आप्पे रेसिपी मराठी Appe Recipe in Marathi

Appe Recipe in Marathi अप्पे कसे बनवायचे? आप्पे रेसिपी मराठी आप्पे हा पदार्थ दक्षिण भारतातील खासियत असून या पदार्थाचा शोध देखील बहुतेक त्या भागातच लागला आणि त्या ठिकाणी हा पदार्थ वारंवार बनवला जाणारा पदार्थ आहे तसेच हा पदार्थ भारतामध्ये काही ठिकाणी आवडीने बनवला जातो तसेच खाल्ला देखील जातो. आपण रोज रोज नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा बनवतो आणि हे रोज खाण्यासाठी कंटाळवाणे वाटते त्यावेळी तुम्ही आप्पे हि रेसिपी नाश्त्यासाठी बनवू शकता ज्यामुळे तुम्हाला काही वेगळे खाल्ल्याचा आनंद मिळतो आणि तुमच्या नाश्त्यामध्ये बदल देखील होतो. म्हणूच या लेखामध्ये आप्पे रेसिपी कशी बनवायची याबद्दल माहिती दिली आहे.

appe recipe in marathi
appe recipe in marathi

आप्पे रेसिपी मराठी – Appe Recipe in Marathi

भिजवून ठेवण्याची प्रक्रियातांदूळ – २ ते ३ तास

पीठ – ८ ते ९ तास

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

अप्पे कसे बनवायचे – appe kase banvayche 

आप्पे हा पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो त्यासाठी काहीजन रवा वापरतात किंवा काहीजन तांदूळ भिजत घालून त्याचे पीठ बनवून त्यापासून आप्पे बनवतात. या लेखामध्ये आज तांदळापासून बनवलेले आप्पे रेसिपी आणि रव्यापासून बनवलेले आप्पे रेसिपी पाहणार आहोत.

तांदळापासून बनवलेले आप्पे रेसिपी – Kolhapuri Appe Recipe in Marathi

भिजवून ठेवण्याची प्रक्रियातांदूळ – २ ते ३ तास

पीठ – ८ ते ९ तास

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients Needed to Make Appe Recipe

आप्पे हा एक भारतीय पाककलेमध्ये नाश्त्यासाठी बनवला जाणारा एक पदार्थ असून हा पदार्थ खूप सोपा आहे आणि घरामध्ये असण्याऱ्या साहित्यापासून अगदी सहज बनवता येतो. चला तर मग आप्पे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूयात.

  • १ वाटी तांदूळ.
  • १/२ वाटी उडदाची डाळ.
  • पाव वाटी चना डाळ.
  • २ चमचे पोहे.
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

आप्पे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – How to Make Appe Recipe in Marathi

आप्पे हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे आणि हा पदार्थ खूप छान लागतो आणि खमंग देखील असतो. म्हणूनच आता आपण खाली आप्पे कसे बनवायचे ते सविस्तर पाहणार आहोत.

  1. तुम्हाला माहित असेलच कि जर आपल्याला आप्पे करायचे असतील तर त्याचे पीठ आदल्या दिवशी रात्री करून ठेवावे.
  2. सर्वप्रथम जे आपण साहित्यामध्ये तांदूळ, उडीदडाळ आणि चणाडाळ सांगितली आहे ती चांगली स्वच्छ निवडून घ्या.
  3. मग हे सर्व एका स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि मग त्यामध्ये थोडे म्हणजे सगळ्या डाळी भिजतील असे पाणी घाला आणि त्यामध्ये २ चमचे पोहे घालून ते चांगले एकत्र करून ते २ ते ३ तासांच्यासाठी भिजवून ठेवा.
  4. २ ते ३ तासांनी ते चांगले भिजल्यानातर ते थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर बारीक करून घ्या जर ते बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घालू ते पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या.
  5. ही प्रक्रिया सर्व तांदूळ, उडीदडाळ, चनाडाळ आणि पोहे या मिश्रणासाठी करा आणि हे बारीक झालेले पीठ एका मोठ्या आणि खोल डब्यात ठेवा जेणेकरून पीठ फसफसल्यानंतर ते बाहेर पडणार नाही किंवा येणार नाही.
  6. मिक्सरवर बारीक केलेले पीठ हे ८ ते ९ तास भिजत ठेवावे लागते आणि ८ ते ९ तासाने हे पीठ फुगून वरती आलेले दिसेल.
  7. सकाळी आप्पे करताना हे पीठ चांगले हलवून घ्या आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला त्याचबरोबर चवीसाठी मीठ घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
  8. आता स्वच्छ धुतलेले आप्पेपात्र घ्या आणि ते मोठ्या आचेवर गरम करण्यासाठी ठेवा एकदा आप्पे पात्र गरम झाले कि त्या तव्याच्या आप्पेच्या साच्यामध्ये तेल सोडा किंवा ब्रशने लावून घ्या आणि मग त्यामध्ये आप्पे पीठ घाला आणि त्या अप्प्यांच्या बाजूने थोडे तेल घालून ते झाकण घालून, गॅसची आच मंद करून ते चांगले खरपूस भाजा म्हणजे त्याला चांगला तपकिरी रंग येईपर्यंत भाजा. ( टीप : ते जास्त करपू देवू नका ते चांगले लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि ते दोन्ही बाजूने भाजा ).
  9. ते चांगले लालसर आणि कुरकुरीत झाले कि ते चमच्याने काढा.
  10. तुमचे आप्पे तयार झाले, हे तयार झालेले आप्पे आपण खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा तसे देखील खाऊ शकतो.

आप्पे चटणी रेसिपी

खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ वाटी खोबरे.
  • १ ते २ हिरव्या मिरच्या.
  • १/४ चमचा जिरे.
  • २ चमचा चिरलेली कोथिंबीर.
  • १/२ चमचा मोहरी ( फोडणीसाठी ).
  • ६ ते ७ पाने कडीपत्ता.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( फोडणीसाठी.

खोबऱ्याची चटणी करण्यासाठी करावी लागणारी कृती

  • खोबऱ्याची चटणी करताना सर्वप्रथम खिसलेले किंवा खवलेले ओले खोबरे घ्या आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या.
  • मग त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला आणि ते सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्या त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते अनेक वेळा मिक्सरवर फिरवून घ्या.
  • मग एक भांडे मध्यम आचेवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी तडतडली कि लगेचच कडीपत्ता घाला आणि मग लगेच खोबऱ्याचे मिश्रण घालून ते एकत्र करा आणि शेवटी त्यामध्ये मीठ आणि साखर चवीनुसार घाला ते चांगले एकत्र करा तुमची आप्पे सोबत खाल्ली जाणारी चटणी तयार आहे.

रवा आप्पे रेसिपी किंवा झटपट आप्पे रेसिपी – Rava Appe Recipe in Marathi

रवा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients Needed to Make Rava Appe Recipe 

रवा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्द असते आणि आता खाली आपण रवा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्याची यादी पाहणार आहोत.

  • १ कप रवा.
  • २ कप ताक.
  • १/२ चमचा खायचा सोडा.
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • १ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

रवा आप्पे बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्वप्रथम रवा भाजून घ्या आणि मग एका भांड्यामध्ये रवा घाला आणि मग त्यामध्ये ताक घालून त्यामधील गाठी चांगल्या फोडून मिश्रण एक जीव करा मग ते १० ते १५ मिनिटासाठी झाकण घालून बाजूला ठेवा.
  • १० ते १५ मिनिटांनी त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ (चवीनुसार) आणि सोडा घालून हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
  • आता स्वच्छ धुतलेले आप्पेपात्र घ्या आणि ते मोठ्या आचेवर गरम करण्यासाठी ठेवा एकदा आप्पे पात्र गरम झाले कि त्या तव्याच्या आप्पेच्या साच्यामध्ये तेल सोडा किंवा ब्रशने लावून घ्या आणि मग त्यामध्ये आप्पे पीठ घाला आणि त्या अप्प्यांच्या बाजूने थोडे तेल घालून ते झाकण घालून, गॅसची आच मंद करून ते चांगले खरपूस भाजा म्हणजे त्याला चांगला तपकिरी रंग येईपर्यंत भाजा. ( टीप : ते जास्त करपू देवू नका ते चांगले लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि ते दोन्ही बाजूने भाजा).
  • ते आप्पे चांगले भाजल्यानंतर काढा, रवा आप्पे तयार झाले.

आप्पे कश्यासोबत खाल्ले जातात – serving suggestions 

आप्पे हा एक असा पदार्थ आहे जो आपण तसाच खाऊ शकतो किंवा त्याच्या सोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सोबत आपण खाऊ शकतो.

आम्ही दिलेल्या appe recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आप्पे रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mix daliche appe recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tikhat appe recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये appam recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!