डॉ झाकीर हुसेन माहिती Dr Zakir Hussain Information in Marathi

dr zakir hussain information in marathi डॉ झाकीर हुसेन माहिती, भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील भारतामध्ये राजकर्ते, नेते आणि राजकारणी लोक होऊन गेले आणि डॉ. झाकीर हुसेन देखील त्यामधील एक होते जे भारताचे राष्ट्रपती होते आणि आज आपण या लेखामध्ये डॉ झाकीर हुसेन यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. डॉ झाकीर हुसेन हे १९६७ ते १९६९ या काळामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या काळामध्ये भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी दोन वर्ष काम केले होते.

आणि ते फक्त भारतामधील एक राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय नाहीत तर ते एक महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या नायकांपैकी देखील एक आहेत कारण ते शिक्षणाचे सर्वात मोठे प्रवर्तक होते. त्याचबरोबर त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून देखील काम केले होते आणि त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून देखील शपथ घेतली होती.

डॉ झाकीर हुसेन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ मध्ये भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील फरुखाबादच्या कैमगंज जिल्ह्यामध्ये झाला आणि यांचा जन्म जरी भारतीय असला तरी त्यांचा कौटुंबिक इतिहास हा पाकीस्थान आणि अफगाणिस्थानमधील सीमावर्ती भागामध्ये असलेल्या पुश्तून जमातींकडे सापडतो.

डॉ झाकीर हुसेन यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे इटावा या ठिकाणी असणाऱ्या इस्लामिया हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि ते पुढे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. चला तर मग डॉ झाकीर हुसेन यांच्याविषयी खाली आपण सविस्तर माहिती पाहूया.

dr zakir hussain information in marathi
dr zakir hussain information in marathi

डॉ झाकीर हुसेन माहिती – Dr Zakir Hussain Information in Marathi

नावडॉ. झाकीर हुसेन
जन्म८ फेब्रुवारी १८९७
जन्म ठिकाण भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील फरुखाबादच्या कैमगंज जिल्ह्यामध्ये झाला
ओळखभारताचे तिसरे राष्ट्रपती
पालकफिदा हुसेन खान आणि नाजनीन बेगम असे होते
पत्नीशाहजहान बेगम
मृत्यू३ मे १९६९

डॉ झाकीर हुसेन यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about dr zakir hussain in marathi

डॉ झाकीर हुसेन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ मध्ये भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील फरुखाबादच्या कैमगंज जिल्ह्यामध्ये झाला आणि ते १० ते १४ वर्षाचे असताना त्यांच्या आईचा आणि वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फिदा हुसेन खान आणि आईचे नाव नाजनीन बेगम असे होते.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे इटावा या ठिकाणी असणाऱ्या इस्लामिया हायस्कूलमध्ये पूर्ण केले अनिमाग त्यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी म्हणजेच कॉलेजच्या शिक्षणासाठी अँग्लो मुहम्मद ओरीएंटल कॉलेजमध्ये जे अलीगड मध्ये आहे त्या ठिकाणी कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आणि यांच्या बद्दल असे म्हटले जाते कि या कॉलेजमधुनच त्यांच्या राजकारणाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

त्यांनी त्यांचे शिक्षण हे काळी थांबवले होते आणि नंतर त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी अर्थशास्त्र मध्ये पीएचडी (PHD) करण्यासाठी ते जर्मनीला गेले आणि त्यांचा उच्च शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश हा होता कि ब्रिटीशांच्याविरुध्द स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारताला मदत करण्यासाठी मुख्य साधन म्हणून शिक्षणाचा वापर करणे हा होता.

डॉ झाकीर हुसेन यांची कारकीर्द – career

 • डॉ झाकीर हुसेन यांची राजकारणाची कारकीर्द हि मुहम्मद ओरीएंटल कॉलेजमधून झाली कारण ते या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना विद्यार्थी संघटनेचे नेता म्हणून संपूर्ण भारताला ओळख मिळाली.
 • त्याचबरोबर ते शिक्षणाचे सर्वात मोठे प्रवर्तक देखील होते आणि त्यांनी २९ ऑक्टोबर १९२० मध्ये अलिगढ या ठिकाणी राष्ट्रीय मुस्लीम विद्यापीठाची स्थापना केली होती आणि त्यावेळी ते दिल्ली मध्ये स्तलांतरित झाली आणि ज्यावेळी त्यांनी हि शिक्षण संस्था स्थापन केली त्यावेळी त्यांचे वय हे फक्त २३ वर्ष होते.
 • १९२७ मध्ये जामिया मिलीया इस्लामिया हे विद्यापीठ बंद होण्याच्या मार्गावर होते परंतु डॉ झाकीर हुसेन यांच्या प्रयात्नांच्यामुळे हि शैक्षणिक संस्था टिकून राहण्यास मदत झाली.
 • डॉ झाकीर हुसेन हे जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांनी हि जबाबदारी २२ वर्ष पार पाडली.
 • तसेच त्यांनी एक शिक्षक म्हणून त्यांच्या काळामध्ये महात्मा गांधी आणि हकीम अजमल खान यांच्या शिकवनीचा प्रचार केला.
 • तसेच १९३० मध्ये देशामध्ये झालेल्या अनेक शैक्षणिक सुधारणा चळवळीचे ते सक्रीय सदस्य होते.
 • मुहम्मद ओरीएंटल कॉलेजमध्ये ते कुलगुरू म्हणून आपली कामगिरी बजावत असताना डॉ झाकीर हुसेन हे अनेक शिक्षकांना पाकिस्थानाचे वेगळे राज्य निर्माण करण्यास पाठींबा देण्यापासून रोखू शकले.
 • २३ ऑक्टोबर १९३७ मध्ये त्यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांनी मुलभूत शिक्षणाची योजना तयार करून डिसेंबर १९३७ मध्ये अहवाल तयार केला.
 • डॉ झाकीर हुसेन यांना राजकारणाची देखील आवड असल्यामुळे ते कॉलेज मध्ये असतानाच राजकारणात पडले होते आणि ते १९५६ मध्ये भारतीय संसदेचे सदस्य बनले आणि सदस्या म्हणून एक वर्ष कामगिरी बजावली.
 • कुलगुरू म्हणून त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना १९५६ मध्ये संसदेच्या उच्च सभागृहात नामांकन देण्यात आले आणि तसेच राज्यसभा सदस्य झाल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतर त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 • त्याचबरोबर त्यांनी १९५७ ते १९६२ हि पाच वर्ष बिहारचे राज्यपाल म्हणून कामगिरी बजावली.
 • त्यांचा पाच वर्षाचा राज्यपालचा कार्यकाळ संपल्यानंतर ते लगेच भारताच्या उपराष्ट्रपती पदावर नेमले गेले आणि १३ मे १९६७ रोजी त्यांची नेमणूक हि भारताचे राष्ट्रपती म्हणून करण्यात आली आणि हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते आणि पहिले मुस्लीम राष्ट्रपती होते.

डॉ झाकीर हुसेन यांना मिळालेले पुरस्कार – awards

डॉ झाकीर हुसेन यांनी भारतामधील शिक्षणामध्ये आणि राजकारणामध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यामुळे त्यांना नावाजलेल्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते आणि ते पुरस्कार कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

 • डॉ झाकीर हुसेन यांना १९५४ मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
 • त्याचबरोबर त्यांना १९६३ मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते आणि भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे.

डॉ झाकीर हुसेन यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts

 • डॉ झाकीर हुसेन यांचा विवाह १९१५ मध्ये म्हणजेच वयाच्या १८ व्या वर्षी शाहजहान बेगमशी झाला आणि यांना सईदा खान आणि साफिया खान अश्या दोन मुली देखील होत्या.
 • डॉ झाकीर हुसेन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ मध्ये भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील फरुखाबादच्या कैमगंज जिल्ह्यामध्ये झाला.
 • यांचा जन्म जरी भारतीय असला तरी त्यांचा कौटुंबिक इतिहास हा पाकीस्थान आणि अफगाणिस्थानमधील सीमावर्ती भागामध्ये असलेल्या पुश्तून जमातींकडे सापडतो.
 • त्यांनी १९२० मध्ये अलिगढ या ठिकाणी मुस्लीम विद्यापीठाची स्थापना केली.
 • त्यांनी सलग पाच वर्ष बिहारचे राज्यपाल म्हणून कामगिरी बजावली.
 • डॉ झाकीर हुसेन यांनी अर्थशास्त्र पीएचडी ( PHD ) चे शिक्षण हे जर्मनीमधून पूर्ण केले आणि परत भारतामध्ये परतले.

आम्ही दिलेल्या dr zakir hussain information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉ झाकीर हुसेन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr zakir hussain information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dr zakir hussain in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!