भाऊ कदम जीवन परिचय Bhau Kadam Biography in Marathi

Bhau Kadam Biography in Marathi – Bhau Kadam information in Marathi भाऊ कदम जीवन परिचय. कॉमेडी किंग म्हणून नावाजले जाणारे भाऊ कदम आपल्या विनोदाच्या माध्यमातून घराघरात पोहचले‌. भाऊ कदम हे नाव ऐकताच चेहऱ्यावर हसू येतं याचं कारण म्हणजे ते विनोदी कलाकार आहेत आणि दरवेळी वेगवेगळ्या विनोदी भूमिका साकारत ते रसिकांना हसवण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर भाऊ कदम यांचे नाव हमखास असतं. चित्रपट सृष्टी मध्ये भाऊ कदम यांची हास्यसम्राट अशी ओळख आहे. चला तर जाणून घेऊया प्रसिद्ध विनोदी कलाकार व अभिनेता भाऊ कदम यांचा जीवन परिचय.

bhau kadam biography in marathi
bhau kadam biography in marathi

भाऊ कदम जीवन परिचय – Bhau Kadam Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)भालचंद्र पांडुरंग कदम
जन्म (Birthday)१२ जुलै १९७२
जन्म गाव (Birth Place)मुंबईतील वडाळा
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)विनोदी कलाकार

Bhau Kadam information in Marathi

जन्म

भाऊ कदम यांचा जन्म १२ जुलै १९७२ साली झाला. भाऊ कदम यांचे संपूर्ण नाव भालचंद्र पांडुरंग कदम होय. मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी कॉटर्स मध्ये भाऊ कदम यांनी बालपण घालवलं. पुढे वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये त्यांच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात झाली. भाऊ कदम यांचे वडील भारतीय पेट्रोलियम मध्ये काम करायचे तर आई गृहिणी होती. भालचंद्र हे नाव बोलायला फार अवघड जायचं म्हणून त्यांची आई त्यांना लाडाने भाऊ अशी हाक मारायची.

आज संपूर्ण महाराष्ट्रात ते भाऊ या नावानेच ओळखले जातात. प्रत्येक मोठ्या कलाकाराच्या यशामागे संघर्ष असतो याचा प्रत्यय भाऊ कदम यांची संघर्ष कहाणी ऐकल्यावर येतो. भाऊ कदम यांच्या वडिलांचे अकाली निधन झालं आणि त्यामुळे भाऊ कदम यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत वडाळा हुन डोंबिवलीमध्ये यावं लागलं. पुढे भाऊ कदम डोंबिवली मध्येच स्थायिक झाले.

घरची परिस्थिती थोडी हालाखीची होती शिवाय घराची संपूर्ण जबाबदारी भाऊ कदम यांच्या खांद्यावर आली होती. उपजीविकेसाठी भाऊ कदम यांची धडपड सुरू झाली. सुरुवातीला ते मतदार नावनोंदणी चे काम करायचे परंतु त्यामध्ये संपूर्ण घराचा खर्च भागत नसल्याने आपल्या भावाच्या सोबतीने एक पानाची टपरी सुरू केली.

भाऊ कदम यांनी ममता कदम यांच्याशी विवाह केला आणि या दाम्पत्यांना आता तीन मुली आणि एक मुलगा देखील आहे. भाऊ कदम यांचा स्वभाव अत्यंत साधा, शांत व लाजरा आहे. जरी सेटवर ते खोडकर किंवा मस्तीखोर वाटत असले तरी ते अत्यंत लाजर्‍या स्वभावाचे आहेत. साधी राहणी आणि विनोदी विचारसरणी असं भाऊंच व्यक्तिमत्व आहे.

अभिनय कारकीर्द

भाऊ कदम यांना लहानपणापासूनच अभिनयाची रुची होती. आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्नदेखील केले. एक दिवस मोठ्या पडद्यावर झळकायचे हे स्वप्न मनात ठेवून भाऊंनी असंख्य नाटकांमध्ये काम केलं. शाळेत असताना भाऊ अतिशय लाजाळू होते पण तेवढाच त्यांचा स्वभाव खोडकर ही होता. शाळेमध्ये देखील त्यांनी विविध नाटकांमध्ये सहभाग घेतला जवळपास पंधरा वर्ष भाऊ कदम अभिनय क्षेत्रामध्ये सक्रीय होते आणि या कालावधीमध्ये भाऊंनी पाचशेहून अधिक नाटकं केली.

पाचशेहून अधिक नाटकं करून देखील भाऊंना हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती. त्यांच्या अभिनय क्षेत्रामध्ये त्यांना मोठ्या संधीची गरज होती. भाऊ कदम यांनी अभिनय क्षेत्रामधून माघार घेण्याचं ठरवलं होतं तितक्यात विजय निकम यांनी भाऊ कदम यांना जाऊ तिथे खाऊ या नाटकांमध्ये मुख्य भूमिकेसाठी संधी दिली. विजय निकम हे भाऊ कदम यांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरले. या संधीचं भाऊ कदम यांनी सोनं केलं.

या नाटकामुळे भाऊ कदम यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, हे नाटक भाऊ कदम यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरल. या नाटकाने भाऊ कदम यांना इंडस्ट्री मध्ये एक नवीन ओळख निर्माण करून दिली आणि इंडस्ट्री मध्ये सर्वत्र भाऊ कदम यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. पुढे भाऊ कदम यांनी बरीच नाटके केली जी अतिशय सुपरहिट ठरली.

भाऊ कदम यांची नाटकांमधील भूमिका प्रामुख्याने विनोदी असायची आणि म्हणूनच ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले. फु बाई फु या शोमुळे भाऊ कदम महाराष्ट्रातील कानाकोपरा मध्ये पोहोचले. जाऊ तिथे खाऊ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये काम करून भाऊंना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळेच बऱ्याच लोकांनी भाऊ कदम यांचे नाव फु बाई फु मराठी शोसाठी सुचवलं.

भाऊंनी सलग दोन वेळा या शोची ऑफर नाकारली कारण भाऊ कदम यांचा आत्मविश्वास कमी झाला होता आणि म्हणून त्यांना हे काम जमणार नाही असे वाटायचे. भाऊ यांचा स्वभाव थोडासा लाजाळू आहे म्हणून टेलिव्हिजनवर त्यांना काम करायला जमेल का याचीही शंका होती. म्हणून भाऊंनी ऑफर नाकारली होती परंतु भाऊंना पुन्हा ही ऑफर देण्यात आली तेव्हा ही तिसर्यांदा आलेली ऑफर भाऊ कदम यांनी स्वीकारली. आणि फु बाई फु शो मध्ये भाऊ कदम यांनी भन्नाट कॉमेडी करून महाराष्ट्रातील रसिक मनावर राज्य केलं.

इतकेच न्हवे तर भाऊ कदम हे फु बाई फू च्या सहाव्या पर्वाचे विजेते ठरले. जिकडे तिकडे फक्त भाऊ कदम हे एकच नाव सातत्याने वर येऊ लागलं. इंडस्ट्रीमध्ये भाऊ कदम यांना मान सन्मान मिळू लागला व त्यांना मागणी देखील सुरू झाली. २०१४ मध्ये झी मराठी ने चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाची ओळख महाराष्ट्राला करून दिली. या कार्यक्रमांमध्ये भाऊ कदम यांचा देखील सहभाग आहे. मराठी सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी झी मराठी ने हा कॉमेडी शो सुरू केला आहे.

ज्या वेळी मराठी कलाकार निवडण्याची वेळ आली तेव्हा सर्वात आधी भाऊ कदम यांचं नाव घेतलं गेलं. भाऊ कदम यांनी निलेश साबळे यांच्या सोबत मिळून अनेक विनोदी पात्र केली आहेत या शोमध्ये भाऊ कदम यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका रसिकांना आवडली. भाऊ कदम यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका लोकांना खळखळून हसायला भाग पाडते. बघता बघता हा शो भरपूर प्रसिद्ध झाला आणि भाऊ कदम हे संपूर्ण महाराष्ट्राचे सुपरस्टार झाले.

या शो ने टीआरपीचा उच्चांक गाठला. या शो चे सहाशेहून अधिक एपिसोड यशस्वीरित्या पार पडले. यातील प्रत्येक एपिसोडमध्ये भाऊ कदम यांनी उत्तम भूमिका बजावली आहे भाऊ कदम हे आपल्या अचूक टायमिंग साठी ओळखले जातात. भाऊ कदम यांना त्यांच्या विविध भूमिकांमुळे वेगवेगळे अवॉर्ड्स देखील प्रदान करण्यात आले. झी मराठीच्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यामध्ये भाऊ कदम यांचा सहभाग नेहमीच असतो. अभिनय करताना भाऊ कदम यांच्या चेहऱ्यावर येणारे भोळेभाबडे हावभाव त्यांच्यातील निरागसतेचे पुरावे देतात.

भाऊ कदम यांची विनोद करण्याची शैली इतर कलाकारांपेक्षा वेगळी आहे आणि याच कारणास्तव लाखो मराठी चाहत्यांमध्ये भाऊ कदम यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. भाऊ कदम यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केल आहे. टाइमपास, टाईमपास टू, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू या चित्रपटांमध्ये भाऊ कदम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि हे चित्रपट यशस्वी देखील ठरले.

मराठी चित्रपट सोबतच भाऊ कदम यांनी बॉलिवूडमधील फरारी की सवारी या चित्रपटा मध्ये देखील अभिनय केला आहे. अनेक सुपरहिट नाटकं, रियालिटी शोज,मराठी चित्रपटांमध्ये काम करत भाऊ कदम यांनी आपल्या भूमिकांमध्ये विनोदाचा भन्नाट तडका मारायला कधीच विसरले नाही. सन २०२२ मध्ये भाऊ कदम यांचा पांडू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. या चित्रपटामध्ये भाऊ कदम मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्यासोबत त्यांची सहकलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी या मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्या.

भाऊ कदम यांनी पांडू च्या भूमिकेतून पुन्हा एकदा रसिकांची मनं जिंकून घेतली. अनेक नाटकांमध्ये काम करून देखील कारकिर्दीमध्ये मोठी संधी येत नव्हती म्हणून अभिनयाला कायमचा रामराम ठोकायला निघालेले भाऊ कदम आज महाराष्ट्राचे कॉमेडी किंग म्हणून ओळखले जातात. एकेकाळी पान टपरी चालवणारे भाऊ कदम आज संपूर्ण महाराष्ट्राला हास्याचा विडा वाटत आहेत. भाऊ कदम यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संघर्षांचा सामना केला आहे.

समोर येणारी प्रत्येक परिस्थिती त्यांनी आपल्या स्मित हास्याने दूर केली आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा हसत सामना केला. मोठा कलाकार व्हायचं असेल तर संघर्ष हा अटळ आहे. एखाद्या चित्रपटाची कथा असावी अशी भाऊ कदम यांच्या जीवनाची गाथा आहे. भाऊ कदम यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. भाऊ कदम यांनी आपल्या हास्याचे विमान सातासमुद्रापार नेले.

भाऊ कदम यांनी त्यांच्या विनोदी व्यक्तिरेखे मूळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील प्रसिद्धी मिळवली आहे. इतर राज्यातील विविध भाषिक लोकदेखील मराठी शिकू इच्छितात आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना भाऊ कदम यांचे विनोदी किस्से ऐकायला मिळतील. ताण-तणाव नैराश्यावर रामबाण औषध म्हणजे भाऊ कदम यांचे विनोद. प्रसंगानुसार अचुक टायमिंग ला विनोद निर्माण करणे हे भाऊ कदम यांचे वैशिष्ट्य आहे. विनोदाचा उत्कृष्ट टायमिंग साधणारा विनोदवीर भाऊ कदम यांना महाराष्ट्राचा सलाम.

आम्ही दिलेल्या bhau kadam biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भाऊ कदम जीवन परिचय मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhau kadam information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of bhau kadam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!