atd course information in marathi एटीडी कोर्सची माहिती, सध्या अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करत असतात अन ते त्यांच्या कोणता चांगला कोर्स आहे ते बघून मग त्या संबधित कोर्सला प्रवेश घेत असतात आणि तसेच ज्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रामध्ये आवड आहे अश्या लोकांनी जर एटीडी सारखा कोर्स निवडला तर खूप फायद्याचे ठरेल कारण ह्या कोर्समध्ये कलाविषयक गोष्टी शिकवल्या जातात. एटीडी या कोर्सला कला शिक्षक डिप्लोमा असे देखील म्हणतात आणि या कोर्सचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप art teacher diploma असे आहे.
एटीडी हा कोर्स २ वर्षाचा कोर्स असून हा कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने १० वी चे शिक्षण किंवा १२ वी चे शिक्षण कोणत्यातरी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला ५० टक्के पेक्षा जास्त गुण असले पाहिजेत आणि त्याला कला क्षेत्रामध्ये आवड देखील असणे आवश्यक असते.

एटीडी कोर्सची माहिती – ATD Course Information in Marathi
एटीडी कोर्सचा अभ्यासक्रम – atd course syllabus
एटीडी हा एक कला क्षेत्रातील कोर्स आहे जो २ वर्षाचा आहे आणि यामध्ये प्रत्येक वर्षी एक वेगळा अभ्यासक्रम असतो आणि आता खाली आपण एटीडी कोर्सचा अभ्यासक्रम कोणता आहे ते पाहणार आहोत.
पहिले वर्ष | दुसरे वर्ष |
स्मृती आणि कल्पनाशक्ती | कला इतिहास |
रेखाचित्र आणि चित्रकला | वेळ स्केच |
मैदानी अभ्यास (स्केचिंग आणि लँडस्केप) | २ डी डिझाईन आणि रचना |
क्ले वर्क | पपेट मेकिंग आणि स्क्रीन पेंटिंग |
कागद आणि पुठ्ठा काम | स्केचिंग आणि कला अभिव्यक्ती |
२ डी आणि ३ डी डिझाईन | मेमरी ड्रॉइंग |
कला आणि संस्कृतीविषयी भारतीय इतिहास | |
ऑब्जेक्ट ड्रॉइंग (निसर्ग किंवा मानवनिर्मित) | |
ब्लॅकबोर्ड ड्रॉइंग आणि कॅलीग्राफी |
एटीडी कोर्स करण्यासाठी असणारे पात्रता निकष – atd course eligibility
कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला त्या संबधित संस्थेने ठरवलेले पात्रता निकष पार पाडावे लागतात तसेच एटीडी कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात. चला तर खाली आपण पात्रता निकष कोणकोणते आहेत ते पाहूया.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला एटीडी हा कोर्स करायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण हे मान्यताप्राप्त शाळेतून किंवा विद्यापीठातून केलेले असले पाहिजे.
- त्याचबरोबर त्या संबधित विद्यार्थ्याला १० वी मध्ये किंवा १२ वी मध्ये ५० ते ५५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असले पाहिजेत.
एटीडी कोर्सची उदिष्ठ्ये – objectives
- कला विद्या येथील ललित कला आणि डिझाईनच्या दृष्टीकोनामध्ये पारंपारिक आणि समकालीन दृष्टीकोन अनुभवने.
- त्याचबरोबर ललित कला हि अशी कला आहे जी अर्थपूर्ण जीवनाचा एक भाग म्हणून व्हिज्युअल कल्चरचा अंगीकार करू शकते आणि व्हिज्युअल आर्टच्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक करिअर करू शकते.
- व्हिज्युअल आर्ट्स हि उदारमतवादी कला शिक्षणाचा एक महत्वपूर्ण आणि गतिशील भाग आहे आणि संस्कृतीत महत्वाची भूमिका व्यापते.
- या कोर्समुळे कला आणि डिझाईन तयार करण्यासाठी आवश्यक साधने, साहित्य आणि तंत्राचा अनुभव घेता येतो त्याचबरोबर विशिष्ट संकल्पना आणि कौशल्ये शिकता येतात.
एटीडी कोर्सची प्रवेश प्रक्रिया – process
एटीडी कोर्सची प्रवेश प्रक्रिया हि संस्थेवर आधारित असते आणि खाली आपण या कोर्ससाठी सामान्य असणारी प्रवेश प्रक्रिया कशी असते ते पाहणार आहोत. प्रवेश प्रक्रिया ह्या ज्यावेळी संबधित महाविद्यालयाने नोंदणी फॉर्म हा संबधित निकाषांसह त्याच्या वेबसाईटवर पोस्ट केल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरु होते आणि हा प्रवेश विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर द्यावा लागतो.
- प्रथम आपल्याला त्या संबधित संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते.
- आता तेथे तुम्हाला प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठीचा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर जावे आणि मग तुमच्या समोर अर्ज ओपन झालेला असेल.
- आता त्या अर्जामधील सर्व माहिती भरा आणि तुमचे डॉक्यूमेंट देखील सबमिट करा.
- पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती तपासा आणि अर्ज सबमिट करा.
एटीडी कोर्सविषयी विशेष तथ्ये – facts
- हा कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने १० वी किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे तसेच त्या संबधित विद्यार्थ्याला ५५ टक्के हून अधिक गुण देखील मिळालेले असले पाहिजेत.
- एटीडी या कोर्सचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप art teacher diploma असे आहे.
- प्रवेश प्रक्रिया ह्या ज्यावेळी संबधित महाविद्यालयाने नोंदणी फॉर्म हा संबधित निकाषांसह त्याच्या वेबसाईटवर पोस्ट केल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरु होते.
- या कोर्सची प्रवेश प्रक्रिया हि त्या संबधित विद्यार्थ्याच्या १० वी किंवा १२ वी च्या गुणांच्या आधारावर असते.
- हा कोर्स २ वर्षाचा असून ह्या दोन वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम असतो.
- जर एखाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स केला तर त्या व्यक्तीला ड्रॉइंगचे शिक्षक म्हणून काम करू शकतो किंवा मग तो संबधित व्यक्ती स्वताचा ड्रॉइंग क्लास सुरु करू शकतो.
- या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कलेविषयी प्रॅक्टीकल ज्ञान मिळण्यास मदत होते.
- एटीडी हा कोर्स एक डिप्लोमा प्रकारातील कोर्स आहे ज्यामध्ये निकाल हा ग्रेडिंग दिले जाते.
- या कोर्समध्ये रेखाचित्र आणि चित्रकला, कला आणि संस्कृतीविषयी भारतीय इतिहास, पपेट मेकिंग आणि स्क्रीन पेंटिंग, ऑब्जेक्ट ड्रॉइंग ( निसर्ग किंवा मानवनिर्मित ), २डी डिझाईन आणि रचना, स्केचिंग आणि कला अभिव्यक्ती या सारखे विषय शिकवले जातात.
FAQ
Q1. ATD कोर्स म्हणजे काय?
एटीडी हा एक कला क्षेत्रातील कोर्स आहे.
Q2. ATD कोर्स किती वर्षाचा असतो?
हा कोर्स 2 वर्षाचा असतो.
आम्ही दिलेल्या atd course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एटीडी कोर्सची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about atd course in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट