bhivgad fort information in marathi – bhimgad fort information in marathi भिवगड किल्ला माहिती, भारतामध्ये आणि विशेषता महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यांनी बांधून ठेवलेले ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात आणि त्यामध्ये काही किल्ली हे आकाराने मोठे असतात तर काही किल्ले हे आकाराने छोटे असतात परंतु जरी या किल्ल्यांचा अकरा हा छोटा किंवा मोठा असला तरी त्या संबधित किल्ल्याला मात्र काही ना काही चांगला इतिहास असतो जो लोकांना भुरळ पडतो आणि म्हणूनच अनेक पर्यटक त्या किल्ल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी तसेच त्या किल्ल्याविषयी काय इतिहास जोडलेला आहे.
हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. महाराष्ट्रामध्ये असे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत जसे कि रायगड, राजगड, प्रतापगड, वज्रगड, अजिंक्यतारा यासारखे अनेक किल्ले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असणारा एक छोटीशी ट्रेक करता येणार किल्ला म्हणजे भिवगड आणि आज आपण या लेखामध्ये भिवगड या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
भिवगड या किल्ल्याला भीमगड या नावाने देखील ओळखले जाते आणि हा किल्ला कर्जत जवळ असणाऱ्या वदप आणि गौरकामत या गावांच्यापाठीमागे एका छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्यावर चढण्यासाठी किल्ल्याच्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्यावरून आपण किल्ला चढू शकतो.
हा किल्ला दोन वाटांनी चढता येतो म्हणजे हा किल्ला वदप या गावातून किल्ला चढता येतो किंवा गौरकामत या गावातून किल्ला चढता येतो वदप गावातून खिंडीमध्ये चढल्यानंतर तेथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी १० मिनिटे लागतात आणि गौरकामत गावातून खिंडीमध्ये गेल्यानंतर भिवगड हा किल्ला चढण्यासाठी २० मिनिटे लागतात. जर आपण वदप या गावातून भिवगड या किल्ल्यावर चढलो आणि गौरकामत या गावामध्ये उतरलो तर आपली छोटीशी ट्रेक होऊ शकते.
भिवगड/भीमगड किल्ला माहिती – Bhivgad Fort Information in Marathi
भिवगड किल्ल्यावर चढण्यासाठी मार्ग
भिवगड या किल्ल्यावर चढण्यासाठी दोन मार्ग आहेत ते म्हणजे वदप या गावातून किल्ल्यामध्ये चढण्यासाठी वाट आहे तसेच गौरकामत या गावामधून देखील वाट आहे.
- गौरकामत मार्गे वाट : गौरकामत या गावामधून जो रस्ता जातो तो भिवगड गडावर जातो आणि भिवगड च्या पायथ्याशी गेल्यानंतर तेथून कच्चा रस्ता चालू होतो आणि तेथून पुढे थोडे चालत गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या खिंडीमध्ये पोहचतो मग खिंडीतून भिवगडच्या रस्त्यावर आपण गडावर चढू शकतो.
- वदप मार्गे वाट : वदप या गावामध्ये धबधबा आहे आणि या धबधब्याचा फाटा सोडल्यानंतर पुढे उजव्या बाजूला गेल्यानंतर गावातून भिवगडला जायचा रस्ता आहे. कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर खिंडीमध्ये पोहचतो आणि खिंडीतून २ वाटा फुटतात एक वाट भिवगडला जातो आणि दुसरा ढाक किल्ल्याकडे जातो. भिवगडच्या रस्त्याने पुढे चाललो कि गडावर पोहचण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात.
भिवगड मधील ऐतिहासिक ठिकाणे
भिवगड किंवा भीमगड हा किल्ला एका छोट्याश्या टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्यावर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्यावरून आपण किल्ल्यावर चढू शकतो तसेह त्या ठिकाणी कातळामध्ये बनवलेल्या २ पूर्वीच्या बांधकाम शैलीतील पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच या किल्ल्यावर दगडामध्ये खोदलेल्या दोन गुहा आहेत आणि असे म्हटले जाते कि या गुहांचा उपयोग हा टेहळणी करण्यासाठी होत होता तसेच गुहेच्या बाहेर एक मनुष्य आणि प्राणी यांचे शिल्प कोरलेले आहे.
तसेच या गडाला एक प्रवेशद्वार देखील आहे परंतु ते उद्वस्त झाले आहे आणि या किल्ल्यावर खांब टाके देखील पहायला मिळतात. या किल्ल्यावर बालेकिल्ला देखील आहे आणि बालेकिल्ल्याच्या वाटेने जाताना उजव्या बाजूला दोन पाण्याचे टाके आहेत जे दगडामध्ये कोरलेले आहेत.
त्याचबरोबर असे म्हटले जाते कि या किल्ल्यावर एकूण ९ पाण्याचे टाके आहेत आणि या ठिकाणी सातवाहन काळामधील उत्खनन केलेला एक स्तंभ देखील पाहायला मिळतो. या किल्ल्याच्या एका टोकाला एक बुरुज आहे आणि या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराची टेहाळणी करता येते. किल्ल्याला दगडांची तटबंदी देखील होती जी सध्या कोसळली आहे. अश्या प्रकारे या किल्ल्यामध्ये अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत परंतु या किल्ल्याविषयी कोणतीही ऐतिहासिक माहिती मिळत नाह
किल्ल्या पर्यंत कसे पोहचावे – How to reach
कर्जत या गावापासून वदप हे गाव ५ किलो मीटर अंतरावर आहे आणि वदप या गावापासून गौरकामत हे गाव १ किलो मीटर अंतरावर आहे आणि या दोन्ही गावातून आपण भिवगड या किल्ल्यावर पोहचू शकतो कारण वदप गावातून देखील किल्ल्यावर चढण्यासाठी मार्ग आहे आणि गौरकामत या गावातून देखील किल्ल्यावर चढण्यासाठी मार्ग आहे.
आपण जर रेल्वेने जायचे ठरवल्यास आपण रेल्वेने कर्जत पर्यंत जाऊ शकतो आणि पुणे किंव मुंबई मधून कर्जतला जाण्यासाठी आपल्याला रेल्वे मिळू शकते तसेच कर्जत मध्ये रेल्वेने पोहचल्यानंतर आपल्या टॅक्सीने वदप या गावामध्ये जावू शकतो किंवा गौरकामत या गावामध्ये जाऊन तेथून भिव्गाडावर जाण्यासाठी पाई प्रवस करावा लागतो.
जर आपण आपले स्वताचे वाहन घेवून गेलो तर ते सोयीस्कर ठरेल कारण आपल्या सवताच्या वाहनाने आपण वदप किंवा गौरकामत या शहरापर्यंत जाऊ शकतो आणि मग तेथे आपली कर पार्क करून कच्च्या रस्त्याने किल्ला चढण्यास सुरुवात करू शकतो.
वदप या गावातून भिवगड किंवा भीमगड या किल्ल्यावर चढण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात आणि गौरकामत या गावातून भिवगड या किल्ल्यावर चढण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वदप या गावातून भिवगड या किल्ल्यावर चढलो आणि गौरकामत या गावामध्ये उतरलो तर आपली छोटीशी ट्रेक होऊ शकते.
आम्ही दिलेल्या bhivgad fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भिवगड/भीमगड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhimgad fort information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट