Bhakarwadi Recipe in Marathi भाकरवडी रेसिपी मराठी बाकरवडी रेसिपी भाकरवडी हा देखील एक भारतीय फराळी पदार्थ आहे जो आवर्जून दिवाळीच्या सणामध्ये बनवला जातो. भाकरवडी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. परंतु हा पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि साहित्य देखील जास्ती लागते. परंतु या पदार्थामध्ये घातलेले साहित्य आणि घालवलेला वेळ या दोन्हींचे समाधान आपल्याला हा पदार्थ खाल्ल्यानंतर मिळते. कारण हा पदार्थ खुसकुशीत, तिखट, आंबट, गोड आणि मसालेदार ह्या सर्वच चावीचा आस्वाद आपल्याला एकाच पदार्थामध्ये घेता येतो.
भाकरवडी हा पदार्थ बनवताना मैद्यामध्ये तिखट आणि मीठ घालून त्याची कणिक मळली जाते आणि त्याची मोठी पाने लाटून त्याला चिंचेचा कोळ लावला जातो आणि त्यावर खोबऱ्याचे तिखट सारण पसरवून त्याचा रोल केला जातो आणि त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून त्या तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळल्या जातात.
भाकरवडी हा पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि हे बनवण्यासाठी जास्ती साहित्य देखील लागते त्यामुळे बहुतेक लोक हे घरी बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्या बाजारातून विकत आणतात. परंतु बाजारातून विकत आणलेल्या भाकरवड्यांमध्ये मसाला कमी आणि शेव जास्त असते.
त्यामुळे त्या इतक्या स्वादिष्ट लागत नाहीत पण घरी बनवलेल्या भाकरवड्या खूप चं लागतात कारण त्यामध्ये तिखट, आंबट, गोड आणि मसालेदार हे सर्वच कॉम्बिनेशन असते. चला तर मग आज या लेखामध्ये आपण घरच्या घरी खमंग, खुसकुशीत आणि स्वादिष्ट भाकरवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

भाकरवड़ी रेसिपी मराठी – Bhakarwadi Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
पाककला | भारतीय |
भाकरवडी म्हणजे काय ?
भाकरवडी हा पदार्थ बनवताना मैद्यामध्ये तिखटआणि मीठ घालून त्याची कणिक मळली जाते आणि त्याची मोठी पाने लाटून त्याला चिंचेचा कोळ लावला जातो आणि त्यावर खोबऱ्याचे तिखट सारण पसरवून त्याचा रोल केला जातो आणि त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून त्या तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळल्या जातात.
- नक्की वाचा: कोथिंबीर वडी मराठी माहिती
- मैदा : मैदा हा घटक भाकरवडी बनवण्यासाठी महत्वाचा असतो कारण मैद्याची कणिक मळली जाते आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून त्याची मोठी पाने लाटून त्यामध्ये सारण भरून त्याचे रोल केले जातात व त्याच्या वड्या पाडून ते तळले जाते.
- खोबरे : भाकरवडीमध्ये जे सारण वापरले जाते ते खोबऱ्याचे असते कारण त्यामध्ये वाळलेले आणि खिसलेले खोबरे वापरले जाते त्याचबरोबर त्या सारणामध्ये तिखट, मीठ, कोथिंबीर आणि इतर साहित्य वापरले जाते.
भाकरवडी हा पदार्थ भारतीय पदार्थ आहे आणि आपण या पदार्थाला भारतीय पारंपारिक पदार्थ म्हणून देखील ओळखू शकतो कारण हा पदार्थ खूप पूर्वीपासून बनवला जातो. हा पदार्थ आपण घरी बनवण्यासाठी सोपा आहे. परंतु हा पदार्थ बनण्यासाठी थोडा वेळ लागतो पण या पदार्थाच्या चवीमुळे हा बनवण्यासाठी घालवलेल्या वेळाचे समाधान मिळते. चला तर मग पाहूयात भाकरवडी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
पाककला | भारतीय |
भाकरवडी बनवण्यासाठी मैदा आणि सुखं खिसलेल खोबरं हे महत्वाचे साहित्य लागते. त्याचबरोबर भाकरवडी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते ते आपण खाली पाहू. आता आपण भाकरवडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सविस्तर पणे पाहूयात.
- ३ वाटी सुखं खिसलेल खोबरं.
- १ छोटी वाटी लसून पाकळ्या ( सोललेल्या ).
- अर्धी वाटी कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- २ चमचे तीळ.
- १ चमचा खसखस.
- १ चमचा बडीशेफ.
- २ चमचे गरम मसाला पावडर.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- पाव किलो मैदा.
- १ चमचा रवा.
- २ चमचे डाळीचे पीठ.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा गरम मसाला पावडर.
- २ ते ३ चमचा तेल किंवा तूप ( मोहन घालण्यासाठी ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
इतर साहित्य
- तेल ( तळण्यासाठी ).
- चिंच आणि गुळ.
- सर्वप्रथम १ छोटी वाटी चिंच घ्या आणि त्यामध्ये अर्धी छोटी वाटी चिरलेला गुळ घाला आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते ५ ते ६ तास भिजी द्या.
- मग मिक्सरमध्ये लसून वाटून घ्या आणि तो बाजूला ठेवा.
- आता सारण बनवण्यासाठी खिसलेले खोबरे एक मोठ्या मिक्सिंग बाऊल मध्ये घ्या आणि मग त्यामध्ये वाटलेला लसून, तीळ. खसखस, बडीशेप, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, साखर आणि मीठ घाला आणि ते प्रथम हाताने चांगले मिक्स करून घ्या.
- नंतर ते थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मोठे मोठे फिरवा किंवा मध्यम वेगामध्ये फिरवा त्यामुळे सर्व मिश्रण चांगले मिक्स होईल. ( टीप: हे मिश्रण कोरडे असावे याची काळजी घ्यावी ).
- आता हे मिश्रण बाजूला ठेवा.
- आता एक परातीमध्ये मैदा घ्या आणि त्यामध्ये रवा, डाळीचे पीठ, लाल तिखट, गरम मसाला, मीठ (चवीनुसार) आणि गरम तेल किंवा तूप घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
- मग त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले घट्ट आणि मऊ मळून घ्या आणि ते झाकून १० मिनिटे ठेवा.
- आता त्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा.
- त्यामधील एक गोळा घ्या आणि त्या गोळ्याला कोरडा मैदा लावून त्याचे मोठे पान लाटा आणि मग त्या संपूर्ण पानाला भिजत ठेवलेले चिंच आणि गुल मिश्रण लावा आणि मग त्यावर खोबऱ्याचे सारण पसरून घ्या.
- सारण पडू नये म्हणून लाटण्याला पीठ लावून ते सारणावर लाटणे फिरवून ते सारण पानावर घट्ट बसवा आणि त्याचा रोल करा.
- आणि त्या रोलच्या छोट्या छोट्या वड्या पाडा.
- आता एक कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि तेलामध्ये जितक्या वड्या मावतील तितक्या घाला आणि त्या मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
- अश्या प्रकारे सर्व गोळे लाटून त्यामध्ये सारण पसरून, त्याचा रोल करून वड्या पाडाव्यात आणि त्या तेलामध्ये तळून घ्याव्यात.
- आपली खमंग आणि कूसकुशीत भाकरवडी तयार झाली.
टिप्स ( Tips )
- जर तुम्हाला भाकरवडीमध्ये बडीशेफ आवडत नसेल तर तुम्ही ती घातली नसली तरी चालेल.
- भाकरवडीच्या सारणामध्ये थोडी शेव देखील घातली तरी चालते.
आम्ही दिलेल्या bhakarwadi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भाकरवड़ी रेसिपी मराठी bhakarwadi recipe in marathi video बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhakarwadi recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chitale bandhu bhakarwadi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhakarwadi recipe in marathi by archana Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट