डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य Dr Panjabrao Deshmukh Information in Marathi

Dr Panjabrao Deshmukh Information in Marathi डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य भारतातील शेतकरी क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा भारताच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. आजच्या लेखामध्ये आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख (भाऊसाहेब)यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भाऊसाहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये जे योगदान दिलं त्यामुळे आज कृषी क्षेत्रामध्ये बरीच सुधारणा पाहायला मिळाली. भाऊसाहेब हे एक समाज सेवक आणि राजकारणी होते. आणि शेतकरी बांधवांसाठी भाऊसाहेबांनी केलेलं कार्य तर आवाक्याबाहेर आहे. भाऊसाहेब हे भारतीय शेतकऱ्यांचे नेते होते.
dr panjabrao deshmukh information in marathi
dr panjabrao deshmukh information in marathi

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य – Dr Panjabrao Deshmukh Information in Marathi

पूर्ण नाव (Name)पंजाबराव देशमुख
जन्म (Birthday)२७ डिसेंबर‌ १८९८
जन्म गाव (Birth Place)पापऴ या अमरावती जिल्ह्यातील छोट्याशा गावातला
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)शेतकरी क्रांतीचे जनक

जन्म व वैयक्तिक आयुष्य

पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापऴ या अमरावती जिल्ह्यातील छोट्याशा गावातला आहे. २७ डिसेंबर‌ इसवी सन १८९८ रोजी पंजाबराव देशमुख यांनी एका शत्रिय मराठा कुटुंबामध्ये जन्म घेतला. पंजाबराव यांचा मूळ आडनाव कदम असं होतं. भाऊसाहेब हे पंजाबराव देशमुख यांचे टोपण नाव होतं. घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होतं. घराची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली होती.

तरीही पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. गावातल्याच शाळेमध्ये पंजाबराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं पुढील शिक्षणासाठी ते कारंजा लाड आणि सोनगाव येथे गेले. येथे अमरावती मधील हिंदू हायस्कूल आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पंजाबराव देशमुख यांनी त्यांच्य पुढील शिक्षण पूर्ण केलं.‌

त्याकाळी भारतामध्ये उच्च शिक्षण उपलब्ध नसल्याने पंजाबराव देशमुख यांना उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जावं लागलं. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती इतकी ही चांगली नव्हती की ते इंग्लंडला अभ्यासासाठी जाऊ शकतील परंतु कसेबसे त्यांनी पैसे जमा केले आणि इंग्लंड गाठलं. उच्चशिक्षणासाठी पंजाबराव देशमुख यांनी इंग्लंड तर गाठलं परंतु, तिकडच्या बदललेल्या वेळा, हवामान, नवीन माणसे या सगळ्याशींच त्यांना मिळतंजुळतं करवून घ्यायची गरज होती.

पंजाबराव देशमुख यांनी संस्कृत मध्ये पदवी मिळवली. पंजब्राव देशमुख यांच्याकडे बॅरिस्टरची पदवी देखील आहे. वैदिक साहित्यामधील‌ धर्मातील मूळ विकास यावर त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळाली. इसवी सन १९२४ मध्ये पंजाबराव देशमुख यांचा विवाह सुवर्ण समाजातील विमल वैद्य यांच्याशी झाला. हा विवाह एक आंतरजातीय विवाह ठरला.

डॉक्टर पंजाबराव देशमुख एक सामाजिक कार्यकर्ते

डॉक्टर पंजाबराव देशमुख सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाची सेवा करून समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचे काम पंजाबराव देशमुख यांनी केले.‌ समाजसेवेची मशाल हाती घेतलेल्या पंजाबराव देशमुख यांनी अस्पृश्यांना योग्य ती वागणूक मिळावी म्हणून संपूर्ण आयुष्यभर लढा दिला. अमरावतीच्या अंबाबाई मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता यासाठी १८ ऑगस्ट १९२८ रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह सुरू केला.

त्या काळी उच्च-नीच, जातिभेद, अस्पृश्यांना मिळणारी गैर वागणूक, उच्चवर्णीय व कृष्णवर्णीय यांवर होणारा भेदभाव‌ या सगळ्या गोष्टी फार चालायच्या आणि ह्याच गोष्टींना आळा घालण्याचं काम डॉक्टर पंजाबराव देशमुख करत होते. अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळू नये म्हणून उच्चवर्णीयांनी निषेध केला होता. परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रह मध्ये भीमराव आंबेडकर यांचा पाठिंबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मिळाला.

या कार्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यशस्वी ठरले मंदिराच्या व्यवस्थापनाने अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला. त्या वेळी अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक अतिशय चुकीची होती. समाजामध्ये समानता आणण्यासाठी पंजाबराव देशमुख यांनी रक्ताचं पाणी केलं. समाजसेवक म्हटलं तर ते नेहमीच समाजाच्या भल्याचा विचार करतात. समाजामध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करून समाजाला विकासाच्या मार्गावर कस आणता येईल याचा विचार करतात. समाजाचा विकास, समाजाचं हित हेच समाजसेवकांच ध्येय असतं.

आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं रोपट़ पेरण्याचे काम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केल. सर्वांनी शिक्षण घेऊन राज्याचा, देशाचा विकास साधावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी इसवी सन १९३१ मध्ये अमरावती येथे शिवाजी एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. हि एक शिक्षण संस्था आहे आणि शिक्षण संस्था महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था ठरली आहे. या शिक्षण संस्थेमध्ये २४ पदवी महाविद्यालय तर ५४ इंटरमीडिएट महाविद्यालय आहेत.

याशिवाय ७५ हायस्कूल आणि ३५ वस्तीगृह समाविष्ट आहेत. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून इसवी सन १९२६ मध्ये गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह स्थापन केल. त्याकाळी शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जायचं नाही परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख हे स्वतः सुशिक्षित व्यक्ती होते आणि त्यांना शिक्षणाचे फायदे चांगलेच माहिती होते.

याशिवाय शिक्षणास आपल्या सगळ्यांचा मूलभूत मानवी अधिकार आहे. शिक्षण ही आपली गरज आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. इसवी सन १९५० मध्ये पुण्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी लोक विद्यापीठ स्थापन केलं. इसवी सन १९५६ मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अखिल भारतीय दलित महासंघाची स्थापना केली.

भारतीय शेतकरी क्रांतीचे जनक डॉक्टर पंजाबराव देशमुख

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये ७५ टक्के लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत.‌ जो शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो. ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. परंतु शेतकरी वर्ग संघटित नसल्यामुळे त्यांच्या बाजूने आवाज उठवणारा कोणी नव्हतं आणि प्रत्येक गोष्टींमध्ये शेतकरी वर्गाची लुटमार केली जायची त्यांना लुबाडल जायचं‌.

शेतकरी शेतात राबतो, घाम गाळतो म्हणूनच सुखाचे दोन घास आपल्या सर्वांच्या पोटात जातात ही जाणीव डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी संपूर्ण समाजाला करून दिली आहे. सात फेब्रुवारी १९५५ रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारतामध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. शेतकरी बांधवांना पंजाबराव देशमुख यांनी राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण करून दिलं.

शेतकऱ्यांना शेतीला मुबलक ज्ञान मिळावं शेतीच्या नवीन नवीन योजना कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून कृषी विद्यापीठ सुरू केली. आज अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी बांधवांसाठी कार्यरत आहे. इसवी सन १९२७ मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी समाजाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र केसरी नावाच मराठी वृत्तपत्र सुरू केले.

शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असणारा कर्जाचा डोंगर कमी व्हावा म्हणून पंजाबराव देशमुख यांनी १९३३ मध्ये कर्जमाफी अधिनियम मंजूर करण्यामध्ये खूप मोठे योगदान दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या जाचातून मुक्त केले जाईल. पंजाबराव देशमुख यांनी इसवी सन १९२७ मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली. इसवी सन १९५५ मध्ये राष्ट्रीय कृषि सहकारी खरेदी व विक्री महासंघ स्थापन केलं.

११ डिसेंबर १९५९ ते फेब्रुवारी १९६० या दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भव्यदिव्य असं जागतिक कृषी प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित केलं होतं. हे प्रदर्शन साधारण शंभर एकर जागेमध्ये आयोजित करण्यात आले होते याशिवाय कृषी क्रांतीच्या इतिहासामध्ये या प्रदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.

राजकीय आयुष्य

डॉक्टर पंजाबराव देशमुख हे स्वातंत्र्यलढा मध्ये समाविष्ट झाले आणि लोकसभेसाठी चक्क तीन वेळा त्यांची निवड करण्यात आली. इसवीसन १९३६ मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण मंत्री झाले. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंजाबराव देशमुख यांची निवड केली. भारतीय राज्यघटना तयार करण्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

इसवी सन १९५२ ते १९६२ पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून अतिशय निष्ठेने व जबाबदारीने सेवा दिली. इसवी सन १९५२, १९५७ आणि १९६२ असे तीन वेळा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची लोकसभेवर निवड झाली आहे. इसवी सन १९३२ मध्ये हिंदू देवस्थान प्रॉपर्टी विधेयक आणले गेल.

याच प्रमुख उद्दिष्ट होतं ते देवस्थानची मालमत्ता शासनाच्या ताब्यात घ्यावी आणि विधायक काम व्हावे. प्राथमिक शिक्षण संघटना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली. पंजाबराव देशमुख यांना शिक्षणा बद्दल फारच हेवा वाटायचा. शिक्षण हे सर्वांनीच घेतल पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यामध्ये काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी ही संघटना स्थापन केली. “भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा सेवाभाव धरा” हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे ब्रीदवाक्य होते.

आम्ही दिलेल्या dr panjabrao deshmukh information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या panjabrao deshmukh jayanti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of panjabrao deshmukh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये deshmukh in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: