दिवेआगर गणपती इतिहास Diveagar Ganpati History in Marathi

diveagar ganpati history in marathi – diveagar ganpati information in marathi दिवेआगर गणपती इतिहास आज आपण या लेखामध्ये दिवेआगर गणपती विषयी काही माहिती आणि दिवेआगर गणपतीचा इतिहास पाहणार आहोत. दिवेआगर गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि हे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या छोट्याश्या गावामध्ये हे मंदिर समुद्र किणाऱ्यावर वसले आहे. या ठिकाणी असलेला समुद्रकिनारा, नारळ आणि सुपारीची झाडे अशा निसर्गरम्य परिसराला प्रसिध्दता मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या ठिकाणी सापडलेल्या सुवर्ण गणेशामुळे हा भाग खूप लोकप्रिय आहे.

या मंदिराविषयी असा विश्वास आहे कि दिवेआगर या गावातील श्रीमंत धर्मा पाटील यांनी सुपारीच्या रोपाची लावण करताना त्यांना एक ताब्याची पेटी सापडली होती आणि ती ३० किलो वजनाची होती आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या गावातील गावकऱ्यांना एकत्र करून ती पेटी उघडली त्या पेटी मध्ये सोन्याची गणेशाची प्रतिमा होती म्हणजेच गणेशाचा मुखवटा होता. हि कोरीव गणेश प्रतिमा मंदिरामध्ये ठेवण्यात आली तसेच पेटी देखील मंदिरामध्ये ठेवण्यात आली.

या मूर्तीमुळे त्या ठिकाणी एक मंदिर झाले आणि या गणेश प्रतिमेमुळे गावातील लोकांचे भाग्य खुलल्या सारखे झाले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या मंदिराला पर्यटक भेट देऊ लागल्यामुळे त्या ठिकाणावरील लोकांचे उत्पन्न देखील वाढले कारण त्या ठिकाणी राहण्यासाठी येऊ लागले आणि त्यामुळे येथे होम स्टे हि संकल्पना सुरु झाली आणि या ठिकाणी पर्यटकांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. चला तर आता आपण दिवेआगर गणपतीविषयी आणखीन खाली माहिती घेवूया.

diveagar ganpati history in marathi
diveagar ganpati history in marathi

दिवेआगर गणपती इतिहास – Diveagar Ganpati History in Marathi

गणपतीचे नावदिवेआगर गणपती
गावाचे नावदिवेआगर
जिल्हारायगड

दिवेआगर गणपतीचा इतिहास – history of diveagar ganapati 

दिवेआगर या गणपती मंदिर ला एक इतिहास आहे आणि तो म्हणजे हा गणपती जमिनीतून सापडला आहे. एके दिवशी दिवेआगर या गावामध्ये श्रीमंत  धर्मा हे आपल्या शेतामध्ये सुपारीच्या रोपांची लावण करत असताना त्यांना त्या ठिकाणी एक पितळेची पेटी सापडली त्यांनी ती पेटी लगेच उघडून बघितली नाही तर त्यांनी हि घटना गावातील लोकांना सांगितली आणि लोकांना एकत्र केले आणि त्याने सर्व लोक एकत्र झाल्यानंतर मग त्याने पेटी उघडली आणि पेटी उघडल्यानंतर त्यामध्ये एक सोन्याच्या गणपतीची प्रतिमा होती.

आणि हि प्रतिमा १ किलो पेक्षा जास्त  वजनाची होती आणि ती प्रतिमा हि शुध्द सोन्यापासून बनवली होती आणि हि गणपतीची प्रतिमा हि अगदी कोरीव होती. गावकऱ्यांनी असे ठरवली कि हि मूर्ती आता मंदिरामध्ये ठेवायची आणि म्हणून त्यांनी समुद्र किनाऱ्यावर एक मंदिर बांधले आणि ती प्रतिमा त्या मंदिरामध्ये प्रस्तापित केली आणि ती पेटी देखील त्या मंदिरामध्ये ठेवण्यात आले.

अशा प्रकारे तेंव्हापासून त्या मंदिराची प्रचीती वाढली आणि या मंदिरामधील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येऊ लागले तसेच अनेक पर्यटक देखील येऊ लागले. पण २०१२ मध्ये या मंदिरामध्ये चोरांनी सशस्त्र चोरी केली आणि या मंदिरामध्ये असणारे रक्षकांना मारहाण केली आणि गणपतीची मूर्ती चोरून नेण्यास दरोडेखोरांना यश आले.

या मारहाणीमध्ये मंदिरामधील रक्षकांचा मृत्यू झाला आणि या दोन रक्षकांचे नाव अनंता बापू भगत आणि महादेव गोपाळ घडशी असे होती. नंतर काही दिवसांनी या मंदिरामधील मूर्ती घेवून जाणाऱ्या दरोडेखोरांना पकडले आणि त्यांच्याकडून वितळलेले सोने घेतले परंतु यामुळे गणपती बाप्पा मात्र कायमचा लुप्त झाला.

दिवेआगर गणपतिच्या मंदिराविषयी काही तथ्ये – facts about diveagar ganapati 

  • दिवेआगर या मंदिरामध्ये जी २०१२ मध्ये गणपतीची मूर्ती होती ती खूप प्राचीन होती आणि या प्रतिमेची किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना हि १८६५ मध्ये केली असा अंदाज व्यक्त केला जातो.
  • माघ चतुर्थीला आणि कार्तिक वद्य चतुर्थीला सुवर्णगणेशाचा जन्मदिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
  • २०१२ मध्ये गणपतीची सोन्याची मूर्ती चोरी झाली आणि यामध्ये दोन रक्षकांचा मृत्यू देखील झाला आणि ह्या मूर्तीचे सोने हे वितळवण्यात आले होते आणि त्यामुळे असे म्हटले जाते कि गणेश मूर्ती हि कायमस्वरूपी लुप्त झाली.
  • असे म्हणतात कि हि दानेशाची मूर्ती हि काही काळापूर्वी जमिनीमध्ये एका पितळेच्या पेटीमध्ये ठेवलेली होती जी दिवेआगर या गावातील धर्मा पाटील याला सापडली होती अनोई मग त्याने गावातल्या लोकांच्यासोनाट विचार विनिमय करून मंदिर बांधले होते.
  • या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती हि सोन्याची असल्यामुळे या मंदिराला सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते होते.
  • दिवेआगर गणपती मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या गावामध्ये वसलेले आहे.
  • २०१२ मध्ये सोन्याची गणेशमूर्ती चोरीला गेल्यानंतर तब्बल ९ वर्षांनी या मंदिरामध्ये पूर्वी होती तशीच मूर्ती २०२१ मध्ये बसवण्यात आली आहे.
  • पूर्वी हे मंदिर फक्त गावातल्या लोकांच्यासाठी प्रसिध्द आणि महत्वाचे होते पण सध्या या मंदिराविषयी जस जसा लोकांना इतिहास माहित होत गेला त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी खूप गर्दी असते आणि पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे या गावातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कामे मिळाली आहेत किंवा रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे त्यामुळे तेथील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
  • दिवेआगरचे गणपती मंदिर हे आठवड्याचे साठी दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत भाविकांच्यासाठी उघडे असते.
  • मूर्ती चोरीला गेल्यानंतर अनंता बापू भगत आणि महादेव गोपाळ घडशी यांचा मृतू झाला होता.

आम्ही दिलेल्या diveagar ganpati history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दिवेआगर गणपती इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या diveagar ganpati information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: