एटीएम मशीनची माहिती ATM Information in Marathi

ATM Information in Marathi – ATM Full Form in Marathi एटीएम मशीनची माहिती एटीएम (अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन) मित्रहो, पतपेढीच्या चार भिंतींबाहेर राहून देखील पतपेढीच्या ग्राहकाला स्वतःच्या खात्यावरील पैसे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाखेरीज कधीही म्हणजे सध्याच्या लोकांच्या भाषेत एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम होय. atm meaning in marathi एटीएम या शब्दाचे पुर्ण विश्लेषण ‘अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन’ असे केले जाते. आपल्या देशातील लोक पैसे देण्याच्या या यंत्राला ‘एनी टाईम मनी’ यंत्र असेदेखील म्हणतात. ग्राहकाच्या पतपेढीच्या खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी अथवा अन्य मार्गाने कनेक्ट केलेले असते.

याशिवाय, संबंधित पतपेढीच्या ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता, एटएम कार्ड त्या व्यक्तीला देताना पतपेढी त्या ग्राहकाला एक सांकेतिक गुप्त क्रमांक देते. या सांकेतिक गुप्त क्रमांकाला इंग्लिशमध्ये ‘पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर’ म्हणजे थोडक्यात PIN म्हणतात.

एटीएमच्या यंत्रात एटीएम कार्ड टाकल्यानंतर, आपला स्वतःचा PIN एटीएम यंत्राच्या स्क्रीनवर टाकावा लागतो, तरच एटीएम यंत्र आपला  व्यवहार व्यवस्थितरीत्या पूर्ण करते आणि आपल्याला पैसे देते.

atm information in marathi
atm information in marathi

एटीएम मशीनची माहिती – ATM Information in Marathi

ATM Full Form in Marathi

ATM – Automated Teller Machine – अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन

एकंदरीत अत्यंत सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता अशा सर्व गोष्टी सामावलेल्या आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक असलेल्या सगळ्या बाबींची पूर्तता हे यंत्र करत असते. त्याचबरोबर, पैसे काढण्याव्यतिरिक्त एटीएम यंत्राद्वारे संबंधित पतपेढीच्या ग्राहकाला खात्यावरील शिल्लक तपासणे, पैसे काढणे, पैसे भरणे अशी अनेक कामे करता येतात.

एखाद्या वेळी जर ग्राहक आपला पिन नंबर विसरला असेल तर तो नवीन पिन कधीही काढू शकतो किंवा गरज नसताना देखील आपला पिन नंबर केंव्हाही बदलू शकतो. भारत सोडून अनेक दुसऱ्या देशांत सुद्धा एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

शिवाय, एटीएम यंत्र दुसऱ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ; ऑटोमेटेड ट्रानजेक्शन मशीन, ऑटोमेटेड बँकिंग मशीन, मनी मशीन, बँक मशीन, कॅश मशीन आणि कॅश पॉइंट इत्यादी.

मित्रहो, अशा पद्धतीने धनादेशाचा पाया हा कोअर बँकिंग यंत्रणेवर पूर्णपणे उभारलेला असतो. कोअर बँकिंग यंत्रणेमध्ये संबंधित ग्राहकाच्या खात्याची खातेवही सध्याच्या काळात शाखास्तरावर नव्हे, तर केंद्रीय मुख्यसंगणकावर काळजीपूर्वक ठेवलेली असते. एटीएम्सची यंत्रे ही संबंधित पतपेढीच्या केंद्रीय महासंगणकाशी कनेक्ट केलेली असतात.

त्यामुळे, अशा पतपेढीच्या कोणत्याही शाखेत किंवा एटीएम मशीनवर आपल्या खात्याची संपूर्ण माहिती ग्राहकाला उपलब्ध असते. खरंतर, सगळ्या बँकांना प्रत्येक शहरामध्ये एटीएम यंत्र उभे करणे कठीण असते आणि खासकरून भारतासारख्या खंडप्राय देशाला तर ही गोष्ट अशक्य आहे.

या कारणामुळे सहकार्याच्या विचारातून व व्यावसायिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त बँकांनी आपापली एटीएम्स यंत्रणा एकमेकांना उपलब्ध करून देणे हे गरजेचे ठरले. पण मित्रहो, यासाठी देखील प्रत्येक बँकांची नेटवर्क्स ही एकमेकांना कनेक्ट झाली पाहिजेत.

दोन अथवा दोनपेक्षा अधिक पतपेढींचे जाळे एकमेकांना कनेक्ट करणारा दुवा म्हणजे स्विच होय. या स्विचच्या माध्यमातून एका पतपेढीच्या एटीएम यंत्रामधून दुसऱ्या पतपेढीच्या आपल्या खात्यावर व्यवहार करणे सहज शक्य होते.

परंतू, अशा पद्धतीने  व्यवहार करण्यासाठी खातेदाराला एटीएम वापराबद्दल काही ठराविक शुल्क मोजावे लागते. एटीएमच्या वापराबद्दलचे स्विच आणि संबंधित एटीएम पतपेढी, त्यांना प्राप्त होणारे हे शुल्क योग्य त्या प्रमाणात वाटून घेतात.

इतिहास

जगातील पहिले एटीएम अथवा ‘अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन’ इसवी सन १९३९ साली न्यूयॉर्क शहरामध्ये ‘सिटी बँक ऑफ न्यूयॉर्क’ने उभे केले होते. खरंतर, ल्यूथर जॉर्ज सिम्जियन या व्यक्तीने एटीएम मशीनची निर्मिती केली होती.

पण, सुरुवातीच्या काळात पतपेढीच्या ग्राहकांच्या निराशाजनक मतामुळे आणि प्रतिसादामुळे अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत एटीएम यंत्र बंद करावे लागले. यानंतर, पुढच्या २५ वर्षांमध्ये एटीएमच्या क्षेत्रात काहीच बदल घडले नाहीत, कारण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

परंतू, या २५ वर्षानंतर दिनांक २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज पतपेढीने एन्फील्ड या गावात इलेक्ट्रॉनिक अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनची स्थापना केली आणि याठिकाणी एटीएम यंत्राची बांधणी देखील केली. खरंतर, इतक्या वर्षांनंतर पुन्हा एटीएम मशीन उभारणे ही जॉन शेफर्ड बंरन यांची मूळ कल्पना होती आणि याच दरम्यान काही अन्य अभियंत्यांनीही एटीएम बाबतीत पेटंट्स घेतलेली होती.

यातील पीआयएन (PIN) ची संकल्पना ब्रिटिश इंजिनियर जेम्स गुडफेलो यांची होती. इसवी सन २००५ मध्ये जॉन शेफर्ड बंरन यांना ‘आॅर्डर आॅफ द ब्रिटिश एम्पायर’ चा पुरस्कार बहाल करण्यात आला होता. इंटरनेटवर आधारलेल्या अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनची सुरुवात इसवी सन १९६८ मध्ये डलास-टेक्सास याठिकाणी झाली.

डोनाल्ड वेत्झ्टेल ही व्यक्ती स्वयंचलित सामान हाताळणी-यंत्रणा सांभाळणाऱ्या डॉक्युटेल नावाच्या एका कंपनीचा मुख्य विभाग प्रमुख होता. खरंतर मित्रहो, या व्यक्तीनेच ही कल्पना विकसित केली होती, त्यामुळे डोनाल्ड वेत्झ्टेलला ‘आंतरजालधारित अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनचा निर्माता’ म्हणून सगळीकडे ओळखले जाते.

याखेरीज, इसवी सन १९७३ पासून इंग्लंड देशाने आंतरजालधारित एटीएमच्या वापरामध्ये खूप प्रगती केली. लॉईड्स नावाच्या एका बँकेने ‘आयबीएम २९८४’ ही मशीन कॅशपॉइंट या नावाने उपयोगात आणली.

कॅशपॉइंट हे यंत्र सध्याच्या एटीएम मशीनशी साधर्म्य असणारे होते. आजच्या काळातही कॅशपॉइंट हा लॉईड्स ट्रस्टी सेव्हिंग्ज पतपेढीचा नोंदणीकृत ट्रेडमार्क म्हणून ओळखला जात आहे. शिवाय, आजकाल सर्व कॅशपॉइंट हे ऑनलाईन स्वरूपात आहेत. त्यामुळे, संबंधित व्यक्तीच्या खात्यावर त्याने केलेल्या व्यवहारांची पटकन नोंद होते.

जर एटीएम मशीन पतपेढीच्या परिसरात असेल, तर याच मशिनीला ‘ऑनसाईट एटीएम’ असे म्हटले जाते. कारण, अशी एटीएम यंत्रे ही अन्य एटीएम यंत्रांपेक्षा अधिक कार्यक्षम असतात. त्याचबरोबर, ही यंत्रे बँकेंची भरपूर कामं करू शकतात आणि या कारणामुळेच ती अधिक खर्चिक स्वरूपाची देखील असतात.

अशा प्रकारची अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन्स ही शॉपिंग सेंटर, मॉल्स, विमानतळ, किराणा दुकाने, पेट्रोल पंप किंवा जास्त लोकांचा वावर आहे अशा ठिकाणी आपल्याला आढळून येतात. मित्रहो, अशा एटीएम मशिन्सना ‘ऑफलाईन एटीएम्स’ असे म्हणतात. शिवाय, ही यंत्रे सामान्यतः केवळ नोटा बाहेर देण्याचे काम करतात. ऑफलाईन एटीएम्सची देखभाल घेण्याचे आणि त्यांना दुरुस्त करण्याचे काम खूप वेळा खाजगी कंपन्यांवर सोपविलेले असते.

भारतातील एटीएमचा वापर

इसवी सन १९९६ मध्ये भारतीय बँक महासंघाने पुढाकार घेत, आपल्या देशामध्ये पहिल्या स्वधन नावाच्या एका स्विचची निर्मिती केली. सर्व सरकारी आणि काही मुख्य खाजगी बँका यांचा हा एकत्रितपणे केलेला सहकारी व महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. भारतामध्ये सुरुवातीला या यंत्रणेच्या पेमेंट ॲन्ड सेटलमेंटचे व्यवस्थापन बँक ऑफ इंडियाने सांभाळले होते.

व्यावसायिकतेपेक्षाही सहकार्य या तत्त्वावर जवळपास ६७ शहरांमधून एकूण ५६ बँकांची अदमासे १००० एटीएम्स ने एकमेकांना कनेक्ट केली गेली होती. दररोजचे साधारणतः २५०० व्यवहार या नेटवर्कवर होत होते. यावेळी, प्रति व्यवहार ५५ रुपये अशा पद्धतीने ग्राहकांचे शुल्क पडत होते.

सुरुवातीला, एटीएमचा वापर करणे ही एक प्रतिष्ठेची बाब म्हणून समजली जायची आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे आपण एटीएममधून काढलेल्या रकमेची आपल्या खात्यावर लगेच नोंद न होता, ही नोंद कदाचित तिसऱ्या दिवशी होत असे.

कारण, सरकारी बँकांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान हे अद्याप बाल्यावस्थेत होते, त्यामुळे व्यवस्थापनाची इच्छाशक्ती खूप दुर्बळ होती आणि याव्यतिरिक्त कर्मचारी संघटनांचा एकूण कारभार पाहता त्याला बाळसे येणे दुर्घट दिसत होते. अशा काळातच स्वधन उदयास आले होते. हे स्वधन जवळपास सहा ते सात वर्षे चालू राहिले आणि हीच आपल्याला आश्चर्याची बाब मानावी लागेल.

पुढील काळात या स्विचच्या सेवाप्रदात्याचे संगणकप्रणाली विक्रेत्याशी काही खटके उडाल्याने, इसवी सन २००३ या वर्षाच्या शेवटी स्वधन हे स्विच बंद पडले.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या atm machine information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एटीएम मशीनची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या atm information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of atm in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये atm card information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!