Dal Vada Recipe in Marathi डाळ वडा रेसिपी मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीचे पदार्थ बनवले जातात. तसेच डाळ वडा हा पदार्थ कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आवडीने खाल्ला जातो म्हणजेच हा पदार्थ कर्नाटकामध्ये लोकप्रिय आहे. जरी हा पदार्थ कर्नाटका तर प्रसिध्द आहेच परंतु हा पदार्थ भारताच्या काही इतर भागामध्ये देखील बनवला जातो. हा वडा चणा डाळ किंवा हरभरा डाळीपासून बनवला जातो आणि चणा डाळ हा एक पौष्टिक घटक आहे त्यामुळे हा पदार्थ लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे.
आपल्याला रोज रोज पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा या प्रकारचा नाश्ता खावून कंटाळा आलेला असतो त्यावेळी आपण डाळीचे वडे हा थोडासा वेगळा नाश्ता बनवू शकतो. डाळ वडा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनतो आणि खूप कमी साहित्यामध्ये देखील बनतो. चला तर आता आपण डाळ वडा कसा बनवायचा याबद्दल पाहूयात.
डाळ वडा रेसिपी मराठी – Dal Vada Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | कर्नाटक ( भारतीय ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
डाळ वडा बनवताना सर्वप्रथम आपल्याला डाळ भिजवून घ्यावी लागते आणि मग ती चांगली भिजली कि त्यामधील जास्त झालेले पाणी काढले जाते आणि मग ती मिक्सरला थोडी मोठी मोठी वाटून घेतली जाते आणि मग त्यामध्ये हिरवी मिरची पावडर, जिरे पावडर आणि मीठ घातले जाते आणि त्याचे छोटे छोटे वडे थापले जातात आणि ते तेलामध्ये तळले जातात.
- नक्की वाचा: डाळ ढोकळी रेसिपी
- डाळ : डाळ वडा बनवण्यासाठी हरभरा डाळ किंवा चणा डाळ हा एक महत्वाचा घटक आहे. चणा डाळ २ ते ३ किंवा शक्य झाल्यास त्यापेक्षा जास्त वेळ भिजवली जाते आणि मग ती मिक्सरला वाटून त्यामध्ये इतर साहित्य घालून त्याचे वडे बनवले जातात.
- हिरवी मिरची : हिरव्या मिरचीची पेस्ट देखील वड्यामध्ये घातली जाते त्यामुळे वड्याला तिखट पणा येतो.
- तेल : तेल देखील हि रेसिपी बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे कारण वडे तळण्यासाठी तेल महत्वाचे असते.
डाळ वडा रेसिपी – recipe of dal vada in marathi
डाळ वडा हा एक नाश्त्यासाठी बनवला जाणारा पदार्थ आहे जो कर्नाटक राज्यामध्ये खूप प्रसिध्द आहे तसेच हि रेसिपी कर्नाटक राज्यामध्ये प्रसिध्द असली तरी ती भारताच्या इतर भागामध्ये देखील बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. डाळ वडा हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि झटपट म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. चला तर मग आता आपण डाळ वडा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | कर्नाटक ( भारतीय ) |
बनवण्याची पध्दत | सोपी |
डाळ वडा बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते शक्यतो आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर ते आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग आता आपण डाळ वडा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २ वाटी चणा डाळ.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या.
- २ चमचे कडीपत्ता.
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
- १/२ चमचा जिरे पावडर.
- १/२ चमचा लाल तिखट.
- १/३ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
डाळ वडा रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून डाळ वडा कसा बनवायचा ते पाहूयात.
- डाळ वडा बनवताना सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ निवडून ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि मग त्यामध्ये पाणी घालून ते २ ते ३ तास भिजत ठेवा.
- भिजत ठेवलेली डाळ २ ते ३ तासानंतर चाळणी मध्ये ओता आणि त्यामधील पाणी अर्धा निताळून घ्या आणि ती डाळ २० मिनिटे तशीच चाळणीमध्ये ठेवा त्यामुळे सर्व पाणी निघून जाईल.
- आता ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्यामध्ये कडीपत्ता घाला आणि मिक्सरवर मोठी मोठी डाळ वाटून घ्या.
- आता ती डाळ एक मिक्सिंग बाऊल मध्ये काढा आणि मग त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करा. मग हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅस वर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई मध्ये तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
- आता डाळीचे मिश्रण अनेकदा चांगले मिक्स करून घ्या आणि आणि त्याचे छोटे छोटे थोडे चपटे वडे बनवून घ्या आणि ते गरम तेलामध्ये घाला ( तेलामध्ये जितके वडे मावतात तितके वडे घाला आणि तळून घ्या ).
- वडे चांगले लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि मग ते तेलामधून काढा.
- अश्या प्रकारे सर्व वडे तळून घ्या.
- डाळ वडा सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
- नक्की वाचा: डाळ फ्राय रेसिपी
डाळ वडा कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestions
- डाळ वडे आपण खोबऱ्याची चटणी, टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत खाल्ला जातो.
टिप्स (Tips)
- आपण फक्त हिरवी मिरची घालून किंवा फक्त लाल तिखट घालून देखील वडा बनवू शकतो.
- जर तुम्हाला कडीपत्ता आवडत नसला तर वड्यामध्ये कडीपत्ता घातला नाही तर चालतो.
आम्ही दिलेल्या dal vada recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डाळ वडा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या harbara dal vada recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mix dal vada recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये moong dal vada recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट