ऑटोमोबाईल अभियांत्रिकी Automobile Engineering Information in Marathi

automobile engineering information in marathi ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, सध्या अनेक विद्यार्थी हे अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत जसे कि सिव्हील अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, टेक्सटाइल अभियांत्रिकी, आर्क्टिटेक्चर अभियांत्रिकी इत्यादी आणि ऑटोमोबाइल अभियांत्रिकी हे देखील अभियांत्रिकी शिक्षण शाखेमधील प्रकार आहे आणि जे मॅन्युफॅक्चरिंग, डिझायनिंग, यांत्रिक यंत्रणा आणि ऑटोमोबाइल संबधित सर्व ऑपरेशन्स निगडीत आहे.

ऑटोमोबाइल अभियंते हे मोटारसायकल, कार, बस, मोठी वाहने आणि इतर वाहने या सारख्या इतर वाहनांच्या उत्पादनासाठी किंवा निर्मितीसाठी कार्य करत असतात. हे उत्पादनाची रचना कशी करावी तसेच उत्पादनामध्ये सुधारणा काय करावी या विषयी देखील बांधील असतात.

जर एखादा व्यक्ती हा ऑटोमोबाइल अभियंता झाला तर तो खाजगी आणि सरकारी अश्या दोन्ही प्रकारच्या कंपनीमध्ये काम करू शकतो. चला तर खाली आपण ऑटोमोबाइल अभियांत्रिकीविषयी सविस्तर माहिती घेवूया.

automobile engineering information in marathi
automobile engineering information in marathi
अनुक्रमणिका hide

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – Automobile Engineering Information in Marathi

ऑटोमोबाइल म्हणजे काय – automobile meaning in marathi  

ऑटोमोबाइल अभियांत्रिकी हि वाहन अभियांत्रिकीची शाखा आहे आणि यामध्ये मेकॅनिकल, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिक, सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे घटक समाविष्ट असतात, जे कार, मोटारसायकल, स्कूटर आणि इतर अनेक वाहनांचे डिझाईन, उत्पादन, नियोजन आणि अपग्रेडेशन करण्यासाठी वापरले जाते. तसेच वाहनांच्यामध्ये काही बदल किंवा नवीन वैशिष्ठ्ये देखील समाविष्ट करण्याची जबाबदारी देखील ऑटोमोबाइल शाखा आपल्या हाती घेते.

ऑटोमोबाइल अभियांत्रिकीच्या जबाबदाऱ्या – responsibilities

खाली आपण ऑटोमोबाइल अभियंते कश्या आणि काय जबाबदाऱ्या पार पडतात या विषयी खाली आपण माहिती घेवूया.

  • वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचे संशोधन आणि डिझाईन आणि उत्पादन घटक यावर काम करणे.
  • त्याचबरोबर ऑटोमोबाइल अभियंत्याचे मुख्य काम म्हणजे नवीन उत्पादनाचे नियोजन करणे आणि त्या नवीन डिझाईनवर काम करणे.
  • विविध परीस्थिती मध्ये वाहनांच्या वर्तनाचा अंदाज घेणे आणि अंदाज घेण्यासाठी संगणकीकृत मॉडेल्सचा वापर करणे.
  • अभियांत्रिकीच्या इतर शाखांच्यासः कार्य करणे, जसे कि एरोस्पेस अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, नागरी अभियांत्रिकी आणि औद्योगिक अभियांत्रिकी.
  • खर्चाचे अंदाज आणि डिझाईनवर काम करणे आणि उत्पादनातील अपयशओळखणे आणि त्यावर कार्य करणे.
  • त्याचबरोबर कंपनीच्या विपणन आणि विक्री संघासह काम करणे.

ऑटोमोबाइल अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्व – importance

सध्या प्रवासासाठी, मालाची वाहतूक करण्यासाठी आणि इतर कामांच्यासाठी वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे खाली आपण ऑटोमोबाइल अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्व काय आहे ते पाहणार आहोत.

  • इतर अभियांत्रिकी क्षेत्राच्या तुलनेने ऑटोमोबाइल क्षेत्रातील अभियंत्यांना सर्वाधिक पगार मिळतो कारण सध्या वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचबरोबर लोक नवीन वैशिष्ठ्ये आणि डिझाईन असणारी वाहने पसंत करत आहेत त्यामुळे या क्षेत्रातील काम हे वाढलेले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये जास्त पगार दिला जात आहे.
  • या क्षेत्रामधून एखाद्या व्यक्तीने शिक्षण घेतले तर त्या व्यक्तीला चांगल्या पोस्टवर नोकरीची संधी मिळू शकते कारण वर सांगितल्या प्रमाणे या क्षेत्रामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या वाहनांचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील काम वाढले आहे आणि यामुळेच या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी ह्या उपलब्ध आहेत.
  • ऑटोमोबाइल अभियांत्रिकी शाखा हि एक इतर क्षेत्रापेक्षा वेगळी शाखा आहे आणि या शाखेचे महत्व केंव्हाच कमी होत नाही.
  • यामध्ये मेकॅनिकल, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिक, सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे घटक समाविष्ट असतात त्यामुळे आपल्याला या घटकांच्या विषयी देखील शिकता येते .
  • ऑटोमोबाइल अभियांत्रिकी हे शिक्षण घेवून आणि थोडा अनुभव घेवून आपण स्वताचा व्यवसाय देखील सुरु करू शकतो.

ऑटोमोबाइल अभियांत्रिकी हे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कोर्स किंवा शिक्षण घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीला त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि तसेच जर एखाद्या व्यक्तीला ऑटोमोबाइल अभियांत्रिकी या शाखेमध्ये शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला देखील काही मोजके पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते पात्रता निकष काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • जर एखाद्या व्यक्तीला ऑटोमोबाइल अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीने १२ वोचे शिक्षण हे विज्ञान (पीसीएमबी) शाखेतून पूर्ण केलेले असावे किंवा मग त्या संबधीत विद्यार्थ्याने ऑटोमोबाइलचा ३ वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा.
  • तो संबधित विद्यार्थ्याला १२ वी विज्ञान ( पीसीएमबी ) शाखेमध्ये किंवा ऑटोमोबाइलच्या डिप्लोमामध्ये कमीत कमी ५० ते ५५ टक्के गुण मिळालेले असावेत आणि तो एका मान्यताप्राप्त विद्यापीठातून उतीर्ण झालेला असावा.

ऑटोमोबाइल अभियांत्रिकीसाठी प्रवेश परीक्षा – entrance exam

ऑटोमोबाइल अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे कॉलेजे किंवा महविद्यालये हि बहुतेकदा राष्ट्रीय आणि राज्य स्थरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या आधारावर प्रवेश देतात आणि संबधित विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि त्यामध्ये उतीर्ण व्हावे लागते. चला तर खाली आपण ऑटोमोबाइल अभियांत्रिकी साठी असणाऱ्या काही प्रवेश परीक्षा पाहूया.

  • जेइइ मेन (Jee main).
  • गेट (GATE).
  • एमएचटी सीइटी (MHT CET).
  • गोवा सीइटी (goa Cet).
  • के सीइटी (KCET).
  • जेइइ अॅडव्हान्स (JEE advance).
  • केइएएम (KEAM).

ऑटोमोबाइल अभियांत्रिकी विषयी काही प्रश्न – questions

Q1. ऑटोमोबाइल अभियांत्रिकी मध्ये उपलब्ध असणारे जॉब कोणकोणते आहेत?

ऑटोमोबाइल अभियांत्रिकीमध्ये वाहन उत्पादनक, मॉड्यूल डेव्हलपर, टियर १ पुरवठादार, टियर २ पुरवठादार, टूल डेव्हलपर, उत्पादन आणि वाहनांचे डिझाईन, वाहनांचा विकास आणि चाचणी अश्या प्रकारच्या नोकऱ्या ह्या ५०० हून अधिक कंपन्या देतात.  

Q2. संपूर्ण भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी ऑटोमोबाइल अभियांत्रिकीसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत ?

संपूर्ण भारतामध्ये ऑटोमोबाइल अभियांत्रिकी पुणे, बेंगलोर, गुडगाव, इंदूर, चेन्नई, मानेसर या ठिकाणी या क्षेत्रातील चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.

Q3. ऑटोमोबाइल अभियांत्रिकीची मुख्य कार्य काय आहेत ?

ऑटोमोबाइल अभियांत्रिकी याची मुख्य कार्य म्हणजे वाहनाचे उत्पादन आणि वाहनांचे डिझाईन बनवणे त्याचबरोबर वाहनांचा विकास आणि चाचणी करणे त्याचबरोबर वाहनांच्यामध्ये नवीन वैशिष्ठ्ये आणि वाहनांचे नवीन डिझाईन बनवणे.

आम्ही दिलेल्या automobile engineering information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ऑटोमोबाईल अभियांत्रिकी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या automobile meaning in marathi या sajjangad fort information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about automobile engineering in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये automobile engineering meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!