बिल गेट्स मराठी माहिती Bill Gates Biography in Marathi

Bill Gates Biography in Marathi – Bill Gates Information in Marathi बिल गेट्स मराठी माहिती बिल गेट्स हे एक अमेरिकन व्यवसायिक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, गुंतवणूकदार, लेखक आणि समाजसेवक आहेत. बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे सह-सहसंस्थापक आहेत. मायक्रोसॉफ्टच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अशी पदे भूषवली आहेत. २०१४ पर्यंत बिल गेट्स हे सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये बिल गेट्स यांची गणना केली जाते. सन १९९५ ते २०१७ पर्यंत बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. या लेखामध्ये बिल गेट्स यांच्या जीवनाचा परिचय जाणून घेणार आहोत.

Bill Gates Biography in Marathi
Bill Gates Biography in Marathi

बिल गेट्स मराठी माहिती – Bill Gates Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)बिल गेट्स
जन्म (Birthday)२८ ऑक्टोंबर १९५५
जन्म गाव (Birth Place)सिएटल वॉशिंग्टन
राष्ट्रीयत्व (Citizenship)अमेरिकन
ओळख (Identity)अमेरिकन व्यवसायिक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, गुंतवणूकदार, लेखक आणि समाजसेवक

Bill Gates Information in Marathi

जन्म

२८ ऑक्टोंबर १९५५ रोजी बिल गेट्स यांचा जन्म सिएटल वॉशिंग्टन येथे झाला. बिल गेट्स यांचे वडील विलियम एच गेट्स हे व्यवसायाने वकील होते व आई मॅक्सवेल या युनायटेड वे आणि फर्स्ट इंटरेस्ट बँक सिस्टम च्या बोर्डस ऑफ डायरेक्टर होत्या. बिल गेट्स यांच्या आई वडिलांची इच्छा होती की त्यांनी कायद्याचं शिक्षण घ्यावे आणि त्यातच करिअर करावं. लहानपणापासूनच बिल गेट्स यांना अभ्यासाची आवड होती. बिल गेट्स यांनी खाजगी लेकसाइड प्रीप स्कूलमध्ये दाखला नोंदवला.

शाळेमध्ये असताना बिल गेट्स ना कम्प्युटरची आवड निर्माण झाली व पुढील बराच वेळ ते कम्प्युटर सोबत घालवू लागले. ‌वयाच्या तेराव्या वर्षी बील गेट्स यांनी पहिला सॉफ्टवेअर प्रोग्राम बनवला जो पुढे जाऊन tic-tac-tow म्हणून ओळखू जाउ लागला. बिल गेट्स यांचे आवडते विषय गणित व विज्ञान होते. बिल गेट्स यांना BASIC मध्ये GE प्रणालीचे प्रोग्रामिंग करण्यात आवड होती.

संगणकामध्ये त्यांची इतकी आवड निर्माण झाली की ते आपल्या बालमित्र पॉल ॲलन यांच्यासोबत मिळून नेहमी सतत कम्प्युटर वर काहीतरी नवीन करण्याचा आणि प्रोग्रामिंग बनवण्याचा प्रयत्न करायचे. आणि यासाठी ते शाळेतील कम्प्युटरचा वापर करायचे त्यामुळे कम्प्युटर कंपनीने काही खात्यावर निर्बंध आणले.

नंतर बिल गेट्स व त्यांच्या मित्र पाॅल एरन यांना पुन्हा आयटी कक्षामध्ये जाण्याची संधी मिळाली पण तीही एका अटीवर ते म्हणजे ते प्रोग्राम मधील सर्व एरर काढतील. यादरम्यान त्यांनी traf-o-data प्रोग्राम बनवला आणि यासाठी बिल गेट्स यांना $२०,००० मिळाले होते. पुढे बिल गेट्स यांनी त्यांचा महाविद्यालयीन जीवन हार्वड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं.

बिल गेट्स यांची कारकीर्द

बील गेट्स हे आज जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या यादी मध्ये समाविष्ट आहेत. आणि याची खरी सुरुवात त्यांच्या शालेय जीवनापासून झाली शाळेमध्ये असताना बिल गेट्स यांना त्यांच्या कौशल्याची जाणीव झाली. संगणकामध्ये त्यांना आवड आहे हे समजल्यावर त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच वेळ संगणकासोबत घालवला आणि उत्तम संगणकीय कौशल्य शिकले. १/२ प्रोग्रामिंग देखील बनवले.

अगदी लहान वयातच बिल गेट्स यांनी कम्प्युटर चा भरपूर अभ्यास करून कम्प्युटर बनवण्यात पारंगत झाले आणि आपल्या बालमित्र पॉल ॲलन याच्या सोबत त्यांनी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी मिळून १९७५ साली मायक्रोसोफ्टची स्थापना केली जी कंपनी आता जगभर नंबर वन कंपनी आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्ट ओळखली जाते याची सुरुवात मायक्रो कंप्यूटरची प्रसिद्ध प्रोग्रामिंग लँग्वेज बेसिक तयार करण्यापासून झाली.

यामध्ये त्यांना यश मिळालं पुढे त्यांनी इतर कंपन्यांसाठी प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र मायक्रोसॉफ्ट कंपनीची ओळख निर्माण झाली. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन मायक्रोसॉफ्ट कडे एक नव्या पर्सनल कंप्यूटर करता बेसिक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ऑफर केली. ही डिल यशस्वी ठरली आणि बिल गेट्स हे आयबीएम या कंपनी करता PC Doc ऑपरेटिंग सिस्टिम तयार केले.

सन १९८५ मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केलं याची घोषणा बिल गेट्स यांनी दोन वर्ष आधीच केली होती. आणि आज आपण सगळेच आपल्या कम्प्युटरमध्ये या ऑपरेटिंग सिस्टम विंडोज चा वापर करतो. या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीला घवघवीत यश मिळालं. प्रत्येकाच्या वैयक्तिक कंप्यूटर वर ही ऑपरेटिंग सिस्टम विंडोज विराजमान झाली. त्यावेळी बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वात मोठी शेअर होल्डर होते.

आणि परिणामी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी बिल गेट्स यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये नोंदवण्यात आलं आणि पुढे अकरा वर्षे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. सन १९८९ मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस ची सुरुवात केली. ऑफिस मध्ये मायक्रोसोफ्ट वर्ड, मायक्रोसोफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट अशी अनेक सॉफ्टवेअर एकाच वेळी सिस्टम मध्ये चालवु जाऊ शकत होते.

पुढे मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होऊ लागला आणि त्यापुढे बिल गेटस् यांनी देखील इंटरनेटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर कसे उपलब्ध करून देता येईल यावर काम करण्यास सुरुवात केली. मायक्रोसोफ्ट मधील बिल गेट्स यांच्या कारकिर्दीत बिल गेट्स यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आणि मुख्य सॉफ्टवेअर आर्किटेक ही पदे भूषवली आहेत. २०१४ पर्यंत बिल गेट्स हे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. सन १९७० आणि १९८० च्या दशकातील मायक्रो कॉम्प्युटर क्रांतीचे प्रमुख उद्योजक बिल गेट्स होते.

बिल गेट्स आणि त्यांचे बालपणीचे मित्र पाॅल एलन यांनी स्थापन केलेली मायक्रोसोफ्ट ही कंपनी जगातील सर्वात मोठी वैयक्तिक संगणक सॉफ्टवेअर कंपनी बनली. सन २००० मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदासाठी राजीनामा दिला आणि चेअरमन पदावर विराजमान झाले. सन २००० मध्ये बिल गेट्स व त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी स्थापन केलेल्या खाजगी धर्मदाय संस्थेवर बिल गेट्स यांनी लक्ष केंद्रित केलं.

मायक्रोसॉफ्ट मध्ये बिल गेट्स यांनी अर्ध वेळ भूमिका स्वीकारली आणि बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन मध्ये पूर्ण वेळ काम केलं. २०१४ मध्ये बिल गेटस् यांनी मायक्रोसॉफ्टच्या बोर्डाचे अध्यक्ष पद सोडलं आणि नवनियुक्त सीईओ सत्या नाडेला यांना पाठिंबा देण्यासाठी तंत्रज्ञान सल्लागार म्हणून नवीन पद स्वीकारलं. पुढे मार्च २०२० मध्ये बिल गेटस् यांनी हवामानबदल, जागतिक आरोग्य, विकास आणि शिक्षण या सह त्यांच्या परोपकारी प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट व बर्कशायर हाथवे येथील बोर्डाची पदे सोडली.

बिल गेट्स व त्यांची पत्नी यांनी सुरू केलेलं बिल गेट्स आणि मेलिंडा फाऊंडेशन ही संस्था गरीब, असहाय्य आणि गरजू लोकांसाठी व त्यांच्या मदतीसाठी धावून जाते. बिल गेट्स यांनी दिन, गरजवंतष असाह्य लोकांच्या मदतीसाठी आणि समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित केलं.

बिल गेट्स व त्यांची पत्नी यांनी सुरू केलेली ही फाउंडेशन विश्वातील सर्वात मोठ्या चारिटी संस्थांपैकी एक आहे. सन २०१० मध्ये त्यांनी विश्वातील सर्वाधिक गुंतवणूक करणारे वॉरेन बफेट आणि फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत करार केला. या करारामध्ये या तिघांनी आपल्या मिळकतीचा अर्धा भाग दान करतील असा निर्णय घेतला याव्यतिरिक्त दरवर्षी भारतात येऊन भारतातील गरीब मुलांना मदत करण्याच या करारात लिहिल गेल आहे.

फोर्ब्स मॅक्झिन मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव अकरा वेळा, 11 वर्ष पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. बिल गेट्स एक लेखक आहेत आणि त्यांनी द रोड अहेड आणि बिझनेस @ द स्पीड ऑफ थॉट या दोन पुस्तकांचे लेखन केले आहे. बिल गेट्स यांना समाजसेवा करायला आवडते आणि त्यामुळेच त्यांनी व त्यांची पत्नी या दोघांनी मिळून एक फाउंडेशन संस्था उभी केली. २०१० मध्ये बिल गेट्स व त्यांची पत्नी मिलींदा यांना भारतातील गरजू मुलांना साहाय्य करत असल्याबद्दल भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बिल गेट्स यांच्या मायक्रोसोफ्ट कंपनीच्या यशासाठी आणि समाजसेवेसाठी सन २०१० मध्ये बिल गेटस् यांना फ्रेंक्लिन इन्स्टिट्यूट तर्फे बोवेर अवॉर्ड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बिल गेट्स यांची पत्नी व ते सामाजिक कार्यकर्ता फारच प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच या पती-पत्नींना सन २००२ मध्ये जेफर्सन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. बिल गेट्स यशस्वी उद्योजक व श्रीमंत माणूस आहेत आणि आज त्यांनी जगातील करोडो तरुणांना प्रोत्साहित केलं आहे.

आज ते लाखो लोकांचे आदर्श बनले आहेत. प्रत्येकाला बिल गेट्स यांच्यासारखं श्रीमंत व्हायचं आहे. परंतु त्यासाठी अपार कष्ट लागतात. बिल गेट्स यांनी त्यांच्या संगणकीय कौशल्यांवर विश्वास ठेवून संपूर्ण विश्वामध्ये त्यांची ख्याती पसरवली.

आम्ही दिलेल्या bill gates biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बिल गेट्स मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bill gates information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of bill gates in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bill gates biography in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!