अंकिता लोखंडे मराठी माहिती Ankita Lokhande Biography in Marathi

Ankita Lokhande Biography in Marathi – Ankita Lokhande Information in Marathi अंकिता लोखंडे मराठी माहिती अंकिता लोखंडे ही एक भारतीय अभिनेत्री असून २००९ साली प्रदर्शित झालेल्या पवित्र रिश्ता या मालिकेमधून अंकिताने प्रत्येक रसिकजनांच्या मनामध्ये घर तयार केलं. २००९ ते २०१४ अशी दीर्घ काळ ही मालिका चालू होती. पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली आणि या मालिके मधील तिची अर्चनाची भूमिका लोकांच्या पसंतीस पडली. पुढे अंकिताने मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, बागी थ्री असे दोन चित्रपट देखील केले.

अंकिताचा हा छोट्या पडद्यावरून ते मोठ्या पडद्या पर्यंतचा प्रवास आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. पवित्र रिश्ता या मालिकेमधील फेम अंकिता लोखंडे यांच्या जीवना विषयी अधिक माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

ankita lokhande biography in marathi
ankita lokhande biography in marathi

अंकिता लोखंडे मराठी माहिती – Ankita Lokhande Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)अंकिता लोखंडे
जन्म (Birthday)१९ डिसेंबर १९८४
जन्म गाव (Birth Place)मध्यप्रदेश मधील इंदूर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)अभिनेत्री

Ankita Lokhande Information in Marathi

जन्म

१९ डिसेंबर १९८४ रोजी अंकिता लोखंडे हिचा जन्म एका मध्यमवर्गीय मराठी फॅमिलीमध्ये झाला. मध्यप्रदेश मधील इंदूर येथे मराठी कुटुंबात जन्माला आलेली अंकिता जन्माला येताच सुप्रसिद्ध अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन आली. अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे बँकेत कर्मचारी होते व अंकिताची आई वंदना फडणीस लोखंडे या एक शिक्षिका होत्या.

अंकिताला दोन भाऊ व एक बहीण देखील आहे. तिच्या दोन भावांची नाव सुरज व अरून तर बहिणीचे नाव ज्योती आहे. संपूर्ण भावंडांमध्ये अंकिता ही मोठी आहे. अंकिताचं विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण इंदूर येथेच पूर्ण झालं. लहानपणापासूनच अंकिताला अभिनयाची फार आवड होती. आणि याच क्षेत्रात तिला पुढे जायचं होतं हे तिने निश्चित केलं होतं.

म्हणून २००५ मध्ये अंकिताने आपल पदवीचे शिक्षण पूर्ण करून इंदोर वरून आपल स्वप्न जगण्यासाठी मुंबईला येण्यास निघाली. कॉलेजमध्ये असताना अंकितला बॅडमिंटनची देखील आवड होती आणि या कालावधीमध्ये ती राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू होती.

वैयक्तिक आयुष्य

पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून अंकिता लोखंडे हिचा परिचय सुशांत सिंग राजपूत यांच्याशी झाला. आणि पुढे जाऊन पाच-सहा वर्ष हे दोघेजण एकत्र देखील होते. परंतु काही कारणास्तव त्यांना वेगळं व्हावं लागलं. २०१० ते २०१६ अशी सहा वर्षे अंकिता सुशांत सिंग राजपूत यांच्या सोबत रिलेशनशिपमध्ये होती.

२०१९ मध्ये अंकिता लोखंडे हिने विकी जैन या व्यावसायिका सोबतीच नातं जाहीर केलं आणि १४ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईमध्ये लग्न देखील केलं. १४ डिसेंबर २०२१ रोजी अंकिता लोखंडे हिने आपला प्रियकर विकी जैन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईत त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला. लग्नाआधी संगीत, कॉकटेल, मेहंदी आणि हळदी सह अनेक प्री-वेडिंग फंक्शन्स होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंकिता तिचे पती विकी जैन सोबत स्टार प्लस च्या स्मार्ट जोडी मध्ये सहभागी होताना दिसली.

अंकिताची अभिनय कारकीर्द

अंकिता लोखंडे एक मराठमोळी मुलगी साध्या मराठी कुटुंबामध्ये जन्माला आलेली परंतु आभाळाएवढी स्वप्न. अंकिताला लहानपणापासूनच अभिनयाची रूची होती आणि तिला स्वतःवर विश्वास होता की एक दिवस ती नक्कीच सुप्रसिद्ध अभिनेत्री बनेल. आणि हाच विश्वास ठेवून आपले शिक्षण पूर्ण करून अंकिताने २००५ मधील राहतं घर सोडून मुंबईला अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्थायिक झाली. लहानपणाची आवड जोपासण्यासाठी अंकिता मुंबईत आली आणि तिने फिल्म आणि टेली इंडस्ट्रीज मध्ये काम करण्यासाठी धडपड सुरू केली.

अंकिता लोखंडे हिचा झी सिनेस्टार की खोज या शोमध्ये सहभाग होता. या शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेला. हा शो तर अंकिता जिंकू शकली नाही परंतु या शोच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि याच शोमुळे तिची लोकप्रियता वाढू लागली आणि तिला पवित्र रिश्ता ही मालिका करण्याची संधी चालून आली. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टार की खोज मध्ये सहभाग घेतल्यानंतर अंकिता लोखंडे हिला एकता कपूरच्या डेलीसोप पवित्र रिश्ता मध्ये अर्चनाची मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली.

अंकिता साठी ही एक सुवर्णसंधी ठरली झी टीव्हीवरील बालाजी टेलिफिल्म्सच्या दैनिक शो पवित्र रिश्ता मध्ये अंकिताने लक्षवेधी कामगिरी केली. या शोच्या माध्यमातून अंकिताने अभिनयामध्ये पदार्पण केलं. या शोमुळे अंकिताच्या जीवनाला कलाटणी मिळाली. या शोमुळे अंकिताचे अॅक्टींग करियर सुरू झालं आणि बघताच तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तीने रसिकजनांच्या मनामध्ये घर केलं.

या मालिकेमध्ये अंकिता अर्चनाच्या भूमिकेमध्ये होती. अंकिताची ही भूमिका इतकी गाजली की प्रत्येक जण तिला अंकिता नव्हे तर अर्चना म्हणूनच ओळखू लागले. २०१८ मध्ये अंकिताने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यापर्यंत ती निवृत्त होईपर्यंत ती एक सर्वाधिक मानधन घेणारी टेलिव्हिजन कलाकारांपैकी एक होती. या शोमुळे अंकिताला भरपूर प्रसिद्धी लाभली. २००९ मध्ये सुरू झालेली ही मालिका पवित्र रिश्ता २०१४ मध्ये संपली.

२०१३ मध्ये पवित्र रिश्ता ने पिढीची झेप घेतली आणि २०१४ मध्ये मालिका संपेपर्यंत अंकिता लोखंडे हीने अर्चना ची नात आणि अंकिता यांच्यासोबत अर्चनाच्या पूर्वीच्या भूमिके सहा भूमिका साकारण्यास सुरुवात केली. पवित्र रिश्ता च्या सेटवर अंकिताची ओळख सुशांत सिंग यांच्याशी झाली. पवित्र रिश्ता या दैनिक शो मध्ये अंकिता लोखंडे ही सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्यासोबत काम करत होती.

हे दोघं सहकलाकार होते. आणि २०१० मध्ये अंकिता व सुशांत यांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली सुशांत सिंग राजपूत याने अंकिता लोखंडे हिला डान्स रियालिटी शो झलक दिखला जा फोर मध्ये प्रपोज देखील केलं आणि २०१६ चा एका मुलाखतीमध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे देखील सांगितले मात्र त्याच वर्षी हे दोघे वेगळे झाले. अंकिताने झलक दिखला जा फोर आणि कॉमेडी सर्कस मध्ये सहभाग घेतला होता. कॉमेडी सर्कस शो मध्ये अंकिता कपिल शर्मा यांच्या सोबत स्टँड अप कॉमेडी देखील करायची.

शिवाय एक थी नायिका साठी एपिसोडिक केले. पुढे पवित्र रिश्ता या शोमधून भरपूर प्रसिद्धी मिळवल्यानंतर अंकिताने तिचं पुढचं पाऊल चित्रपट आणि वेबसीरीज मध्ये टाकण्यासाठी तिने स्वतःला सज्जन केलं. २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये अंकिताने चित्रपट व वेबसिरीज मध्ये पदार्पण केलं.

अंकिताने अभिनयातील दोन वर्षाच्या अंतरानंतर आणि सुशांत सिंग राजपूत पासून वेगळे झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटातील भूमिके मधून अंकिता लोखंडे तिचे चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे अशा बातम्या सुरू झाल्या. परंतु ती चित्रपटांसाठी अजूनही तयार नाही असे उत्तर देऊन तिने या बातम्या संपवल्या. तसेच पुढील वर्षी संजय दत यांच्यासोबत गिरीश मलिकच्या तोरबाज या चित्रपटासाठी अंकिताने साइन केल्याच्या बातम्या पसरला परंतु अंकिताने ती या चित्रपटात सहभागी होणार नसल्याचे सांगितल्यावर ह्या अफवा असत्य ठरल्या.

२०१८ मध्ये अंकिता लोखंडे हिने स्वतः जाहीर केलं की ती मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी राणी लक्ष्मीबाई च्या जीवनावर आधारित महाकाव्य नाटक मध्ये झलकारीबाई या योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडे हिने कंगना राणावत यांच्यासोबत काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. या चित्रपटांमध्ये अंकिताने तिची भूमिका अत्यंत चांगली पार पाडली होती आणि त्या बदल्यात तिच भरपूर कौतुक करण्यात आलं.

अंकिताच्या चाहत्यांना देखील हा चित्रपट आवडला आणि अंकिताच्या अभिनय कारकिर्दीतील व्यवसायिक यश मिळवून देणारा हा चित्रपट ठरला. यापुढे अंकिता लोखंडे हिने साजिद नाडियाडवाला च्या ॲक्शन पार्क प्रोडक्शन बागी थ्री मध्ये काम केलं. या चित्रपटांमध्ये तिने टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या साथीने काम केलं. भारतातील कोरोनाव्हायरस च्या साथीच्या आजारांमुळे चित्रपटगृहे बंद होण्यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता ज्याचा परिणाम या चित्रपटावर झाला.

२०२१ मध्ये अंकिता शाहीर शेख यांच्यासोबत पवित्र रिश्ता २.० या वेबसीरिज मध्ये अर्चनाच्या भूमिकेत दिसली. अंकिता लोखंडे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मराठी मुलगी जी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावाजली जाते. अंकिताचे अनेक चाहते आहेत. अंकिताचा चाहतावर्ग भरपूर मोठा आहे.

अगदी छोट्या पडद्यापासून सुरुवात करत तिने छोटा पडदा गाजवला आणि आता मोठा पडदा गाजवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. अंकिता लोखंडे हिची अभिनय कारकीर्द व तिचा अभिनय क्षेत्रातील संघर्ष आज तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेपासून सुरू झालेला अंकिताचा यशाचा हा प्रवास पुढेही असाच चालू राहू दे अशी तिच्या चाहत्या वर्गाची इच्छा आहे.

आम्ही दिलेल्या ankita lokhande biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अंकिता लोखंडे मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Ankita Lokhande Information in Marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ankita lokhande in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!