Chakali Recipe in Marathi चकली रेसिपी मराठी आपण सतत काहीना काही स्नॅक्स बनवून ठेवत असतो जेणेकरून आपल्याला काही खावेसे वाटत असल्यास आपण ते लगेच खावू शकतो आणि चकली हा देखील एक स्नॅक्स मधील प्रकार आहे जो आपण मुख्यता दिवाळीच्या सणामध्ये फराळाचे बनवताना हा एक पदार्थ बनवतो आणि दिवाळीच्या फराळाचे ताट हे चकली शिवाय पूर्ण होत नाही म्हणून दिवाळी मध्ये चकली हा फराळाचा पदार्थ बनवलाच जातो. चकली हि तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, चणा डाळ या सर्व साहित्यांच्या मिश्रणाचे पीठ बनवले जाते आणि मग त्यामध्ये लाल तिखट, मीठ घालून ते मळून ते साचामध्ये घालून त्याच्या चकल्या बनवल्या जातात.
आणि मग त्या तेलामध्ये कुरकुरीत तळल्या जातात. काही लोक चकली बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि हि बनवण्याची पध्दत देखील किचकट असते त्यामुळे काही लोक चकली घरी बनवत नाहीत ती विकत आणतात परंतु मला असे वाटते कि चकली जर आपण घरामध्ये केली तर ती खूप सुंदर बनते आणि लागते. आज आपण या लेखामध्ये चकली रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
चकली रेसिपी मराठी – Chakali Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
चकली म्हणजे काय ?
चकली हि तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, चणा डाळ या सर्व साहित्यांच्या मिश्रणाचे पीठ बनवले जाते आणि मग त्यामध्ये लाल तिखट, मीठ घालून ते मळून ते साचामध्ये घालून त्याच्या चकल्या बनवल्या जातात.
- नक्की वाचा: शंकरपाळी रेसिपी मराठी
- तांदूळ : तांदूळ हे चकली बनवण्यासाठी लागणाऱ्या मुख्य साहित्य पैकी एक आहे. तांदळापासून सर्प्रथम चकलीची भाजणी बनवली जाते आणि मग त्याचे चकली पीठ बनवले जाते.
- इतर साहित्य : चकली बनवब्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे हरभरा डाळ, उडीद डाळ आणि फुटाणा डाळ इत्यादी.
जर तुम्हाला चकली घरामध्ये बनवायची असेल तर तुम्ही आधी पासूनच चकली भाजणी बनवून त्याचे पीठ बनवून ते डब्यामध्ये ठेवू शकतो. आता चला तर मग चकली भाजनी कशी बनवायची ते.
- २ वाटी तांदूळ.
- १ वाटी हरभरा डाळ.
- अर्धी वाटी उडदाची डाळ.
- १ छोटी वाटी चणा डाळ.
- १ चमचा धने.
- १/२ चमचा मेथी.
- सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ निवडून चांगले धुवून घ्या.
- मग ते तांदूळ सावलीमध्ये वाळत घालून ते १ तास चांगले वाळवा.
- आता गॅसवर एक कढई मध्यम आचेवर ठेवा आणि मग त्यामध्ये धने आणि मेथी टाकून ते चांगले भाजून घ्या आणि ते बाजूला काढून घ्या.
- आता वाळवलेले तांदूळ घ्या आणि ते देखील कढई मध्ये खमंग भाजून घ्या आणि मग हरभरा डाळ आणि उडदाची डाळ देखील भाजून घ्या आणि ते बाजूला काढा.
- भाजलेले सर्व मिश्रण ( तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि धने आणि मेथी ) एकत्र करा आणि ते गिरणीतून किंवा घरगुती चक्कीतून दळून आणा आणि त्याचे पीठ बनवून ठेवा आणि जेंव्हा चकली बनवू वाटते तेंव्हा आपण चकली बनवू शकतो.
चकली रेसिपी – how to make chakli recipe in marathi
चकली हा पदार्थ एक भारतीय पदार्थ आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये दिवाळीच्या फराळामध्ये बनवला जातो तसेच हा पदार्थ आपण कधीहि बनवून खावू शकतो. हा पदार्थ आपण जर भाजणी पीठ बनवून ठेवले असेल तर लगेच बनणारा पदार्थ आहे आणि हा खूप कमी वेळेमध्ये बनू शकतो. चला तर मग चकली रेसिपी कशी बनवायची आणि त्या साठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: चिवडा रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
चकली भाजणी पीठ जर आपल्या घरामध्ये आधीपासून बनवून ठेवले असेल तर चकली बनवण्यास्ठी लागणारे इतर साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असते. चला तर मग चकली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ वाटी चकली भाजणी पीठ.
- १ मोठा चमचा तेल.
- दीड चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- १/२ चमचा ओवा.
- १ चमचा तीळ.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम चकली भाजणी पासून बनवलेले पीठ घ्या आणि त्यामध्ये हळद, हिंग, लाल मिरची पावडर, ओवा, तीळ आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण एकत्र करून घ्या.
- आता एका छोट्या तडका कढईमध्ये १ मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि ते गरम झाले कि ते चकलीच्या पिठामध्ये ओता.
- पुन्हा पीठ चांगले एक जीव करून घ्या आणि त्यामध्ये एक वाटी उकळलेले पाणी घाला आणि ते पीठ चांगले गुसळून घ्या.
- मग गॅसवर मोठ्या आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये चकल्या तळण्यासाठी तेल घाला आणि ते तेल मोठ्या आचेवर गरम करा.
- आता ते पीठ तसेच दाबून ठेवा आणि त्यामधील थोडे थोडे पीठ घेवून त्याला साधे पाणी लावून ते चांगले मऊ मळून घ्या आणि ते मळलेले पीठ जितके मावेल तेवढे चकली साचामध्ये घाला आणि त्याच्या गोल चकल्या बनवा.
- तेल गरम झाले असेल तर गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये बनवलेल्या २ किंवा ३ ( मावतील तेवढ्या ) चकल्या सोडून त्याच्या चांगल्या लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि त्या भाजल्या कि त्यामध्ये दुसऱ्या चकल्या घाला आणि त्या भाजा.
- अश्या प्रकारे पीठ मळून ते साच्यामध्ये घालून त्याच्या सर्व चकल्या बनवून त्या तळून घ्या.
- तुमच्या कुरकुरीत आणि खमंग चकल्या तयार झाल्या.
चकल्या कश्या सोबत खातात – serving suggestion
चकली या पदार्थाची आपण तशीच मजा घेवू शकतो तसेच चकली आपण संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून खावू शकतो तसेच काही ठिकाणी लोक दही चकली देखील खातात.
- नक्की वाचा: बेसन लाडू रेसिपी मराठी
टिप्स ( Tips )
- जर तुम्हाला चकलीमध्ये तीळ घालायचे नसतील तर तुम्ही तीळ घातले नाही तरी चालतील.
- चकली पिठामध्ये आपण तेल गरम करून घालण्याऐवजी तूप देखील घालू शकतो.
आम्ही दिलेल्या Chakali Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चकली रेसिपी मराठी माहिती chakali recipe marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chakli bhajni recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chakli recipe in marathi madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhajnichi chakli recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट