आशा भोसले यांची माहिती Asha Bhosle Biography in Marathi

Asha Bhosle Biography in Marathi – Asha Bhosle information in Marathi आशा भोसले यांची माहिती आशा भोसले भारतीय पार्श्वगायिका, उद्योजक आणि अभिनेत्री आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आशा भोसले या मूळच्या सुप्रसिद्ध मंगेशकर घराण्यातील सदस्य आहेत. लता मंगेशकर यांची धाकटी बहीण म्हणजेच आशा भोसले. आशा भोसले यांनी त्यांच्यातील उत्कृष्ट कलागुणांनी भारतीय लोकांच्या मनावर राज्य केलं आणि आज संपूर्ण भारत आशा भोसले यांना आशाजी या नावाने ओळखतो. आशाजी प्रामुख्याने भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये काम करतात. अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशाजी हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी गायिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत. या लेखामध्ये आपण आशा भोसले यांच्या संपूर्ण जीवनावर माहिती जाणून घेणार आहोत.

asha bhosle biography in marathi
asha bhosle biography in marathi

आशा भोसले यांची माहिती – Asha Bhosle Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)आशा भोसले
जन्म (Birthday)८ सप्टेंबर १९३३
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील सांगली
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)पार्श्वगायिका, उद्योजक आणि अभिनेत्री

Asha Bhosle information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

८ सप्टेंबर १९३३ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे आशा भोसले यांचा जन्म झाला. आशाताईंचा जन्म मराठी व कोकणी कुटुंबांमध्ये झाला. दीनानाथ मंगेशकर आशाताईंचे वडील हे एक शास्त्रीय गायक आणि संगीतकार होते त्यांची आई शेवंती गुजराती होती. आशाताईंचा जन्म एका संगीत परिवारात झाला.

आशाताई नऊ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मग त्यांचे संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुरात आणि नंतर मुंबई मध्ये स्थायिक झालं. वडिलांचे निधन झाल्यावर घरातील सर्व जबाबदारी आशाताई यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यावर आली होती. आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आशाजी आणि लताजी या दोघींनी मिळून चित्रपटांमध्ये गाणी गाणे आणि अभिनय करण्यास सुरूवात केली.

आशाताईंनी वयाच्या सोळाव्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. एक उत्कृष्ट स्त्री कलाकार असून देखील साधी राहणीमान ठेवणार्‍या आशाताई स्वयंपाकाची आवड असणाऱ्या आशाताई मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी देखील आहेत. सोबतच इतका मानसन्मान मिळून देखील त्यांचे पाय आजही जमिनी मध्ये घट्ट रोवलेले आहेत.

कारकीर्द

आशाताईंच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर अशाताईंची संगीत क्षेत्रातील व चित्रपटसृष्टीतील कारकीर्द फार मोठी आहे. वडिलांचं निधन झाल्यानंतर आशाताई व त्यांची मोठी बहीण लताजी यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. संगीतमय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये आशा भोसले यांचा जन्म झाला होता. माझं बाळ या मराठी चित्रपटामध्ये आशा भोसले यांनी ‘चला चला नव बाळा’ हे आपलं पहिलं गाणं गायलं. सन १९४८ मध्ये आशा भोसले यांनी हंसराज बहल यांच्या चुनरिया या चित्रपटामध्ये सावन आया हे गाणं गाऊन हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केलं.

दिनानाथ मंगेशकर यांची मुलगी आणि लता मंगेशकर यांची बहीण या वातावरणात आशा भोसले यांनी आपल्या आवाजाला आकार दिला. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीस गीता दत्त, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या प्रख्यात पार्श्‍वगायिका यांनी मोठ्या चित्रपटातील गायनावर आपले वर्चस्व गाजवले. अशावेळी आशा भोसले यांना मोठ्या गायिकांनी नकार दिलेले असाइनमेंट मिळायची. तसेच किंवा कमी बजेट चित्रपटातील गाणी मिळायची.

१९५० च्या दशकामध्ये आशा भोसले यांनी इतर पार्श्वगायिका पेक्षा सर्वाधिक गाणी गायली परंतु यापैकी बहुतेक गाणी चांगली कामगिरी करू शकली नाहीत. सज्जाद हुसेन यांनी संगीतबद्ध केलेल्या संगदिल मधील गाण्याने आशा भोसले यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा भोसले यांना परिणिता या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली.

राज कपूर यांनी आशा भोसले यांना बूटपॉलिश या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी सरांसोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे’ हे गाणं गाण्याची संधी दिली आणि या गाण्यानंतर आशा भोसले यांना लोकप्रियता मिळाली. १९६०च्या दशकामध्ये ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांची जोडी सुपरहिट ठरली. नय्यर यांचे संगीत असणारे आंखों से जो उतरी है दिलमें, जाइए आप कहां, वह हसीन दर्द देदो, चैन से हमको कभी ही आशाताईंनी गायलेली गाणी प्रसिद्ध ठरली. १९७१ मध्ये कारवा चित्रपटातील ‘पिया तू अब तो आजा’ हे राहुल देव बर्मन यांच्या साथीने गायलेलं गाणं, ‘दम मारो दम’ व ‘जाने जा’ या गाण्यांनी आशाताईंच्या नव्या आवाजाची ओळख प्रेक्षकांना करून दिली.

‘दिल चीज क्या है’, ‘इन आंखों की मस्ती’ अशी आशाताईनी गायलेली गाणी लोकप्रिय झाली. हिंदी चित्रपट सृष्टीत सोबतच आशाताईंनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर अशा गायक गायिका बरोबर आशाताईंनी गायलेली गाणी रसिकजनांच्या मनामध्ये कायमची घर करून बसली. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या मांग के साथ तुम्हारा, साथी हाथ बढ़ाना, उड़े जब जब जुल्फें तेरी यांसारख्या रफी सरांसोबत च्या युगल गीतांनी आशाताईंना ओळख मिळवून दिली.

आजा आजा, ओ हसीना जुल्फोंवाली, ओ मेरे सोना रे ही रफी मोहम्मद सोबत गायलेली गाणी सुपरहिट ठरली. हळूहळू आशाताईंनी आपला दर्जा प्रस्थापित केला. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध संगीतकारां पैकी एक सचिनदेव बर्मन आणि त्यांची आवडती गायिका लता मंगेशकर १९५७ ते १९६२ या कालावधीमध्ये चांगल्या परिस्थितीत नव्हते. या काळामध्ये सचिन देव बर्मन यांनी आपली प्रमुख महिला गायिका, आवाज म्हणून आशाताईंची निवड केली.

आशाताई आणि सचिन देव बर्मन यांनी काला पानी, काला बाजार, इंसान जग उठा, लाजवंती, सुजाता और तीन देवियां यांसारख्या चित्रपटांमधून आशाताईंनी हिट गाणी दिली. यातील सर्वात प्रसिद्ध गाणे आशा ताई यांची किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत ची युगल गीते होती. बिमल रॉय यांच्या बंदिनी मधील अबके बरस या गाण्याने मुख्य गायिका म्हणून आशाताईंना स्थान मिळवून दिलं. आशाताईंनी गायलेलं रात अकेली है हे गाणं खूप लोकप्रिय झालं. आशा भोसले या पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या बहिणी आहेत आणि त्या सोबतच प्रख्यात मंगेशकर कुटुंबातील आहेत.

आशाताई सोप्रनो वोईस रेंज साठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा आशाताईंना त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी श्रेय दिलं जातं. आशाताई यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चित्रपट संगीत, गझल, भजने, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली आणि रवींद्र संगीत अशी संगीताची अनेक प्रकारे आपल्या सुरेल आवाजाने रसिकजनांच्या समोर मांडली. हिंदी व मराठी या दोन भाषा सोडल्या तर आशाताईंनी २० पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

आशाताई यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत १२ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. आशाताईंनी संगीत क्षेत्रामध्ये आठ दशकहुन अधिक अशी भव्यदिव्य कारकीर्द उभारली आहे. या काळातील कारकिर्दीत आशाताईंनी विविध भारतीय भाषांमधील चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. आठहून अधिक दशकांच्या कालावधीमध्ये आशाताईंना अनेक पुरस्कार लाभले.

आशाताईंना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ४ बीएफजएफ पुरस्कार, १८ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कारासह ९ फिल्मफेअर पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या सोबतच दोन वेळा ग्रॅमी नामांकन अतिरिक्त सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक यासाठी सात फिल्मफेयर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. सन २००० मध्ये आशाताईंना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च मानला जाणारा “दादासाहेब फाळके पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.

२००८ मध्ये आशाताईंना भारत सरकार द्वारे “पद्मविभूषण” देशाचा सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. याही व्यतिरिक्त आशाताईंच एकेरी सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग साठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. २०२१ मध्ये आशाताईंना महाराष्ट्र सरकार तर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आशाताईंची गाण्याची रेंज हि फारच अप्रतिम आणि वेगळी आहे. अगदी नाच रे मोरा, आईए मेहरबां, दिव्य स्वातंत्र्य रवि, तनहा तनहा यहां पर जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, ही रेंज अप्रतिम व अफाट आहे.

उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी हिंदी चित्रपट गीते, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को रॉक पॉप गाणी व इतर अन्य भाषांतील गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई ने तेवढयाच ताकदीने गायल्या आहेत. आशाताईंचे भारतीय संगीत क्षेत्रात असणार स्थान हे न बदलता येणार आहे. आशाताई या एक उत्कृष्ट परफॉर्मर आहेत आणि रसिकजनांच्या रूदयात असणारी त्यांची जागा, त्यांची उणीव कशानेही भरून काढता येणे शक्य नाही. २००२ सालापासून आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद आणि अन्य काही संस्थांच्या वतीने आशा भोसले पुरस्कार दिला जातो.

आम्ही दिलेल्या asha bhosle biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आशा भोसले यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या asha bhosle information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of asha bhosle in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!