धनुरासन मराठी माहिती Dhanurasana Information in Marathi

Dhanurasana Information in Marathi – Bow Pose धनुरासन विषयी माहिती आपल्या आजच्या दगदगीच्या आणि गडबडीच्या आयुष्यामध्ये व्यायाम हा एक महत्वाचा भाग बनला आहे कारण व्यायाम आणि योगासनामुळे आपले शरीर खूप सदृढ राहते त्यामुळे रोज योगासन करणे खूप गरजेचे आहे. योगासनाचे खूप असे प्रकार केले जातात आणि प्रत्येक प्रकारचा काहीतरी एक वेगळा फायदा होतो. आज या लेखामध्ये आपण योगासानामधील एक प्रकार ‘धनुरासन’ या विषयी माहिती घेणार आहोत. धनुरासन हे एक योगासनामधील आसन आहे आणि ते केल्यानंतर आपले शरीर धनुष्यासारखे दिसते आणि म्हणूनच बहुतेक या आसनाला धनुरासन असे नाव दिले असावे.

धनुरासन हे आसन करते तसे थोडे अवघड असते पण जर आपण रोज त्याचा सराव रोज करून ते आपल्यासाठी सोपे बनू शकते. धनुरासानाचे अनेक फायदे आहेत जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करू शकते त्यामुळे हे आसन रोज करणे आवश्यक आहे.

धनुरासन हे एक असे आसन आहे जे आपल्या शरीरामधील पाचन तंत्र मजबूत करते आणि ते शरीरातील हाडांमधील तापमान वाढवते. त्याचबरोबर धनुरासन डोके दुखीसाठी आणि मधुमेह कमी करण्यासाठी देखील काम करते.

 dhanurasana information in marathi

dhanurasana information in marathi

धनुरासन विषयी माहिती – Dhanurasana Information in Marathi

नावधनुरासन
प्रकारयोगासन
धनुरासन म्हणजे कायधनुरासन हे एक योगासनामधील आसन आहे आणि ते केल्यानंतर आपले शरीर धनुष्यासारखे दिसते आणि म्हणूनच बहुतेक या आसनाला धनुरासन असे नाव दिले असावे.
धनुरासन कसे करावेसर्वप्रथम पोटावर झोपावे त्यानंतर आपले गुडघे वाकवून गुडघ्यांना कमरेजवळ आणावे आणि मग पायाच्या घोट्याना आपल्या दोन्ही हातानी पकडावे त्यानंतर आपले डोके छाती आणि मांडी वरच्या दिशेला उचलावी आणि आपल्या सर्व शरीराचा भार पोटावर द्यावा.
धनुरासन केंव्हा करावेधनुरासन हे पोटावर भार देऊन करावयाचे असल्यामुळे आपले पोट रिकामे असताना हे आसन करावे.
धनुरासन किती वेळ करावेधनुरासन हे आपल्या क्षमतेनुसार १५ ते २० सेकंद केले जाते.

धनुरासन म्हणजे काय ? 

धनुरासन हे एक योगासनामधील आसन आहे आणि ते केल्यानंतर आपले शरीर धनुष्यासारखे दिसते आणि म्हणूनच बहुतेक या आसनाला धनुरासन असे नाव दिले असावे तसेच धनुरासन हा शब्द संस्कृत मधून आला आहे. धनुरासन केल्यामुळे आपल्या शरीरामधील पाचन तंत्र मजबूत करते आणि ते शरीरातील हाडांमधील तापमान वाढवते. त्याचबरोबर धनुरासन डोके दुखीसाठी आणि मधुमेह कमी करण्यासाठी देखील काम करते.

धनुरासन कसे करावे 

ज्यावेळी आपण धनुरासन करत असतो त्यावेळी आपण सर्वप्रथम पोटावर झोपावे त्यानंतर आपले गुडघे वाकवून गुडघ्यांना कमरेजवळ आणावे आणि मग पायाच्या घोट्याना आपल्या दोन्ही हातानी पकडावे त्यानंतर आपले डोके छाती आणि मांडी वरच्या दिशेला उचलावी आणि आपल्या सर्व शरीराचा भार पोटावर द्यावा.

हे आसन नवीन शिकणाऱ्यांनी अगदी काळजी पूर्वक करा किंवा हे आसन एका प्रशिक्षित व्यक्तीकडून शिकून घेवून मग त्याचा प्रयोग आपण घरी करावा. धनुरासन हे आपल्या क्षमतेनुसार १५ ते २० सेकंद केले जाते.

धनुरासन या आसनाचे फायदे – dhanurasana benefits in marathi

  • या आसनाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे हे आसन केल्यामुळे वजन आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होऊ शकते त्यामुळे जर जाड किंवा लठ्ठ माणसांनी हे आसन जर रोज केले तर ते फायद्याचे ठरू शकते.
  • जर आपण धनुरासन नियमितपाने केले तर मांडीजवळ असणारी जास्तीची चरबी निघून जाते.
  • जर आपल्याला अस्वस्थ किंवा नैराश्य वाटत असेल तर हे कमी करण्यासाठी धनुरासन हा एक उत्तम उपाय आहे करणे धनुरासन केल्यामुळे अस्वस्थ पणा आणि नैराश्य कमी होऊ शकते आणि त्या संबधित व्यक्तीचा मूड अगदी फ्रेश होऊन जातो.
  • धनुरासन ह्या आसनामुळे आपल्या शरीराचे स्नायू आणि हाडे लवचिक बनण्यास मदत होते तसेच स्नायू दुखणे, हाडे दुखणे या सारख्या समस्या दूर होतात.
  • हे आसन महिलांच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकेल कारण महिलांमध्ये पाठदुखी समस्या खूप उद्भवते आणि धनुरासन हे आसन केल्यामुळे पाठदुखीपासून मुक्ती मिळू शकते.
  • धनुरासन केल्यामुळे महिलांच्या मासिक पाळीतील समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
  • धनुरासनामुळे आपल्या शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते.
  • धनुरासन हे आसन मूत्र रोगावर उपयोगी आहे.
  • धनुरासन केल्याने संपूर्ण शरीराच्या सर्व नसांना व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर चपळ बनण्यास मदत होते आणि शरीरावर जमा झालेली चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो.
  • धनुरासन केल्याने छाती, खांदे आणि मांड्या मजबूत होण्यास मदत होते.
  • हे आसन केल्यामुळे पोटामध्ये असणाऱ्या अवयवांना चांगला रक्त पुरवठा होतो.

धनुरासन कोणी करू नये 

  • ज्या लोकांना कमरेशी संबधित समस्या आहेत त्याने हे आसन करू नये किंवा डॉक्टरांचा सल्ला घेवून करावे.
  • एखाद्या व्यक्तीला जर मणक्या संबधित समस्यांना तोंड ध्यावे लागत असेल तर त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.
  • ज्यांना पोट दुखी आणि पोटातील जळजळ या सारख्या समस्या असतील त्यांनी धनुरासन करू नये.
  • गर्भवती महिलांनी हे आसन करू नये.
  • हर्नियासारखा आजार झालेल्या व्यक्तींनी हे आसन करणे टाळावे.

धनुरासनाचे प्रकार – types of dhanurasana 

या आसनाचे दोन प्रकार आहेत आणि ते म्हणजे अर्ध धनुरासन आणि पूर्ण धनुरासन.

  • अर्ध धनुरासन 

अर्ध धनुरासन म्हणजे शरीराचा संपूर्ण भर जेव्हा पोटावर नसतो आणि पायाचा अगदी थोडासा भाग आपल्या कंबरेकडे ओढलेला असतो त्यावेळी त्या आसनाला अर्ध धनुरासन म्हणतात. ज्यावेळी आपण हे आसन शिकत असतो किंवा पहिल्यांदा करत असतो तेव्हा अर्ध धनुरासन प्रथम शिकणे फायद्याचे ठरू शकेल.

  • पूर्ण धनुरासन 

पूर्ण धनुरासनला संपूर्ण धनुरासन या नावाने देखील ओळखले जाते. पूर्ण धनुरासनामध्ये आपल्या पूर्ण शरीराचा भार आपल्या पोटावर असतो. या आसनामध्ये आपले पाय कंबरेकडे पूर्ण खेचले जातात आणि घोट्याना हाताने धरलेले असते आणि आपले डोके, छाती आणि मांड्या वरच्या दिशेला उंचावलेल्या असतात आणि त्यावेळी आपले शरीर धनुष्य सारखे दिसते.

धनुरासन या आसनाविषयी काही अनोखी तथ्ये – facts about dhanurasan 

  • धनुरासन या आसनाला इंग्रजीमध्ये बो पोज (bow pose) म्हणतात.
  • धनुरासन हे पोटावर झोपून केले जाणारे एक आसन आहे.
  • ज्यावेळी कोणतीतरी व्यक्ती धनुरासन करते त्यावेळी त्या व्यक्तीचे शरीर हे धनुष्यासारखे दिसते आणि म्हणूनच या आसनाला धनुरासन म्हंटले जाते.
  • धनुरासन हा शब्द संस्कृत मधून आला आहे.
  • या आसनाचे दोन प्रकार आहेत आणि ते म्हणजे अर्ध धनुरासन आणि पूर्ण धनुरासन.
  • धनुरासन केल्यामुळे लठ्ठपणा, डोके दुखील, मधुमेह, पाठदुखी आणि अस्वस्थपणा या सारखे अनेक आजार कमी होऊ शकतात.
  • धनुरासन हे आपल्या क्षमतेनुसार १५ ते २० सेकंद केले जाते.

आम्ही दिलेल्या dhanurasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर धनुरासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhanurasana yoga information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about dhanurasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dhanurasana marathi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!