डेंग्यू निबंध मराठी Dengue Essay in Marathi

Dengue Essay in Marathi डेंग्यू निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये डेंग्यू या रोगावर निबंध लिहिणार आहोत. आपल्याला वेगवेगळ्या कारणांच्यामुळे वेगवेगळे आजार होतात आणि त्यामधील एक म्हणजे डेंग्यू आणि हा एक विषाणूजन्य रोग आहे. जो आपल्याला डास चावल्यामुळे होण्याची शक्यता असते. डेंग्यू हा रोग एडीस इजिप्ती आणि एडीस अल्बोपिक्टस या  प्रकारच्या डासांच्यामुळे पसरतो. डेंग्यू हा रोग बहुतेक भागामध्ये कमी प्रमाणात होतो परंतु हा रोग दक्षिण आणि मध्य अमेरिका, आशियाच्या काही भागामध्ये, आफ्रिकेच्या काही भागामध्ये, पॅसिफिक कॅरेबियन या भागामध्ये मोठ्या प्रमाणत होतो कारण हा रोग मोठ्या प्रमाणत उपउष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय या सारख्या भागामध्ये खूप सामान्य आहे तसेच डेंग्यू हा रोग अमेरिकेतील पोर्तो रिको, व्हाजीन बेट, ग्वाम आणि सामोआ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

dengue essay in marathi
dengue essay in marathi

डेंग्यू निबंध मराठी – Dengue Essay in Marathi

Dengue Awareness Essay in Marathi

डेंग्यू डास चावल्यानंतर लगेच ४ ते ७ दिवसामध्ये या रोगाची लक्षणे दिसू लागतात आणि ती साधारणपणे ४ ते १० टिकतात. जर या रोगाचे निदान लवकरात लवकर किंवा या रोगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर निदान करून घेतले तर या रोगावर प्रभावीपणे उपचार करणे खूप सोपे आहे. आपण लेखाच्या सुरुवातीलाच पहिले कि डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि डेंग्यू हा चार डेंग्यू विषाणू एकत्र येवून बनतो आणि शक्यतो डेंग्यू हा रोग एडीस इजिप्ती या नावाच्या डासांच्यामुळे जास्त होतो आणि लवकर होतो.

डेंग्यूचा विषाणू हा संक्रमित डासातून माणसामध्ये पसरतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला डेंग्यूच्या विषाणूची लग्न झाली आहे अश्या व्यक्तीला तो डास चावतो आणि जेव्हा तो दास दुसऱ्या व्यक्तीला चावतो त्यावेळी विषाणून व्यक्तीमध्ये पसरतो. ज्यावेळी एकाद्या व्यक्तीला डेंग्यू डास चावल्यानंतर सुरुवातीला त्या व्यक्तीला सौम्य ताप येतो.

आणि यामध्ये ७ दिवस लक्षणे दिसतात म्हणजेच सौम्य तापाची लक्षणे हि सात दिवस असतात आणि डास चावतो त्यावेळी पहिल्या सात दिवसामध्ये स्नायू आणि सांधे दुखणे, मलमल होणे किंवा उलट्या होणे, डोळ्यांच्या मध्ये दुखणे, घसादुखी, चवीच्या संवेदने मध्ये बदल होतो, जास्त ताप किंवा ताप कमी होणे आणि परत येणे, तीव्र डोकेदुखी आणि शरीरावर पुरळ उटून ते आपोआप जातात आणि ते परत येतात आणि जर असे होत असेल तर हि सर्व सौम्य डेंग्यूची लक्षणे आहेत किंवा सुरुवातीची लक्षणे आहेत.

आणि जर कोणत्याही व्यक्तीला अश्या प्रकारची लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तिल सुरुवातीला त्ते डॉक्टरला दाखवून त्यावर जर योग्य उपचार करून घेतले तर डेंग्यू लगेच बारा होऊ शकतो. डेंग्यू हा रोग जास्त दिवस मानवी शरीरामध्ये टिकला म्हणजेच या रोगाचे योग्य वेळी निदान नाही झाले तर या रोगाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीमध्ये लिम्फ आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान, त्वचेखाली लहान रक्ताचे ठिबके, तोंड, नाक आणि हिरड्या यामधून रक्तस्त्राव यायला सुरुवात होते तसेच त्या संबधित व्यक्तीची त्वचा हि चिकट होते. त्याचबरोबर पोटात दुखणे, थकवा जाणवणे तसेच अस्वस्थ वाटणे यासारखी अनेक लक्षण तीव्र डेंग्यू मध्ये दिसून येतात.

डेंग्यू या रोगावर विशिष्ठ असे उपचार नाहीत आणि आपण या रोगाविषयी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरला दाखवून निदान करून घेवून आपल्याला आवश्यक ती काळजी घ्यावी लागते तसेच डॉक्टर देखील आपल्याला अवश्यक ते उपचार करतात तसेच आपला हा धोका कमी होण्यासाठी आपल्याला औषधे देतात. आपण हा रोग झाल्यास वेगवेगळ्या फळांचा ज्यूस, नारळाचे पाणी, फळे, शुध्द पाणी या सारखे द्रव पदार्थ जास्त खावेत यामुळे आपला धोका मोठ्या प्रमाणत कमी होऊ शकतो.

काही वेळा डेंग्यू आणि टायफॉईड झालेल्या व्यक्तीची लक्षणे हि एकसारखीच असतात आणि जर डॉक्टरने चुकीचे निदान केले तर या उपचारासाठी वेळ होऊ शकतो त्यामुळे जे लोक जास्त जोखीम असणाऱ्या म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त प्रमाणत डेंग्यू रोग पसरतो त्या ठिकाणी राहत असतात त्यांनी या डेंग्यू डासांचा अनेक प्रकारे बंदोबस्त करू शकतो.

तुमच्या घराला चांगले दार तसेच खिडक्या असल्या पाहिजेत तसेच खिडक्यांना कीटकनाशकाने उपचार केलेली जाळी असली पाहिजे जेणेकरून दारातून किंवा जाळीतून डास घरामध्ये येवू शकणार नाहीत आणि यामुळे डासांच्या चावण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव होईल. त्याचबरोबर जे लोक जास्त जोखीम असणाऱ्या ठिकाणी राहतात त्यांनी लांब हाताचे शर्ट, लांब पँट, मोजू घालून आपली त्वचा हि झाकण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे आपल्याला डास चावणार नाहीत.

सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये डास येऊ नयेत म्हणून डासांच्या अगरबत्त्या, मॉस्केटो कॉइल, गुड नाईट लिक्विड तसेच फास्ट कार्ड हे लावून ठेवा जेणेकरून डास घरामध्ये येणार नाहीत तसेच पाहते किंवा संध्याकाळी बाहेर जाने टाळा जेणेकरून बाहेरचे डास चावणार नाहीत. सुगंधी परफ्युम, साबण, लोशन, क्रीम यासारखे सुगंधी युक्त प्रसाधने लावणे टाळा कारण डास हे सुगंधित वासाला देखील आकर्षित होतात.

तसेच दासांचे प्रमाण हे साचलेल्या घाण पाण्यामुळे किंवा स्वच्छ पाण्यामुळे वाढते त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाणी साचू देवू नका जेणेकरून आपल्या परिसरामध्ये जास्त डास होणार नाहीत आणि आपण अश्या प्रकारे डास होऊ नयेत म्हणून काळजी घेवू शकतो आणि एडीस या दासांची वाढ होण्यापासून रोखू शकतो.

आपल्या आजूबाजूला डेंग्यू या रोगाची जरी जोखीम कमी असली म्हणजे जरी तेथे या रोगाचे प्रमाण जास्त नसे तरी देखील तेथील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे तसेच केरकचरा आणि सांडपाणी यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. आणि अश्या प्रकरे आपण वेगवेगळ्या प्रकारे उपाय करून डेंग्यू या रोगाचे वाढणारे संक्रमण कमी करू शकतो.

त्याचबरोबर आयुर्वेद हे एक भारतातील एक खूप जुने उपचार क्षेत्र आहे आणि भारतातील काही आयुर्वेदिक ग्रंथांच्यामध्ये डेंग्यू या रोगाविषयी काही माहिती आणि काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय सांगितले आहेत ज्याच्यामुळे आपण डेंग्यू हा रोग सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर बरा करू शकतो किंवा मग या रोगापासून होणारा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो म्हणजेच आपण आयुर्वेदिक उपचाराद्वारे डेंग्यू या रोगावर उपचार करू शकतो.

आम्ही दिलेल्या dengue essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डेंग्यू निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Dengue Awareness Essay in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!