अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर |
आधी हाताला चटके तव्हां मियते भाकर |
Bahinabai Chaudhari Information in Marathi कवयित्री बहिणाबाई चौधरी विषयी माहिती हि कविता कानावर पडली कि बहिणाबाई चौधरी यांचे नाव डोळ्यासमोर येते कारण हि कविता त्यांनी रचली आहे आणि त्यांच्या संपूर्ण काव्यातील हि एक लोकप्रिय कविता आहे. आज या लेखाच्या सुरुवातीस अरे संसार संसार ह्या कवितेच्या काही ओळी लिहिण्याचे कारण आज या लेखामध्ये बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत.
भारतामधील मराठी साहित्यामध्ये अनेक कवी आणि कवियित्री होवून गेले त्यामधील काहींनी अश्या कविता आणि रचना लिहिल्या कि त्या वाचून मन अगदी समाधानी होवून जाते. त्यामधील एक पूर्वीच्या काळातील प्रसिध्द आणि लोकप्रिय कवियित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी आणि त्यांच्या कविता आजही तितक्याच प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत.
बहिणाबाई चौधरी ह्या जरी अशिक्षित असल्या तरी त्यांनी रचलेल्या कविता आणि काव्य वाचले कि वाटते कि हि काव्ये आणि कविता कोणत्यातरी अनुभवी आणि सुशिक्षित व्यक्तीने लिहिली असावी. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता ह्या खानदेशी भाषेतील होत्या कारण त्या खानदेश भागातील जळगाव जवळ असणाऱ्या असोदे गावामध्ये राहत होत्या.
त्यांनी रचलेली काव्य आणि कविता ह्या संसार, शेती आणि शेतीची साधने, माहेर, सण आणि काही ओळखीच्या व्यक्ती या सारख्या विषयांवर त्यांनी कविता रचल्या आणि आपल्या मराठी साहित्यामध्ये भर टाकली. आज बहिणाबाई चौधरी या कावियीत्रीला मराठी साहित्यातील अजरामर कवी म्हणून ओळखले जाते.
सोपानदेव यांच्या मते, बहिणाबाई ह्या अनेकदा तालबद्ध कवितेत बोलत असे. जेव्हा एका शेजाऱ्याने त्यांना विचारले की तुम्ही अशा कविता कशा तयार करू शकता, त्यावर बहिणाबाई म्हणाल्या.
“माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या, मनी किती गुपीतं पेरली.”
कवयित्री बहिणाबाई चौधरी माहिती – Bahinabai Chaudhari Information in Marathi
नाव | बहिणाबाई चौधरी |
ओळख | कवियित्री |
जन्म | ११ ऑगस्ट १८८० |
जन्म ठिकाण | खानदेशातील असोदे गावामध्ये झाला जे जळगाव पासून ५ ते ६ किलो मीटर अंतरावर आहे. |
वडिलांचे नाव | उखाजी महाजन |
आईचे नाव | भिमाई |
भावंडे | एकूण सहा भावंडे बहिणी – तुळसा, अहिल्या आणि सीता भाऊ – घना, घमा आणि गणा |
जोडीदाराचे नाव | नथुजी चौधरी |
मुले | काशी, सोपान आणि ओंकार |
मृत्यू | ३ डिसेंबर १९५१ |
कौटुंबिक माहिती
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० चा आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी बहुतेक नाग पंचमी होती. यांचा जन्म खानदेशातील असोदे गावामध्ये झाला जे खानदेशातील मुख्य शहरांपैकी एक असणारे जळगाव पासून ५ ते ६ किलो मीटर अंतरावर आहे आणि बहिणाबाई चौधरी यांचा जन्म एक शेतकरी कुटुंबामध्ये झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन आणि आईचे नाव भिमाई असे होते तसेच बहिणाबाई यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ असे एकूण सहा भावंडे होती त्यामधील तुळसा, अहिल्या आणि सीता अशी तीन बहिणींची नावे होती आणि घना, घमा आणि गणा अशी तीन भावांची नावे होती.
बहिणाबाई चौधरी यांच्या वडिलांनी म्हणजेच उखाजी महाजन यांनी आपल्या मुलाची विवाह लवकर करायचे ठरवले आणि बहिणाबाई यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी जळगावचे नथुजी चौधरी यांच्याशी विवाह करून दिला. बहिणाबाई यांना काशी, सोपान आणि ओंकार अशी तीन मुले होती.
दुर्देवाने बहिणाबाई यांच्या वयाच्या ३० व्या वर्षी त्याचे पती नथुजी चौधरी यांचे निधन झाले आणि त्यामुळे त्या खूप लहान वयामध्ये विधवा झाल्या पण त्यानंतर त्या न डळमळता त्यांनी त्यांच्या मुलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले. बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू वयाच्या ७१ व्या वर्षी ३ डिसेंबर १९५१ या दिवशी झाला.
बहिणाबाई यांच्या कविता – Bahinabai Chaudhari Kavita in Marathi
Bahinabai Chaudhari Poems बहिणाबाई यांच्या कविता म्हणजे मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे आणि यांच्या या कविता म्हणजे दैनंदिन जीवनातील एक प्रतिबिंबच होते. यांचा मुलगा सोपान जो कवी होता तो आपल्या आईच्या आठवणी पाहत असताना त्याला बहिणाबाई यांनी लिहिलेल्या कविता सापडल्या त्यावेळी सोपान यांनी ह्या कविता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे हस्तलिखित लिहून संपर्क साधला.
त्यावेळी अत्रे असे म्हणाले कि हि काव्ये म्हणजे सोन आहे आणि ते महाराष्ट्रा पासून कसे लपवू चालेल. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामुळेच बहिणाबाईंच्या ह्या अमूल्य कविता जगभर पोहचू शकल्या. बहिणाबाई यांनी संसार, शेती आणि शेतीची साधने, माहेर, सण आणि काही ओळखीच्या व्यक्ती या सारख्या विषयांवर अनेक कविता रचल्या आहेत त्यामधील काही कविता खाली दिल्या आहेत.
- नक्की वाचा: मराठी कविता संग्रह
पहिली कविता
“असा राजा शेतकरी, चाल्लारे आलवाणी,
देखे तयाचया पयाखले, काटे गेले वाकीसानी
आला सास, गेला सास, जीव तुझा रे तंत्र
आरे जगना-मर्ना एक ससाचा अंतर”
दुसरी कविता
“पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड!पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे. बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी. ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी.”
तिसरी कविता
मानूस,
मतलबी रे मानसा, तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालयेमानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस.
बहिणाबाई चौधरी यांची संसारावर लिहिलेली प्रसिध्द कविता
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तव्हां मियते भाकर ॥ १ ॥अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसालेलोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥अरे संसार संसार नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥अरे संसार संसार म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥देखा संसार संसार शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥ऐका संसार संसार दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार अन सुखाले नकार ॥ ७ ॥देखा संसार संसार दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥अरे संसार संसार असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥अरे संसार संसार आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार मग जीवाचा आधार.
बहिणाबाई यांनी जन्मावर लिहिलेली कविता
मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात |
आता व्हत भुईवर, गेलं गेलं आभायात |
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये bahinabai chaudhari information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर bahinabai chaudhari kavita pdf म्हणजेच “बहिणाबाई चौधरी यांची माहिती” bahinabai chaudhari poems यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या bahinabai chaudhari kavita information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about bahinabai chaudhari in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
SUDAIVANE bahinabainchya vayachya 30 vya varshi tyanchya patiche nidhan zale. Ha jo ullekh aahe to chukicha. DURDAIVANE asa ullekh hava aahe.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!