Bread Recipes in Marathi ब्रेड रेसिपी मराठी आज आपण या लेखामध्ये ब्रेडपासून बनवल्या जाणार्या काही रेसिपी पाहणारा आहोत. ज्या बनवण्यासाठी खूप सोप्या आहेत आणि आपण जर नाश्त्यासाठी काही वेगवेगळ आणि झटपट बनणाऱ्या रेसिपींच्या शोधात असाल तर काही ब्रेड रेसिपीज तुमच्यासाठी उत्तम आहेत कारण ब्रेड पकोडा, ब्रेड कटलेट, ब्रेड पिझ्झा या ब्रेड पासून बनणाऱ्या रेसिपीज अगदी झटपट बनतात आणि बनवण्यासाठी सोप्या आहेत. ब्रेड रेसिपी कोणाला आवडत नाहीत ब्रेड पासून बनवलेल्या रेसिपीज लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते. चला तर आता आपण या लेखामध्ये ब्रेड पासून वेगवेगळ्या रेसिपीज कश्या बनवायच्या आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
ब्रेड रेसिपी मराठी – Bread Recipes in Marathi
ब्रेड पासून आपण अनेक रेसिपीज नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि ब्रेड पासून बनवल्या जाणार्या बहुतेक रेसिपीज ह्या घरी बनवण्यासाठी खूप सोप्या असतात आणि खूप कमी वेळेमध्ये बनतात, चला तर मग ब्रेड पासून वेगवेगळ्या रेसिपीज कश्या बनवायच्या ते पाहूयात.
ब्रेड पकोडा रेसिपी – bread pakoda recipe in marathi
ब्रेड पकोडा रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि आता आपण ब्रेड पकोडा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- ४ ते ५ ब्रेड.
- १ वाटी डाळीचे पीठ.
- १/२ चमचा ओवा.
- १/३ चमचा हळद.
- १/२ चमचा लाल तिखट.
- १/३ चमचा सोडा.
- १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- ब्रेड पकोडा बनवताना सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
- आता एका बाऊल मध्ये पीठ घ्या आणि त्यामध्ये ओवा, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, सोडा आणि चवीनुसार मीठ घाला आणि मग त्यामध्ये लागेल तेवढे पाणी घाला आणि त्याचे बॅटर बनवून घ्या.
- आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- आता कडा काढून ठेवलेले ब्रेड बॅटरमध्ये बुडवा आणि ते तेलामध्ये सोडा आणि लालसर रंग येईपर्यंत भाजा.
- अश्या प्रकारे सर्व पकोडे बनवून घ्या.
- आणि हे गरमागरम पकोडे टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
ब्रेड पिझ्झा रेसिपी – bread pizza recipe in marathi
आता आपण सर्वांना आवडणारी आणि अगदी सोपी ब्रेड पिझ्झा रेचीपे कशी बनवायची ते पाहणार आहोत.
- ४ ब्रेड.
- १ शिमला मिरची ( बारीक चिरलेली ).
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- अर्धी वाटी कॉर्न.
- अर्धी वाटी चीज ( खिसलेले ).
- २ ते ३ चमचे शेजवान चटणी.
- २ चमचे टोमॅटो सॉस.
- मिरी पावडर.
- मीठ ( चवीनुसार ).
- बटर ( भाजण्यासाठी ).
- ब्रेड पिझ्झा बनवताना सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्या आणि त्याला शेजवान चटणी लावा मग त्यावर टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न घाला आणि त्यावर थोडासा टोमॅटो सॉस घाला आणि मग त्यावर चीज पसरा आणि त्यावर थोडेसे मीठ ( चवीनुसार ) आणि काळी मिरी पावडर टाका.
- अश्या प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्या.
- आता गॅसवर तवा गरम करा आणि तव्याला बटर लावून पिझ्झा भाजा.
- आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
ब्रेड कटलेट रेसिपी – bread cutlet recipe in marathi language
चला तर आता आपण ब्रेड कटलेट कसे बनवायचे ते पाहूयात.
- ५ ते ६ ब्रेड स्लायसेस.
- ३ ते ४ बटाटे
- ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा गरम मसाला.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
- १ मोठा चमचा तेल ( फोडणीसाठी ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
- कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते बारीक मॅश करून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला.
- आणि कांदा थोडा वेळ भाजला किं त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि १ ते २ मिनिटे भाजा.
- त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
- आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करून गॅस लगेच बंद करा. मग हे मिश्रण थोडे गार होऊ द्या.
- ते मिश्रण गार झाले कि त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे बनवा.
- आणि ब्रेड च्या कडा काढलेल्या स्लायसेस पाण्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून स्लाईस आहे तशी तळ हातावर ठेवून प्रेस करून त्यामध्ये पाणी काढा आणि त्यामध्ये बनवून ठेवलेला बटाट्याच्या भाजीचा गोळा घाला आणि आणि ते झाकून घ्या आणि थोडे चपटे करा.
- अश्या प्रकारे सर्व कटलेट बनवून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये कटलेट तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये २ ते ३ कटलेट घालून त्याला लालसर रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- अश्या प्रकारे सर्व कटलेट तळून घ्या.
- कटलेट सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
आम्ही दिलेल्या bread recipes in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर ब्रेड रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bread pakora recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bread sandwich recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg bread roll recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट