माझा आवडता सण दसरा निबंध Dussehra Essay in Marathi

Dussehra Essay in Marathi माझा आवडता सण दसरा निबंध भारत हा देश संस्कृती प्रधान देश आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक राहतात आणि सर्व लोक आपल्या आपल्या धर्मानुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि भारतामध्ये असे अनेक मोठ मोठे सण साजरे केले जातात आणि हे सण सर्व धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र येऊन साजरे केले जातात. भारतामध्ये दिवाळी, दसरा, गणेश जयंती, महाशिवरात्री, नागपंचमी, बैल पोळा, होळी, पोंगल, रंगपंचमी, लोहरी यासारखे अनेक सण साजरे केले जातात.

आणि यामधील एक महत्वाचा आणि पावित्र्य जपणारा सण म्हणजे दसरा. दसरा हा सण भारतामध्ये सर्व ठिकाणी केला जातो आणि पण हा सण मोठ्या प्रमाणत कर्नाटक राज्यामध्ये साजरा केला जातो. दसरा सणाच्या अगोदर ९ दिवस नवरात्र साजरे केले जातात आणि या नऊ दिवसामध्ये दुर्गादेवीची पूजा केली जाते आणि कडक उपवास केला जातो आणि या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत.

म्हणजेच मिठाचे पदार्थ किंवा मीठ नऊ दिवस वज्र केले जाते आणि नऊ दिवस फक्त फळे, दुध असे पदार्थ खाल्ले जातात. नऊ दिवस उपवास आणि पूजा झाल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण असतो आणि या दहाव्या दिवसाला विजयादशमी या नावाने देखील ओळखले जाते. दसरा हा सण साजरा करण्याचे एक मुख्य कारण आहे कारण या दिवशी प्रभू श्री रामांनी रावण या रक्षाचा वध करून विजय मिळवला होता आणि म्हणूनच या दिवशी दसरा हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो.

dussehra essay in marathi
dussehra essay in marathi

माझा आवडता सण दसरा निबंध – Dussehra Essay in Marathi

Dasara Essay In Marathi

अश्विन शुध्द दशमीच्या दिवशी दसरा साजरा केला जातो कारण प्रभू श्री रामांनी याचा दिवशी रावणाचा वध केला होता. त्याचबरोबर दसऱ्या विषयी असे देखील म्हटले जाते कि दसऱ्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला होता आणि म्हणूनच भारतामध्ये काही लोक दुर्गा देवीची पूजा करून दसरा हा सण साजरा करतात, तर काही लोक रावणाच्या पुतळ्याचे दहन करून हा दिवस साजरा करतात.

विजयादशमी दिवशी जे पुतळे जाळले जातात ते रावणाचे, मेघनाथाचे किंवा कुंभकर्णाचे असतात. दसरा हा सण सत्त्यावर विजय म्हणून साजरा केला जातो तसेच हा सण भारतातील हिंदू धर्माच्या लोकांच्या मार्फत केला जातो तसेच हा सण भारतातील मोठ्या सनापैकी एक म्हणून मनाला जातो आणि या सणाबद्दलची अशी शिकवण आहे. कि वाईट गोष्टींच्या वर चांगल्या गोष्टींचा विजय होतो याचे उत्तम उदाहरण आहे.

Essay On Dussehra in Marathi

दशहरा हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे आणि हि कथा अशी आहे. कि महिषासुर या राक्षसाने पृथ्वीवरील लोकांचा छळ केला होता तसेच काही लोकांना मारले होते आणि त्यांची घरे उद्वस्त केली होती तसेच त्याने स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील त्रास दिला होता त्यांना डांबून ठेवले होते.

तसेच स्वर्गातील देव महिषासुराला घाबरत होते आणि ते त्याच्या समोर त्याचा वध करण्यासाठी जात नव्हते आणि त्यावेळी स्वर्गातील लोकांनी दुर्गादेवीकडे विनंती केली आणि त्याचा वध करण्यास सांगितले त्यावेळी दुर्गा देवीने शक्ती आणि शौर्याचे मूर्त रूप घेवून महिषासुराचा वध केला आणि त्यामुळे पृथ्वीवरील लोकांना आणि स्वर्गातील देवांना होणारा त्रास कमी झाला आणि तिचा विजयाचा दिवस आणि तिचा सन्मान करण्यासाठी दसरा किंवा विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो.

तसेच असे देखील म्हटले जाते कि या दिवशी श्री रामांनी रावणाचा वध करून वाईटावर सत्याचा विजय मिळवून जगासमोर एक उदाहरण ठेवले आणि म्हणून विजयादशमी दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. दसरा हा सण भारतामध्ये दहा दिवस साजर केला जातो आणि वर सांगितल्या प्रमाणे नऊ दिवस उपवास करून दहाव्या दिवशी लोक उपवास सोडला जातो.

तसेच त्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात आणि अपट्या पाने एकमेकांना देतात. दसरा हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो आणि हा सण उत्तर भारतामध्ये नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो. सणाचे नऊ दिवस उपवास केला जातो आणि तो नवव्या किंवा दहाव्या दिवशी सोडला जातो.

गुजरात मध्ये दसरा या सणाला गरभा किंवा दांडिया खेळला जातो आणि हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे जो आता सर्व भारतभर खेळला जातो. देशाच्या पूर्व आणि पश्चिम बंगाल, ओडीसा आणि आसाम मध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच भारताच्या काही भागामध्ये म्हणजे शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये या सणाला छोटे छोटे मंडप घालून मातीच्या बनवलेल्या दुर्गा मूर्ती पुजल्या जातात आणि त्यांची नऊ दिवस पूजा केली जाते आणि काही मंडळे महाप्रसाद घालतात आणि अन्नदानाचे पुण्यांचे काम करतात.

दुर्गा पूजा नऊ दिवस केली जाते आणि नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे आणि नवीन कपडे घालतात. शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये एकाद्या विस्तृत भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सजावट केली जाते आणि त्या भागामध्ये दिव्यांची रोशनाई केली जाते आणि तेथे गरबा आणि दांडिया यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात तसेच शेवटच्या दिवशी काही ठिकाणी रामलीला तसेच रावण दहन देखील केले जाते.

या सणामुळे अनेक लोकांना आर्थिक मदत होते तसेच रोजगाराची संधी मिळते कारण या सणाला भारतामध्ये काही ठिकाणी दुर्गा मातेच्या पुतळे पूजले जातात आणि हे पुतळे बनवणाऱ्यांना काम मिळते तसेच अनेक प्रकारे लोकांच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील हातभार लागतो. देशाच्या दक्षिणेकडील भागामध्ये लोकांचे दसरा साजरा करण्याची पद्धत थोडो वेगळी आहे.

कारण दक्षिण भागातील लोक घरामध्ये असणारी सर्व धातूची उपकरनांच्या सोबत देवी सरस्वतीची आणि आणि प्रभू श्री रामांची पूजा केली जाते आणि दसरा साजरा केली जाते. तसेच काही ठिकाणी दुर्गा मूर्तीचे पूजन करतात त्या मुर्त्यांचे दहाव्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन केले जाते.

तसेच दसरा हा सण कर्नाटक राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो आणि कर्नाटकातील म्हैसूर या ऐतिहासिक शहरामध्ये म्हैसूर पॅलेसमध्ये मोठ्या दिमाखात दसरा हा सण साजरा केला जातो. अश्या प्रकारे दसरा हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या Dussehra Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता सण दसरा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on dasara in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dussehra in marathi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dussehra essay in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!