दाऊद इब्राहिम इतिहास Daud Ibrahim History in Marathi

daud ibrahim history in marathi – dawood ibrahim information in marathi दाऊद इब्राहिम इतिहास आज आपण या लेखामध्ये दाऊद इब्राहिम या अंडरवर्ल्ड डॉन विषयी माहिती आणि त्याचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. दाऊद इब्राहिम याचा जन्म २६ डिसेंबर १९५५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या गावामध्ये झाला आणि त्याला एक भारतीय माफिया गुंड म्हणून ओळखले जाते आणि तसेच हा ड्रग किंगपीन आणि डोंगरी (मुंबई) येथील दहशतवादी होता. २००३ मध्ये त्याला भारताने आणि युनायटेड स्टेट्सने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त केले होते. चला तर आता आपण दाऊद इब्राहिम याच्याविषयी खाली आणखीन माहिती घेवूया.

daud ibrahim history in marathi
daud ibrahim history in marathi

दाऊद इब्राहिम इतिहास – Daud Ibrahim History in Marathi

पूर्ण नावदाऊद इब्राहिम कासकर
जन्म२६ डिसेंबर १९५५
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड

दाऊद इब्राहिमची माहिती – Dawood Ibrahim Information in Marathi

दाऊद इब्राहिमचे बालपण आणि प्रारंभिक जीवन

दाऊद इब्राहिम याचा जन्म २६ डिसेंबर १९५५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी राज्यातील खेड या गावामध्ये झाला आणि त्याचे वडील इब्राहीम कासकर हे मुंबई पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते आणि त्यांच्या आईचे नाव अमिना असे होती आणि ती गृहिणी होती. आणि ते मुंबईमधील डोंगरी या मुस्लीम बहुल परिसरामध्ये राहत होते आणि हे निम्मवर्गीय कुटुंबामध्ये जरी वाढले असले तरी दाऊद इब्राहिम यांची स्वप्ने हि लहनपणी पासूनच मोठी ठेवत होते.

त्याला शाळा शिकण्यची एवढी आवड नसल्यामुळे त्यांनी शाळा सोडली आणि लहन वयामध्ये कमाई सुरु केली त्यांनी सर्वप्रथम रिक्षा चालवणे किंवा मोटारी दुरुस्त करणे या सारखी कामे करण्यास सुरुवात केली. आणि खूप कमी वयामध्ये तो गुन्हेगारी मध्ये अडकत गेला आणि त्याने सुरुवातीला डुप्लीकेट घड्याळे विकली तसेच त्याने घड्याळ्याच्यावर बनवट किमतीचे टॅग लाऊन लोकांची फसवणूक केली आणि अश्या प्रकारे तो वाईट कामामध्ये अडकत गेला आणि पुढे त्याने हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्या टोळी सोबत देखील काम केले नंतर त्याने आपली एक टोळी तयार केली.

दाऊद इब्राहीम इतिहास – Dawood ibrahim history 

दाऊद इब्राहीम एक कुख्यात भारतीय गुंड आणि दहशतवादी आहे जो १९९३ मध्ये झालेल्या साकळी बॉम्बस्फोटाचा कर्ताधरता म्हणजेच मास्टरमाईड होता. विशेष म्हणजे मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या पोटी जन्मलेला दाऊद इब्राहीम हा मुंबई मधील डोंगरी या ठिकाणी लहानाचा मोठा झाला. त्याने सर्वप्रथम रिक्षा चालवणे किंवा मोटारी दुरुस्त करणे या सारखी कामे केली आणि मग नंतर मुंबई माफियाची सुरुवात करणाऱ्या हाजी मस्तान या टोळीशी याचा संबध आला.

आणि त्याने खूप कमी वयामध्ये गुन्हेगारी करण्यास सुरुवात केली तसेच त्याने करीम लाला या टोळीसोबत काम केले होते असे सांगितले जाते. त्यांनी १९७० मध्ये आपली डी कंपनी हि वेगळी टोळी तयार केली होती. सध्या ते बेकायदेशीर अंमली पदार्थाचा व्यापार आणि जगभरातील २५ हून अधिक देशामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता.

१९९३ मध्ये झालेल्या साकळी बॉम्बस्फोट मध्ये त्याची भूमिका म्हणजे त्याने टायगर मेमनसोबत योजना आखली होती आणि त्याला  २००३ मध्ये त्याला भारताने आणि युनायटेड स्टेट्सने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त केले होते. सध्या दाऊद इब्राहीम कराची (पाकीस्थान) मध्ये राहत असल्याचे सांगितले जाते आणि याचे नाव मोस्ट वॉन्टेड या यादीमध्ये आहे.

दहशतवादी हल्ले

  • टायगर मेमननेच मुंबई हल्ल्याची योजना आखली होती आणि या हल्ल्यामध्ये सामील असलेली शस्त्रे हि दाऊदच्या तस्करीच्या सकालीतून आणली गेली होती. १२ मार्च १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि २५७ निष्पाप लोकांचा मूत्यू हा दाऊद इब्राहीम मुळे झाले असा आरोप त्याच्यावर आहे.
  • भारतामध्ये विशेषता मुंबई मध्ये पसरलेल्या जातीय वीसंवादाचा फायदा घेण्यासाठी पाकिस्थानाची गुप्त सेवा संस्था इंटर सर्व्हीसेस इंटेलीजंस ने ९० च्या दशकामध्ये सुरुवातीला दाऊद इब्राहीमशी हातमिळवणी केली. आयएसआयने दाऊदला आणखीन आर्थिक मदत केली आणि त्याला मोठे होण्यास मदत झाली आणि दाऊद वर मुंबई उद्वस्त करण्याच्या कटाचा एक भाग आहे.
  • दाऊद इब्राहीम हा भारतीय उपखंडामध्ये सक्रीय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांसोबत देखील काम करत असल्याचा संशय आहे. २००२ मधील गुजरातची दंगल आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यामध्ये हल्ल्यातील त्याची भूमिका आज देखील चर्चेत आहे.
  • मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाल्यापासून तो भारत सरकारने जारी केलेल्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये आहे. ओसामाबिन लादेनशी त्यांच्या संपर्कामुळे तो अमेरिकेच्या रडारवरदेखील होता. यामुळे २५ दशलक्ष डॉलर्स हेड मनी असलेल्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आहे.

दाऊद इब्राहिम विषयी विचारले जाणारे प्रश्न – questions

  • दाऊद इब्राहिम कोण होता ?

दाऊद इब्राहीम एक भारतीय माफिया गुंड म्हणून ओळखले जाते आणि तसेच हा ड्रग किंगपीन आणि डोंगरी ( मुंबई ) येथील दहशतवादी होता.

  • दाऊद इब्राहिम भारतातून केंव्हा पळून गेला ?

१९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर दाऊद इब्राहीम आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहीम हे १९९३ पासून भारतातून फरार आहेत. जेंव्हा डी कंपनी मुंबई मधील समन्वित बॉम्बस्फोटामध्ये गुंतलेली होती ज्यामध्ये २५० हून अधिक निष्पाप लोक मारले गेले होते.

  • दाऊद इब्राहिमचा जन्म कोठे व केंव्हा झाला ?

दाऊद इब्राहिम याचा जन्म २६ डिसेंबर १९५५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी राज्यातील खेड या गावामध्ये झाला आणि त्याचे वडील इब्राहीम कासकर हे मुंबई पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते आणि त्यांच्या आईचे नाव अमिना असे होती.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या daud ibrahim history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दाऊद इब्राहिम इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या daud ibrahim history in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!