भेंडी मसाला रेसिपी मराठी Bhindi Masala Recipe in Marathi

Bhindi Masala Recipe in Marathi भेंडी मसाला रेसिपी मराठी आज आपण या लेखामध्ये भिंडी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बहुतेक लोक भेंडी खाण्यास नकार देतात कारण त्यांना भेंडी हा प्रकार आवडत नाही. पण जर आपण भिंडी मसाला केला तर ती रेसिपी लोक आवडीने खातील कारण यामध्ये भेंडी तळून आपण ती टोमॅटोच्या ग्रेविमध्ये मिक्स केली जाते. गडबडीच्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो कि आन कोणती भाजी बनवावी त्यावेळी आपण भरलेली वांगी, मसाला दोडका किंवा भिंडी मसाला यासारख्या भाज्या बनवू शकतो आणि भिंडी मसाला हि तर झटपट बनणारी भाजी आहे.

भिंडी मसाला हि एक खूप सोपी आणि झटपट म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग आता आपण भिंडी मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.

bhindi masala recipe in marathi
bhindi masala recipe in marathi

भेंडी मसाला रेसिपी मराठी – Bhindi Masala Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ ७ ते ८ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ २७ ते २८ मिनिटे
पाककला भारतीय

भिंडी मसाला बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • भेंडी : भेंडी मसाला बनवण्यासाठी ताज्या आणि छोट्या भेंड्या वापरल्या तर ते उत्तम होईल. भिंडी मसाला बनवताना आपण जर भेंडी तळून घेतली तर त्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो.
  • कांदा आणि टोमॅटो : भिंडी मसाला बनवताना त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट वापरली जाते आणि कांदा आणि टोमॅटो पेस्ट वापरल्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते.
  • दही : भिंडी मसाल्यामध्ये जर आपण दही वापरले तर ग्रेविला दाटपणा येतो तसेच ग्रेविला थोडी आंबट चव येते.

मसाला भेंडी बनवण्याची रेसिपी – how to make bhindi masala

भिंडी मसाला रेसिपी हि एक भारतीय डिश आहे आणि हि डिश आपण गडबडीच्या वेळी बनवून चपाती किंवा रोटी सोबत खावू शकतो. भिंडी मसाला हि रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम बनू शकते. अनेक लोकांना भेंडी आवडत नाही पण जर आपण भेंडी अश्या प्रकारे बनवून सर्व्ह केली तर ती सर्वांना आवडेल. चला तर मग भिंडी मसाला कसा बनवायचा आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ ७ ते ८ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ २७ ते २८ मिनिटे
पाककला भारतीय

भिंडी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make bhindi masala recipe 

भिंडी मसाला बनवण्यासाठी भेंडी, कांदा, टोमॅटो आणि दही मुख्य साहित्य लागते तसेच भिंडी मसाला बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि ते काही वेळा घरामध्ये उपलब्ध नसते त्यावेळी आपण भिंडी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर मग भिंडी मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २५० ग्रॅम ताजी भेंडी.
  • २ मोठे आणि लाल ताजे टोमॅटो ( उभे चिरलेले ).
  • १ मोठा कांदा ( उभा चिरलेला ).
  • ३ चमचे आले लसून पेस्ट.
  • २ ते ३ पाने तमाल पत्री पाने.
  • १ बदाम फुल.
  • १ तुकडा दालचिन.
  • १ वाटी फेटलेले दही.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/४ चमचा हळद.
  • १ चमचा गरम मसाला.
  • २ मोठे चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( भेंडी तळण्यासाठी ).

भिंडी मसाला बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make bhindi masala 

  • सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि मग त्याच्या दोन्ही बाजू काढून टाका आणि भेंडीचे चार भाग करा ( आपण भरलेल्या वांगे चिरतो तशी भेंडी उभी चिरून त्याच्या चार भाग करा ) आणि ते बाजूला ठेवा.
  • आता कढई मध्ये भेंडी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल मध्यम आचेवर गरम करा.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये चिरलेल्या भेंड्या तेलामध्ये टाकून त्या कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या भाजून घ्या अश्या प्रकारे सर्व भेंड्या तळून घ्या आणि ह्या भेंड्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता त्या कढईतील तेल हळूवार दुसऱ्या भांड्यामध्ये काढून कढई परत गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि मग त्यामध्ये बदाम फुल, दालचिन, तमाल पत्रीची पाने, कांदा आणि टोमॅटो घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून ते चांगले भाजून घ्या आणि भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडा वेळ गार होऊ द्या.
  • आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्याची बारीक पेस्ट करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण थोडे पातळ करा.
  • त्यानंतर गॅसवर ग्रेवी पॅन गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ते काही सेकंद भाजा आणि आणि मग त्यामध्ये आपण बनलेली कांदा टोमॅटो पेस्ट घाला आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालून मिक्स करून त्यामधील पाणी आटेपर्यंत भाजून घ्या मग त्यामध्ये दही आणि मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करा आणि मग त्यामध्ये शेवटी आपण तळून ठेवलेल्या भेंड्या घाला आणि ते मिक्स करा.
  • आणि यावर झाकण लावून ते ५ ते १० मिनिटे वाफवून घ्या आणि गॅस बंद करा आणि आपण बनवलेला भिंडी मसाला सर्विंग बाऊल मध्ये काढा आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाका आणि सर्व्ह करा.

भिंडी मसाला कश्यासोबत खातात – serving suggetsions 

  • भिंडी मसाला आपण चपाती, रोटी, नान किंवा पांढऱ्या भातासोबत खावू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • भिंडी मसाल्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो न भाजत तसाच मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून घातला तरी चालतो.
  • आपण भिंडी मसाला बनवताना कांदा आणि टोमॅटो पेस्ट, दही, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद पूर्वीच एका बाऊल मध्ये एकत्र करून ते ग्रेवी बनवताना वापरू शकतो.

आम्ही दिलेल्या bhindi masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भेंडी मसाला रेसिपी मराठी ladies finger masala बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bharwa bhindi masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dahi bhindi masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhendi recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: