dr rani bang information in marathi डॉ. राणी बंग यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये गडचिरोली या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवणाऱ्या डॉक्टर राणी बंग यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. राणी बंग ह्या हे डॉक्टर आहेत आणि त्यांचे पती अभय बंग सुध्दा डॉक्टर आहेत आणि या दोघांनी मिळून आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केली त्यांनी भारतामधील ग्रामीण भागामधील मोठ्या प्रमाणात होणारा बालमृत्यू आणि प्रजनन आरोग्याशी संबधित मार्ग बदलला. डॉक्टर राणी बंग यांचा भारतातील ग्रामीण भागातील त्रासदायक आरोग्य शिक्षण आणि काळजीचा पहिला सामना हा १९७८ मध्ये सुरु झाला आणि त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यातील कान्हापूर या ठिकाणी त्यांनी लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रयत्न केले.
त्यांनी १९७८ मध्ये कान्हापूर मध्ये स्वताच्या डोळ्याने एका विधवा मजुराच्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू होताना पहिले. त्यांनी २०१८ पर्यंत डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांनी महाराष्ट्र मधील गडचिरोली येथील आदिवासी जिल्ह्यातील अत्यंत खालच्या भागातील सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले आणि त्यांच्या कामगिरीसाठी ह्या जोडप्याला भारताने पद्मश्री पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
डॉक्टर राणी बंग या अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च एन कम्युनिटी हेल्थ या संस्थेची स्थापना केली. डॉक्टर राणी बंग या जिल्ह्यातील एकमेव स्त्री रोग तज्ञ होत्या तसेच त्यांनी ज्यावेळी काम करायला सुरुवात केली होती त्यावेळी त्या परिसरातील पहिली सिजेरियन शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी त्यांच्या समाजसेवे आणि आरोग्यसेवेसोबत लेखन देखील केले आणि त्यांनी गोईण आणि कानोसा हि दोन पुस्तके देखील लिहिली.

डॉ. राणी बंग यांची माहिती – Dr Rani Bang Information in Marathi
नाव | डॉक्टर राणी बंग |
ओळख | डॉक्टर |
शिक्षण | एम. बी. बी एस (MBBS) |
पतीचे नाव | अभय बंग |
मुले | आनंद बंग आणि अमृत बंग |
डॉक्टर राणी बंग यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about rani bang in marathi
राणी बंग ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील होत्या आणि त्यांच्या वडिल हे प्रसिध्द डॉक्टर होते त्यामुळे डॉक्टरकीची संस्कार हे लहानपणी पासून रुजले होते. डॉक्टर राणी बंग यांनी आपले एम. बी. बी एस (MBBS) हे शिक्षण पूर्ण केले आणि मग त्यांनी एम. बी. बी. एस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह समाजसेवक अभय बंग यांच्याशी झाला.
आणि मग त्यांनी विवाहानंतर स्वताला देखील समाजसेवे मध्ये वाहून घेतले. त्यांनी थोड्या दिवसांनी युनायटेड स्टेट्स मधील जॉन हॉपकिन्स मधून स्त्रीरोगशास्त्र या विषयातून पद्युत्तर शिक्षण घेतले. डॉक्टर राणी बंग यांना दोन मुले आहेत आनंद आणि अमृत.
राणी बंग यांची आरोग्यसेवा कशी सुरु झाली
राणी बंग यांची आरोग्य सेवा करण्याची सुरुवात हि १९७८ पासून केली कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर वर्धा जिल्ह्यातील कान्हापूर मध्ये एका विधवा मुजाराच्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे पहिले होते. रायबाई दाबोळे हि महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीला उपचारासाठी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर राणी बंग यांच्याकडे घेऊन गेल्या होत्या.
आणि त्यांनी त्या मुलीला तपासून त्या मुलीला गॅस्ट्रो आणि न्युमोनिया झाल्याचे सांगितले होते आणि तिला एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सांगितले होते जेणेकरून त्या मुलीवर चांगले उपचार होतील परंतु रायबाई दाबोळे ह्या आपल्या मुलाली दवाखान्यामध्ये न नेता त्या शेतामध्ये गेल्या आणि हा प्रकार कळताच डॉक्टर राणी बंग तिच्यावर रागावल्या परंतु त्या महिलेची परिस्थिती तशी होती.
ती एक मजूर होती आणि रोज काम केल्याशिवाय तिला अन्न मिळत नव्हते आणि मुलीला दवाखान्यामध्ये नेण्यासारखी परिस्थिती देखील नव्हती आणि तिला इतर १३ वर्षाचा एक मुलगा आणि ८ वर्षाची एक मुलगी देखील होती त्यामुळे त्या २ वर्षाच्या मुलीला उपचार न मिळाल्या मुळे त्या मुलीचा मृत्यू झाला आणि हे सर्व डॉक्टर राणी बंग यांच्या डोळ्यासमोर घडले आणि त्यावेळी पासून त्यांनी ठरवले कि आपले जीवन हे आरोग्यसेवेसाठी सामार्पित करायचे.
डॉक्टर राणी बंग यांना मिळालेले पुरस्कार – awards
त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन अनेक प्रकारची समाजसेवा केली तसेच त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे आरोग्यसेवा करण्यातच घालवले आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या लाख मोलाच्या कामगिरीसाठी सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले. चला तर आता आपण त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ते पाहूया.
- डॉक्टर राणी बंग यांना २०१८ मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला आहे.
- २००३ मध्ये त्यांना त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने दिला आणि त्यांना सन्मानित केले.
राणी बंग यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts
- राणी बंग यांनी महिलांच्या वैद्यकीय समस्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर काम केले आणि किशोरवयीन लैंगिक आरोग्य शिक्षणाबाबत त्या उत्कट होत्या.
- शिक्षणतज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या मागणीच्या आधारे डॉक्टर राणी बंग यांनी दिलेली माहिती एका नवीन पुस्तकामध्ये संकलित केली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील तरुणांना सर्वसमावेशक लैंगिक आरोग्य शिक्षण देण्यासाठी डॉक्टर राणी बंग यांचा उपक्रम हा भारत आणि उर्वरित जगासाठी एक आदर्श होता.
- डॉक्टर राणी बंग यांना त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाले.
- त्यांनी युनायटेड स्टेट्स मधील जॉन हॉपकिन्स मधून स्त्रीरोगशास्त्र या विषयातून पद्युत्तर शिक्षण घेतले आहे.
- त्यांनी आणि त्यांच्या पतीने म्हणजेच अभय बंग यांनी १९७८ पासून २०१८ पर्यंत आरोग्य सेवा केली.
आम्ही दिलेल्या dr rani bang information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डॉ. राणी बंग यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rani bang in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट