Bhagat Singh Essay in Marathi माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग निबंध आज आपण या लेखामध्ये सर्व भारतामध्ये शहीद म्हणून ओळखणारे भगतसिंग यांच्या विषयी निबंध लिहिणार आहोत. भगतसिंग यांचा भारतीय स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक प्रयात केले आहेत आणि त्यांनी देशासाठी प्राण दिले आहेत आणि म्हणूनच त्यांना शहीद भगतसिंग म्हणून ओळखले जाते. भगतसिंग यांचा जन्म पंजाब मधील फैसलाबाद जिल्ह्यातील बांगा मध्ये २८ सप्टेंबर १९०७ मध्ये संधू जाट कुटुंबामध्ये झाला होता आणि भागात सिंग यांचे कुटुंब हे शेतकरी होते आणि ते शेतकरी कुटुंबा मध्ये झाल्यामुळे ते राहणीमान देखील खूप सोपे होते.
भगतसिंग यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशनसिंग असे होते. त्यांनी आपल्या वयाच्या १३ व्या वर्षी शिक्षण सोडले होते आणि त्यांनी नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेवून युरोपियन क्रांतिकारक चळवळीचा आभास केला होता. भगतसिंग यांना देशाबद्दल खूप प्रेम आणि आत्मियता होती आणि त्यांनी आपले आयुष्य हे देशासाठीच समर्पित केले होते.
ज्यावेळी त्यांच्या घरातील त्यांचे लग्न लावून देण्याचा विचार करत होते त्यावेळी त्यांनी लग्नासाठी नकार दिला होता आणि ज्यावेळी त्यांच्या घरातील लोकांनी त्यांच्या लग्न लाऊन देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते घर सोडून निघून गेले होते.
माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग निबंध मराठी – Bhagat Singh Essay in Marathi
Essay On Bhagat Singh In Marathi
भगतसिंग यांचे नाव आपल्या देशासाठी लढलेल्या आणि प्राणाची आहुती दिलेल्या लोकांच्या यादीमध्ये होते आणि हे जिवंतपणी देशासाठी लढणारे एक उत्तम उदाहरण होते आणि ते आज देखील अनेक लोकांना प्रेरित करतात. भगतसिंग हे असे क्रांतिकारक होते कि त्यांना गांधीयवादी तत्वे आवडत नव्हती आणि ते त्या तत्वांच्या विरोधात होते.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक लोकांनी आपले आयुष्य त्याग केले आणि भागात सिंग हे देखील त्यामधीलच एक होते. भगतसिंग यांना लहानपनी पासूनच देशाबद्दल प्रेम होते आणि त्यांनी ते अगदी लहान वयातच मुक्तीच्या अनेक लढ्यामध्ये भाग घेत होते तसेच त्यांनी काही दिवस उर्दू भाषेतील वृत्तपत्रासाठी लेखक आणि संपादक म्हणून देखील काम केले होते.
ते आपले शिक्षण घेत असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी सुरुवात केली होती आणि ते विद्यार्थी असतानाच एक विद्यार्थी संघटनेची स्थापना केली होती आणि त्यावेळीच त्यांची भेट क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या सोबत झाली. १९२६ मध्ये भगत सिंग हे नौजवान भारत सभा याची स्थापना केली तसेच हिंदुस्थान रिपब्लिकन असोशीयेषण मध्ये ते सामील झाले होते.
१९२८ मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये भगत सिंग हे राजगुरु आणि सुखदेव यांच्या सोबत भारतीय राष्ट्रवादी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी एक डाव अक्खला आणि त्यामध्ये असे ठरवले कि लाहोरमधील पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांना मारण्याचा कट रचण्यात आला.
यामध्ये तसेच त्यांनी सहय्य्यक पोलीस अधीक्षक जॉन्स सॉडर्स यांचा जीव घेतला आणि त्यावेळी भगत सिंग यांना गुन्हेगार म्हणून पाहू लागले. त्यांनी आपण ओळख कोणाला सहजासहजी होऊ नये म्हणून दाढी आणि केस कापून टाकले आणि ते लाहोर सोडून कलकत्ता या शहरामध्ये गेले.
Essay on Freedom Fighter Bhagat Singh in Marathi
भगतसिंग यांनी बॉम्बस्फोट प्रकरणात देखील सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२९ मध्ये भगत सिंग यांनी बुकटेश्वर दत्त यांच्यासोबत आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या सोबत दिल्लीमधील सेन्ट्रल असेंब्लीमध्ये विझीटर्स गॅलरीतून बोंब फेकला होता त्यावेळी त्यांनी “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा दिला होता.
या घटनेमध्ये त्यांना कोणालाही दुखापत करायचा हेतू नव्हता किंवा कोणालाही या घटनेमध्ये इजा झाली नाही. भगतसिंग आणि बुकटेश्वर दत्त यांना यामधून फक्त क्रांतीचा आणि सामाराज्यावाद विरोधी संदेशाचा प्रचार करायचा होता. भागात सिंग हे या घटने मागचे मुख्य सूत्रधार होते आणि त्यांना पॅरीस मधील अशाच एका घटनेसाठी फ्रांसने फाशी दिलेले ऑगस्टे वायलांट या फ्रेंच अराजकतेपासून प्रेरणा मिळाली.
या घटनेमुळे भगतसिंग आणि बुकटेश्वर दत्त यांना अटक करण्यात आले होते आणि या दरम्यान झालेल्या खटल्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण काही काळाने भगतसिंग यांना राजगुरू, सुखदेव आणि इतरांसह जॉन्स सॉडर्स खून प्रकरणा संबधी अटक करण्यात आले आणि भगत सिंग यांच्यावर हा खटला १९२९ या वर्षामध्ये जुलै महिन्यामध्ये सुरु झाला.
त्यानंतर त्यांना व त्यांच्या साथीदारांना लाहोर तुरुंगामध्ये ठेवले आणि त्या तरुण नेत्यांनी त्यांना कैदेत चांगले उपचार मिळावे म्हणून उपोषण सुरु केले. भगतसिंग यांनी ११६ दिवस उपोषण केले आणि त्यानंतर त्यांचे वडील आणि इतर नेत्यांच्या विनंतीवरून उपोषण सोडले. भगत सिंग आणि त्याचे साथीदार कैदेत असताना जवाहरलाल नेहरूंसह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.
भगतसिंग यांच्यावर जो खटला सुरु होता तो एकतर्फी होता आणि भगतसिंग यांच्यासोबत, राजगुरू आणि सुखदेव यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मग त्यानंतर शिक्षेच्या स्थरातून निषेध झाला तसेच अनेक राष्ट्रीय नेत्यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची शिक्षा कमी करण्याची विनंती केली परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही.
२४ मार्च १९३१ मध्ये या तिघांना फाशी देण्याचे आदेश देण्यात आले. आणि शिक्षा फाशी देण्याच्या अगोदर एक दिवस सांगण्यात आली होती. त्यांना फाशी दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. असे म्हटले जाते कि सिंग यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांनी ब्रिटीश साम्राज्यवादाचा पराभव केला होता. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशीमुळे अनेक भारतीय लोकांच्या कडून तीव्र प्रक्रिया उमटल्या तसेच अनेक तरुण स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी प्रवृत्त झाले.
२३ मार्च १९३१ मध्ये खूप कमी वयामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या देशासाठी आयुष्याची आहुती दिली. आणि तेव्हापासून २३ मार्च हा शहीद दिवस किंवा सर्वोदय दिन म्हणून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अश्या प्रकारे भगतसिंग यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावली. खाली भगतसिंग यांचा एक मोलाचा विचार दिला आहे.
“ते मला मारू शकतात पण माझ्या कल्पना ते मारू शकत नाहीत
ते माझ्या शरीराला चिरडून टाकू शकतात पण माझ्या आत्म्याला
चिरडून टाकू शकणार नाहीत.”
आम्ही दिलेल्या Bhagat Singh Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhagat singh in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on bhagat singh in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shaheed bhagat singh essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
भगतसिंग यांच्यावर हा खटला जुलै 1929 मध्ये झाला