ओठावर अमिताभ बच्चन यांचं नाव येतं. बॉलिवूडमधील महान व यशस्वी कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांची गणना केली जाते. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय चित्रसृष्टी मध्ये व्यतीत केला आहे. या काळामध्ये त्यांनी अनेक लोकांना अनेक कलाकारांना प्रेरणा दिली. चित्रपटसृष्टी मध्ये काम करण्याची इच्छा ठेवणारऱ्या मध्ये किंवा चित्रपट सृष्टी मध्ये येऊन एक यशस्वी अभिनेता किंवा अभिनेत्री होण्याची रूची बाळगणार्‍या बऱ्याच लोकां साठी अमिताभ बच्चन हे एक मोठे आदर्श ठरले आहेत.

राजकीय आयुष्य

१९९४ मध्ये अमिताभ बच्चन यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबादमध्ये खासदार म्हणून निवडून आले. जवळपास तीन वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सृष्टी कडे पुन्हा आपली पावले वळवली.

इतर माहिती

इन्सानियत या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टी पासून पाच वर्ष विश्रांती घेतली. या कालावधीमध्ये त्यांनी एबीसील कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तो बर्‍यापैकी गाजला देखील. पुढे याच कंपनीच्या माध्यमातून मृत्युदाता हा चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आला परंतु यावेळी मात्र अभिताभ बच्चन यांना यश प्राप्त झालं नाही आणि सोबतच कंपनीला देखील फार नुकसान सोसावे लागले आणि म्हणूनच कालांतराने कंपनी बंद करण्यात आली.

२००० साली अमिताभ बच्चन यांनी भारतात सर्वात लोकप्रिय ठरलेला शो म्हणजेच कोण बनेगा करोडपती? याचं होस्टिंग केलं. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांचे “देवियों और सज्जनों” हे शब्द पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये घर करून बसले. या शोमुळे अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लाभलं. या शोमुळे त्यांचे सर्व कर्ज तर फिटले परंतु त्यापेक्षाही अधिक त्यांनी या शोमधून कमावलं. आज गेले दोन दशक हा शो सुरूच आहे. आणि लोक आजही तितक्याच आनंदाने हा शो बघतात. तो म्हणजे फक्त सर्वांचे लाडके अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासाठी.

आम्ही दिलेल्या amitabh bachchan information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अमिताभ बच्चन विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Amitabh Bachchan biography in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि amitabh bachchan full information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये amitabh bachchan information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!