अंडा करी रेसिपी मराठी Anda Curry Recipe in Marathi

Anda Curry Recipe in Marathi – Egg Curry Recipe in Marathi अंडा करी रेसिपी मराठी अंडा करी हा पदार्थ भारतातील एक लोकप्रिय प्रकार असून हा पदार्थ नॉन व्हेजिटेरियन लोकांचा आवडत्या यादीमधील एक पदार्थ आहे. अंडा करी भारतामध्ये लोक आवडीने खातात ती रेस्टॉरंट / हॉटेल असो किंवा घरामध्ये असो. अंडी खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि म्हणूनच बहुतेक लोक आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा अंडी खातात. अंड्यामध्ये प्रथिने असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदे होता तसेच अंडी खाल्ल्यामुळे आपली उर्जा देखील वाढते.

तसेच डॉक्टर देखील आपल्याला रोज एक उकडलेले अंडे खायला सांगतात. पण रोज आपल्याला उकडलेले अंडे खाणे कंटाळवाणे वाटते त्यावेळी आपण अंड्यापासून वेगवेगळ्या डीश बनवून खावू शकतो त्यामधील एक लोकप्रिय आणि वारंवार खाल्ली जाणारी डिश म्हणजे अंडा करी.

लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत अंडा करी हा पदार्थ सर्वांना आवडतो आणि हा भारतामध्ये सर्व ठिकाणी जरी बनत असला तरी तो भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने बनवला जातो. आज या लेखामध्ये अगदी सोपी आणि कमी वेळेत बनणारी अंडा करी रेसिपी पाहणार आहोत.

anda curry recipe in marathi
anda curry recipe in marathi

अंडा करी रेसिपी मराठी – Anda Curry Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी४ व्यक्ती
डिश प्रकारनॉन व्हेज
बनवण्याची पध्दतखूप सोपी

अंडा करी कशी बनवायची – How to Make Egg Curry Recipe in Marathi

अंडा करी भारतामध्ये लोक आवडीने खातात ती रेस्टॉरंट / हॉटेल असो किंवा घरामध्ये असो. अंडा करी रेसिपी हि थोडी तिखट आणि मसालेदार असल्यामुळे सर्वांना खूप आवडते आणि बहुतेक लोक हि रेसिपी घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी खास आज आपण अंडा करी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी४ व्यक्ती
डिश प्रकारनॉन व्हेज
बनवण्याची पध्दतखूप सोपी

अंडा करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make anda curry 

अंडा करी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर काही साहित्य आपल्या घरी नसेल तर ते आपण अगदी सहजपणे बाजारातून उपलब्ध करू शकतो. चला तर मग पाहूयात अंडा करी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ४ अंडी ( चांगली उकडलेली ).
  • १ मध्यम आकाराचा कांदा ( उभा चिरलेला ).
  • १ बारीक चिरलेला कांदा ( फोडणीसाठी ).
  • १ टोमॅटो ( उभा चिरलेला ).
  • अर्धी वाटी वाळलेले खोबरे ( काप केलेले .
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).
  • ३ ते ४ मोठे चमचे तीळ.
  • १ मोठा चमचा जीरा.
  • २ ते ३ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा धने पावडर.
  • १ चमचा गरम मसाला.
  • २ तमाल पत्रीची पाने.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

खडा मसाला 

  • १ दालचिन तुकडा.
  • १ बदाम फुल.
  • २ ते ३ काळी मिरी.
  • ३ ते ४ लवंग.
  • १ मसाला वेलदोडे.

अंडा करी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make anda curry 

  • सर्वप्रथम ४ अंडी घ्या आणि ती भांड्यामध्ये पाणी घालून ते भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये अंडी घालून त्यावर झाकण लावून ती १० ते १५ मिनिटे चांगली उकडून घ्या. अंडी उकडल्यानंतर गॅस बंद करून ठेवा आणि ते गार होऊ द्या.
  • आता एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये सर्वप्रथम वाळलेले खोबरे भाजून घ्या आणि मग त्यामध्ये तीळ – जिरे भाजून घ्या आणि शेवटी खडे मसाले भाजून घ्या आणि ते बाजूला काढून घ्या.
  • आता कढई मध्ये १ चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि कांदा घालून तो थोडा लालसर होईपर्यंत भाजा मग त्यामध्ये टोमॅटो घालून ते दोन्हीही चांगले भाजून घ्या.
  • आता हे सर्व मिश्रण म्हणजे खडे मसाले, तीळ, खोबरे, टोमॅटो- कांदा मिश्रण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेवून त्याची बारीक पेस्ट करा.
  • आता एक कढई घ्या आणि त्यामध्ये तेल घालून गॅस मंद आचेवर ठेवा. तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि आले लसून पेस्ट घाला आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घाला आणि ते चांगले एकत्र करून २ ते ३ मिनिटे भाजून घ्या आणि मग त्यावर झाकण ठेवून ते ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या.
  • आता झाकण काढून त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून ते चांगले एकत्र करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि ते चांगले शिजवून घ्या मग शेवटी उकडलेली अंडी सोलून ती त्या ग्रेवी मध्ये टाका.
  • आणि त्यावर कोथिंबीर टाकून चपाती किंवा रोटी सोबत सर्व्ह करू शकता.

अंडा करी कश्यासोबत खाल्ली जाते – serving suggestions 

अंडा करी आपण रोटी, चपाती, नान, भाकरी किंवा प्लेन राईस सोबत खाऊ शकतो.

अंडा करीची चव चांगली येण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत – tips to make anda curry 

  • अंडा करी मध्ये आपण खडा मसाला वापरला नाहीत तरी चालेले.
  • सर्व्ह करतेवेळी आपण अंडा करीवर बटर घालून सर्व्ह करू शकतो.
  • उकडलेली अंडी ग्रेविमध्ये घालताना ती एका पॅनमध्ये तेल घालून फ्राय करून ग्रेव्ही मध्ये घालू शकता.

अंड्यामध्ये असणारे पोषक घटक – nutritional value

पोषक घटक प्रमाण ( १ अंडे )
कॅलरी७०
प्रथिने६ ग्रॅम
जीवनसत्व अ१० टक्के
कॅल्शियम२ टक्के
जीवनसत्व ड१५ टक्के
जीवनसत्व इ१५ टक्के
जीवनसत्व ब १२५० टक्के
लोह६ टक्के
फोलेट१५ टक्के

आम्ही दिलेल्या anda curry recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अंडा करी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anda kari recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि egg masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये anda recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!