Burger Recipe in Marathi बर्गर रेसिपी मराठी बर्गर हि रेसिपी कोणाला आवडत नाही हि रेसिपी सर्वांना आवडते. लोक ज्यावेळी मॅक डी मध्ये जातात तेव्हा हमखास बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर करतात कारण हा त्यांचा मॅक डी मधील ठरलेला मेनू असतो. बर्गर हि रेसिपी लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते आणि म्हणून काही लोकांना असे वाटते कि बर्गर हि रेसिपी सतत बाहेर जाऊन खाण्याऐवजी आपल्याला हि रेसिपी घरामध्येच बनवता आली तर ते किती सोपे होईल आणि त्यचा लोकांच्यासाठी आज आपण या लेखामध्ये बर्गर रेसिपी पाहणार आहोत.
बर्गर हि रेसिपी भारतामध्ये सर्व ठिकाणी मॅक डी मध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळते परंतु हि रेसिपी आपण घरामध्ये देखील सोप्या पध्दतीने आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ ते ४० मिनिटामध्ये बनवू शकतो. चला तर आता आपण बर्गर रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
बर्गर रेसिपी मराठी – Burger Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ त्ते ४० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
बर्गर रेसिपी बनवताना बर्गर बन पावचे मधुन दोन भाग केले जातात आणि बटाटा आणि इतर काही साहित्य घालून टिक्की बनवली जाते आणि ती तेअवुअवर भाजली जाते. बर्गर बनला टोमॅटो सॉस लावून मग त्यावर तुमच्या आवडीच्या फळ भाज्या जसे कि काकडी, टोमॅटो आणि कांदा गोल चिरून ठेवा आणि मग त्यावर टिक्की ठेवा परत त्यावर गोल चिरलेले काकडी, टोमॅटो आणि कांदा ठेवा आणि मग त्यावर एक चीज स्लाईस ठेवा आणि आणि हा बर्गर तव्यावर थोडा गरम करून घेतला जातो.
- बर्गर बनपाव : बर्गर बनवण्यासाठी बर्गर बनपाव हे महत्वाचे साहित्य आहे. बर्गर बन हा मधून कट केला जातो आणि त्यामध्ये टिक्की आणि इतर फळभाज्या घातल्या जातात.
- बटाटा : बर्गर मध्ये जी टिक्की वापरलेली असते ती टिक्की उकडलेला बटाटा मॅश करून बनवलेली.
- टोमॅटो सॉस : टोमॅटो सॉस मुले बर्गरला गोड आंबट अशी टेस्ट येते त्यामुळे बर्गर बनवताना टोमॅटो सॉस वापरला जातो.
बर्गर रेसिपी – how to make burger at home in marathi
बर्गर रेसिपी हि आपण जर मॅक डी मध्ये किंवा बाहेर रेस्टॉरंट मध्ये खात असलो तरी हि रेसिपी आपल्याला घरामध्ये देखील अगदी सहजपणे बनवता येते. बर्गर हि रेसिपी घरामध्ये सोप्या पध्दतीने आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ te ४० मिनिटामध्ये बनवू शकतो परंतु यासाठी साहित्य जास्त लागते. चला तर आता आपण बर्गर रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ त्ते ४० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
बर्गर बनवण्यासाठी बर्गर बनपाव, टोमॅटो सॉस, बटाटे, मटार आणि काही इतर साहित्य लागते आणि त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते आणि जे साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर मग आता आपण बर्गर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ बटाटे ( उकडलेले ).
- अर्धी वाटी मटार ( उकडलेले ).
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- अर्धा चमचा मिरची पेस्ट.
- १ चमचा गरम मसाला.
- १/२ चमचा धने पावडर.
- १/४ चमचा आमचूर पावडर.
- २ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- २ बर्गर बनपाव.
- ७ ते ८ काकडीचे गोल काप.
- ५ ते ६ टोमॅटोचे गोल काप.
- ७ ते ८ कांद्याचे काप.
- टोमॅटो सॉस.
- चाट मसाला.
- २ ते ३ चीज स्लाईसेस.
बर्गर रेसिपी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून बर्गर कसा बनवायचा ते पाहूयात.
- बर्गर बनवताना सर्वप्रथम उकडलेले बटाटे साल काढून तो एका बाऊल मध्ये मॅश करून घ्या आणि मग त्यामध्ये उकडलेले मटार थोडे मॅश करून घाला.
- आता गॅसवर कढई ठेवा आणि कढई मध्ये तेल घाला मग त्यामध्ये आले लसून पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला आणि ते तेलामध्ये परता मह त्यामध्ये गरम मसाला, आमचूर पावडर, धने पावडर घाला मग त्यामध्ये मॅश करून ठेवलेला बटाटा आणि मटार घाला आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करून घ्या.
- आता हे मिश्रण थोडे गार झाले कि त्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्या आणि त्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करा आणि तव्याला बटर लावा आणि टिक्की ठेवून टिक्की लालसर रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्या.
- आता बर्गर बनपाव घ्या आणि ते मधून कट करून त्याचे दोन भाग बनवा म्हणजे आपल्याला त्यामध्ये टिक्की घालता येईल.
- आता त्या बर्गरच्या बनच्या एका भागाला टोमॅटो सॉस लावा आणि मग त्यावर एक चीज स्लाईस ठेवा आणि मग त्यावर काकडीच्या, टोमॅटोच्या आणि कांद्याच्या गोल फोडी ठेवा आणि मग त्यावर थोडा चाट मसाला घाला आणि मग यावर टिक्की ठेवा मग त्यावर परत टोमॅट, काकडी आणि कांद्याच्या गोड फोडी घाला आणि त्यावर चाट मसाला घाला आणि मग त्यावर थोडासा टोमॅटो सॉस घाला आणि त्यावा चीज स्लाईस ठेवा आणि मग त्यावर बन ठेवा आणि बर्गर तव्याला बटर लावून दोन्ही बाजूने हळुवार गरम करून घ्या.
- अश्या प्रकारे दुसरा बर्गर देखील बनवून घ्या.
- बर्गर सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
बर्गर कश्यासोबत खातात – serving suggestions
- बर्गर आपण शक्यतो टोमॅटो सॉस सोबतच खातो तसेच फ्रेंच फ्राईज या साईड डिश सोबत देखील खावू शकतो.
आम्ही दिलेल्या burger recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बर्गर रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg burger recipe at home in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken burger recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये burger tikki recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट