कटलेट रेसिपी मराठीत Cutlet Recipe in Marathi

Cutlet Recipe in Marathi कटलेट रेसिपी मराठीत आपण सतत काही झटपट बनणारी पण चवदार डिश बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि झटापट बनणाऱ्या आणि चाविदार अश्या अनेक रेचीपे आहेत जसे कि मेथी पराठे, वडा पाव, नुडल्स, समोसा या प्रकारच्या अनेक रेसिपी आपण झटपट बनवून खावू शकतो आणि त्यामधील अजून एक लोकप्रिय आणि झटपट बनणारी आणि चवदार रेसिपी म्हणजे कटलेट रेसिपी. कटलेट रेसिपी हि भारतामध्ये अनेक ठिकाणी बनवला जाणारा पदार्थ आहे आणि हा रस्त्यावर असणाऱ्या वडाभजीच्या गाड्यांच्यावर देखील आपल्याला कटलेट खायला मिळते.

कटलेट हा असा पदार्थ आहे जो लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकणारा पदार्थ आहे आणि हा पदार्थ आपण घरामध्ये अगदी सहजपणे बनवून शकतो कारण हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनू शकतो. चला तर मग आज आपण या लेखामध्ये कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

cutlet recipe in marathi
cutlet recipe in marathi

कटलेट रेसिपी मराठीत – Cutlet Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
बनवण्याची पद्धतसोपी

कटलेट बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • बटाटा : बटाटा हा कटलेट बनवण्यासाठीचा महत्वाचा घटक आहे. कटलेट बनवताना सर्वप्रथम आपल्याला बटाटा उकडून घ्यावा लागतो मग त्याला बटाट्याला कांदा, आले लसून, हळद, मीठ , मिरची याची फोडणी दिली जाते आणि मग ते त्याचे चपटे कटलेट बनवले जातात.
  • रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स : रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स महत्वाचे असतात कारण आपण बनवलेले बटाट्याचे कटलेट यामध्ये कोट केले जातात.
  • तेल : आपण रव्यामध्ये चांगले कोट करून ठेवलेले कटलेट गरम तेलामध्ये तळले जातात म्हणून तेल हा कटलेट बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे.

व्हेज कटलेट रेसिपी – veg cutlet recipe in marathi

कटलेट रेसिपी हि एक झटपट बनणारी रेसिपी असल्यामुळे हि रेसिपी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो कारण सकाळी सर्वांची गडबड असते कारण सगळेच आपल्या कामासाठी घराबाहेर जाणार असतात आणि त्यांच्यासाठी आपण कटलेट हा नाश्ता बनवू शकतो करत हा लवकर बनवता येतो. चला तर आपण झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून एकदम सोप्या पद्धतीने बनवता येणारी रेसिपी पाहूया.

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
बनवण्याची पद्धतसोपी

कटलेट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make cutlet recipe 

कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आधीपासून घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असल्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. कटलेट बनवण्यासाठी बटाटा, रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स  आणि तेल हे लागणारे मुख्य साहित्य आहे. चला तर मग कटलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ ते ४ बटाटे
  • ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • १ कांदा ( बारीक चिरलेला ).
  • ७ ते ८ कडीपत्ता पाने ( बारीक चिरलेला ).
  • १/४ चमच्या हिंग.
  • १ चमचा गरम मसाला.
  • हळद ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
  • १ मोठा चमचा तेल ( फोडणीसाठी ).
  • २ वाटी रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स ( कटलेट कोट करण्यासाठी ).
  • तेल ( तळण्यासाठी ).

कटलेट बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make catlet recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून कटलेट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
  • कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते बारीक मॅश करून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला.
  • आणि कांदा थोडा वेळ भाजला किं त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि १ ते २ मिनिटे भाजा.
  • त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
  • आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करून गॅस लगेच बंद करा. मग हे मिश्रण थोडे गार होऊ द्या.
  • ते मिश्रण गार झाले कि त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे बनवा आणि ते रव्यामध्ये किंवा ब्रेड क्रम्ब्स मध्ये चांगेल कोट करून घ्या.
  • कढईमध्ये आता तेल घाला आणि ते मध्य आचेवर गरम करा आणि त्या तेलामध्ये जितके कटलेट मावतील तितके कटलेट घाला आणि ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि भाजल्यानंतर ते टिशू पेपरवर काढा ज्यामुळे जादाचे तेल त्या पेपरमध्ये शोषले जाई.
  • अश्या प्रकारे सर्व कटलेट रव्यामध्ये किंवा ब्रेड क्रम्ब्स मध्ये बुडवून चांगले कोट करा आणि तेलामध्ये लालसर रंगावर तळून घ्या.
  • तुमचे क्रिस्पी आणि टेस्टी कॅतालेत सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

कटलेट कश्यासोबत खातात – serving suggestion 

  • क्रिस्पी आणि टेस्टी कटलेट आपण टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत खावू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • जर तुम्ही कटलेट नाश्त्यासाठी बनवणार आसल तर बटाटे रात्रीच उकडून ठेवू शकता.
  • जर तुम्हाला कडीपत्ता आवडत नसेल तर त्यामध्ये कडीपत्ता घातला नाही तरी चालेल.

आम्ही दिलेल्या cutlet recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कटलेट रेसिपी मराठीत माहिती veg cutlet by madhura बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg cutlet recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि poha cutlet recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aloo matar cutlet recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!