बेंजामिन फ्रँकलिन माहिती Benjamin Franklin Information in Marathi

Benjamin Franklin Information in Marathi बेंजामिन फ्रँकलिन मराठी माहिती एकतर असे लिहा जे वाचण्या लायक असेल किंवा असे काहीतरी करा जे लिहिण्या लायक असेल’ असे म्हणणारा बेंजामिन फ्रँकलिन हा शास्त्रज्ञ, संशोधक, राजदूत, राजकीय नेता, अर्थतज्ञ, सुधारणावादी, समाजकारणी, लेखक, संपादक, हवामान तज्ञ असा बहुआयामी होता. देवाने त्याला मानव जातीच्या कल्याणासाठी जन्माला घातले असावे इतके त्याचे मानवजातीवर आणि विशेषता अमेरिकेवर उपकार आहेत. अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याला त्याने केलेले योगदान इतके मोठे आहे की लोक जॉर्ज वॉशिंग्टन ऐवजी त्यालाच अमेरिकेचा पहिला अध्यक्ष मानत असत. इंग्लंडमध्ये मूळ जन्मलेला बेंजामिन फ्रेंक्लिनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा उचलला.

benjamin franklin information in marathi
benjamin franklin information in marathi

बेंजामिन फ्रँकलिन माहिती – Benjamin Franklin Information in Marathi

बेंजामिन फ्रँकलिनमाहिती
जन्म17 जानेवारी 1706
जन्म ठिकाणबॉस्टन येथे झाला
वडिलांचे नावजोसाय
आईचे नावआबायाह
सिद्धान्तविजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर फ्रांकलीन यांनी 1753 साली विद्युत  निवारकाची संकल्पना मांडली
फील्ड्सवैज्ञानिक
मृत्यू17 एप्रिल 1790

जन्म आणि बालपण :  

यांचा जन्म 17 जानेवारी 1706 साली बॉस्टन येथे झाला. फ्रँकलिन हे त्यांच्या आई वडिलांचे सतरावे अपत्य होते. आईचे नाव आबायाह आणि वडिलांचे नाव जोसाय होते. त्यांच्या वडिलांचा साबण कारखाना होता. यांच्या साबण कारखान्यात काम करत असतात मात्र त्यांना त्यामध्ये फारसा रस नव्हता.

फ्रँकलिन च्या भावाने एक वर्तमानपत्र काढले होते. त्यामध्ये फ्रँकलिनने ‘सायलेन्स डू गुड’ नावाने लेखन सुरू केले. ते सर्वत्र चर्चिले गेले. त्याने त्याच्या सायलेन्स डू गुड च्या तोंडी हे वाक्य टाकले होते “Without Freedom Of Speech There Can Be No Such Thing As Liberty Without Freedom Of “.

त्याने भावाची परवानगी न घेता बॉस्टन सोडले आणि फिलाडेल्फिया येथे गेला. वयाच्या 17 व्या वर्षी तो लंडनला वर्तमानपत्र काढायच्या सामग्रीसाठी गेला आणि लंडनला टाईप सेटर म्हणून काम करू लागला. फिलाडेल्फिया येथे गेल्यावर त्यांनी मजुरी पासून अनेक उद्योग केले आणि स्वताचा छापखाना काढला.

ते पेनसिल्वेनिया गॅझेट नावाच्या वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध करू लागले. यातील बहुतेक मजकूर ते स्वतः लिहीत असत. त्यातील व्यंगचित्रे आणि नकाशाद्वारे कथाकथन ह्या गोष्टी वाचकांच्या अत्यंत आवडीचे विषय होते. हे विषय वृत्तपत्रांद्वारे मांडणारे फ्रँकलिन हे वसाहतीत पहिले संपादक होते.

त्यातील त्यांचे लेख पुढे पुअर रिचर्डस ऑल्मन्याक यात प्रसिद्ध झाले. त्यातील सुभाषिते, मार्मिक वचने आणि म्हणी फारच लोकप्रिय ठरल्या. फोन फ्रांकलीन ला गडगंज पैसा मिळू लागला. त्याने समान विचारांच्या म्हणजे जे स्वतःबरोबर समाजाचा उत्कर्ष करू इच्छित होते. अशा माणसांचा “जनतो ” नावाचा ग्रुप काढला. त्यांना वाचनाची खूप आवड होती.

पुस्तके कमी असल्यामुळे एकमेकांना पुस्तके देऊन तसेच वर्गणी काढून पुस्तके घेऊन त्याची लायब्ररी सुरू केली. ही त्यांची पहिली लायब्ररी. मुद्रणाचा धंदा केल्यानंतर फ्रांकलीन त्यातून निवृत्त झाले. वृत्तपत्र कामगिरीमुळे ते एक अभिजात लेखक म्हणून उदयास आले होते. मुद्रण व्यवसायात असताना त्यांनी पेनसिल्वेनिया सभागृहात नोकरी पसरली. पुढे ते फिलाडेल्फिया टपाल खात्यात पोस्टमास्टर झाले.

त्यांच्या कार्यक्षम सेवेमुळे त्यांनी ब्रिटिश शासनाची मर्जी संपादन केली. त्यामुळे त्यांना डेप्युटी पोस्टमास्टर जनरल हे पद देण्यात आले. त्यांनी वसाहतींच्या टपाल खात्यात आमूलाग्र सुधारणा केले. तसेच फिलाडेल्फिया हे शहर सुधारण्याच्या अनेक योजना मांडल्या आणि त्या राबवल्या सुद्धा.

पेनसिल्वेनिया विधिमंडळाने इंग्लंडच्या स्टॅम्प निर्माण झालेल्या तीव्र वादात मध्यस्थी करण्यासाठी फ्रँकलिन यांना आपला प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला पाठवले. 1762 पर्यंत ते इंग्लंडमध्ये होते. त्यानंतर जॉर्जिया आणि मॅसेच्युसेट्स राज्यांचा एजंट म्हणून फ्रँकलिन यांची इंग्लंडमध्ये नियुक्ती करण्यात आली.  

इंग्लंडच्या वास्तव्यात त्यांनी अमेरिकेचा एक प्रभावी प्रवक्ता म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. 1773 च्या स्टॅम्प ऍक्टला त्यांनी कडाडून विरोध केला आणि आपला निषेध नोंदवला यावेळी त्यांनी An Addict By The King Of Prussia आणि Rules By Which a Great Empire May Be Reduced To a Small One या दोन राजकीय उपरोधिका प्रसिद्ध केल्या.

सुरुवातीस अमेरीकेतील वसाहती ब्रिटिश साम्राज्य पासून अलग होऊ नयेत असे त्यांचे मत होते परंतु पुढे ब्रिटिशांच्या हुकूमशाही धोरणामुळे त्यांचे मत बदलले. प्रत्येक वसाहती ने स्वतःपुरते पाहण्याची वृत्ती सोडावी आणि सर्व वसाहतींनी एकत्र येऊन सामुदायिक जीवनाचा पाया घालावा असे अमेरिकन लोक नेत्यांना बजावणाऱ्या लोकांमध्ये फ्रँकलिन यांची गणना होऊ लागली.

फ्रँकलिन यांची फिलाडेल्फिया तर्फे कॉन्टिनेन्टल काँग्रेसवर निवड झाली. त्यांना अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या मसुदा समितीत घेण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात फ्रान्सची मदत मिळवण्यासाठी फ्रांकलीन यांना फ्रान्सला पाठवण्यात आले. 1783 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता देणारा तह पॅरिस येथे झाला या तहाच्या वाटाघाटी तो फ्रांकलीन यांचा सिंहाचा वाटा होता.  

नंतर पेनसिल्वेनिया च्या कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांची दोन वर्षांकरिता नेमणूक झाली. गुलामगिरी विरुद्ध स्थापन झालेल्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले काँग्रेसमध्ये यासंदर्भात त्यांनी विधेयक ही मांडले होते.

वैज्ञानिक कार्य :  

विजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर फ्रांकलीन यांनी 1753 साली विद्युत  निवारकाची संकल्पना मांडली. यशराज या शतकाच्या मध्यापर्यंत वीज पडून अनेक उंच इमारतींची नासधूस होत असे त्या नंतरच्या काळात मात्र फ्रॅंकलिन याने तयार केलेला विद्युत निवारक उंच इमारतींची विजेपासून रक्षण करण्यास उपयोगी ठरू लागला.

फ्रँकलीनने फिलाडेल्फिया येथे 1752 साली केलेला गडगडाटी वादळात पतंग उडवण्याचा ऐतिहासिक प्रयोग विद्युत निवारकच्या निर्मितीला कारणीभूत ठरला. फ्रांकलीन ने आकाशातील वीज तसेच दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर निर्माण होत असलेली घर्षणजन्य वीज या दोन्ही एकच असल्याचे या प्रयोगातून दाखवून दिले.

फ्रांकलीन ने सीडर लाकडाच्या दोन पट्ट्यांवर रेशमी कापड बांधून एक पतंग तयार केला पतंगाच्या वरच्या टोकाला त्याने एक धातूची तार बसवली या तारेला त्याने पतंगाची दोरी जोडली. दोरीच्या दुसऱ्या टोकाला त्याने लोखंडी किल्ली बांधली. कील्लीपासून खालच्या भागात एक कोरडी रेशमी फित बांधली आणि ती धरून तो छताखाली उभा राहिला.

वादळी ढग आकाशात जमले असताना त्याने पतंग ढगात उंच उडवला. पावसामुळे पतंग आणि दोरी भिजली. ढगात असलेला विद्युत भार या भिजलेल्या पतंगात आणि त्यानंतर त्या तारेद्वारे दोरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत उतरला. दोरीवर चे धागे उभे राहत असलेले दिसतात त्याने आपले बोट किल्ली च्या जवळ आणले त्याच बरोबर त्याला जाणवण्याइतका जोरदार विजेचा झटका बसला.  

ढग हे विद्युत् भारित असल्याचे स्पष्ट झाले. घर्षणजन्य वीज साठवता येते ती लेंडन बरणी त्याने या किल्ली जवळ आणली. लेण्डन बरणीच्या विद्युत वाहक पत्र्याला किल्ली टेकावल्या बरोबर ती बरणी विद्युत् भारित झाली यावरून त्याने दाखवून दिले की आभाळात कडाडणारी वीज आणि प्रयोगशाळेतील घर्षणजन्य विदयुत यामध्ये फरक नाही.

विजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर फ्रांकलीन याने 1753 साली विद्युत निवारकची कल्पना मांडली. इमारती वर एखादा धातूचा दांडा बसवायचा त्याला लांबलचक धातूची पट्टी जोडायची आणि या पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या संपर्कात आणायचे. यामुळे गडगडाटी वादळात त्या वस्तूवर जमा होणाऱ्या विद्युत भागाला धातूच्या दांड्या द्वारे सुलभ व वाहक मार्ग मिळेल आणि वीज तिच्यातून निघून जमिनीत सहजपणे विसर्जित होईल.

परिणामी विजेपासून इमारतीचा बचाव होईल. फ्रांकलीन ने सुचवलेल्या या विद्युत निवारकचा लवकरच सर्वत्र वापर चालू झाला. वीज  अणकुचिदार पृष्ठभागावर जास्त आकर्षित होते म्हणून घरांच्या वर अनकुचिदार खांब बसवला आणि त्याचे एक टोक जमिनीत पुरले तर वीज घरावर न पडता जमिनीत जाईल हे त्याने शोधून काढले.

1746 मध्ये बिशपचे विजेवर असलेले भाषण ऐकल्यावर त्याने विजेवर प्रयोग करण्यास सुरुवात केली. वीज ही प्रवाही असते आणि तिच्यात धन आणि ऋण बाजू असतात हे सिद्ध केले. शिक्षण नसताना केवळ वाचनाच्या आधारे तो महान संशोधक झाला. त्याला हार्वर्ड आणि एल या युनिव्हर्सिटी नी डॉक्टरेट दिली आणि तो डॉक्टर बेंजामिन झाला.

त्याने उष्णतेवर पण शोध लावले. ईथर मुळे थंडावा येतो हे फ्रीज चे तत्त्व त्याने शोधून काढले. 1751 मध्ये त्याने अकॅडमी अँड कॉलेज ऑफ फिलाडेल्फिया या युनिव्हर्सिटीची स्थापना केली आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. प्रथम सेक्रेटरी आणि नंतर चेअरमन झाला.

हे सर्व चालू असताना त्याचे राजकीय महत्त्व पण वाढत होते पेंनसिलवानिया मध्ये तो हिरो झाला होता. ज्यावेळी आपण भारतात तलवारी आणि तोफांनी युद्ध करत होतो तेव्हा ते वीज आणि प्रकाशावर संशोधन करत होते आणि संसदेत लढा देत होते. बेंजामिन ने सगळ्या तेरा कॉलनी ना एकत्र आणले.

अमेरिकेच्या जडणघडणीत तो एक मुख्य व्यक्ती बनला. अमेरिकेची घटना लिहिणे, फ्रान्स बरोबरच या करारावर स्वाक्षरी करणे इत्यादी महत्त्वाच्या घटनांमध्ये त्याचे योगदान होते. अमेरिका स्वतंत्र झाली हे डिक्लेरेशन सुद्धा त्याने केले.

फ्रांकलीन यांचे विचार :

  • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण लवकर मोठे होतो पण समजदार होण्यासाठी खूप वेळ लागतो.
  • देव त्याची मदत करतो जो स्वतःची मदत करतो.
  • ज्याच्याकडे धैर्य आहे तो जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकतो.
  • छोट्या छोट्या खर्चापासून सावध राहा कारण छोटेसे होल सुद्धा मोठ्या जहाजाला बुडू शकते.

मृत्यू :  

फ्रांकलीन यांचा मृत्यू 17 एप्रिल 1790 मध्ये झाला. अमेरिकेसारख्या राष्ट्रांच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले होते. तसेच त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन नवीन प्रयोग केले होते. त्यांचे आत्मचरित्र जगातील एक उत्कृष्ट आत्मचरित्र मानले जाते. त्यांना अनेक उच्च पदे प्राप्त झाली. अमेरिकेच्या इतिहासात त्यांचा सर्वज्ञ म्हणून गौरव करण्यात येतो. त्यांच्या स्मरणार्थ अमेरिकेत अनेक मान्यवर संस्था स्थापन करण्यात आल्या.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि बेंजामिन फ्रँकलिन कोण होते benjamin franklin information in marathi त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. benjamin franklin scientist information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच benjamin franklin electricity information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about benjamin franklin in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही benjamin franklin in marathi information त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!