bhaichung bhutia information in marathi भाईचुंग भुतिया माहिती, भारतामध्ये अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावून आपले आणि देशाचे नाव मोठे केले आहे आणि त्यामधील एक खेळाडू म्हणजे भाईचुंग भुतिया आणि हा एक फुटबॉल खेळाडू आहे आणि या खेळाडूला फुटबॉल खेळामधील सचिन तेंडूलकर म्हणून ओळखले जाते कारण त्याने या खेळामध्ये तशी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. सध्या हा खेळाडू या खेळामधून निवृत्त जरी झाला असेल तर त्या खेळाडूने स्ट्रायकर म्हणून आपली कामगिरी बजावली होती.
भाईचुंग भुतिया यांनी दिल्ली या ठिकाणी झालेल्या १९९२ च्या सुब्रोतो चषक स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि या स्पर्धेमध्ये या खेळाडूला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला आणि अश्या प्रकारे त्यांची खेळाची सुरुवात झाली. भाईचुंग भुतिया यांचा जन्म हा १५ डिसेंबर १९७६ मध्ये भारतातील सिक्कीम राज्यातील टींकिटम या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव दोरजी डोरमा असे आहे.
आणि आईचे नाव सोनम टॉपडेन असे आहे. तसेच त्यांना दोन भाऊ (चेवांग भुतिया आणि बॉम भुतिया) आणि एक बहिण (काली) आहे. त्यांचे लग्न २००४ मध्ये माधुरी टिपणीस यांच्या सोबत झाले होते आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे परंतु २०१५ मध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचा घटस्पोट झाला आहे.
भाईचुंग भुतिया माहिती – Bhaichung Bhutia Information in Marathi
नाव | भाईचुंग भुतिया |
जन्म | १५ डिसेंबर १९७६ |
जन्मठिकाण | भारतातील सिक्कीम राज्यातील टींकिटम |
शाळेचे नाव | सेंट झेवियर्स स्कूल (पूर्व सिक्कीम) |
पालक | दोरजी डोरमा आणि सोनम टॉपडेन |
ओळख | फुटबॉलपटू |
पत्नीचे नाव | माधुरी टिपणीस |
खेळाची प्रारंभिक सुरुवात
त्यांना एसएआय शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी गंगोटोकमधील सुप्रसिध्द तशी नामग्याल अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी सिक्कीममधील अनेक शाळा आणि स्थानिक क्लबसाठी ते सर्वप्रथम खेळले आणि ज्यावेळी भाईचुंग भुतिया यांनी १९९२ मध्ये दिल्ली मध्ये झालेल्या सुब्रोतो चषक स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेवून त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडून विजेते पद जिंकले.
आणि त्यावेळी भाईचुंग भुतिया यांचे नाव हे फुटबॉल खेळाशी जोडले गेले आणि त्यावेळी त्यांना फुटबॉल खेळामध्ये चांगली संधी मिळण्यास आणि पदार्पण करण्यास सोपे झाले. त्याचबरोबर दिल्ली मध्ये झालेले सुब्रोतो चषक स्पर्धेमध्ये यश मिळवल्यामुळे त्यांना कलकत्ता फुटबॉलमध्ये वाटचाल करण्यास मदत झाली.
१९९३ मध्ये भाईचुंग भुतिया हे कलकत्ता इस्ट बंगालचा एक भाग होते आणि त्यांनी १९९५ मध्ये त्यांच्या संघाने भारतीय राष्ट्रीय फुटबॉल लीग जिंकली आणि त्यामध्ये भाईचुंग भुतिया हे त्या लीगमध्ये सर्वाधिक धावा बनवणारे खेळाडू होते आणि अश्या प्रकारे त्यांनी या खेळाची सुरुवात केली.
भाईचुंग भुतिया यांची फुटबॉल खेळामधील कामगिरी – career
- भाईचुंग भुतिया यांनी १९९२ मध्ये दिल्ली मध्ये झालेल्या सुब्रोतो चषक स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेवून त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडून विजेते पद जिंकले आणि त्यावेळी भाईचुंग भुतिया यांचे नाव हे फुटबॉल खेळाशी जोडले गेले.
- भाईचुंग भुतिया यांनी १९९६ आणि १९९७ च्या हंगामामध्ये इंडिया नॅशनल फुटबॉल लीग जिंकली आणि या लीगमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा तो खेळाडू बनला आणि या यशामुळे त्याला नेहरू चषक स्पर्धेमध्ये अंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी मदत झाली.
- नेहरू चषक स्पर्धेमध्ये भुतिया याला उझबेकीस्थानविरुध्द चांगल्या प्रकारे धावसंख्या मिळवली आणि अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी भारताचा सर्वात तरुण गोलकीपर बनला.
- १९९८ आणि १९९९ मध्ये ते संघाचे कर्णधार बनले आणि ज्या दरम्यान इस्ट बंगाल लीगमध्ये साळगावकर नंतर दुसरे स्थान मिळवले.
- भाईचुंग भुतिया यांनी ३० सप्टेंबर १९९९ मध्ये ईंग्लंडमधील ग्रेटर मॅचेस्टरमधील बरी या ठिकाणी खेळण्यासाठी त्याने परदेशामध्ये प्रवास केला आणि तो मोहम्मद सलीमनंतर युरोपमध्ये व्यावसायिकपणे खेळणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
- तो भारतामध्ये आल्यानंतर परत एकदा पूर्व बंगाल क्लबमध्ये परतला आणि त्यांने आशियन क्लब चॅम्पीयनशिप जिंकण्यास मदत केली आणि त्याने २००५ – २००६ या दरम्यामध्ये पूर्व बंगाल क्लबसाठी एकूण ९ गोल बनवले.
- भाईचुंग भुतिया याने २००५ – २००६ या दरम्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून राष्ट्रीय फुटबॉल लीगचा खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आणि ज्या ठिकाणी त्याने १२ गोल केले होते.
- २००८ मध्ये एएफसी चॅलेंज कपमध्ये तुर्कमेनिस्तानविरुध्द २-१ असा विजय मिळवून त्यांनी चॅलेंज कप हे दोनदा जिंकले.
- २००९ मध्ये झालेला नेहरू चषक हा भाईचुंग भुतियासाठी उल्लेखनिय होता कारण त्याने किरगीझस्तानवर २-१ असा विजय मिळवून त्याने देशासाठी १०० कॅप मिळवली आणि अश्या प्रकारचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला.
- त्याचबरोबर २०११ मध्ये झालेल्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रोलिया आणि बहारीन विरुध्द पहिल्या दोन सामन्यांमध्ये दुखापत झाली होती.
- २४ ऑगस्ट २०११ मध्ये भारतासाठी १०४ सामन्यांमध्ये ४० गोल करण्याच्या विक्रमासह निवृत्तीची घोषणा केली परंतु २०१५ पर्यंत तो क्लब फुटबॉल मध्ये खेळत राहिला.
- तसेच त्यांनी २०१८ मध्ये सिक्कीम फुटबॉल संघामध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले.
भाईचुंग भुतिया यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts
- भाईचुंग भुतिया याने २००९ मध्ये इंडियन स्पोर्ट फाऊंडेशन नावाने एका फाऊंडेशनची सुरुवात केली.
- सिक्कीममधील सरकारने त्यांच्या सन्मानार्थ नामची याठिकाणी भाईचुंग स्टेडीयम बांधले.
- भाईचुंग भुतिया यांनी झलक दिखला जा या रियालिटी शो मध्ये तिसऱ्या सीजनमध्ये भाग घेतला होता आणि तो सीजन जिंकला होता.
- त्यांचे लग्न २००४ मध्ये माधुरी टिपणीस यांच्या सोबत झाले होते परंतु २०१५ मध्ये त्यांचा घटस्पोट झाला होता.
भाईचुंग भुतिया यांना मिळालेले पुरस्कार – awards
भाईचुंग भुतिया यांनी फुटबॉल खेळामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती आणि त्यासाठी त्यांना काही पुरस्कार देखील मिळाले ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.
- भाईचुंग भुतिया यांना २००८ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
- त्याचबरोबर १९९८ मध्ये त्यांनी फुटबॉल खेळामधील चांगल्या कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
- तसेच २०१४ मध्ये बंग भुषन हा पुरस्कार मिळाला होता.
FAQ
Q1. भाईचुंग भुतिया हा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?
फुटबॉल खेळाशी.
आम्ही दिलेल्या bhaichung bhutia information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भाईचुंग भुतिया माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhaichung bhutia football information in marathi या bhaichung bhutia information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि bhaichung bhutia information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट