अंडा बिर्याणी रेसिपी मराठी Egg Biryani Recipe in Marathi

Egg Biryani Recipe in Marathi – Anda Biryani Recipe in Marathi अंडा बिर्याणी रेसिपी मराठी एग बिर्याणी रेसिपी मराठी बिर्याणी हा प्रकार सर्वांच्या आवडीचा असतो तो कोणताही का असेना, आपण बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार बनवतो जसे कि व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी, एग बिर्याणी अश्या प्रकारे आपण बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार बनवून खातो त्यामधील एक प्रसिध्द प्रकार म्हणजे अंडा बिर्याणी कारण अंडा बिर्याणी खूप लोक आवडीने खातात आणि लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वजन ह्या बिर्याणीचा आस्वाद घेवू शकतात. अंडा बिर्याणी हि एक भारतीय डिश आहे जी आपण कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, किती पार्टी आणि वाढदिवस अश्या कार्यक्रमामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे.

आज या लेखामध्ये आपण अंडा बिरयानी कशी बनवायची याबद्दल माहिती घेणार आहोत. अनाद बिर्याणी हि एक अशी रेसिपी आहे कि ज्यामध्ये सुंगधी तांदूळ, टोमॅटो, कांदा, अंडी आणि वेगवेगळे मसाले वापरले जातात.

egg biryani recipe in marathi
egg biryani recipe in marathi

अंडा बिर्याणी रेसिपी मराठी – Egg Biryani Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळी३० ते ३५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास
वाढणी३ ते ४ व्यक्ती

अंडा बिर्याणीमध्ये लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • अंडी : अंडी हा घटक या रेसिपी मधील मुख्य घटक आहे कारण आपण अंडी घालून बिर्याणी करणार आहोत. ही रेसिपी बनवतेवेळी आपण अंडी मसाल्यामध्ये परतवतो आणि मग त्याचा एक थर आणि भाताचा एक थर अश्या प्रकारे अंडा बिर्याणी बनवली जाते.
  • राईस : आपण बिर्याणी बनवण्यासाठी जे तांदूळ वापरणार आहे ते लांब असावेत आणि ते चांगल्या दर्ज्याचे आणि सुगंधित असावेत त्यामुळे आपली बिर्याणी चांगली बनण्यास मदत होते. आपण बिर्याणीसाठी दावत बिर्याणी बासमती तांदूळ, फॉर्च्यून बिर्याणी स्पेशल बासमती तांदूळ किंवा इंडिया गेट यासारखे तांदूळ बिर्याणी बनवण्यासाठी वापरा.
  • खडे मसाले : खड्या मसाल्यांच्यामुळे बिर्याणीला खमंग वास आणि स्वाद देखील येतो त्यामुळे बिर्याणीमध्ये वापरले जाणारे खडे मसाले हे चांगल्या दर्ज्याचे असावेत.

अंडा बिर्याणी रेसिपी – anda biryani recipe in marathi

अंडा बिर्याणी हि रेसिपी भारतामध्ये अगदी आवडीने खाल्ली जाणारी डिश आहे आणि हि डिश भारताच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण जरी हि रेसिपी वेगवेगळ्या पध्दतीने बनत असली तरी तो पदार्थ खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच असतो. अंडा बिर्यांनी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे परंतु हा पदार्थ बनवण्यासाठी वेळ लागतो आणि जरी वेळ लागत असला तरी ती बिर्याणी खाल्ल्यानंतर आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी घालवलेल्या वेळेचे समाधान वाटते. चला तर मग पाहूयात अंडा बिर्याणी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळी३० ते ३५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास
वाढणी३ ते ४ व्यक्ती

अंडा बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make anda biryani 

अंडा बिर्याणी बनवण्यासाठी अंडी, तांदूळ आणि खडे मसाले हे महत्वाचे साहित्य लागते त्याचबरोबर आपल्याला इतर साहित्य जसे कि कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि मीठ यासारखे साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. आता खाली आपण अंडा बिर्याणी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी लांब बासमती तांदूळ.
  • ४ अंडी.
  • १ मोठा कांदा ( उभा चिरलेला ).
  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो ( उभे बारीक चिरलेले ).
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • २ चमचे गरम मसाला.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १/२ वाटी दही फेटलेले.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोथिंबीर.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

खडे मसाले 

  • २ दालचिन तुकडे.
  • २ ते ३ बदाम फुल.
  • ३ ते ४ वेलदोडे.
  • ३ ते ४ लवंग.
  • ५ ते ६ काळी मिरी.
  • ३ तमाल पत्री पाने.

अंडा बिर्याणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – how to make anda biryani recipe in marathi

  • सर्वप्रथम तांदूळ एक भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून ते २० मिनिटे पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि २० मिनिटे तांदूळ चांगले भिजले कि त्यामधील पाणी काढून त्यामध्ये स्वच्छ दीड वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये तमाल पत्री पाने, लवंग आणि मीठ ( चवीनुसार )घालून ते मध्यम आचेवर शिजवण्यासाठी ठेवा आणि ते तांदूळ ८० टक्के शिजवून घ्या.
  • तांदूळ शिजवतेवेळी दुसरीकडे एका भांड्यामध्ये पाणी घाला आणि त्यामध्ये अंडी घालून त्यावर झाकण लावून ती देखील मोठ्या आचेवर उकडून घ्या आणि १० मिनिटांनी अंडी उकडल्यानंतर गॅस बंद करू ती थंड झाली कि सोलून बाजूला ठेवा.
  • आता एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घाला आणि तो थोडा वेळ भाजा आणि मग त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि मग कांदा लालसर होईपर्यंत भाजा.
  • आता त्यामध्ये २ दालचिन तुकडे, २ ते ३ बदाम फुल, ३ ते ४ वेलदोडे आणि ३ ते ४ लवंग टाका आणि ते थोडा वेळ भाजा त्यामुळे मिश्रणाला खमंग वास सुटेल.
  • आता या मध्ये टोमॅटो घाला आणि तो तेलामध्ये भाजून, थोडा वेळ शिजवून घ्या ( टीप : टोमॅटो पासून तेल वेगळे होईपर्यंत टोमॅटो शिजवा ).
  • आता यामध्ये गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ घाला आणि ते मिश्रण एकत्र करा.
  • मग त्यामध्ये फेटलेले दही घालून ते दही सगळ्या मिश्रणामध्ये चांगले एकजीव करा आणि २ मिनिटे हलवत रहा. आता त्यामध्ये उकडून सोललेली अंडी घाला आणि ते चांगले एकत्र करून त्या मिश्रणाला चांगली वाफ आणा आणि गॅस बंद करा.
  • आता ज्या कुकर मध्ये बिर्याणीला दम देणार आहोत तो कुकर घ्या आणि त्याला खाली तूप लावून घ्या.
  • मग खाली थोडा ८० टक्के शिजवलेला भात पसरा आणि त्यावर थोडे केसरचे पाणी शिंपडा मग त्यावर आपण तयार केलेली ग्रेवी २ अंड्यांच्यासोबत पसरा मग त्यावर थोडासा ८० टक्के शिजवलेला भात पसरा आणि त्यावर परत केसरचे पाणी शिंपडा आणि परत राहिलेली सर्व ग्रेवी त्या भाताच्या थरावर पसरवून त्यावर राहिलेला भात पसरा आणि त्यावर केसरचे पाणी शिंपडून कुकरला झाकण लावून घ्या आणि २ ते ३ मिनिटे मंद आचेवर आणि ५ मिनिटे मध्यम आचेवर बिर्याणी वाफवून घ्या किंवा मध्यम आचेवर कुकरला एक शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्या, मग गॅस बंद करा.
  • आता आपण बिर्याणी सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेवून त्यावर तळलेला कुरकुरीत कांदा, कोथिंबीर आणि लिंबूची फोड ठेवून सर्व्ह करा.

अंडा बिर्याणी कश्या सोबत सर्व्ह करू शकतो – serving suggestions

  • अंडा बिर्याणी आपण कांदा रायत्यासोबत सर्व्ह करू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • मसालेदार आणि सुगंधी अंडा बिर्याणी बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ, ताजे मसाले आणि ताजे तूप वापरा.
  • जर आपल्याला काजू आवडत असतील तर आपण अंडा बिर्याणीमध्ये काजू देखील वापरू शकतो ( काजू ग्रेव्ही बनवतेवेळी ग्रेव्ही मध्ये टाका ).
  • चांगल्या दर्जाचे अख्खे मसाले आणि मसाले पावडर वापरा ज्यामुळे अंडा बिर्याणीला चांगली चव येते.
  • जर तुम्हाला बिर्याणी खूप तिखट आवडत असेल तर ग्रेवीमध्ये २ ते ३ हिरव्या मिरच्या मोडून टाकल्या तरी चालतील.

आम्ही दिलेल्या egg biryani recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अंडा बिर्याणी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या spicy egg biryani recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make egg biryani recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये egg dum biryani recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!