Balasaheb Desai Essay in Marathi बाळासाहेब देसाई निबंध आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आणि लोकनेते म्हणून ओळख असणाऱ्या बाळासाहेब देसाई यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. बाळासाहेब देसाई यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विहे या गावामध्ये १० मार्च १९१० मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव दौलतराव उर्फ बाळासाहेब श्रीपतराव देसाई असे आहे. बाळासाहेब यांचा जन्म एक गरीब कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांची आई ते दीड वर्षाचे असतानाच मरण पावली होती त्यामुळे त्यांनी त्यांचे आयुष्य आईच्या मायेविना घालवले आहे.
ज्यावेळी बाळासाहेब देसाई हे कोल्हापूरला आले त्यावेळी त्यांना तिथल्या वस्ती गृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांनी एका दवाखान्यामध्ये त्यांनी नोकरी केली आणि शेवटी प्रिन्स शिवाजी वस्ती गृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला आणि मग त्यांचे एल. एल. बी ( LLB ) चे शिक्षण पूर्ण होई पर्यंत ते कोल्हापुर मध्येच राहिले. त्यांनी करवीर पीठाचे क्षत्रराज जगद्गुरू सदाशिव पाटील यांच्या पुतनीशी म्हणजेच वत्सलाबाई ( बनू ) हिच्याशी लग्न केले. आणि मग त्यांनी काही दिवस वकिली केली आणि मग ते राजकारणात पडले.
बाळासाहेब देसाई निबंध – Balasaheb Desai Essay in Marathi
Essay on Balasaheb Desai in Marathi Language
करियरच्या सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेब देसाई यांनी प्रथम सातारा, कराड आणि पाटण या ठिकाणी वकिली केली म्हणजेच ते वकील होते त्यामुळे ते न्यायालयामध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यांना हळू हळू राजकारणाची देखील आवड निर्माण होऊ लागली आणि म्हणून ते इ.स १९४० मध्ये जिल्हा स्थानिक मंडळाच्या निवडणुकीसाठी उभारले आणि त्यांनी जिल्हा स्थानिक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रचार केला आणि मग ते जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
तसेच ते इ.स १९५२ मध्ये ते पाटण तालुक्यातून विधान सभा सदस्य म्हणून ते निवडून आले म्हणजेच ते पटना तालुक्याचे आमदार बनले तसेच इ.स १९५७ मध्ये परत त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली आणि ते परत पाटण तालुक्याचे आमदार बनले आणि इ.स १९५७ या वर्षीचे ते राज्याचे कॅबीनेट मंत्री देखील झाले. इ.स १९६२ मध्ये त्यांचे पद हे आणखीनच उंचावले आणि ते १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्याचे शैक्षनिक मंत्री झाले. त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले होते आणि खूप अडचणीतून आपले शिक्षण पूर्ण केले होते.
आणि म्हणून ते शैक्षणिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी गरिबांच्या मुलांच्यासाठी म्हणजेच ज्यांचे उत्पन्न वर्षाचे उत्पन्न हे रुपये १२०० पेक्षा कमी आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या हतबल आहेत पण त्यांना शिक्षण घ्यायचे आहे अश्या मुलांच्यासाठी त्यांनी शिक्षण विमा सुरु केला. इ.स १९७८ मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राच्या द्विभाषिक राज्य सरकारमध्ये ते मुख्य मंत्री देखील होते. महाराष्ट्र सरकारच्या इतिहासात बाळासाहेब देसाई यांच्याकडे आजपर्यंतचे सर्वात मजबूत आणि एक चांगले गृहमंत्री म्हणून पाहिले जाते.
ज्यावेळी बाळासाहेब देसाई यांच्याकडे गृह आणि पोलीस खाते होते त्यावेळी त्यांनी गृह आणि पोलीस खाते मजबूत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी त्यांनी अनेक चांगली पावले उचलली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आघाडीची भूमिका बजावली आणि बॉम्बेमधील त्यांच्या कारवायांमध्ये हिंसाचाराच्या कोणत्याही उद्रेकाला खंबीरपणे सामोरे गेले. त्याचबरोबर त्यांनी पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना नावाचा साखर कारखाना काढला.
या भागातील शेतकऱ्यांना स्थिरता आणि वाढीची संधी देण्यासाठी सहकारी म्हणून हा साखर कारखाना सुरू करण्यात आला आणि या सहकारी साखर कारखान्याची स्थापना मा.लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ग्रामीण विकासासाठी केली आहे. अनेक वर्षांपासून या संस्थेत अनेकांना नोकरी मिळत आहे. बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील आदी महाराष्ट्रातील आघाडीच्या सहकारी नेत्यांसोबत जवळून काम केले आहेत.
बाळासाहेब देसाई हे इ.स १९६० मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात शैक्षणिक मंत्री बनल्यानंतर आणि त्यांना शिक्षणाचे महत्व माहित असल्य्यामुळे त्यांनी दोन वर्षांनी म्हणजेच इ.स १९६२ मध्ये कोल्हापुर मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी इ.स १९६९ मध्ये पाटण येथे बाळासाहेब देसाई कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली आणि अश्या प्रकारे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये देकील काम करून आपली मोलाची कामगिरी बजावली.
भारतातील एक आघाडीचे राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृहमंत्री, शिक्षण मंत्री आणि महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि सतत गरिबांच्या आणि असहाय्य लोकांच्या हिताचा आणि त्यांच्या सुधारणेचा विचार केला आणि म्हणून त्यांना गरीबांचा खरा नेता किंवा लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती त्याचबरोबर पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांना लोकनेते म्हणून संबोधत होते. ११ डिसेंबर १९६७ मध्ये पाटण तालुक्या मध्ये भीषण भूकंप झाला होता आणि त्यावेळी महाराष्ट्रातील लोकांना आपत्तीतून सावरण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक कार्याचे सर्वत्र कौतुक झाले.
अश्या प्रकारे बाळासाहेब देसाई यांनी अनेक अडचणींचा आणि संकटांचा सामना करून आपले शिक्षण पूर्ण केले तसेच त्यांनो कठोर परिश्रम करून एल. एल. बी ( LLB ) पूर्ण केले आणि ते वकील झाले. तसेच त्यांनी काही दिवस वकिली केली आणि मग त्यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकला आणि मग ते आमदार, गृहमंत्री, शैक्षणिक मंत्री झाले आणि गरीब आणि असहाय्य लोकांच्यासाठी अनेक कामे केली तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी देखील त्यांनी अनेक कामे केली आणि कॉलेज देखील सुरु केले आणि अश्या प्रकारे ते लोकांच्यामध्ये लोकप्रिय झाले आणि लोकनेते बनले.
आम्ही दिलेल्या balasaheb desai essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बाळासाहेब देसाई निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on balasaheb desai in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि balasaheb desai essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट