आवळा कँडी रेसिपी Amla Candy Recipe in Marathi

Amla Candy Recipe in Marathi – Amla Murabba Recipe in Marathi आवळा कँडी रेसिपी आवळा कँडी हि लिंबू सारख्या आणि लिंबूच्या आकाराच्या मोर आवळ्या पासून बनवला जातो. बहुतेक आवळ्याचे एकूण दोन प्रकार असतात ते म्हणजे मोर आवळा आणि साधा आवळा जो आपण लहापणी सर्वांनी खाल्ला आहे. मोर आवळ्यापासून अनेक वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात जसे कि आवळा ज्यूस, मोर आवळ्याचे लोणचं, आवळा कँडी, आवळा बर्फी यासारखे अनेक पदार्थ बनवले जाता आणि हे पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवू शकतो कारण आवळा हा बाजारामध्ये उन्हाळ्यामध्ये येतो. मोर आवळ्यापासून मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आवळा कँडी जो लहान मुलांना खूप आवडेल कारण याचे नाव कँडी आहे.

आणि त्याची टेस्ट देखील एक लिमलेटच्या गोळीसारखी लागते. आवळा कँडी हे लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यासाठी एक उत्तम रेसिपी आहे कारण हे खाल्ल्यामुळे आपल्याला आरोग्य फायदे मिळतात म्हणजेच २ ते ३ कँडी खाल्ल्यामुळे आपले पचन चांगले होते तसेच पित्त होत नाही. चला तर आता आपण आवळा कँडी कशी बनवायची ते पाहूयात.

amla candy recipe in marathi
amla candy recipe in marathi

आवळा कँडी रेसिपी – Amla Candy Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते १९ दिवस
एकूण लागणारा वेळ१९ दिवस २० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पद्धतखूप सोपी

आवळा कँडी रेसिपी- dry amla candy recipe in marathi

आवळा कँडी हि हि रेसिपी मोर आवळ्यापासून बनवली जाते आणि हि उन्हाळ्यामध्ये केली जाते कारण मोर आवळा बाजारामध्ये उन्हाळ्यामध्ये येतात. मोर आवळा हा आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात कारण कारण आपण जर एका वेळी २ ते ३ आवळा कँडी खाल्ल्या तर त्या आपले पाचन सुधारते. आवळा कँडी हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनतो. चला तर आज आपण आवळा कँडी कशी बनवायचा ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते १९ दिवस
एकूण लागणारा वेळ१९ दिवस २० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पद्धतखूप सोपी

आवळा कँडी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make amla candy 

आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला फक्त साखर आणि आवळे लागतात. साखर हि आपल्या घरामध्ये उपलब्ध असते पण आवळे हे फक्त उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये आवळा कँडी बनवू शकतो. आवळा कँडी बनवण्यासाठी ताजे आवळे वापरा आणि साखर देखील चांगल्या प्रतीची वापरा. आता आपण आवळा कँडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

 • १ किलो ताजे मोर आवळे.
 • १ किलो साखर.
 • अर्धी वाटी पिठी साखर.
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ) ( आवळे उकळण्यासाठी ).

आवळा कँडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – how to make amla candy recipe in marathi

 • आता आपण वरील साहित्य वापरून आवळा कँडी कशी बनवायची ते पाहूयात.
 • आवळा कँडी बनवताना सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या आणि मग ते एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये सर्व आवळे बुडतील इतके पाणी घाला आणि ते गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा आणि त्याला एक उकळी आणा.
 • पाण्याला एक उकळी आली कि लगेच गॅस बंद करा आणि आवळे जास्त शिजू देवू नका नाही तर त्याच्या चांगल्या पाकळ्या निघू शकत नाहीत.
 • हे पाणी थोडे गार झाले कि आवळ्याच्या आपोआप पाकळ्या निघण्यास सुरुवात होईल आता त्यामधील पाणी काढून टाकून आवळ्याच्या पाकळ्या काढून घ्या आणि त्यामधील बिया काढून टाका.
 • आता या निघालेल्या आवळ्यांच्या पाकळ्यामध्ये आता १ किलो साखर घाला आणि ती त्यामध्ये चांगली मिक्स करून हवा बंद डब्यामध्ये झाकून तो डबा चार ते पाच दिवस तसाच ठेवा. जेणेकरून आवळ्याच्या पाकळ्यांमध्ये साखरेचा गोडपणा उतरेल.
 • आता चार ते पाच दिवसांनी यामध्ये झालेले पाणी गाळून घ्या आणि तो आवळा परातीमध्ये पातळ पसरून कडक उन्हामध्ये १० ते १५ दिवस वाळवा ज्यामुळे तो कडक बनेल आणि जास्त काळ चांगला राहील.
 • मग तो चांगला वाळला कि त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालून ती चांगली मिक्स करा आणि तो आवळा डब्यामध्ये पॅक करून ठेवा.
 • आणि तुम्हाला हवा तेंव्हा तो खावू शकता.

आवळा कँडी कधी खावी – serving suggestions

 • आवळा कँडी आपण रोज ३ ते ४ कँडी जेवणानंतर खावू शकतो कारण त्यामुळे आपले पचन चांगले होते तसेच हे इतर आरोग्य फायद्यासाठी चांगले असते.

आवळा कँडी खाण्याचे फायदे – amla candy benefits in marathi

 • आवळा कँडी खाल्ल्यामुळे होणारे फायदे
 • आवळा कँडी खाल्ल्यामुळे आपली पचन शक्ती सुधारते.
 • तसेच यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे औषधी गुण असतात.
 • यामुळे केस वाढण्यास मदत होते तसेच हे त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.

टिप्स (Tips) 

 • आवळा कँडी आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो.
 • आवळा कँडी आपण पित्त झाल्यावर खावू शकतो तसेच प्रवासासाठी जाताना पित्ताचा त्रास होत असल्यास आपण आपल्या सोबत आवळा कँडी घेवू शकतो.
 • आवळा कँडी आपण जितके जास्त दिवस वाळवू तितके जास्त दिवस ती चांगली राहते.
 • आवळा कँडी कडक उन्हामध्ये वाळवणे गरजेचे असते नाहीतर आवळा मऊ पडतो आणि लवकर खराब होतो.
 • आपण साखर घालून आवळ्याच्या पाकळ्या डब्यामध्ये ठेवतो त्यावेळी त्यामध्ये पाणी तयार होते ते पाणी आपण गाळून घेवून त्याचे सरबत बनवू शकता.

आम्ही दिलेल्या dry amla candy recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आवळा कॅन्डी रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या amla candy benefits in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make amla candy recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sweet amla candy recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!