डॉ अमोल कोल्हे परिचय Dr Amol Kolhe Biography in Marathi

Dr Amol Kolhe Biography in Marathi – Dr Amol Kolhe Information in Marathi डॉ अमोल कोल्हे परिचय छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो या दोन्ही भूमिका रंगवणारे एकमेव अभिनेता म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पार पडणारे डॉ. अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. डॉ. अमोल कोल्हे यांनी पार पाडलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रसिकमनावर राज्य करून गेली. डॉ. अमोल कोल्हे भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेता असून एक राजकारणी व शिरूर मधील लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत.

आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य देखील आहेत. अमोल कोल्हे हे व्यवसायाने एक डॉक्टर, एक अभिनेता आणि एक राजकारणी नेते देखील आहेत. अशा विविध क्षेत्रांमध्ये तितक्याच ताकदीने व उत्साहाने काम करणारे अमोल कोल्हे यांच्या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण डॉ. अमोल कोल्हे‌ यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत.

dr amol kolhe biography in marathi
dr amol kolhe biography in marathi

डॉ अमोल कोल्हे परिचय – Dr Amol Kolhe Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)डॉक्टर अमोल कोल्हे
जन्म (Birthday)१८ सप्टेंबर १९८०
जन्म गाव (Birth Place)पुणे जिल्ह्यातील नारायणगाव
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)अभिनेता

Dr Amol Kolhe Information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (१८ सप्टेंबर १९८०). पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म झाला. अमोल कोल्हे यांच आठवीपर्यंतचे शिक्षण नारायणगाव येथील शाळेत झालं. पुढील शिक्षणासाठी वडिलांनी अमोल कोल्हे यांना पुण्याला पाठविले नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षण अमोल कोल्हे यांनी पुण्याच्या आपटे शाळेतून पूर्ण केलं.

विज्ञान शाखेतून अमोल कोल्हे शिक्षण घेत होते कारण त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. हायस्कूल नंतर अमोल कोल्हे यांनी किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि शेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मुंबई येथून एमबीबीएसची पदवी मिळवली. डिग्री मिळाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी केईएम रुग्णालयात सराव सुरू केला. या दरम्यान त्यांचा परिचय डॉक्टर अश्विनी यांच्याशी झाला आणि पुढील वर्षांमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

त्यांची पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. अमोल कोल्हे यांना आध्या व रुद्रा अशी दोन मुलं आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या शालेय जीवनात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. शिवाय अमोल कोल्हे त्यांच्या फावल्या वेळामध्ये कबड्डी व क्रिकेट खेळण्यास पसंत करतात.

अमोल कोल्हे फिटनेस साठी नेहमीच उत्साहित असतात आणि स्वताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते घरी नेहमी विविध शारीरिक व्यायाम करत असतात. व्यायामाचे व्हिडिओज ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतात. अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियावर फार मोठा चाहता वर्ग आहे. साधी राहणीमान, रुबाबदार, अष्टपैलू असं अमोल कोल्हे यांचे व्यक्तिमत्व आहे.

अभिनय कारकीर्द

अमोल कोल्हे डॉक्टर आहेत. परंतु अभिनयातील रूची त्यांना या क्षेत्रांमध्ये घेऊन आली. सुबल सरकार यांना आदर्श मानून अमोल कोल्हे यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. अभिनयाची आवड तशी अमोल कोल्हे यांना लहानपणीच लागली होती आणि म्हणूनच कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये त्यांचा सहभाग होता. आपली हीच आवड पुढे नेऊन फिल्मी दुनिया मध्ये करिअर करण्याचं ठरवलं. २००८ मध्ये अमोल कोल्हे यांची राजा शिवछत्रपती ही मालिका प्रसारित झाली.

स्टार प्रवाह वर प्रसारित होणाऱ्या राजा शिवछत्रपती या मराठी टीव्ही शोमध्ये अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे अभिनय कौशल्य दाखवले आणि तेव्हापासून त्यांना लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली. या मालिकेने त्यांना अनेक वेगळ्या संधी दिल्या.

पुढे २०१७ मध्ये अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित करण्यात आली. या मालिकेमध्ये अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांची पार पाडलेली भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचली. या मालिकेत अमोल कोल्हे यांचा अभिनय बघून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर २०१९ मध्ये स्वराज्य जननी जिजामाता या सोनी मराठी वरील मालिकेमध्ये अमोल कोल्हे यांची नवी भूमिका पाहायला मिळाली.

२००८ मध्ये अमोल कोल्हे यांनी मी अमृता बोलतेय या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. २०११ मध्ये अमोल कोल्हे राजमाता जिजाऊ या चित्रपटांमध्ये दिसून आले. २०१४ मध्ये अमोल कोल्हे रमा माधव या चित्रपटामध्ये काम करत होते. अलख निरंजन या मराठी चित्रपटाचे मुख्य नायक म्हणून अमोल कोल्हे यांना २०१९ मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अमोल कोल्हे यांनी तेरा चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन भूमिकांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोचले. २०१७ मध्ये अमोल कोल्हे यांनी व्हाय आय कील्ड गांधी? या चित्रपटामध्ये नथुराम गोडसे ची वादग्रस्त भूमिका साकारली होती. जानेवारी २०२२ मध्ये अमोल कोल्हे यांचे नाव सातत्याने चर्चेत येऊ लागलं.

व्हाय आय किल्ड गांधी? या चित्रपटातील नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्या बद्दल अमोल कोल्हे यांच्यावर टीका करण्यात आली होती. परंतु एका मीडिया हाऊसच्या सोबत झालेल्या संभाषणात अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की २०१७ मध्ये त्यांनी या चित्रपटामध्ये काम केले होते. परंतु काही कारणास्तव हा चित्रपट त्यावेळी प्रदर्शित होऊ शकला नाही.

जेव्हा त्यांनी या चित्रपटांमध्ये काम केले तेव्हा ते राजकारणात सक्रिय नव्हते. शिवाय त्यांनी नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीचे समर्थन कधीही केले नव्हते आणि कधीही करणार नाहीत. अमोल कोल्हे यांच्या घरी १५० तलवारींचा संग्रह आहे. ते राजा शिवछत्रपतींचे खूप मोठे अनुयायी असल्यामुळे त्यांनी हा तलवारींचा संग्रह जमा केला आहे. अमोल कोल्हे यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून जाहीर केले की ते दिवसातून वीस ते बावीस तास काम करत असतात.

राजकीय आयुष्य

चित्रपट क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर अमोल कोल्हे यांची गाडी राजकीय क्षेत्रा कडे वळली. अभिनयामध्ये बहार येतच होता तर अमोल कोल्हे यांना राजकीय क्षेत्राचही आकर्षण होतं. म्हणूनच त्यांनी शिवसेना पक्ष निवडून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं. अभिनयाच्या माध्यमातून अमोल कोल्हे महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये पोहोचले होते त्यामुळे शिवसेनेकडून देखील त्यांना भरभरून प्रोत्साहन मिळालं.

२०१४ मध्ये अमोल कोल्हे शिवसेनेचे उपनेते बनले फारच कमी वयामध्ये अमोल कोल्हे यांना शिवसेनेसारख्या पक्षांमध्ये इतक मोठ पद मिळालं होतं. आणि इतक मोठ पद पटकावणारे कदाचित ते एकमेव असावेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं. भाषणामध्ये पारंगत असल्याने व महाराष्ट्राचे आवडत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मागणी होती.

परंतु २०१५ मध्ये पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून अमोल कोल्हे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. २०१९ मध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. हा काळ लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांन विरुद्ध अमोल कोल्हे यांना पुढे केलं या निवडणुकीवरून महाराष्ट्र मध्ये भरपूर चर्चा झाली.

पुण्यामध्ये शिवसेनेचा धबधबा होता परंतु अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलल्यानंतर २३ मे २०१९ रोजी राष्ट्रवादीतून विजय मिळवला. आज डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांना मध्ये येतात. अभ्यासपूर्ण भाषणे हि अमोल कोल्हे यांची विशेषता आहे. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये त्यांच्या भाषणाची नेहमीच चर्चा असते. आधी डॉक्टर मग अभिनेता आणि आता एक राजकारणी नेता अशा विविध क्षेत्रांमध्ये अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका उत्तम रित्या लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी नावाजले जातात. निवडणूक कुठलीही असो परंतु प्रचारासाठी नेहमी अमोल कोल्हे यांना पुढे केलं जातं. १३ सप्टेंबर २०१९ रोजी अमोल कोल्हे यांना कृषी स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीं. १३ सप्टेंबर २०२० रोजी अमोल कोल्हे यांची पर्यटन मंत्रालयाच्या आयोजित आणि कुटुंब कल्याण सदस्य सल्लागार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजकारणामध्ये ते एक तरुण नेते आहेत आणि त्यांचे वय पाहता त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे यात काही शंका नाही.

आम्ही दिलेल्या dr amol kolhe biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉ अमोल कोल्हे परिचय मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr amol kolhe information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dr amol kolhe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!