Chicken Tandoori Recipe in Marathi चिकन तंदुरी रेसिपी मराठी चिकन म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण काही लोकांना चिकन पासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज खूप आवडतात जसे कि चिकन टिक्का मसाला, चिकन बिर्याणी, चिकन मसाला, बटर चिकन आणि यामधील एक लोकप्रिय डिश म्हणजे चिकन तंदुरी. चिकन तंदुरी हा पदार्थ नॉनव्हेजीटेरियन लोकांच्यासाठी एक उत्तम रेसिपी ठरू शकते आणि हि रेसिपी आपण विकएंड ला बनवू शकतो कारण चिकन हे रात्रभर जर मॅरीनेट केले तर ते खूप छान लागते त्यामुळे तुम्ही जर हि रेसिपी रविवारी बनवणार असाल तर शनिवारी रात्री आपण चिकन मॅरीनेट करून ठेवू शकतो.
म्हणजे ते रात्रभर चांगले मुरेल आणि जर तुम्हाला हे करण्याची खूपच गडबड असेल तर ते कमीत मकी २ ते ३ तास मॅरीनेट करा. चिकन तंदुरी हि रेसिपी ओव्हन मध्ये किंवा तंदुर मध्ये भाजली जाते. पण आपल्या कडे ओव्हन किंवा तंदूर नसेल तर आपण हे चिकन कुकरमध्ये शिजवून घेवून ते गॅसवर भाजू शकतो.
चिकन तंदुरी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते आणि जर आपली मॅरीनेशनची पूर्व तयारी झाली असेल तर हि रेसिपी १० ते १५ मिनिटामध्ये बनू शकते. चला तर आता आपण या लेखामध्ये चिकन तंदुरी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
चिकन तंदुरी रेसिपी मराठी – Chicken Tandoori Recipe in Marathi
पूर्व तयारी | ४ ते ५ तास |
तयारी लागणारा वेळ | १० ते १५ |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चिकन तंदुरी बनवण्यासाठी चिकन लेग पीस वापरले जातात, हे लेग पीस चाकूने थोडे वरून चिरले जातात जेणे करून मसाला आतमध्ये जाईल. मग त्याला प्रथा आले लसून पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि थोडे मीठ लावून ते त्याला चांगले मसाज केले जाते.
आणि यावर झाकण लावून ते अर्धा तास मॅरीनेट केले जाते आणि मग फ्रीजमधून काढून त्यामध्ये दही, गरम मसाला, धने जिरे पावडर, कॉर्ण फ्लावर, तेल हे सर्व साहित्य घालून ते चांगल्या प्रकारे चिकन लेग पिसला लावले जाते आणि हे परत कमीत कमी २ ते ३ मॅरीनेट केले जाते. आणि मग ते भाजले जाते.
- चिकन लेग पीस : चिकन तंदुरी बनवण्यासाठी चिकन लेग पीस हे महत्वाचे साहित्य आहे. चिकन लेग पीसला मसाले लावून ते मॅरीनेट केले जाते आणि मग ते भाजले जाते.
- आले लसून पेस्ट : चिकन तंदुरी बनवताना चिकन लेग पिसला आले लसून पेस्ट लावली तर त्याचा चिकनला फ्लेवर छान येतो.
- कॉर्ण फ्लावर : कॉर्ण फ्लावर वापरल्यामुळे चिकन वरून चांगले क्रिस्पी होते.
चिकन तंदुरी रेसिपी – indian tandoori
चिकन तंदुरी रेसिपी हि एक भारतीय पारंपारिक डिश आहे जी आज देखील खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली जाते. चिकन तंदुरी रेसिपी हि एक नॉनव्हेजीटेरियन डिश आहे जी आपण विकएंडला बनवू शकतो. चिकन तंदुरी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते आणि जर आपली मॅरीनेशनची पूर्व तयारी झाली असेल तर हि रेसिपी १० ते १५ मिनिटामध्ये बनू शकते. चला तर आता आपण चिकन तंदुरी रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
पूर्व तयारी | ४ ते ५ तास |
तयारी लागणारा वेळ | १० ते १५ |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चिकन तंदुरी बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामध्ये सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही, तर काही साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते जसे कि चिकन लेग पीस, गरम मसाला आणि काही इतर साहित्य परंतु हे साहित्य आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होते. चला तर मग चिकन तंदुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ चिकन लेग पीस.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १/४ चमचा काळी मिरी पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १ चमचा लिंबू रस.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- २ ते ३ चमचे दही.
- २ ते ३ चमचे कॉर्ण फ्लावर.
- १/२ चमचा धने पावडर.
- १/३ चमचा जिरे पावडर.
- २ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
घरी बनवण्यासाठी एकदम सोपे तंदुरी चिकन वर दिलेले साहित्य वापरून कसे बनवायचे ते आता आपण पाहूयात.
- चिकन तंदुरी बनवताना सर्वप्रथम चिकन लेग पीस स्वच्छ धुवून घ्या आणि ते कापडाने कोरडे करून घ्या आणि मग हे लेग पीस चाकूने थोडे वरून चिरले जातात जेणे करून मसाला आतमध्ये जाईल.
- मग हे चिकन लेग पीस एक बाऊल मध्ये घ्या आणि मग त्यावर आले लसून पेस्ट, लिंबू रस, हळद, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि मीठ चवीनुसार घाला आणि ते सर्व साहित्य चिकनला चांगले मसाज करा आणि मग त्या बाऊलला झाकण लावून ते फ्रीजमध्ये अर्धा तास मॅरीनेट करा आणि मग ते फ्रीजमधून बाहेर काढा.
- मग त्यामध्ये दही, धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, कॉर्ण फ्लावर, गरम मसाला आणि तेला घाला आणि हे चिकनला चांगले लावून घ्या आणि परत त्यावर झाकण ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा आणि कमीत कमी २ ते ३ तास मॅरीनेट होऊ द्या.
- आता मॅरीनेट झालेले चिकन ओव्हन मध्ये बेक करून घ्या आणि तंदुर मध्ये भाजून घ्या आणि जर आपल्या घरामध्ये ओव्हन आणि तंदूर नसेल तर आपण हे कुकर मध्ये शिजवून गॅसवर भाजू शकतो.
- कुकर मध्ये चिकन लेग पीस शिजवताना कुकरमध्ये अगदी थोडेसे पाणी घाला आणि त्यामध्ये कुकरचा डबा ठेवा ( ह्या डब्यामध्ये काही घालायचे आणि तो रिकामा ठेवायचा ) आणि त्यावर जाळीची प्लेट ठेवायची आणि त्या जाळीच्या प्लेटवर मॅरीनेट केलेले चिकन लेग पीस ठेवायचे आणि तकुकरचे झाकण लावून कुकर गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून ३ शिट्या आणायच्या आणि लगेच गॅस बंद करायचा.
- कुकर गार झाला कि त्यामधील शिजलेले चिकन लेग पीस काढायचे आणि ते स्टीलच्या स्किवर मध्ये घालायचे आणि लाकडाचा कोळसा असल्यास त्याचा एक तुकडा गॅसवर ठेवायचा आणि गॅस चालू करून चिकन लेग पीस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे ( लकडा कोळसा नसेल तर आपण चिकन तसेच गॅसवर भाजू शकतो).
- अश्या प्रकारे दोन्ही चिकन लेग पीस भाजून घ्या.
- चिकन तंदुरी सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
चिकन तंदुरी कश्या सोबत सर्व्ह करतात – serving suggestions
- चिकन तंदुरी सोबत आपण चिकन बिर्याणी, फ्राईड राईस, नान, यासारखे अनेक पदार्थ सर्व्हे करू शकतो.
आम्ही दिलेल्या Chicken Tandoori Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिकन तंदुरी रेसिपी मराठी madhura recipes tandoori chicken बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tandoori chicken biryani recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken tandoori masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chicken tandoori microwave recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट