कोरोना व्हायरस महामारी निबंध Corona Nibandh in Marathi

Corona Nibandh in Marathi – Corona Essay in Marathi कोरोना व्हायरस वर निबंध मराठी असं म्हणतात की नशीब हे एकदाच दार ठोठावते पण दुर्दैवी हे तोपर्यंत दार ठोठावते जोपर्यंत आपण उघडत नाही. अशीच दस्तक देऊन आपल्या देशावर म्हणजे जगावर आलेलं संकट म्हणजे कोरोनाव्हायरस. सध्या मोठा चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोनाव्हायरस. आपण लहानपणापासून ‘आरोग्य हीच संपत्ती’ आहे हाच विचार सतत ऐकत आलो आहे पण या सुविचाराचे महत्व आम्हाला 2020 मध्ये कळाले. एक सूक्ष्म परंतु  घातक असा विषाणू म्हणजे कोरोनाव्हायरस.

covid 19 information in marathi हा संपूर्ण जगामध्ये थैमान घालतोय. सर्व जगाला भेडसावणारा बंदिस्त करून सोडलेला रोग म्हणजे कोरोनाव्हायरस. कोरोना विषाणू covid-19 या नावाने ओळखला जात असून या विषाणूची निर्मिती 2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वूहान प्रांतांमध्ये  झाली. चीन मध्ये कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण आढळला.

corona nibandh in marathi
corona nibandh in marathi

कोरोना व्हायरस महामारी निबंध मराठी – Corona Nibandh in Marathi

कोरोना व्हायरस एक महामारी निबंध मराठी – Corona Essay in Marathi

2020 मध्ये WHO ने विषाणूंमुळे होणाऱ्या थैमानाला महामारी म्हणून घोषित केले. आज जगातील सर्व देश आपापल्या परीने या संकटाशी लढत आहेत. सुरुवातीच्या काळात म्हणजे जानेवारीअखेर पर्यंत एकाच गोष्टीची खळबळ होती ती म्हणजे चीन या देशाने शत्रू देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने किंवा इतर देशांना हरवण्याच्या उद्देशाने कोरोना हा वायरस निर्माण केला व त्यांच्या चुकीमुळे तो त्यांच्याच इथे ब्लास्ट झाला व त्याचा परिणाम हा सर्वत्र होत आहे.

कोरोनाव्हायरसची आग चीनमध्ये लागली. आग आग म्हणेपर्यंत वनव्याने रुद्रावतार धारण केला. सर्व चिन काबीज करून एक एक करत जगभर वनवा एकदम पसरला. कोरोनाच्या भस्मासुरानी हजारोंची बळी घेऊन ही अद्याप वनवा भडकत आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लाखोच्या संख्येने  लोक मृत्यूमुखी पडत आहेत.

हा एक प्रकारचा विषाणू आहे. त्याचे नाव नोवेल कोरोना व्हायरस नोवेल म्हणजेच नवीन. सर्व शास्त्रज्ञ त्यावर योग्य प्रतिबंधक लस व योग्य प्रतिबंधक औषधे शोधण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत पण अजूनही योग्य औषध सापडले नाही.

प्रतिबंधक लस आज पर्यंत सापडली नाही. शास्त्रज्ञ कोरोनावर नक्कीच योग्य इलाज शोधून काढतील. सध्या तरी एक जालीम इलाज म्हणजे लोकांच्या संपर्कात न येता स्वतः घरांमध्ये बंदिस्त राहणे.त्याने आपल्याला स्वतःचा व इतरांचा या संसर्गापासून बचाव करता येईल.

कोरोना व्हायरस गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, हिंदू मुस्लिम, सिख ईसाई असा कुठलाही भेदभाव करत नाही. संस्कृती धर्म, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि प्रसिद्धी याबाबतीत जरी माणसामाणसात फार तफावत असली तरी आपण एकाच पातळीवर आहोत. याची जाणीव कोरोनाव्हायरसने आपल्याला नक्कीच करून दिली आहे. आपलं स्वास्थ किती महत्त्वाचा आहे आणि आपण त्याची किती हेळसांड करतो आहे.याची जाणीव आपल्याला या कोरोनाव्हायरस मुळे झाली.

कोरोनाव्हायरस विरुद्ध लढण्यासाठी दिवस-रात्र पोलीस, सैनिक, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी प्रयत्न करत आहेत. हे सर्व कोरोना काळातील कोरोना योद्धा आहेत. सुरुवातीच्या काळात भारत सरकारने संपूर्ण लॉकडाउन जाहीर केला सर्वजण आपापल्या घरांमध्ये सुरक्षित राहावे हाच त्यामागचा उद्देश होता कोरोना योद्धाने त्याकाळात यांचे काम जबाबदारीने निभावले.

सर्व डॉक्टर, नर्स  हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत होते. आरोग्य कर्मचारी सर्व कोरोणा बाधित रुग्णांना योग्य औषधोपचार व सुविधा उपलब्ध करून देत होते. पोलीस सर्व लोकांना आपापल्या घरी सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी सूचना करत होते .खरोखरच आपल्याला या रोगाला संपवायचे असेल तर आपण सरकारच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कोरोना हा एक विषाणू आहे.तो वेगाने वाढतो. कोरोनाव्हायरस  हा संसर्गजन्य असल्यामुळे याचा प्रसार वेगाने होतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो.ज्या प्रकारे कोरोना वायरसचा वेगाने फैलाव होत आहे. त्यावरून असे दिसते की या विषानुचे दोन प्रकार आहेत.

(1) कोरोना बाधित रुग्णांच्या खोकल्यातून म्हणजेच रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात व पसरतात त्यात विषाणू असतात. आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यानंतर त्याचा त्यांना संसर्ग होतो.

(2) रुग्ण खोकल्यावर काही तुषार विषाणू आजूबाजूच्या वस्तू वर पडतात. त्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर ते विषाणू आपल्या हाताला लागतात. तो हात आपल्या चेहऱ्यावर किंवा नाकावर लागल्यास श्वसन संस्थेतून आपल्या शरीरात जातात व त्याचा संसर्ग होतो.

कोरोनाव्हायरसची लक्षणे :

ताप येणे, खोकला येणे, घसा बसणे, थंडी वाजणे, सर्दी, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, बोलता न येणे ही लक्षणे अशी असू शकतात. एखाद्या व्यक्तीस त्याची लागण झाल्यास त्याची लक्षणे दिसून येण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात किंवा 14 दिवसही लागू शकतात.

गंभीर स्थितीमध्ये निमोनिया तसेच फुफ्फुस, यकृत, हृदय, घसा, मेंदू असे शरीराचे अनेक अवयव निकामी होतात आणि मृत्यू होतो. पण सर्दी ताप खोकला या लक्षणावरून आपल्याला कोरोना झालेला आहे कि दुसरा कोणता आजार आहे हे ओळखणे ही फार कठीण आहे. हे ओळखण्यासाठी आपल्याला टेस्ट करावी लागेल.

कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी :

(1) गरम पाणी प्यावे.

(2) थंड पदार्थ खाऊ नये.

(3) सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.

(4) सर्दी खोकला झालेल्या रुग्णापासून दूर राहणे त्याच्यापासून एक मीटर अंतर ठेवणे.

(5) हस्तांदोलन केल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुणे.

(6) घराबाहेर पडणे टाळणे.

(7) मास्कचा वापर करणे.

(8) प्रतिकार शक्ती वाढेल अशा अन्नपदार्थांचे सेवन करणे.

(9) खोकताना किंवा शिंकताना नाकावर तोंडावर रुमाल धरणे.

मास्क कोणी आणि कसा वापरावा :

(1)  जर आपण स्वस्त असेल तर मास्क वापरण्याची गरज   नाही.

(2) जर आपण कोरोना अबाधित असलेल्या रुग्णाची काळजी घेत असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे.

(3) ज्या व्यक्तींना सर्दी ताप खोकला किंवा श्वास घेताना त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने मास्क वापरणे गरजेचे आहे.

कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाला खूप नुकसान हानी पोहोचवली आहे. पण या व्हायरसमुळे काही चांगल्या गोष्टी पण झाल्या आहेत. संपूर्ण जगात लोकडाउन असल्याने तब्बल 70 वर्षाने जगातील हवा शुद्ध झाली आहे. जागतिक तापमानात घट झाली आहे. एका अर्थाने सर्व प्रदूषण कमी झाले आहे.

नोकरीसाठी, व्यवसायासाठी घराबाहेर पडून मुंबई पुणे यासारख्या यासारख्या शहरांमध्ये मुले कामासाठी बाहेर निघून गेलेली आहे. त्या मुलांना आपल्या आई वडिलांना भेटायला सुद्धा वेळ नव्हता पण या कोरोनामुळे हीच मुले आपल्या कुटुंबाला आई-वडिलांना वेळ देऊ शकली.

काही अंशी हा रोग पसरण्यापासून थांबू शकतो. कारण तो व्हायरस बारा तास जिवंत राहू शकतो आणि आपण 14 तास संचारबंदी घेऊ शकतो. त्यामुळे रोगाची लागण तिथे थांबू शकते आणि ती चैन मोडू शकते. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी आपण एक दुसऱ्याचे सहकार्य केले पाहिजे.

आम्ही दिलेल्या corona nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “कोरोना व्हायरस एक महामारी निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या corona essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि coronavirus essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण corona nibandh marathi या लेखाचा वापर coronavirus in hindi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!