anil awachat information in marathi डॉ. अनिल अवचट माहिती, भारतामध्ये अनेक लोकांनी या अगोदर समाजसेवा किंवा सामाजिक कार्ये केली आहे तसेच आज देखील आपल्या भारतामध्ये समाजसेवा करणारे असे अनेक व्यक्ती होऊन गेले आहेत आणि त्यामधील एक म्हणजे अनिल अवचट आणि आज आपण या लेखामध्ये अनिल अवचट यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. अनिल अवचट यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये १ जानेवारी १९४४ मध्ये झाला होता. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यामध्ये असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून पूर्ण केले.
आणि मग त्यांनी पुण्यामधील बी.जे महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेवून वैद्यकीय पदवी पूर्ण केली. अनिल अवचट हे एक चांगले समाजसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ते, मराठी लेखक आणि पत्रकार देखील होते. अनिल अवचट हे डॉक्टर होते आणि त्यांचा विवाह देखील डॉक्टर मुलीशी झाला आणि त्यांचे नाव सुनंदा अवचट असे होते आणि त्यांना मुकता आणि यशोदा अश्या दोन मुली होत्या. अनिल अवचट यांनी भारतातील सामाजिक प्रश्नांच्यावर विपुल लेखन केले असून त्यांच्या लेखणीतून समाजातील असहाय्य वर्गाला त्यांनी न्याय देखील मिळवून दिला आहे.
डॉ. अनिल अवचट माहिती – Anil Awachat Information in Marathi
नाव | अनिल अवचट |
जन्म | १ जानेवारी १९४४ |
जन्म ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये |
ओळख | मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार |
अनिल अवचट यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about anil awachat in Marathi
अनिल अवचट यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील ओतूर या ठिकाणी झाला आणि त्यांनी सुनंदा यांच्याशील लग्न केले आणि त्या देखील डॉक्टर होत्या आणि त्यांना दोन मुली आहेत त्या म्हणजे यशोधा आणि मुक्ता. त्यांनी पुण्यामध्ये आपल्या पत्नीसोबत मुक्तांगण या संस्थेची स्थापना केली जे एक व्यसनमुक्ती केंद्र होते.
आणि त्यांनी या केंद्रामाराफात अनेक लोकांना व्यसनापासून मुक्त केले आणि आज त्यांना पुण्यातील मुक्तांगण संस्थेचे संस्थापक म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी बाबा म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये पोर्निया, गर्द, कार्यरत, संभ्रम, कोंडमारा, धार्मिक, वाघ्या मुरळी अश्या प्रकारची अनेक पुस्तके लिहिली.
अनिल अवचट यांचे शिक्षण – education
त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यामध्ये असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून पूर्ण केले आणि मग त्यांनी पुण्यामधील बी.जे महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेवून वैद्यकीय पदवी पूर्ण केली.
अनिल अवचट यांची साहित्यिक कामे
अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते तर होतेच परंतु त्यांची त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक लेखन देखील लिहिले जसे कि निबंध, चरित्रात्मक रेखाटन आणि कविता या सारख्या पुस्तकांची यदि लिहिली. खाली आपण अनिल अवचट यांचे साहित्यिक काम पाहणार आहोत.
सण | लेखन |
१९७९ | संभ्रम |
१९८३ | वाघ्या मुरळी |
१९७७ | हमीद |
१९८५ | कोंडमारा |
२००१ | प्रार्थना आणि प्रश्न |
१९८६ | गर्द |
१९८९ | धार्मिक |
२००५ | जगण्यातील काही |
२००६ | मस्त, मस्त उत्तर |
२००७ | सृष्टीत गोष्टीत |
२००७ | सुनंदाला आठवताना |
अनिल अवचट यांनी केलेली कामगिरी
- अनिल अवचट यांनी त्यांची पत्नी सुनंदा अवचट यांच्यासोबत पुणे या शहरामध्ये मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले होते.
- अनिल अवचट यांनी पोर्निया घे पहिले पुस्तक लहिले आहे.
- त्यांनी मुक्तांगण या संस्थेच्या अनुभवावर गर्द आणि मुक्तांगनाची गोष्ट हि दोन पुस्तके लिहिले.
- तसेच त्यांनी दलित, मजूर आणि भटक्या जमातीच्या लोकांच्या प्रश्नांचे लिखाण केले.
- त्यांनी १९७० च्या सुरुवातीस साधना या नावाचे एक मराठी मासिक संपादित केले ज्यामध्ये त्यांनी सामाजिक साम्स्यांच्यावर अनेक तीव्र लेखन केले होते म्हणजेच त्यांनी महाराष्ट्रावर आलेल्या दुष्कालाविषयी अहवाल होता.
- ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये दुष्काळ आला होता त्यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला किंवा गावांना भेट दिली तसेच त्या ठिकाणी मुक्काम केला तसेच त्यांनी या मध्ये सापडलेल्या अनेकांच्यासोबत संवाद देखील साधला आणि त्यांना मदत देखील केली.
- गर्द, कार्यरत, स्वत्थ वश्यत्ति, कुतुहलापोटी, वाघ्या मुरली आणि कार्यमग्न हि त्यांची प्रसिध्द पुस्तके आहेत.
- त्यांनी १९८५ मध्ये दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर कोंडमारा हे पुस्तक लिहिले तसेच त्यांनी १९८९ मध्ये धार्मिक या पुस्तकाचा देखील समावेश केला.
- गर्द या पुस्तकासह प्रसिध्द असलेल्या अनिल अवचट यांनी नियमितपणे मराठी मासिके आणि इतर प्रकाशनासाठी लेखन केले.
अनिल अवचट यांना मिळालेले पुरस्कार – awards
अनिल अवचट हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते आणि त्यांनी सामाजिक कार्यामध्ये चांगली कामगिरी केली तसेच लेखनामध्ये देखील चांगली कामगिरी केली त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी अनेक संस्थांनी, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनेक पुरस्कार दिले. आता खाली आपण अनिल अवचट यांना मिळाले पुरस्कार कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.
- अनिल अवचट यांना महाराष्ट्र राज्य वांडमय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
- त्यांना सातारा या ठिकाणी सामाजिक न्याय पुरस्कार न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला.
- महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार.
- त्यांनी व्यसनमुक्तीसाठी चांगली कामगिरी केली आणि म्हणून त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- त्यांना साहित्य जीवन गौरव हा पुरस्कार अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनने केला.
अनिल अवचट यांचे निधन – death
बाबा म्हणून ओळखल्या जाणारे सामाजिक कार्यकर्ते, मराठी लेखक आणि पत्रकार अनिल अवचट यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी म्हणजेच गुरुवार दिनांक २७ जानेवारी २०२२ या दिवशी निधन झाले.
आम्ही दिलेल्या anil awachat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डॉ. अनिल अवचट माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anil awachat wikipedia in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about anil awachat in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट