ccc course information in marathi CCC कोर्स माहिती, सध्या संगणक येणे हि काळाची गरज झालेली आहे आणि यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स असतात आणि अनेकजण संगणक मधील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करतात आणि तसाच सीसीसी (CCC) हा देखील संगणक विषयी असणारा कोर्स आहे आणि आज आपण या लेखामध्ये सीसीसी कोर्सविषयी माहिती घेणार आहोत. सीसीसी याचे पूर्ण स्वरूप कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट (course on computer concept) असा आहे आणि ज्या व्यक्तींना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विषयी ज्यांना माहिती हवी आहे. अश्या लोकांच्यासाठी सीसीसी हा कोर्स एक उत्तम कोर्स आहे.
सीसीसी या कोर्समध्ये इंटरनेटवर माहिती पाहणे, वैयक्तिक किंवा व्यवसाय पत्रे तयार करने, मेल पाठवणे तसेच प्राप्त करणे, लहान डेटाबेस तयार करणे अश्या वेगवेगळ्या प्रकारची कामे यामध्ये शिकता येतात. सीसीसी या कोर्सचा अभ्यासक्रम करून ती संबधित व्यक्ती संगणक प्रणालीचे आवश्यक उपयोग जसे कि इमेल पाठवणे किंवा प्राप्त करणे तसेच विविध सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रोग्रॅम्सविषयी माहिती घेऊ शकतात.
सीसीसी हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला विशेष असे काही पात्रता निकष पार पाडावे लागत नाहीत म्हणजेच त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता पार पडावी लागत नाही आणि ते शैक्षणिक अवश्यकतेकडे दुर्लक्ष करून अर्ज करू शकतात.
CCC कोर्स माहिती – CCC Course Information in Marathi
कोर्सचे नाव | सीसीसी कोर्स |
पूर्ण स्वरूप | कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट (course on computer concept) |
पात्रता | १० वी किंवा १२ वी पूर्ण |
कालावधी | ३ महिने |
फी | ५०० ते १००० रुपये |
सीसीसी कोर्स म्हणजे काय ?
सीसीसी याचे पूर्ण स्वरूप कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट ( course on computer concept ) असे आहे आणि यामध्ये इंटरनेटवर माहिती पाहणे, वैयक्तिक किंवा व्यवसाय पत्रे तयार करने, मेल पाठवणे तसेच प्राप्त करणे, लहान डेटाबेस तयार करणे अश्या प्रकारची कामे शिकण्यास मदत होते.
सीसीसी कोर्स विषयी महत्वाची माहिती –information about ccc course in marathi
सीसीसी कोर्स हा एक असा कोर्स आहे ज्यामध्ये कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट विषयी माहिती शिकवली जाते जसे कि वैयक्तिक किंवा व्यवसाय पत्रे तयार करने आणि डेटाबेस तयार करणे अश्या प्रकारची माहिती शिकवली जाते. सीसीसी याचे पूर्ण स्वरूप हे कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट असे आहे आणि हा कोर्स विद्यार्थी १० वी किंवा १२ वी नंतर करू शकतात.
आणि हा कोर्स ३ महिन्याच्या कालावधीसाठी असतो आणि हा कोर्स करण्यासाठीची फी हि ५०० रुपये ते १००० रुपये पर्यंत असू शकते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी मिळू शकते आणि सुरुवातीला त्या संबधित व्यक्तीला ८००० रुपये पगार मिळू शकतो आणि नंतर तो ३० हजार पर्यंत जावू शकतो.
सीसीसी कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणताही कोर्स करण्यासाठी संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष असतात आणि त्या पात्रता निकषामध्ये जर तो व्यक्ती बसत असेल तरच त्याला कोणत्याही कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो. तसेच सीसीसी कोर्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची विशेष अशी आट पार करावी लागत नाही पण काही पात्रता निकष त्याला पूर्ण करावे लागतात जसे कि.
- जी व्यक्ती हा कोर्स करणार असेल त्या व्यक्तीने १० किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- तसेच त्या व्यक्तीला कमीत कमी ४५ ते ५० टक्के गुण मिळालेले असावेत.
सीसीसी कोर्ससाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा करायचा – How to apply online
आता खाली आपण सीसीसी कोर्स करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या विषयी माहिती घेवूया.
- सीसीसी कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज करत असताना प्रथम आपल्याला एनआयइएलआयटी ( NIELIT ) विद्यार्थी पोर्टलच्या कार्यालयावर जा.
- आता त्या कार्यालयाच्या पोर्टलवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय दिसेल. तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करा.
- आता विविध कोर्समधील सीसीसी कोर्सचा पर्याय निवडा.
- आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल आता त्यामध्ये असणारा सर्व तपशील भरा जसे कि तुमचे नाव, सही, आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी परत एकदा तुम्ही भरलेला तपशील तपासा .
- आता सबमिट बटनावर क्लिक करा.
- श्रेणीनुसार शुल्क भरा आणि पुढील वापरासाठी दस्ताऐवजाचा प्रिंट घ्या.
सीसीसी कोर्सचा अभ्यासक्रम – c.c.c course syllabus
सीसीसी कोर्सचा कालावधी हा ३ महिन्याचा असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण दिले जाते. या कोर्समध्ये कव्हर केला जाणारा अभ्यासक्रम कोणकोणता असतो ते पाहूया.
- संगणकाचा परिचय : प्रथम विषय हा संगणकाचा परिचय हा असतो यामध्ये संगणकाची संपूर्ण माहिती दिलेली असते.
- विंडोज : या विषयामध्ये वेगवेगळ्या विंडोज विषयी परिचय दिला जातो तसेच त्याच्या वेगवेगळ्या प्रकाराविषयी माहिती दिली जाते.
- ई-मेल, चॅटिंग : यामध्ये विषयामध्ये ई-मेल, चॅटिंग विषयी माहिती दिली जाते त्याचबरोबर यामध्ये मेल पाठवणे तसेच प्राप्त करणे या विषयी ज्ञान दिले जाते.
- संगणक संप्रेषण आणि इंटरनेट : या विषयामध्ये संगणक संप्रेषण आणि इंटरनेट विषयोई माहिती दिली जाते.
- स्प्रेडशीट ( एमएस एक्सेल ) : या विषयामध्ये एमएस एक्सेल ( स्प्रेडशीट ) विषयी माहिती दिली जाते त्याचबरोबर ते कसे वापरायचे या विषयी ज्ञान दिले जाते.
- तसेच या कोर्समध्ये एमएस पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन तसेच मायक्रोसॉफ्ट वर्ड या विषयी माहिती दिली जाते.
क्रं | विषय |
१ | संगणक परिचय |
२ | संगणक संप्रेषण आणि इंटरनेट |
३ | ई-मेल, चॅटिंग |
४ | स्प्रेडशीट (एमएस एक्सेल) |
५ | वेब ब्राऊजर आणि वर्ड वाइड वेब |
६ | विंडोज |
FAQ
Q1. CCC कोर्स म्हणजे काय?
सीसीसी याचे पूर्ण स्वरूप कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट (course on computer concept) असे आहे आणि यामध्ये इंटरनेटवर माहिती पाहणे, वैयक्तिक किंवा व्यवसाय पत्रे तयार करने, मेल पाठवणे तसेच प्राप्त करणे, लहान डेटाबेस तयार करणे अश्या प्रकारची कामे शिकण्यास मदत होते.
आम्ही दिलेल्या ccc course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर CCC कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ccc course details in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ccc course in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ccc course pamplet in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट