कोल्ड कॉफी रेसिपी मराठी Cold Coffee Recipe in Marathi

Cold Coffee Recipe in Marathi कोल्ड कॉफी रेसिपी मराठी आपण रोजच्या दिवसाची सुरुवात जशी आपण चहा पिऊन करतो तसेच काही लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात आणि कॉफी हि दोन प्रकारे बनवली जाते ती म्हणजे गरम कॉफी (हॉट कॉफी) आणि थंडगार कॉफी (कोल्ड कॉफी) आणि आज आपण या लेखामध्ये कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कोल्ड कॉफी हा कॉफीचा प्रकार खूप लोकांना आवडतो आणि लहान मुले तर या प्रकारची कॉफी पिण्यासाठी हट्ट करतात कारण ती तितकी टेस्टी असते. आपण या प्रकारची कॉफी खास करून उन्हाळ्यामध्ये पिऊ शकतो.

आपण कोणत्याही कॅफेमध्ये गेलो तर त्याठिकाणी लोक कोल्ड कॉफी आवर्जून ऑर्डर करतात आणि आवडीने पितात परंतु आपण कॅफे मध्ये मिळणाऱ्या कोल्ड कॉफीसारखी कॉफी घरी देखील बनवू शकतो. कोल्ड कॉफी हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते. हि एकदम सोपी कॉफी खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण कोल्ड कॉफी प्रेमींच्यासाठी कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहूयात.

cold coffee recipe in marathi
cold coffee recipe in marathi

कोल्ड कॉफी रेसिपी मराठी – Cold Coffee Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी

कोल्ड कॉफी म्हणजे काय ? 

कोल्ड कॉफी हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे जी बनवताना थंडगार दुधामध्ये प्रथम इंस्टंट कॉफी घालून ते मिक्सरमध्ये फिरवले जाते मग त्यामध्ये २ कुब्स बर्फ आणि साखर घातली जाते आणि ते मिक्सरला फिरवली जाते. आपली एकदम सोपी आणि टेस्टी कोल्ड कॉफी तयार झाली.

कोल्ड कॉफी रेसिपी – how to make cold coffee recipe in marathi

कोल्ड कॉफी पिण्याचा सध्या ट्रेंडच आला आहे आणि कोलेजची मुले तर हि कॉफी कॉलेज सुटल्यानंतर किंवा ट्युशन सुटल्यानंतर कॉलेज जवळ असणाऱ्या कॅफे मध्ये पिऊन मगच घरी जातात पण आपण कॅफे मध्ये मिळणाऱ्या कोल्ड कॉफी सारखी कॉफी घरी देखील बनवू शकतो ज्यासाठी आपल्या एकदम घट्ट दुध, साखर आणि इंस्टंट कॉफीची गरज असते.

कोल्ड कॉफी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि आपण हि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये घरी बनवू शकतो. चला तर आता आपण कोल्ड कॉफी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make cold coffee recipe 

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते आणि हे साहित्य काही वेळा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही वेळा हे साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते त्यावेळी आपण हे साहित्य बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. कोल्ड कॉफी बनवण्यासाठी दुध, साखर, बर्फ आणि कॉफी हे महत्वाचे साहित्य लागते आणि हे बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. चला तर मग कोल्ड कॉफी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ कप थंडगार दुध.
  • ४ ते ५ चमचे साखर.
  • २ चमचे इंस्टंट कॉफी पावडर.
  • २ चमचे चॉकलेट सिरप.
  • ४ चमचे फ्रेश क्रीम.
  • ५ ते ६ आईस क्युब्स.

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make cold coffee 

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनते. आता आपण वर दिलेले साहित्य वापरू एकदम टेस्टी आणि क्रिमी कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहूयात.

  • कोल्ड कॉफी बनवताना सर्वप्रथम दुध चांगले उकळून ते थोडे थंड झाले कि ते जास्त थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ते चांगले थंडगार होईल.
  • मग एक छोटासा बाऊल घ्या आणि त्या बाऊल मध्ये २ चमचे कॉफी घाला आणि त्यामध्ये ४ चमचे पाणी घालून त्यामध्ये कॉफी मिक्स करून ते ६ ते ७ मिनिटे बाजूला ठेवा.
  • आता मोठे मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यामध्ये फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेल्या दुधामधील २ कप दुध मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि आणि मग त्यामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेले कॉफी घाला आणि ती ३ ते ४ सेकंद मिक्सरच्या भांड्याला गच्च झाकण लावून मिक्सरवर चांगली गुसळून घ्या. ( मिक्सर कमी किंवा मध्यम वेगावर फिरवा ).
  • मग त्यामध्ये फ्रेश क्रीम घाला आणि परत कमी वेगावर ते मिश्रण चांगले फिरवून घ्या त्यामुळे फ्रेश क्रीम दुधामध्ये चांगली मिक्स होईल आणि कॉफी घट्ट देखील होईल.
  • आता त्यामध्ये साखर आणि चॉकलेट सिरप घाला आणि परत मिक्सरवर गुसळून घ्या.
  • शेवटी यामध्ये बर्फ घाला आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरवर ३ ते ४ सेकंद फिरवून घ्या.
  • तुमची कोल्ड कॉफी तयार झाली.
  • आता ती कपमध्ये ओता आणि त्यावर थोडी फ्रेश क्रीम आणि चॉकलेट सिरपने सजवा आणि सर्व्ह करा.

टिप्स (Tips) 

  • कोल्ड कॉफी मध्ये आपण व्हॅनीला आईस्क्रीम देखील घालू शकतो.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्ती करू शकता.

आम्ही दिलेल्या cold coffee recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोल्ड कॉफी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या thick cold coffee recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि cold coffee recipe at home in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chocolate cold coffee recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!