चिरोटे रेसिपी मराठी Chirote Recipe in Marathi

Chirote Recipe in Marathi चिरोटे रेसिपी मराठी चिरोटे हा एक फराळी पदार्थ आहे जो आपण विशेषता दिवाळीच्या सणामध्ये बनवतो. दिवाळीचा सन जवळ आला कि आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी तयारी सुरु करतो आणि दिवाळीच्या फराळाची सुरुवार १० ते ८ दिवस अगोदर करतो. दिवाळीच्या फराळा मध्ये करंज्या, चकली, चिवडा, रव्याचे लाडू, कळीचे लाडू, शेव, अनारस या सारखे पदार्थ असतात आणि त्यामधील एक पारंपारिक पदार्थ म्हणजे चिरोटे. चिरोटे हा पदार्थ खूप पूर्वी पासून फराळा मध्ये बनवला जातो पण सध्याच्या काळामध्ये हा पदार्थ दिवाळीमध्ये बनवण्याचे प्रमाणत खूप कमी झाले आहे.

पण हा पदार्थ जर आपण बनवला तर तर हा खूप छान गोड आणि खुसखुशीत लागतो. चिरोटे हा पदार्थ आपण दिवाळीमध्ये तर बनवतोच परंतु जर आपल्याला हा पदार्थ आधी मधी केंव्हा तरी हा पदार्थ खावू वाटला तर आपण हा पदार्थ बनवून खावू शकतो आणि चिरोटे आपण ८ ते १० दिवस हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवू शकतो.

चिरोटे हा पदार्थ चांगला खुसखुशीत बनला तर हा घरामधील बहुतेक लोकांना आवडू शकणारा पदार्थ आहे. चिरोटे हा पदार्थ आपण दोन प्रकारे बनवू शकतो एक पाकातले चिरोटे किंवा पिठी साखरेचे चिरोटे. चला तर मग आज आपण विशेषता दिवाळीच्या फराळामध्ये बनवले जाणारे चिरोटे घरी कसे बनवायचे ते पाहूयात.

chirote recipe in marathi
chirote recipe in marathi

चिरोटे रेसिपी मराठी – Chirote Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ५५ मिनिटे ते एक तास
पाककलाभारतीय

चिरोटे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • मैदा : मैदा हा चिरोटे बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे कारण मैद्याचे घट्टसर मळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवले जातात आणि त्याच्या पातळ अश्या पोळ्या लाटून त्यावर तूप लावून अश्या प्रकारे २ ते ३ पानांचे थर लावले जातात.
  • रवा : रवा चिरोटे बनवताना मैद्याच्या पिठामध्ये अगोदर थोडा वेळ भिजवून मळला तर आपले चिरोटे मऊ पडत नाहीत म्हणून चीरोटे बनवतेवेळी रवा वापरा.
  • तूप : चिरोट्यामध्ये जर आपण तूप वापरले तर चिरोटे खूप खुसखुशीत होतात आणि ते तोंडामध्ये टाकताच विरघळतात.
  • नक्की वाचा: बालुशाही रेसिपी मराठी 

चिरोटे कसे बनवतात – how to make chirote recipe in marathi

चिरोटे हा एक भारतीय पदार्थ आहे जो महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या सणाला बनवला जाणारा एक पारंपारिक पदार्थ आहे. चिरोटे आपण दोन प्रकारे बनवू शकतो पाकातले चिरोटे आणि साखरेचे चिरोटे. चला तर मग चिरोटे कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ५५ मिनिटे ते एक तास
पाककलाभारतीय

चिरोटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chirote recipe 

चिरोटे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते आणि त्यामधील रवा, मैदा आणि तूप हे चिरोटे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. त्याचबरोबर यासाठी काही इतर साहित्य देखील लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि जरी घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अनु शकतो. चला तर मग पाहूयात चिरोटे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडा जास्त मैदा.
  • १ वाटी रवा.
  • ३ ते ४ चमचे तूप.
  • २ ते ३ चमचे कॉर्नफ्लॉवर.
  • १ वाटी पिठी साखर.
  • पाणी किंवा दुध ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल किंवा तूप ( तळण्यासाठी ).

चिरोटे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – chirote recipe step by step

  • आता आपण खुसखुशीत आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारे चिरोटे वर दिलेले साहित्य वापरून कसे बनवायचे ते पाहूयात.
  • सर्वप्रथम ३ ते ४ चमचे तूप एका वाटीमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे कॉर्नफ्लॉवर घाला आणि ते ५ मिनिटे चमच्याने हलवून एकजीव करून ठेवा. हे तुपाचे आणि कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण थोडे पातळच असू द्या कारण ते मिश्रण आपण मैद्याच्या पोळ्यांच्या थरांना वापरणार आहोत.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये रवा आणि मैदा घ्या आणि त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. मग त्यामध्ये ४ चमचे एकदम कडक तूप घाला आणि ते मिक्स करा. आता या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी किंवा दुध घालून ते चांगले घट्टसर मळून घ्या.
  • आणि मग त्यावर झाकण ठेवून ते १० ते १५ मिनिटासाठी भिजू द्या.
  • १० ते १५ मिनिटे हे पीठ भिजले कि त्याचे जास्त छोटे पण नाहीत आणि जास्त मोठे पण नाहीत असे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. ( टीप : आपण घेतलेल्या प्रमाणावरून ह्या पीठाचे एकूण ६ गोळे बनवून घ्या म्हणजे आपल्याला तीन पानांचा थर असे २ बॅच बनवता येतील.
  • आता सर्वप्रथम ३ गोळे घ्या आणि त्याला थोडा मैदा लावून एक पातळ पोळी लाटून घ्या अश्या प्रकारे तिन्ही गोळ्यांच्या पातळ पोळ्या लाटून घ्या.
  • आता पोळपाटावर एक पोळी ठेवा आणि त्यावर आपण प्रथम बनवून ठेवलेले तुपाचे आणि कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण चांगले चपचपीत लावून घ्या मग त्यावर दुसरी पोळी ठेवा आणि परत त्याला तुपाचे मिश्रण लावा आणि त्यावर तिसरी पोळी ठेवा आणि त्याला परत तुपाचे मिश्र लावा.
  • आता या पोळ्यांच्या दोन्ही बाजूनी रोल करा आणि मग शेवटी दोन्ही बाजूचे रोल एकमेकावर प्रेस करा आणि त्याचा एक घट्ट रोल बनवा. अश्या प्रकारे उरलेल्या तीन गोळ्यांचे देखील रोल बनवा.
  • आणि ते दोन्ही रोल १० मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून त्यामधील तूप थोडे घट्ट होईल आणि आपल्याला त्याचे चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे गोल तुकडे करता येतील.
  • आता दोन्हीहि रोलचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि मग त्या तुकड्याच्या कडा दाबून त्याला थोडे मैद्याचे पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व चिरोटे लाटून घ्या.
  • मग गॅसवर मध्य आचेवर गरम करण्यासाठी ठेवलेल्या तेलामध्ये सर्व चिरोटे हलका बदामी रंग येईपर्यंत टाळून घ्या.
  • तळलेले चिरोटे थोडे गार झाले कि ते पिठी साखरेमध्ये चिरोट्याच्या दोन्ही बाजू साखरेत बुडवून घ्या.
  • आपले खुसखुशीत चिरोटे तयार झाले. हे चिरोटे आपण हवाबंद डब्यामध्ये ९ ते १० दिवस ठेवू शकतो.

टिप्स ( Tips )

  • पाकातले चिरोटे बनवण्यासाठी देखील हीच प्रक्रिया वापरली जाते परंतु चिरोटे साखरे ऐवजी पाकमध्ये बुडवून काढले जातात.
  • जर तुम्हाला तूप वापरायचे नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा डालडा वापरला जावू शकतो.
  • आपण जे मैदा आणि रव्याच्या मिश्रणामध्ये तुप वापरतो ते एकदम कडकडीत गरम असावे.
  • थरांचा रोल बनवताना आपण एक बाजूने गुंडाळी बनवून देखील रोल बनवू शकतो.

आम्ही दिलेल्या chirote recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चिरोटे रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chirote recipe in marathi by archana या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chirote recipe by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pakatle chirote chirote recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!