Dal Bati Recipe in Marathi दाल बाटी रेसिपी मराठी आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खातो आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक विशिष्ट पदार्थाला खूप महत्व असते जसे गुजरातचा ढोकळा / खमण किंवा मुंबईचा वडा तसेच राजस्थानमध्ये देखील काही प्रसिध्द पदार्थांचे प्रकार आहेत त्यामधील एक म्हणजे डाळ बाटी. डाळ बाटी मधील डाळ फ्राय किंवा डाळ तडका हा एक वेगळा पदार्थ आहे आणि बाटी हा एक वेगळा पदार्थ आणि हे दोन्हीही पदार्थ खूप वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जातात आणि चवीला देखील हे पदार्थ खूप वेगळे लागतात. बाटी हे गव्हाचे पीठ, सुजी, तूप हे सर्व मळून घेवून त्याचे मध्यम आकाराचे पोकळ गोळे बनवले जातात.
आणि ते भाजले जातात तर डाळ हि वेगवेगळ्या प्रकारच्या ( २ ते ३ प्रकारच्या ) डाळी वापरून बनवली जाते आणि त्यामध्ये राजस्थानी मसाल्यांचा स्वाद असतो. डाळ बाटी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण आपल्याला यामध्ये दोन वेगवेगळ्या डिश बनवायच्या असतात परंतु हा पदार्थ बनवणे खूप सोपे आहे.
आणि कमी साहित्यात आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी उत्तम प्रकारे बनतात. आपण हि डिश केंव्हाही बनवून खावू शकतो. चला तर मग आज आपण या लेखामध्ये राजस्थानी डाळ बाटी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
दाल बाटी रेसिपी मराठी – Dal Bati Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | ४० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
पाककला | राजस्थानी ( भारतीय ) |
डाळ बाटी म्हणजे काय ?
डाळ बाटी मधील डाळ फ्राय किंवा डाळ तडका हा एक वेगळा पदार्थ आहे आणि बाटी हा एक वेगळा पदार्थ आणि हे दोन्हीही पदार्थ खूप वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जातात. बाटी हे गव्हाचे पीठ, सुजी, तूप हे सर्व मळून घेवून त्याचे मध्यम आकाराचे पोकळ गोळे बनवले जातात आणि ते भाजले जातात तर डाळ हि वेगवेगळ्या प्रकारच्या ( २ ते ३ प्रकारच्या ) डाळी वापरून बनवली जाते.
- गव्हाचे पीठ : बाटी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ हे महत्वाचा घटक आहे. गव्हाच्या पिठामध्ये सुजी, तूप, मीठ आणि बेकिंग पावडर घालून ते घट्ट मळून घेतले जाते आणि त्याचे पोकळ गोळे बनवले जातात आणि ते कढईमध्ये किंवा तव्यावर भाजले जातात आणि तुपामध्ये बुडवले जातात.
- डाळ : डाळ हि डाळ फ्राय किंवा डाळ तडका बनवण्यासाठी आवश्यक असते. तुम्ही डाळ बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची डाळ वापरू शकता किंवा त्यामध्ये २ ते ३ प्रकारची डाळ घालून देखील तुम्ही डाळ फ्राय बनवू शकता.
दाल बाटी कशी करायची – how to make dal bati recipe in marathi
डाळ बाटी हि एक राजस्थानी थाळी आहे जे त्या ठिकाणी खूप लोकप्रिय आहे तसेच हि डिश भारताच्या काही इतर ठिकाणी देखील खूप लोकप्रिय आहे. डाळ बाटी यामधील डाळ आणि बाटी ह्या जरी वेगवेगळ्या डिश असल्या तरी ह्या बनवण्यास खूप सोप्या आहेत. आता आपण राजस्थानी डाळ बाटी हा पदार्थ कसा बनवायचा आणि हा पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | ४० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १ तास |
पाककला | राजस्थानी ( भारतीय ) |
डाळ बाटी यामधील डाळ आणि बाटी हे दोन वेगवेगळे पदार्थ असल्यामुळे या दोन्ही पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळे साहित्य लागते आणि हे दोन्ही पदार्थ बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते आणि जरी नसेल तरी ते बाजारातून लगेच उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग डाळ बाटी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ वाटी गव्हाचे पीठ.
- अर्धा चमचा बेकिंग सोडा.
- १ चमचा मोठा रवा किंवा सुजी.
- अर्धी वाटी तूप ( पिठामध्ये घालण्यासाठी ).
- मीठ ( चवीनुसार ).
- तूप ( आवश्यकतेनुसार ).
- अर्धी वाटी तुरडाळ आणि अर्धी वाटी मुग डाळ
- २ वाटी पाणी.
- २ ते ३ चमचे तेल किंवा तूप.
- १/२ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- ६ ते ७ कडीपत्ता पाने
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा गरम मसाला.
- २ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
आता वर दिलेले साहित्य वापरून डाळ बाटी कशी बनवायची ते आपण पाहूयात.
- सर्वप्रथम गव्हाचे पीठ एक बाऊलमध्ये घ्या आणि त्यामध्ये बेकिंग सोडा, मीठ ( चवीनुसार ) आणि अर्धी वाटी तूप घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या. पीठाचे हातामध्ये मुटके होईपर्यंत पीठ मिक्स करून घ्या.
- आता या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते घट्ट मळून घ्या आणि ते चांगले मळून झाले कि त्यावर झाकण ठेवून ते पीठ १० मिनिटे भिजू द्या.
- मग १० मिनिटांनी हे पीठ अनेकदा थोडे माळून घ्या आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवा आणि त्यानंतर त्यामधील एक एक गोळे घेवून त्याचा टोपली सारखा आकार करा आणि मग ते मधी पोकळ ठेवून वर मिटवा आणि त्याचा गोल बनवा. अश्या प्रकारे सर्व गोळ्यांचे अश्या बाटी बनवून घ्या.
- बाटी आपण कुकरमध्ये किंवा आप्पे तव्यावर भाजू शकतो.
- आता एक आप्पे तवा घ्या आणि तो मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्याला ब्रशने तूप लावा आणि आपण तयार केलेल्या बाटी आप्पे साच्यामध्ये ठेवा आणि बाटीला देखील तूप लावा आणि त्या बाटी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी चांगल्या भाजून घ्या.
- तुम्ही बाटी ओव्हनमध्ये देखील भाजू शकता.
- आता एक बाऊल मध्ये तूप घ्या.
- बाटी भाजून झाल्या कि त्या तुपामध्ये बुडवून २ मिनिटे ठेवा आणि मग काढा. अश्या प्रकारे सर्व बाटी भाजा आणि तुपामध्ये बुडवून काढा.
- तुमची बाटी तयार झाली.
- सर्वप्रथम तूर डाळ आणि मुग डाळ एका बाऊल मध्ये काढून घेवून त्यामध्ये पाणी घालून ते एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
- नंतर कुकर मध्ये तुरडाळ आणि मूगडाळ घाला आणि त्यामध्ये २ वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून मध्यम आचेवर ४ शिट्या येई पर्यंत ठेवा आणि मग ते शिजल्यानंतर कुकर बंद करा.
- थोडा वेळाने कुकर गार झाला कि त्याचे झाकण उघडून ती डाळी थोड्या रवीने गुसळून घ्या.
- मंद आचेवर गॅस लावून त्यावर कढई ठेवा त्यात २ ते ३ चमचे तेल किवा तूप घालून त्यामध्ये १/२ चमचा मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे घाला आणि मग त्यामध्ये लगेच १ मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये आले लसून पेस्ट, कडीपत्ता घाला आणि ते एकत्र करून चांगले भाजून घ्या.
- मग त्यामध्ये हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग ते थोडे भाजले कि त्यामध्ये गुसळलेली डाळ घालून ते मिश्रण चांगले मिक्स करीन घ्या ( टीप – जर यामध्ये थोडे पाणी घालण्याची गरज असेल तर थोडे पाणी घालावे ).
- मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते एकत्र करा आणि त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एक चांगली उकळी आणा.
- तुमची बाटी सोबत खाल्ली जाणारी डाळ तयार झाली.
तिसरी कृती : डाळ बाटी सर्व्ह कशी करावी
- डाळ बाटी सर्व्ह करताना एका बाऊमध्ये डाळ घाला आणि ती ताटामध्ये ठेवा आणि त्यामध्ये बाटी देखील घाला.
- बाटी फोडून घ्या आणि त्यावर डाळ घालून ते चांगले कालवून घ्या आणि डाळ बाटीचा आनंद घ्या.
आम्ही दिलेल्या dal bati recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दाल बाटी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khandeshi dal bati recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtrian dal bati recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dal bati recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट