Chivda Recipe in Marathi – Diwali Chivda Recipe in Marathi चिवडा रेसिपी मराठी चिवडा हा एक फराळाचा प्रकार आहे जो दिवाळीमध्ये किंवा आपल्याला जेंव्हा खावेसे वाटते तेंव्हा आपण बनवू शकतो. चिवडा हा पदार्थ आपण संध्याकाळच्या चहा सोबत स्नॅक्स महणून देखील खावू शकतो. चिवडा हि अशी एक फराळी डिश आहे जी लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते आणि हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनू शकतो. चला तर मग आज या लेखामध्ये आपण चिवडा रेसिपी कशी बनवायची याबद्दल पाहूयात.
चिवडा रेसिपी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आणि त्यासाठी वापरले जाणारे पोहे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. भाजके पोहे, पातळ पोहे, दगडी पोहे, नायलॉन पोहे हे काही पोह्यांचे प्रकार आहेत. आता आपण यामधील पोह्यांचे काही प्रकार वापरून चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
चिवडा रेसिपी – chivda recipe maharashtrian
चिवडा हा एक भारतीय प्रकार असून हा पदार्थ भारतीय लोक दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात बनवतात आणि हा पदार्थ दिवाळीच्या पदार्थातील एक महत्वाचा पदार्थ असतो कारण या पदार्थाशिवाय फराळाचे ताट पूर्ण होत नाही. चला तर मग बनवण्यास अगदी सोपा, कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये चिवडा हि डिश वेगवेगळे पोहे वापरून कसा बनवायचा ते पाहूयात आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- नक्की वाचा: शंकरपाळी बनवायची रेसिपी
भाजके पोहे वापरून केला जाणारा चिवडा – poha chivda recipe in marathi
भाजके पोहे बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेकदा घरामध्ये उपलब्ध असते जसे कि शेंगदाणे, डाळ, लसून, खोबरे पण पोहे, चिवडा मसाला प्रत्येक वेळी घरामध्ये उपलब्ध असू शकत नाही तो आपल्याला बाजारातून विकत आणावा लागतो. खाली आपण चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.
- १ किलो भाजके पोहे.
- १०० ग्रॅम चिवडा मसाला ( कोणताही वापरा ).
- १ मोठी वाटी खोबरे तुकडे.
- १ मोठी वाटी शेंगदाणे.
- १ वाटी फुटाणा डाळ.
- १ मोठा चमचा बारीक ठेचलेला लसून.
- १ छोटी वाटी कडीपत्ता.
- लाल मिरची पावडर ( चवीनुसार ).
- १ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- पिठी साखर ( चवीनुसार )
- तेल ( फोडणीसाठी आणि तळण्यासाठी )
- सर्वप्रथम पोहे चांगले निवडून घ्या आणि ते तासभर उन्हामध्ये घाला त्यामुळे ते चांगले तापतील आणि त्यामध्ये थोडा मऊ पणा असेल तर तो निघून जाईल.
- मग ते पोहे एक मोठ्या भांड्यामध्ये काढा जेणेकरून त्यामध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर ते चांगले हलवता येईल.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये सर्व साहित्य तळून घेता येईल इतके तेल घाला ती ते गरम होईपर्यंत वाट पहा.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाका आणि ते चांगले तळून घ्या आणि ते तेलामधून काढून ते सरळ पोह्यामध्ये घाला.
- मग तेलामध्ये शेंगदाणे टाका आणि ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि ते चांगले कुरकुरीत तळून झाले कि ते काढून पोह्यामध्ये घाला.
- आता त्यामध्ये डाळ घाला आणि ती देखील तळून पोह्यामध्ये टाका.
- आता गॅसची आच थोडी मंद करा आणि आणि त्यामध्ये बारीक ठेचलेला लसून घाला आणि तो लसून चांगला भाजा. लसून जर मऊ ठेवला तर चिवडा देखील मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून लसून चांगला भाजा. आता त्यामध्ये कडीपत्ता घाला आणि तो चांगला फुलला कि त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घाला लगेच ते पोह्यामध्ये ओता आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा.
- आणि आता त्यामध्ये चिवडा मसाला, साखर ( चवीनुसार ), मीठ ( चवीनुसार ) घाला आणि चांगले एकत्र करा आणि गॅसवर तो चिवडा थोडा वेळ गरम करा.
- तुमचा भाजक्या पोह्याचा कूसकुशीत आणि खमंग चिवडा तयार झाला.
- नक्की वाचा: रवा लाडू रेसिपी
- १ किलो दगडी पोहे.
- १०० ग्रॅम चिवडा मसाला ( कोणताही वापरा ).
- १ मोठी वाटी खोबरे तुकडे.
- १ मोठी वाटी शेंगदाणे.
- १ वाटी काजू.
- १ मोठा चमचा बारीक ठेचलेला लसून.
- १ छोटी वाटी कडीपत्ता.
- लाल मिरची पावडर ( चवीनुसार ).
- १ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- पिठी साखर ( चवीनुसार ).
- नक्की वाचा: अनारसे रेसिपी
- सर्वप्रथम पोहे चांगले निवडून घ्या आणि ते तासभर उन्हामध्ये घाला त्यामुळे ते चांगले तापतील आणि त्यामध्ये थोडा मऊ पणा असेल तर तो निघून जाईल.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून टाळून घेवून ते एक भांड्यामध्ये घाला.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाका आणि ते चांगले तळून घ्या आणि ते तेलामधून काढून ते सरळ पोह्यामध्ये घाला.
- मग तेलामध्ये शेंगदाणे टाका आणि ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आणि ते चांगले कुरकुरीत तळून झाले कि ते काढून पोह्यामध्ये घाला.
- आता त्यामध्ये काजू घाला आणि ती देखील तळून पोह्यामध्ये टाका.
- आता गॅसची आच थोडी मंद करा आणि आणि त्यामध्ये बारीक ठेचलेला लसून घाला आणि तो लसून चांगला भाजा. लसून जर मऊ ठेवला तर चिवडा देखील मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून लसून चांगला भाजा. आता त्यामध्ये कडीपत्ता घाला आणि तो चांगला फुलला कि त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घाला लगेच ते पोह्यामध्ये ओता आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा.
- आणि आता त्यामध्ये चिवडा मसाला, साखर ( चवीनुसार ), मीठ ( चवीनुसार ) घाला आणि चांगले एकत्र करा आणि गॅसवर तो चिवडा थोडा वेळ गरम करा.
पातळ पोहा चिवडा रेसिपी – patal poha chivda recipe in marathi
- १ किलो दगडी पोहे.
- २ चमचे चिवडा मसाला ( कोणताही वापरा ).
- १ मोठी वाटी खोबरे तुकडे.
- १ मोठी वाटी शेंगदाणे.
- १ वाटी फुटाणा डाळ.
- १ चमचा हळद.
- २ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- सर्वप्रथम पोहे चांगले निवडून घ्या आणि ते तासभर उन्हामध्ये घाला त्यामुळे ते चांगले तापतील आणि त्यामध्ये थोडा मऊ पणा असेल तर तो निघून जाईल.
- मग ते पोहे एक भांड्यामध्ये काढून घ्या.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले कि त्यामध्ये शेंगदाणे, फुटाने, खोबरे तळून घ्या आणि ते पोह्यामध्ये टाका. आता १ मोठा चमचा तेलामध्ये हिरवी मिरची आणि हळद घालून ते पोह्यामध्ये घाला आणि ते हलवून घ्या.
- मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि २ चमचे चिवडा मसाला घालून ते चांगले हलवा आणि ते ५ मिनिटे गॅसवर गरम करा.
- तुमचा पातळ पोह्याचा चिवडा तयार झाला.
- नक्की वाचा: बालुशाही रेसिपी मराठी
आम्ही दिलेल्या chivda recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिवडा बनवायची रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या murmura chivda recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chivda kasa banvaycha माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chivda recipe maharashtrian Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट