चार्ली चॅप्लिन माहिती मराठी Charlie Chaplin Biography in Marathi

Charlie Chaplin Biography in Marathi – Charlie Chaplin Information in Marathi चार्ली चॅप्लिन माहिती मराठी सर चार्लस स्पेन्सर चापलीन हे एक इंग्रजी कॉमिक अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार होते जे मुका चित्रपटाच्या युगामध्ये प्रसिद्ध झाले. चार्ली चापलीन त्यांच्या स्क्रीन व्यक्तिमत्व ट्रॅम्प द्वारे जगभरात एक आयकॉन बनले. आणि चित्रपट उद्योगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी मानले जाऊ लागले. चार्ली चापलीन यांची कारकीर्द ७५ वर्षाहून अधिक काळाची आहे. चार्ली चापलीन हे स्क्रीन वरील सर्वात महान कॉमिक कलाकार आणि मोशन पिक्चर इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जातात. आजच्या ब्लॉग मध्ये आपण चारली चापलीन यांच्याविषयी माहिती जाणून घेणार.

charlie chaplin biography in marathi
charlie chaplin biography in marathi

चार्ली चॅप्लिन माहिती मराठी – Charlie Chaplin Biography in Marathi

Charlie Chaplin Information in Marathi

जन्म

चारलेस स्पेन्सर चापलीन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन, इंग्लंड येथे झाला. चार्ली चापलीन यांना सर चार्लस् स्पेन्सर चापलीन आणि ज्युनियर या नावाने ओळखले जायचं. चापलीन हे नाव त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडिल एक अष्टपैलू गायक आणि अभिनेते होते व त्यांची आई लिलि हालॆ॔ या रंगमंचाच्या नावाने ओळखली जाणारी एक आकर्षक अभिनेत्री आणि गायिका होती. ज्यांनी लाईट ओपेरा क्षेत्रात त्यांच्या कामासाठी नावलौकिक मिळवला.

वडिलांच्या लवकरच मृत्यूमुळे व त्यानंतर त्यांच्या आईच्या आजारपणामुळे चार्ली आणि त्याचे भाऊ सिडनी यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणं गरजेचं होतं. चार्ली त्यावेळी दहा वर्षाचे देखील नव्हते तर त्यांच्या उदरनिर्वाहाची सर्व जबाबदारी त्यांच्या स्वतःवर आली होती. अति मानसिक तणावामुळे चार्ली यांच्या आईला अधून मधून वेडाचे झटके यायचे शिवाय अति मद्यपानामुळे चार्ली यांच्या वडिलांचं निधन झालं.

आणि अशावेळी चार्ली यांच्या घराची परिस्थिती फारच हलाखीची होती त्यामुळे चार्ली यांनी अगदी लहान वयातच छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. चार्ली नऊ वर्षाचे होईपर्यंत दोन वेळा वर्क हाऊस मध्ये जाऊन आले होते. चार्ली यांना त्यांच्या पालकांकडून नैसर्गिक कौशल्यांचा वारसा मिळाला होता आणि यासाठी चार्ली यांनी करिअरमधील सर्वोत्तम संधी म्हणून मंचावर प्रवेश केला. चार्ली यांनी द एट लँकेशायर लाड्स नावाच्या गटात सदस्य म्हणून सामील झाली आणि आपल्या व्यवसायिक कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी वेगाने लोकप्रियता मिळवली.

वैयक्तिक आयुष्य

चार्ली चापलीन यांच आयुष्य एखाद्या चित्रपटा पेक्षाही नाट्यमय होतं. त्यांच्या आयुष्यामध्ये अश्या बऱ्याच काही घटना घडल्या की एखाद्याला वाटेल हा एक चित्रपटच आहे. सुरुवातीला त्यांच्या जन्मावरून बरेच प्रश्न उठले आणि नंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्य वरून. चार्ली चापलीन यांची एकूण चार लग्न झाली. ज्यावेळी चार्ली चापलीन यांच चौथ लग्न झालं तेव्हा ते ५३ वर्षाचे होते त्यांची पत्नी अठरा वर्षाची होती. चार्ली चापलीन यांना एकूण अकरा मुलं होती.

सुरुवातीचे दिवस

चार्ली चापली यांची आई एक प्रसिद्ध गायिका व उत्तम अभिनेत्री होती परंतु त्यांच्या आईचा आवाज गेल्याने त्या गाऊ शकल्या नाहीत. परंतु आईची ही खंत चार्ली चापलीन यांनी बालपणीच ओळखली आणि ते पुढे जाऊन गाऊ लागले. चार्ली चापलीन यांनी त्यांच्या आईच्या शो व्यवसाय संपर्काचा वापर करून १८९७ मध्ये एक व्यवसायिक मनोरंजनकर्ता बनले. जेव्हा चार्ली बारा वर्षाचे होते तेव्हा त्यांना कायदेशीर स्टेज शो मध्ये अभिनय करण्याची पहिली संधी मिळाली.

पुढे ते शेरलॉक होम्स च्या वेगवेगळ्या निर्मितीमध्ये प्रथम एच.ए सेंट्सबरी आणि नंतर विलियम जिलेट यांच्या समर्थनार्थ बिली पेज बॉय म्हणून दिसले. शेवटी चार्ली चापलीन यांनी वाॅडेव्हिल मध्ये विनोदी कलाकार म्हणून करियर सुरू केलं. जे अखेरीस फ्रेड कर्नो रेपटायर कंपनी सह एक उत्कृष्ट कलाकार म्हणून युनायटेड स्टेटस ला गेले. चार्ली चापलीन यांनी खूपच कमी वयामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अगदी वयाच्या १९ व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीने चारली चापलीन यांच्यासोबत करार केला.

१९१० मध्ये चारली चापलीन अमेरिकेला गेले आणि नविन चित्रपट उद्योगात अनुभव मिळवायला सुरुवात केली. तिथेच अमेरिकेमध्ये त्यांचं पहिलं पात्र प्रसिद्ध झालं. या पात्राचे नाव होतं ट्रॅम्प. एक बॉलर टोपी, मिशा आणि खराब कपडे असा या पात्राचा पोशाख होता. चार्ली चापलीन हे मूक युगाचे महान तारा बनले आणि त्यांची लोकप्रियता जगभर पसरली. अमेरिकेमध्ये असताना खऱ्या अर्थाने चार्ली चापलीन यांच्या करियरला गती मिळाली. चार्ली चापलीन यांनी अमेरिकन प्रेक्षकांमध्ये लगेचच लोकप्रियता मिळवली.

विशेषता आ नाईट इन एन इंग्लिश म्युझिक हॉल या स्केच मधील त्यांच्या व्यक्तीतचित्रणामुळे. १९१२ मध्ये जेव्हा फ्रेड कर्नो शरद ऋतूत पुन्हा दौऱ्यासाठी युनायटेड स्टेट्सला परत आले तेव्हा त्यांनी चारली चापलीन यांना मोशन पिक्चर कॉन्ट्रॅक्ट ची ऑफर दिली. १९१४ मध्ये चार्ली चापलीन यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. मेकिंग अ लिविंग हा चार्ली चापलीन यांचा पहिला मूकपट चित्रपट होता. चार्ली चापलीन यांच्या मध्ये एक वेगळीच कला होती. चार्ली चापलीन फक्त आपल्या हावभावातून लोकांना अगदी पोट धरून हसवायचे.

१९२१ मध्ये चार्ली चापलीन यांचा द किड हा चित्रपट प्रदर्शित झाला. चार्ली चापलीन यांच्यामध्ये असणाऱ्या अनोख्या कलेद्वारे त्यांनी संपूर्ण जगाला हसविल. त्याकाळात चार्ली चापलीन आठवड्याला साधारण दीड लाख डॉलर इतकी कमाई करत होते. चार्ली चापलीन यांचे विचार व त्यांचे व्यक्तिमत्व फार महान व मोठा होतं. आपल्या अनोख्या कलेद्वारे त्यांनी संपूर्ण जगाला हसवण्याच मौल्यवान कार्य केलं. अगदी जागतिक महायुद्धाच्या काळात देखील अत्यंत गंभीर परिस्थितीतही चारली चापलीन यांनी लोकांना हसवण्याचा कार्य केलं.

चार्ली चापलीन यांनी म्हटलं होतं की त्यांचं दुःख कोणाच्यातरी हसण्याचं कारण होऊ शकत. परंतु, त्यांचं हास्य कोणाचं दुःखाच कारण होऊ शकत नाही. चार्ली चापलीन यांच आयुष्य सुरुवातीपासूनच नाट्यमय राहिला आहे. अगदी लहान असल्यापासून त्यांनी गरीबी व कष्टमय जीवन बघितलं आणि त्यांच्या पुढील आयुष्यात देखील अनेक चढ-उतार आले. १९४० मध्ये चार्ली यांचा द ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट वादात अडकला होता. या चित्रपटांमध्ये चार्ली हिटलरच्या भूमिकेमध्ये दिसले.

हिटलरची भूमिका साकारल्याने चार्ली यांना अमेरिकेमध्ये कम्युनिस्ट असल्याचा आरोप लावण्यात आला त्यामुळे चार्ली यांना अमेरिका सोडावी लागली. आणि त्यापुढे ते स्विझर्लांड येथे जाऊन स्थायिक झाले. अमेरिके मुळे चार्ली यांनी भरपूर यश कमावलं. इतके यश कमावलं की अमेरिका ही त्यांची कर्मभूमी बनली होती. कोणतेही हावभाव नाहीत, कोणतेही संवाद नाही निव्वळ मुख्य हास्य अभिनय करणं हे फक्त चारली चापलीन यांनाच जमलं.

चार्ली चापलीन यांनी शेवटचा केलेला चित्रपट अ काऊंटलेस फ्रॉम होंग कोंग होता. चार्ली चापलीन यांचे द किड, सिटी लाइट्स, मोडरन टाइम्स, द ग्रेट डिक्टेटर, लाईमलाईट हे चित्रपट मास्टरपीस मानले जातात. चार्ली चापलीन हे एक असं एकमेव व्यक्तिमत्व आहे जे जगातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला माहीत आहे. चारली चापलीन यांचे चाहते जगात सर्वत्र पसरले आहेत अगदी सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या मान्यवरां पर्यंत अनेक नामवंत लोक चार्लीचे चाहते आहेत. चार्ली चापलीन यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ८२ चित्रपट बनवले. त्यातील ७७ चित्रपट मूकपट होते आणि पाच बोलपट होते.

मृत्यू

संपूर्ण जगाला अगदी पोट धरून हसायला लावणारे चार्ली चापलीन यांचं आयुष्य आणि व्यक्तिमत्व मात्र विरोधाभासाने भरलेलं होतं. पडद्यावर जरी ते खोडकर मस्ती कर आणि हास्य करताना दिसायचे. तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते अतिशय साधे, भोळे, गरीब विनोदी वगैरे नव्हते. चार्ली हे एक जीनियस कलाकार होते.

त्यांनी त्याकाळी मिळवलेली प्रसिद्धी प्रेम आणि यश मिळवून ते टिकवणं आणि वाढवणं आजवर कुणालाही जमलेल नाही आहे. चार्ली चापलीन यांच आयुष्य नेहमीच नाट्यमय राहिला आहे. अगदी त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. असं म्हणतात चार्ली चापलीन यांना नाताळ कधीच आवडला नाही परंतु जेव्हा चारली चापलीन ८८ वर्षाचे होते तेव्हा नाताळच्या दिवशी सकाळी झोपेत असताना त्यांचा मृत्यू झाला. २५ डिसेंबर १९७० रोजी चार्ली चापलीन काळाच्या पडद्याआड झाले.

परंतु गोष्टी इथवरच थांबल्या नाहीत तर स्विझरलँड मधील त्यांच्या घराच्या जवळील एका दफनभूमीत त्यांना पूरल गेलं. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन महिन्यांनी कोणी तरी त्यांचं थडगं उकरून त्यांचा मृतदेह असलेली शवपेटी चोरून नेल्याचा आढळून आलं. या चोरांनी चार्ली यांच्या मृतदेहाचे अपहरण केलं होतं. जेणेकरून त्यांना त्याद्वारे पैसे कमवता येतील जवळजवळ अकरा आठवड्यानंतर हे चोर सापडले गेले आणि त्यांना चार वर्ष अठरा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल.

आम्ही दिलेल्या Charlie Chaplin Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चार्ली चॅप्लिन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Charlie Chaplin information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Charlie Chaplin in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!