डिझेल मेकॅनिक माहिती Diesel Mechanic Course Information in Marathi

diesel mechanic course information in marathi – diesel mechanical course information in marathi डिझेल मेकॅनिक माहिती, सध्या शिक्षणाला खूप महत्व आहे आणि अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतात. काही विद्यार्थी विज्ञान क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात, काही विद्यार्थी वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात, काही कला अशा अनेक वेगवेगळ्या शिक्षणाच्या शाखा आहेत तसेच कोर्स देखील आहेत त्यामधील एक म्हणजे डीझेल मेकॅनिकल कोर्स आणि आज आपण या लेखामध्ये डीझेल मेकॅनिकल कोर्स या विषयी माहिती घेणार आहोत.

डीझेल मेकॅनिकल कोर्स हा एक वर्षाचा नॅशनल कौन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग सह मंजूर केलेला कार्यक्रम आहे. या प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये डीझेल इंजिनच्या विविध पैलूंचा समावेश आहे जसे कि सरेखन आणि समायोजन करणे, वाहनांच्यामधील कमतरता दूर करणे. या कोर्समध्ये डीझेल इंजिनवर आधारित सेटअप कसे करायचे आणि ऑपरेशन या विषयी कौशल्ये शिकवली जातात.

जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला हा कोर्स त्याला प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि मग त्यांनतर त्याला या कोर्साठी प्रवेश मिळतो. कधीही कमी कालावधीचे कोर्स हे आपल्याला पटकन नोकरी मिळण्यासाठी चांगले ठरतात आणि डीझेल मेकॅनिकल कोर्स हा देखील तसाच कोर्स आहे जो केल्यानंतर आपल्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळू शकतात.

डीझेल मेकॅनिकल कोर्स हा इंधनाचे ऑपरेशन आणि व्यवस्थापन कसे करायचे या बद्दल माहिती देतो. चला तर खाली आपण या कोर्स विषयी सविस्तर माहिती घेऊया.

diesel mechanic course information in marathi
diesel mechanic course information in marathi

डिझेल मेकॅनिक माहिती – Diesel Mechanic Course Information in Marathi

कोर्सचे नावडीझेल मेकॅनिकल कोर्स
कोर्स करण्यासाठी पात्रताइयत्ता १० वी पूर्ण
कोर्सचा कालावधी१ वर्ष
कोर्सची फी११००० ते १२००० रुपये

डीझेल मेकॅनिकल कोर्स काय आहे ?

डीझेल मेकॅनिकल कोर्स हा एक वर्षाचा नॅशनल कौन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग सह मंजूर केलेला आहे आणि यामध्ये डीझेल इंजिनवर आधारित सेटअप कसे करायचे आणि ऑपरेशन या विषयी कौशल्ये शिकवली जातात.

डीझेल मेकॅनिकल कोर्स विषयी महत्वाची माहिती – diesel mechanical course information in marathi

 • डीझेल मेकॅनिकल कोर्स फी हि प्रत्येक संस्थेनुसार बदलत असते म्हणजेच संस्था आणि राज्य सरकार नुसार या कोर्सची फी १५०० ते ३००० पर्यंत असते तर खाजगी संस्थेमध्ये या कोर्सची फी ५००० ते २५००० पर्यंत असते.
 • डीझेल मेकॅनिकल कोर्स झाल्यानंतर बाईक, ट्रक, कार, ट्रॅक्टरसाठी गॅरेज उघडून आणि त्याच्या पार्टसाठी दुकान उघडून तुम्ही तुमच्यासाठी स्वयंरोजगार तयार करू शकता.
 • हा कोर्स पूर्ण केल्यानंतर संबधित व्यक्ती हा मेकॅनिक, वाहन ऑपरेटर, लॅब असिस्टंट पंप ऑपरेटर, ऑटो फिटर आणि टूल हँड्लर या प्रकारच्या नोकर्या मिळवू शकता.
 • डीझेल मेकॅनिकल कोर्स हा एक वर्षाचा नॅशनल कौन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग सह मंजूर केलेला कार्यक्रम आहे.
 • डीझेल मेकॅनिकल हा कोर्स १० वी किंवा १२ वी झाल्यानंतर करता येतो आणि हा कोर्स खूप कमी खर्चामध्ये होऊ शकतो.
 • जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला हा कोर्स त्याला प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि मग त्यांनतर त्याला या कोर्ससाठी प्रवेश मिळतो.

डीझेल मेकॅनिकल कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा – how to apply 

डीझेल मेकॅनिकल कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. चला तर आता आपण डीझेल मेकॅनिकल कोर्ससाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया.

 • सर्वप्रथम आपण अर्ज करण्यासाठी aiecet.com वर जाऊन AIE CET साठी अर्ज भरू शकतो.
 • आता ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल.
 • आता तेथून अर्ज करा यावर क्लिक करा म्हणजे तुमच्या समोर अर्ज उघडेल आणि मग तुमच्या अर्जामधील सर्व तपशील भरा आणि मग अनेकदा भरलेले तपशील तपासा आणि शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा.

डीझेल मेकॅनिकल कोर्समधील अभ्यासक्रम – syllabus 

      पहिले सत्र (1st semester)       दुसरे सत्र (2nd semester)
इंजिनचा परिचयडीझेल इंजिन तत्व
मापन प्रणालीगव्हर्नर आणि इनटेक सिस्टम
व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्यइंजिन परिचय : ४ स्ट्रोक पेट्रोल आणि डिझेल इंजिन, २ स्ट्रोक इंजिन पेट्रोल आणि डिझेल
ड्रिलिंग, टॅप्स, रीमिंग शीट मेटल वर्किंगकुलिंग सिस्टीम, ऑपरेशन आणि देखभाल
विना विध्वंसक चाचणीइंजिन ऑपरेशन
हायड्रोलिक्स आणि न्यूमॅटिक्सइंधन प्रणाली आणि इंधन इंजेक्शन
मुलभूत वीज बॅटरी, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि वेल्डींगएक्झॉस्ट सिस्टम आणि चार्जिंग सिस्टम

डीझेल मेकॅनिकल कोर्स झालेल्या व्यक्तीला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी मिळू शकते ?

या प्रकारचा कोर्स झालेले व्यक्ती हे मेकॅनिक्स इंजिनमधील समस्या ओळखतात आणि ती दूर करण्याचा प्रयत्न करतात. डीझेल मेकॅनिकल हा कोर्स झालेले व्यक्ती कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात ते आता आपण पाहूया.

 • स्वतंत्र दुरुस्ती दुकाने ( independent repair shop ).
 • बस आणि वाहतूक कंपन्या ( bus and transport companies ).
 • वाहन सेवा केंद्र ( vehicle service stations ).
 • सरकारी विभाग ( government departments ).
 • कार्बोनेटेड शीतपेय उद्योग (carbonated soft drink industry ).
 • सेवा स्थानके ( service stations ).

डीझेल मेकॅनिकल कोर्ससाठी असणारी वयोमर्यादा – Age criteria 

 • डीझेल मेकॅनिकल हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याचे कमीत कमी वय हे १४ इतके असले पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे ४० वर्ष इतके असू शकते.
 • जर तुम्ही कोणत्याही राखीव जातीचे असाल तर तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट मिळू शकते.

आम्ही दिलेल्या diesel mechanic course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डिझेल मेकॅनिक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या diesel mechanical course information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about diesel mechanic in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!