bhms information in marathi बीएचएमएस कोर्सची माहिती, बीएचएमएस हा एक होमिओपॅथी औषधातील पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम आहे आणि आज अपान या लेखामध्ये या बीएचएमएस होमिओपॅथी अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. बीएचएमएस चे पूर्ण स्वरूप बॅचलर इन होमिओपॅथीक मेडिसिन अँड सर्जरी आहे आहे आणि हा कोर्स करण्यासाठी किंवा या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी त्या संबधित व्यक्तीने बारावीचे शिक्षण हे विज्ञान विभागातून केले पाहिजेत आणि त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे विषय घेऊन १२ वीचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे.
बीएचएमएस हा कोर्स करण्यासाठी ५ वर्षाचा कालावधी असतो आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्या संबधित व्यक्तीला कमीत कमी सहा महिन्याची आणि जास्तीत जास्त १ ते १.५ वर्षाची इंटर्नशिप करावी लागते आणि आणि या कोर्सची फी १.५ लाख ते २ लाख पर्यंत असते किंवा मग ती फी विद्यापीठांच्यानुसार बदलू शकते.
परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स केला तर या क्षेत्रामध्ये त्याचे चांगले करिअर बनू शकते. चला तर खाली आपण बीएचएमएस विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.
बीएचएमएस कोर्सची माहिती – BHMS Information in Marathi
कोर्सचे नाव | बीएचएमएस (BHMS) |
BHMS Full Form in Marathi – पूर्ण स्वरूप | बॅचलर इन होमिओपॅथीक मेडिसिन अँड सर्जरी (bachelor in homeopathy medicine and surgery) |
कोर्सचा कालावधी | ५ वर्ष |
कोर्सचा प्रकार | पदवी |
पात्रता | १२ विज्ञान शिक्षण |
होमिओपॅथी म्हणजे काय – bhms meaning in marathi
अनेकांना माहित नाही कि होमिओपॅथी म्हणजे काय, होमिओपॅथी हि एक समग्र वैद्यकीय प्रणाली आहे. ज्यात शरीराची नैसर्गिक उपचार प्रणाली वाढवून रुग्णांच्यावर उपचार केला जातो.
बीएचएमएस हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक कोर्स करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला त्या संबधित संस्थेने किंवा विद्यापीठाने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तसेच होमिओपॅथी औषधातील बीएचएमएस हा कोर्स करताना देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात. बीएचएमएस हा कोर्स करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- जर एखाद्या व्यक्तीला बीएचएमएस हा कोर्स करायचा असल्यास त्या व्यक्तीने त्याचे किंवा तिचे १२ वीचे शिक्षण हे विज्ञान शाखेतून पूर्ण करणे आवश्यक आहे आणि त्याने किंवा तिने १२ वी चे शिक्षण हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन पूर्ण केले पाहिजेत.
- तसेच त्या संबधित विद्यार्थ्याला १२ विज्ञान शाखेमध्ये ५० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले पाहिजेत आणि त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे.
- त्या संबधित विद्यार्थ्याची वयोमर्यादा हि कमीत कमी १७ ते १८ वर्ष असली पाहिजे.
प्रवेश परीक्षा – entrance test
जर एखाद्या व्यक्तीला बीएचएमएस अभ्यासक्रम घ्यायचा असल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि ह्या प्रवेश परीक्षेमध्ये उर्तीर्ण झाल्यानंतर त्या संबधित व्यक्तीला या कोर्ससाठी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळू शकतो.
नीट ( neet ) याचे पूर्ण स्वरूप नॅशणल एलिजीब्लीटी कम एन्ट्रान्स टेस्ट ( national eligibility cum entrance test ) असे आहे. हि परीक्षा बीएचएमएस शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्यासाठी दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. नीट हि परीक्षा २०० प्रश्नांची असते आणि या साठी ७२० गुण असतात आणि या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी असतात आणि यामध्ये योग्य उत्तरासाठी ४ गुण असतात आणि नकारात्मक उत्तरांच्यासाठी १ गुण वजा केला जातो.
- बीव्हीपी सीइटी (BVP CET) :
या परीक्षेला भारतीय विद्यापीठ सामाईक परीक्षा ज्याला इंग्रजीमध्ये ( bharati vidyapeeth common entrance test ) म्हणतात. हि परीक्षा वर्षातून एकदा आयोजित केली जाते आणि यामध्ये २०० प्रश्न विचारले जातात आणि २०० गुणांची हि परीक्षा असते आणि या परीक्षेला नेगेटिव्ह मार्किंग नसते.
- इएएम सीइटी ( EAM CET ) :
इएएम सीइटी हि एक अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षा आहे आणि याचे पूर्ण स्वरूप engineering, agricultural and medical common entrance test ) असे आहे. हि परीक्षा एकूण १६० मार्काची असते आणि यामध्ये रसायनशास्त्रातील ४० प्रश्न, भौतिकशास्त्रातील ४० प्रश्न आणि गणितातील ८० प्रश्न असतात आणि या परीक्षेसाठी ३ तासाचा कालावधी असतो आणि या बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि या परीक्षेमध्ये नेगेटीव्ह मार्केटिंग नसते.
बीएचएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया – entrance test
खाली आपण बॅचलर इन होमिओपॅथीक मेडिसिन अँड सर्जरी या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया कसी असते या विषयी आपण माहिती घेवूया.
- विद्यार्थी बीएचएमएस अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश मिळवू शकतात आणि राज्य आणि राष्ट्रीय स्थरावर विविध चाचण्या घेतल्या जातात.
- प्रवेश परीक्षेत उतीर्ण होणाऱ्या सर्व इच्छुकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार क्रमवारी दिली जाते.
- प्रवेश परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना समुपदेशन फेरीसाठी बोलावले जाते.
- समुपदेशन सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी त्यांच्या ३ पसंतीच्या महाविद्यालयांची यादी विचारली जाते.
- उमेदवारांच्या श्रेणीनुसार, त्यांना त्यांच्या पसंतीच्या यादीतून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.
- काही महाविद्यालये, अंतिम प्रवेशापूर्वी, प्रत्येक पात्र उमेदवारीचे वैयक्तिक मुलाखत फेरी आयोजित केली जाते.
- मुलाखतीच्या सत्रादरम्यान, व्यक्तीला अभ्यासक्रमातील प्रश्नांचा सामना करावा लागतो ज्यामुळे मुलाखतकाराला हे समजण्यास मदत होते कि उमेदवाराला विषयाच्या मुलभूत संकल्पना किती स्पष्टपणे समजतात.
- मग शेवटी त्या उमेदवाराला त्या संबधित विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जातो.
बीएचएमएस करण्यासाठी भारतातील काही लोकप्रिय कॉलेज – colleges
जर एखाद्या व्यक्तीलाबीएचएमएस हा ५ वर्षाचा अभ्यासक्रम करायचा असल्यास त्यांच्यासाठी भारतामध्ये काही लोकप्रिय विद्यापीठे आहेत आणि ती कोणकोणती आहेत ते आपण पाहूया.
- लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल कॉलेज ( पुणे ).
- कलकत्ता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ( कलकत्ता ).
- शासकीय होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ( पुणे ).
- नैमिनाथ होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर ( आग्रा ).
- श्रीमती चंदाबेन मोहनभाई पटेल होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज ( पुणे ).
- केरळ आरोग्य विज्ञान विद्यापीठ ( त्रिशूर ).
आम्ही दिलेल्या bhms information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बीएचएमएस कोर्सची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhms meaning in marathi या bhms full form in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bhms in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट