बिस्कीट केक रेसिपी मराठी Biscuit Cake Recipe in Marathi

Biscuit Cake Recipe in Marathi बिस्कीट केक रेसिपी केक म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी येतेच आणि केक हा असा पदार्थ आहे जो बहुतेक लोकांना खूप म्हणजे खूप प्रिय असतो आणि केक कोणाला आवडत नाही, केक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला केक कट करणे हि एक प्रथा झालेली आहे आपण बहुतेक कार्यक्रमामध्ये पाहतो कि केक कट केला जातो आणि त्या कार्यक्रमाचा आनंद वाढवला जातो. आजच्या जगामध्ये केक बनवण्याची एवढी स्पर्धा वाढली आहे कि सध्या आपल्याला बेकरीमध्ये किंवा केक हाऊस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक पाहायला मिळतात.

पण बहुतेक लोक घरामध्ये केक बनवण्याचा प्रयत्न करतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवून पाहतात जसे कि साधा केक, आयसिंग केक, रवा केक किंवा मग बिस्कीट केक. बिस्कीट केक हा एक झटपट बनणारा केक आहे.

आणि चवीला देखील खूप छान लागतो आणि हा केक आपण सोप्या पध्दतीने कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवू शकतो आणि केक बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे वापरू शकतो. आज या लेखामध्ये आपण बिस्कीट केके कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

biscuit cake recipe in marathi
biscuit cake recipe in marathi

बिस्कीट केक रेसिपी मराठी – Biscuit Cake Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ मिनिटे

बिस्कीट केक कसा बनवायचा – how to make biscuit cake recipe in marathi

काही वेळेला आपल्याला केक खाण्याची गडबड असते किंवा आपल्या केक लवकर बनवून खावासा वाटत असेल तर आपण झटपट बनणारा बिस्कीट केक खावू शकतो कारण हा बनवण्यासाठी खूप सोपा आणि आणि चवीला देखील खूप छान लागतो आणि हा केक कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. बिस्कीट केक हा वेगवेगळ्या बिस्किटांच्या पासून बनवला जावू शकतो त्यामधील रेसिपीज आपण आता पाहणार आहोत.

पार्ले जी पासून बनवला जाणारा केक – parle biscuit cake recipe in marathi language

आता आपण पार्ले जी बिस्किटांच्या पासून बनवला जाणारा केक घरामध्ये कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ मिनिटे

पार्ले जी केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make Parle – G cake 

पार्लेजी बिस्कीट पासून बनवला जाणारा केक हा आपण घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनवू शकतो. आणि आपल्याला बाजारातून केक बनवण्यासाठी काही विकत आणावे लागत नाही. जर तुमच्या घरी पार्ले बिस्कीट नसतील तर ती फक्त आपल्याला बाजारातून विकत आणावी लागतात. आता आपण पार्ले जी बिस्कीट पासून बनवला जाणाऱ्या केक साठी काय काय साहित्य लागते त्याची यादी पाहूयात.

  • २ पुडे पार्ले जी बिस्कीट.
  • १/२ चमचा बेकिंग सोडा.
  • १ ते २ चमचे बटर.
  • २ चमचे चॉकलेट सिरप.
  • १ कप किंवा आवश्यकतेनुसार दुध.
  • १ छोटी वाटी काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे.
  • १ चमचा वेलची पावडर.
  • ३ चमचे पिठी साखर.

पार्ले जी केक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make Parle – G cake 

  • सर्वप्रथम पार्ले जी चे बिस्किटे घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि त्याची बारीक पावडर करा. जर त्यामध्ये कुठेतरी बारीक तुकडे राहिले असतील तर ते चाळणीने चाळून घ्या म्हणजे आपल्याला केक बनवण्यासाठी बिस्किटाची बारीक पावडर मिळेल. अश्या प्रकारे सर्व बिस्किटांची पावडर करून घ्या.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये बिस्कीट पावडर, पिठीसाखर ( साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करा ) आणि बेकिंग सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा आता त्यामध्ये बटर आणि वेलची पावडर घाला आणि ते देखील चांगले मिक्स करा.
  • मग या मिश्रणामध्ये थोडे थोडे दुध घालून केकचे बॅटर बनवून घ्या आणि ते बॅटर ४ ते ५ मिनिटे चांगले फेटून घ्या.
  • आता त्या बॅटरमध्ये काजू, बदाम आणि पिस्ता याचे तुकडे घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि ते बाजूला ठेवा.
  • आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
  • त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी किंवा बटर लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही.
  • आता केकचे बॅटर त्या भांड्यामध्ये ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
  • आता कुकर गॅसवर मोठ्या आचेवर गरम करा आणि त्यामध्ये केक बॅटरचे भांडे ठेवा त्यावर काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे टाकून कुकरचे झाकण लावून केक मंद आचेवर २५ मिनिटे केक भाजा.
  • २५ मिनिटांनी झाकण उघडून पहा आपला केक फुगला असेल. त्यामध्ये चाकू घालून बघा चाकुला जर पीठ लागले नाही तर आपला केक बेक झालेला असतो केक बेक झाला असेल तर गॅस बंद करा.
  • आता थोड्या वेळाने केकचे भांडे कुकर मधून काढून केकच्या कडा सैल करा आणि केक हलक्या हाताने एक प्लेटमध्ये काढा.

ओरिओ बिस्कीट केक रेसिपी – oreo biscuit cake recipe in marathi

आता आपण ओरिओ च्या केक पासून घरामध्ये झटपट केक कसा बनवायचा आणि हा केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. चला तर मग ओरिओ केक कसा बनवायचे ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ मिनिटे

ओरियो केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make oreo cake 

  • १५ ते १५ ओरिओ बिस्किटे.
  • १/४ चमचा बेकिंग सोडा.
  • २ ते ३ चमचे पिठी साखर.
  • १ वाटी किंवा आवश्यकतेनुसार दुध.
  • १ चमचा बटर.
  • १ छोटी वाटी काजू, बदाम, पिस्ता तुकडे.

ओरियो केक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make oreo cake 

  • सर्वप्रथम क्रीम सोबत बिस्किटचे तुकडे करून घ्या आणि त्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्या आणि ती पावडर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्या.
  • आता त्या पावडर मध्ये बेकिंग सोडा, पिठी साखर आणि बटर घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
  • मग त्यामध्ये थोडे थोडे दुध घालून ते चांगले मिक्स करून ते एकत्र करा आणि अश्या प्रकारे केकचे बॅटर बनवून घ्या. मग त्या बॅटरमध्ये काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • आता ज्या कुकरमध्ये तुम्ही केक भाजण्यासाठी ठेवणार आहात त्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढा आणि त्यामध्ये एक वाटी किंवा प्लेट ठेवा.
  • त्यानंतर ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहात त्या संपूर्ण भांड्याला आतून लोणी किंवा बटर लावा आणि त्यावर मैदा भुरभुरा म्हणजे आपला केक भांड्याला चिकटणार नाही.
  • आता केकचे बॅटर त्या भांड्यामध्ये ओता आणि ते भांडे २ ते ३ वेळा टॅप करा त्यामुळे त्या भांड्यामध्ये असणारी हवा निघून जाईल आणि बॅटर भांड्यामध्ये चांगले पसरेल.
  • आता कुकर गॅसवर मोठ्या आचेवर गरम करा आणि त्यामध्ये केक बॅटरचे भांडे ठेवा त्यावर काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे टाकून कुकरचे झाकण लावून केक मंद आचेवर २५ मिनिटे केक भाजा.
  • २५ मिनिटांनी झाकण उघडून पहा आपला केक फुगला असेल. त्यामध्ये चाकू घालून बघा चाकुला जर पीठ लागले नाही तर आपला केक बेक झालेला असतो केक बेक झाला असेल तर गॅस बंद करा.
  • आता थोड्या वेळाने केकचे भांडे कुकर मधून काढून केकच्या कडा सैल करा आणि केक हलक्या हाताने एक प्लेटमध्ये काढा.
  • तुमचा ओरिओ बिस्कीट केक तयार झाला.

आम्ही दिलेल्या biscuit cake recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बिस्कीट केक रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या oreo biscuit cake recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि parle biscuit cake recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये biscuit cake recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!